Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 28, 2023 in जीवन प्रकाश

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक ७

शेवटचा काळ

देवाचे राज्य यावर विचार करताना त्याचा उद्देश काय आहे, ते युगारंभापासून कसे सुरू आहे, ते दृश्य स्वरूपात कसे आहे, अदृश्य स्वरूपात कसे आहे, जुन्या करारात त्याची वाटचाल कशी झाली, नव्या करारात त्याचे कसे स्थित्यंतर झाले, भावी काली त्याचे स्वरूप कसे असणाऱ आहे, एवढे सारे विचारात घेऊन त्यापैकी कोणत्या विषयावर वचन बोलत आहे हे समजणे आता तुम्हाला नक्कीच सोपे जाईल. तरी अजून भावी काळातील या राज्याचे स्वरूप अजून तुम्हाला समजून घ्यायचे आहे. तर पाहू या – हजार वर्षांचे राज्य.

आतापर्यंतच्या अभ्यासानुसार आपण सध्या नव्या कराराच्या काळाच्या अखेरच्या टप्प्यात आहोत. अखेरचे जागतिक मानवी साम्राज्य हे ख्रिस्ताविरोध्याचे असेल व ते ७ वर्षांच्या महासंकटाच्या काळात होईल. त्या काळात देवाच्या योजनेच्या केंद्रस्थानी इस्राएल राष्ट्र असेल. त्या काळात त्यांचा अतोनात छळ होईल. हा त्यांचा तारणाचा व राष्ट्र म्हणून जिर्णोद्धाराचाही काळ असेल.

अखेर येशूचे द्वितीयागमन होऊन येशू ख्रिस्तविरोध्याच्या अखेरच्या मानवी राज्याचा नायनाट करून इस्राएल राष्ट्राला पुन्हा आपल्या योजनेत व्यासपीठावर आणून पुढची भाकिते पूर्ण करील. त्याचाच एक भाग म्हणजे एक हजार वर्षांचे ख्रिस्ताचे प्रत्यक्ष दृश्य राज्य या पृथ्वीवर स्थापित होईल.

त्या राज्यात इस्राएल व या भूतलावरील सर्व राष्ट्रे असतील. इस्राएल राष्ट्र म्हणजे अब्राहामाचे संतान म्हणूनच चालत आलेले जुन्या करारातले  राष्ट्र. त्याची मंडळीशी गल्लत करता कामा नये. आरंभीची ख्रिस्ती मंडळी यहुद्यांतूनच तारण आल्याने त्यांच्यापासूनच सुरू झाली होती. त्यामुळे मंडळीत यहूदी व विदेशांतूनही तारण पावलेले लोक आहेत. मंडळीचा वापर देव विदेश्यांच्या तारणासाठी आजवर करून घेत आहे. मंडळीला वचनात कोठेही इस्राएल संबोधलेले नाही. आता इस्राएलांसाठी व मंडळीसाठी देवाची खास स्वतंत्र योजना आहे. मंडळी इस्राएलाविषयी देवाचा करार पूर्ण होण्याची वाट पाहात आहे. तो एक हजार वर्षांच्या काळात पूर्ण झालेला दिसेल.  तेव्हा ते राष्ट्रांमध्ये नेत्याची भूमिका बजावतील. तर मंडळी ख्रिस्तासोबत राज्य करील. या राज्यातील इस्राएल राष्ट्राचे वर्णन यहेज्केल ३८-४८ अध्यायामध्ये सुरेख केले आहे. तर महासंकट काळाचे वर्णन प्रगटी ६ ते १८ अध्यायांमध्ये दिले आहे. मंडळी व इस्राएल याविषयी समजून घेऊ या.

इस्राएल – जुन्या कराराच्या इतिहासात अब्राहामाशी झालेला करार, या राष्ट्राचा उगम व पुढे काय झाले ते आपण पाहिले. इस्राएल दोन प्रकारे राष्ट्रांना आशीर्वाद होणार होते.

एक, त्यांच्याद्वारे जगाचे तारण करणारा देवाचा पुत्र मशीहा जगात जन्माला येणार होता. उत्पत्ती ३:१५ व १२:२-६ ची भाकिते, गलती  ४:४; ३:१६ नुसार पूर्ण झाली व तो उत्पत्ती ४९:८-१२ मधील आशीर्वादाप्रमाणे यहूदा वंशातून आला.

