Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 1, 2017 in जीवन प्रकाश

लेखांक ४: कृपा आणि वैभव

लेखांक ४: कृपा आणि वैभव

 ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव                                                            

स्टीव्ह फर्नांडिस

 आपल्या लोकांसाठी देहधारी होण्याच्या परिणामामधील त्याचे गौरव

शेवटची बाब म्हणजे आपल्या लोकांसाठी देहधारी होण्याने झालेल्या परिणामांमुळे तो गौरवी ठरतो.
पहिला परिणाम म्हणजे त्याच्या देहधारी होण्याद्वारे त्याने आपल्या व्यक्तित्वाचे व कार्याचे गौरवी प्रकटीकरण केले. खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला प्रथम त्याचे व्यक्तित्व आकर्षित करून घेते. त्याच्या पवित्र आत्म्याचे कार्य ख्रिस्ती व्यक्तीमध्ये झाल्याने पवित्र आत्मा त्यांना ख्रिस्ताचे दर्शन घडवतो.परंतु तो जो कोणी आहे तेवढ्याच गोष्टीने ख्रिस्ती व्यक्तींना तो गौरवी दिसतो असे नाही तर त्याने जे काही केले त्यामुळेही त्यांना तो गौरवी दिसतो.त्याचे लोक त्याच्या व्यक्तित्वाचे गौरव पाहतात. ’ज्यांचा नाश होत आहे’ ते विश्वास ठेवत नाहीत म्हणून नाश पावतात. कारण या युगाच्या देवाने त्यांची मने आंधळी केली आहेत . यासाठी की ‘ख्रिस्ताच्या तेजाच्या (गौरवाच्या) सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये’(२ करिन्थ ४:३-४). हरवलेले जन ख्रिस्ताचे  गौरव दिसू नये म्हणून अंध केले आहेत. तरीही देवाने आपल्या लोकांना आपल्या गौरवाचे प्रकटीकरण केले आहे.

ख्रिस्ताच्या देहधारी होण्याचा दुसरा परिणाम म्हणजे तो आपल्या लोकांचा खडक व पक्का , भक्कम पाया असा आहे. तो देव –मानव या नात्याने आपल्या लोकांसाठी अढळ खडक आहे. या महान सत्याला अधोलोकाची द्वारेही विरोध करतील , पण त्यांचे काही चालणार नाही व ते यशस्वी होणार नाहीत.मत्तय १६:१८ मध्ये म्हटले आहे येशूने म्हटले, ‘आणखी मी तुला सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकांच्या द्वारांचे काही चालणार नाही.’ दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर अधोलोकांची द्वारे ख्रिस्ताचे व्यक्तित्व व गौरव यावर हल्ले करतील पण त्यांची सरशी होणार नाही. या लोकांना येशूने विचारले, ‘लोक मला कोण म्हणून म्हणतात?’ ते म्हणाले ‘कित्येक यिर्मया म्हणतात, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठून आला आहे असे म्हणतात.’ अनुवाद १८ मध्ये एक थोर संदेष्टा येण्यासंबंधीचे भाकीत केले आहे. ख्रिस्ताने , ‘पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? ते म्हणाले, “आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहा”. ख्रिस्त हा निर्मिती आहे असे त्यांना नक्कीच म्हणायचे नव्हते. तर त्याच्या ठायी देवत्वाचे सर्व गुण आहेत असेच त्यांना म्हणायचे होते. ख्रिस्ताच्या पुत्रत्वात देवपित्याशी सादृशता आहे. त्याचे देवपित्याशी असलेले संबंध एकमेव आणि अपवादात्मक असे आहेत. ख्रिस्ताची देवपित्याच्या स्वभावाशी सादृशता आहे …’ तू देवाचा पुत्र आहे असे त्यांनी जाहीरपणे घोषित केले! ‘तुझा स्वभावविशेष, तुझे अस्तित्व हेच प्रदर्शित करते की तुझ्या ठायी देवाचा स्वभाव आहे. तू देवाचा पुत्र आहेस .’ अशी त्यांनी कबुली दिली. आम्ही समुद्र उगा राहिल्याचे पाहिले . आम्ही मृत जिवंत होत असेलेले पाहिले. कधी कोणी मनुष्य बोलला नाही अशी वचने तुझ्या मुखातून आम्ही ऐकली. गावोगावी आपल्या दुर्बलतेत वावरणाऱ्या लोकांमधून जा ये करीत असता संपूर्ण गावेच्या गावे तू आपल्या स्पर्शाने आरोग्य देऊन बरी केल्याचे आम्ही पाहिले. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस! तू देहधारी होऊन आलेला देव आहेस. मग ख्रिस्त म्हणाला ,”शिमोन बार्योना धन्य तुझी , कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे.’ (हे प्रकटीकरण तुला तुझ्या कुवतीने प्राप्त झाले नाही) (मत्तय १६:१७). हा देहधारी देव मंडळीचा खडक आहे, आणि त्यावर सैतान हल्ला चढवील. पण असे म्हटले आहे की, अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. खरे तर अधोलोकाची द्वारे ख्रिस्ताच्या गौरवावरच हल्ला करतात; असाच त्याचा मतितार्थ आहे. सर्व मंडळीच्या इतिहासात सर्व पाखंडी मते मंडळीतील सर्व समस्या ही मुळात त्याच्या गौरवाचा गैर अर्थ लावल्याचे परिणाम दिसतात. म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व कमी लेखणे, त्याला लपवणे ,त्याला दिसेनासे करणे यात आढळते. परंतु तो म्हणतो की, त्यांचे काही चालणार नाही..म्हणून तो आपल्या विश्वासाचे, विसाव्याचे स्थान आहे.