दुसरे, इस्राएलने इतर राष्ट्रांचे पुढारपण व सेवा करण्याची भूमिका पार पाडायची होती. देवाने मशीहाच्या यशस्वी राज्याची योजना आखली आहे. यशया ५२:१३. मशीहाच्या राजसत्तेखाली ही भूमिका पार पाडायला इस्राएलांचा देव वापर करून घेणार आहे. यशया २:२-४. इस्राएलांना जसे वतन  देऊन देवाने आशीर्वादित केले होते तसे देव इतर राष्ट्रांनाही आशीर्वादित करणार आहे. यशया २७:६.

ही इस्राएलांची भूमिका पुढे कशी अमलात येणार हे समजून घेण्यापूर्वी त्यांचा भूतकाळ थोडा लक्षात घेऊ या. जुन्या कराराचा अभ्यास करताना अखेर त्यांची स्वतंत्र राजवट राहिली नाही हे आपण पाहिले. मग संदेष्ट्यांनी आपली भूमिका तीन प्रकारे संदेश देऊन पार पाडली.
१- मोशेच्या काळात केलेले करार मोडल्याबद्दल त्यांना धमकावले. यहेज्केल १-२४ अध्याय, मीखा १-३
   अध्याय.
२- राष्ट्र म्हणून त्यांना भाकिते व इशारे दिले. यशया १३-२३ अध्याय, यहेज्केल २५-३२ अध्याय.
३- येणार्‍या गौरवी राज्यात मशीहाच्या अधिपत्याखाली इस्राएलचा जीर्णोद्धार होऊन त्यांच्याद्वारे इतर राष्ट्रे आशीर्वाद पावतील याविषयी सांत्वनदायी व आशेची अभिवचने दिली. यशया २:२-४. १९:२४-२५; आमोस ९:११-१५.

या योजनेअंतर्गत जुन्या कराराच्या या संदेष्ट्यांनी वर्णन केलेला राजा व त्या राज्याचा संदेश सादर केला. मत्तय ४:१७. पण त्यांच्या नगरांनी त्या राजाचा (येशूचा) व त्याच्या संदेशाचाही धिक्कार केला. मत्तय. ११:२०-२४; २३;३७-३९;  धर्मपुढार्‍यांनी तो सैतानाच्या सहाय्याने भुते काढतो असे आरोप केले. मत्तय १२:२४. इस्राएलांच्या येशूवरील अविश्वासाचा योहान १:११ परिणाम असा झाला की ७० साली इस्राएलांचे मंदिर व यरुशलेम नगर धुळीस मिळाले. दानी ९:२६. येशूनेही हे भाकीत केले होते. मत्तय २३:३८. लूक १९:४१-४४. २१:२०-२४. त्यानंतर त्यांना विदेशी सत्तांकडून अमानुष छळाच्या अनुभवातून जावे लागले.

आता भावी घटनांशी इस्राएलाचा कसा संबंध लागतो – येशू या जगात येण्याची तारणार्‍याविषयीची पहिली भूमिका पूर्ण झाली. यशया ४९:३, गल. ४:४-५; ३:१६. येशू जो इस्राएलांचे अखेरचे संतान, त्याने कोणत्याही व्यक्तिला येशूने सिद्ध केलेले तारण पश्चात्तापपूर्वक स्वीकारल्यास पापक्षमा व पवित्र आत्म्याचे वास्तव्य ही देऊ केली आहेत. येशूचे पहिले आगमन व दुसरे आगमन यांच्या मधल्या काळात हे कार्य तो मंडळीकडून करून घेत आहे. आपण या काळात आहोत. इस्राइल राष्ट्र तात्पुरते बाजूला ठेवले आहे. प्रमुख राष्ट्र म्हणून या पृथ्वीवर इतर राष्ट्रांची सेवा करण्याविषयी त्यांचे भाकीत पूर्ण व्हायचे राहिले आहे. यशया अध्याय ११ व ६५:१७-२५ मध्ये वर्णन केलेले ते राज्य असेल. सध्या मात्र ते मशीहाच्या पहिल्या आगमनाच्या वेळी त्याला धिक्कारल्याबद्दलच्या परिणामामधून ते जात आहेत. मशीहाचा भेट घेण्याचा समय त्यांनी ओळखला नाही. त्यामुळे ७० सालापासून ते कष्ट भोगत आहेत. सध्याचा विदेश्यांचा, मंडळीचा, कृपेचा काळ आहे. भावी कालामध्ये इस्राएल राष्ट्राचे तारण होण्यासाठी जे निवडलेले अवशिष्ट आहेत त्यांना ‘देवाचे इस्राएल’ म्हटले आहे. गलती ६:१६.  जखर्‍या १२:१० प्रमाणे देवाच्या कृपेचा आत्मा त्यांच्यावर येईल. येशूच्या आगमनसमयी ज्यांनी भोसकले तेही त्याला पाहातील. त्याला ओळखतील व शोक करतील.

दानी ९:२७ नुसार त्यांच्यावर ख्रिस्तविरोध्याच्या राज्यातील ७ वर्षांचा संकटकाळ येईल. त्यात त्यांच्या छळासोबतच तारण होणेही सुरू होईल. सात वर्षांच्या दुसर्‍या टप्प्यात ख्रिस्ताविरोधी मंदिरात अमंगळ कृत्य करील. मत्तय २४:१५; २ थेस्स २:३-४; तो काल इस्राएलांसाठी क्लेशाचा असेल. यिर्मया ३०:७. राष्ट्रे यरुशलेमावर चालून येतील, पण येशूचे द्वितीयागमन होऊन तो इस्राएलांना सोडवील. व आपले १००० वर्षांचे राज्य स्थापील. जखर्‍या १४:१-९. मग यरुशलेमातून राष्ट्रांचा न्याय होईल. आणि देवाचे  भाकीत पूर्ण होईल. इस्राएल एक महान राष्ट्र म्हणून नव्हे तर देव आपल्या कराराशी एकनिष्ठ आहे म्हणून देवाने इस्राएलांचा कायमचा धिक्कार केलेला नाही.

                                                          
                                                            प्रश्नावली

प्रश्न १ला – (अ) यशया ११:६-१० वचने वाचून मशीहाच्या राज्याविषयीची पुढील वाक्ये पूर्ण करा.                                   

१- लांडगा————
२- चित्ता———
३- ——— एकत्र रहातील
४- त्यांस ——- वळील.
५———-एकत्र चरतील
६- त्यांचे बच्चे ——-
७ – सिंह ———
८- तान्हे बाळ ———–खेळेल.
९- —— मूल     ———— हात लाविल.
१०- सगळ्या पवित्र डोंगरावर ती ———- व ———–नाहीत.
११- सागर जसा ———- तशी ———– होईल.
१२- मशीहाला राष्ट्रे ——-                                         

(ब) यशया ६५:१७-२५ वाचून नवे आकाश व नवीन पृथ्वीचे वर्णन करणारी वाक्ये पूर्ण करा.              

१- पूर्वीच्या गोष्टी कोणी ———
२ – ———- चा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही
३- ———- तिच्यात जन्मास येणार नाही.
४- ———— असा म्हातारा तिच्यात असणार नाही.
५- तरुण ———होऊन मरेल.
६- ते —— रहातील, ———- त्यांचे फळ खातील.
७- ते ———- आणि ——— असे व्हायचे नाही.
८- माझे निवडलेले ———-
९- त्यांचे ———— नाहीत.
१०- ————– ते जन्म देणार नाहीत.
११———— मी उत्तर देईन.
१२- ———- तोच मी त्यांचे ऐकेन
१३- सर्पाचे  खाणे ——— असे परमेश्वर म्हणतो.


प्रश्न २ रा – दिलेल्या संदर्भ वचनांवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या/ जागा भरा.
                                                         

१- यहेज्केल ३८:१९-२३  वचने वाचून पुढील वाक्ये पूर्ण करा.

देव क्रोधाग्नीने —- होऊन बोलत आहे. इस्राएल देशात मोठा———- समुद्रातील —- , आकाशातील—-, वनातले—-, जमिनीवर ——-   सर्व प्राणी व —— राहणारी सर्व —– माझ्यासमोर —- कापतील. —– नष्ट होतील. —–   खचतील. हरएक —- कोसळून —– होईल. प्रत्येकाची —- आपल्या —- चालेल.—— व——–यांनी मी त्याजबरोबर —— मांडीन. सैन्यावर —– , मोठ्या —–, अग्नी व —— यांची —–वृष्टी लोकसमुहावर करीन. मी आपला —– व —— प्रगट करीन. बहुत —- माझी —- होईल. तेव्हा त्यांना समजेल की मी ——- आहे.                                                                       

२- अध्याय ३९ मध्ये सात वर्षे इस्राएलच्या रहिवाश्यांना कशापासून सरपण मिळेल? किती महिने ते शत्रूंची प्रेते पुरत राहतील? एका नगराचे नाव ते काय ठेवतील? त्या नावाचा अर्थ काय? यज्ञबली कापीत आहे, चला या हे पाचारण कोणास केले आहे? ते — चे मांस खातील आणि ————–       यांचे रक्त पीतील. देव——- बंदिवास उलटवील. देव त्यांच्या —- दया करील. ते देशात —- वसतील. देवाबरोबर केलेल्या ——— त्यांस
—— वाटेल.

प्रश्न ३ रा – पुढील वर्णनांपुढे कंसातील योग्य संदर्भ लिहा.

(उत्पत्ती १२:२-६; मत्तय ११:२०-२४;  जखर्‍या १४:१-९; उत्पत्ती ३:१५; यशया २:२-४; गलती ४:४; मत्तय ११:२०-२४; रोम ११:२६-२७;   गलती ३:१६ )                                                                                      
१- यरुशलेमातून इस्राएलांचा न्याय होईल. ——–                                                          
२- भावी काळी इस्राएलांचे तारण होईल.——-                                                             
३- मशीहाविषयीचे पहिले भाकीत ———-                                                               
४-इस्राएल राष्ट्र उभारण्याचे भविष्य ———-                                                                            
५- योग्य समयी येशू जगात जन्मला ———                                                                 
६- अब्राहामास ख्रिस्ताविषयी भाकीत सांगितले होते अशी नोंद ———                                                
७- मशीहाच्या राजसत्तेचे भाकीत——–                                                                      
८- संदेष्ट्यांनी वार्णिलेल्या मशीहाच्या राज्याचा संदेश धिक्कारला गेला———-                                          
९- धर्मपुढार्‍यांनी येशूवर खोटे आरोप केले ——–                                                      

प्रश्न ४ था – लेख वाचून कंसातील योग्य शब्द वापरुन रिकाम्या जागा भरा.

(पापक्षमा; महासंकटाचे; तारणाचा; मंडळी; दुसरे आगमन; निवडलेले; पवित्र आत्म्याचे वास्तव्य; जीर्णोद्धाराचा; सात; राज्य; तात्पुरते; अवशिष्ट; ख्रिस्त विरोध्याच्या; कृपेचा; मानवी; विदेश्यांचा; छळाचा; संतान; नायनाट; नेत्याची; अब्राहामाचे;
इस्राएल राष्ट्र )                                                               

१- ख्रिस्ताविरोध्याचे राज्य—- वर्षांचे, —– राज्य असून, ते अखेरचे ——– जागतिक राज्य आहे.               
२- देवाच्या योजनेच्या केंद्रस्थानी इस्राएल राष्ट्र असेल. त्यांच्यासाठी तो ——- , त्यांच्या——– व     ——–
    ही असेल.                                                                           
३- ——— राज्याचा ——– करून येशू इस्राएल राष्ट्राला जगाच्या व्यासपीठावर आणील.                      
४- इस्राएल राष्ट्र म्हणजे ——— संतान म्हटलेले जुन्या करारातील राष्ट्र होय.                            
५- आरंभीची ख्रिस्ती ——– यहुद्यांमधून तारण आल्यामुळे सुरू झाली.                              
६- वचनात कोठेही मंडळीला ——— संबोधलेले नाही.                                              
७- भावी काळी इस्राएल राष्ट्र ——- भूमिका बजावील आणि मंडळी ख्रिस्ताबरोबर —– करील.                  
८- येशू हा इस्राएळाचे अखेरचे ——– होय.                                                           
९- ख्रिस्ताने सिद्ध केलेले तारण स्वीकारणार्‍या कोणत्याही व्यक्तिला ——व ——-ही देऊ केली आहेत.    
१०- येशूचे पहिले व —– आगमन यांच्या मधल्या काळात देव मंडळी कडून काम करून घेत आहे. त्याने
      इस्राएल राष्ट्राला —— बाजूला ठेवले आहे.                                                      
११- सध्या —-, मंडळीचा व ——- काळ आहे.                                         
१२- भावी काळी तारणासाठी जे —- व——–इस्राएल असतील, त्यांना ‘देवाचे इस्राएल’ म्हटले आहे.