त्याच्या देहधारी होण्याचा परिणाम त्याच्या लोकांवर होतो तो म्हणजे यामुळे सैतानाचा समूळ नाश होतो. सैतानाची आठवण ठेवा. बायबल त्याला दैदिप्यमान, लूसीफर, तेजस्वी तारा सर्व आत्मिक जीवसृष्टींच्या निर्मितीमधील आणि देवदूतांच्या निर्मितीमध्ये जेष्ठ , त्या सर्वांमध्ये अत्युच्च संबोधते. या अभिषिक्त करूबाने ख्रिस्ताच्या स्वभावविशेषाविरुध्द बंड केले. ख्रिस्ताचे देवत्व व त्याच्या दैवी अधिकाराविरूद्ध बंड केले. तो म्हणाला मी त्याची सेवा करणार नाही तर मी त्याच्या समान होईन. म्हणून त्याने देवाच्या पुत्रासाठीच असलेले योग्य स्थान जेथे त्याला स्तुतीभक्ती आराधना ,वंदन आणि उच्च पद व गौरव प्राप्त होते , त्याविरुध्द त्याने बंड केले. त्याने प्रत्यक्षात देवाविरुध्द बंड केले. मग जेव्हा देवाने मानव निर्माण करून त्याला एदेन बागेत ठेवले तेव्हा सैतानाने बागेत प्रवेश केला आणि मानवाच्या स्वभावाचा नाश केला. म्हणजे त्याने दैवी स्वभाव व अधिकाराविरुध्द बंड केले आणि मग मानवाच्या स्वभावाचा नाश केला. म्हणून देवाने ख्रिस्त या एकाच व्यक्तीच्या ठायी मानवी व दैवी स्वभाव ठेवले आणि सैतानाचा नाश केला . देवाने सैतानाची पापावर जी पकड आहे तिचा बिमोड केला. त्याने मरणाचे सामर्थ्य मोडून टाकले. आणि तुम्ही देवाला भेटू शकला कारण तुमच्या पापांची बंधने त्याने तोडून टाकली हे तुम्ही जाणता. ख्रिस्ती विश्वासी म्हणून आपण हे जाणतोच की त्याच्या देहधारी होण्यामागे मुक्ती किंवा तारण देणे हाच उद्देश होता. मुक्तीसाठीच देहधारणाची रचना करणे हा उद्देश होता. आपल्याला ठाऊक आहे की पापाची आडभिंत आपल्याला पलीकडे जाऊ देत नाही . बायबल आपल्याला हे सांगतेच . आणि त्याविषयी आपल्याला जागृत करण्यात आले आहे. देवाला पापाची इतकी चीड आहे की त्यामुळे तयार झालेली आडभिंत मानव दूर करू शकत नाही. तुम्ही स्वत:चे तारण करू शकत नाही. तुम्ही स्वत:मध्ये सुधारणा करू शकत नाही. तुम्ही सद्वर्तन करून पाप दूर करू शकत नाही. तुम्हांला दूर करता येत नाही अशी ती पापाची आडभिंत आहे. आपल्याला देखील हे ठाऊक आहे की प्रत्येक मनुष्यावर देव न्याय आणील. म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष, मुलगा , मुलगी यांचा न्याय होईल. बायबल तसे सांगते आणि कालवरीमुळे आपल्याला ठाऊक आहे की ते सत्य आहे. पापानेच ही आडभिंत तयार केली. त्याने ही नैतिक आडभिंत तयार केली, ती ओलांडताच येत नाही. कोणीही व्यक्ती स्वत:चे तारण करू शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती अशा अनेक गोष्टीनी व्याप्त आहे की ज्यापासून तिला सुटका हवी आहे . योहानाच्या प्रकटीकरणातील ५व्या अध्यायात बायबल सांगते की योहानाने सिंहासनावर बसलेल्या देवपित्याच्या हातातएक गुंडाळी पहिली. ती गुंडाळी घेऊन उघडण्यासाठी कोणीच पात्र नव्हता . ती गुंडाळी  पृथ्वीची मुक्ती व सुटका यांचे प्रतिनिधीत्व करणारी होती. कोणीही त्यासाठी साजेसा नव्हता म्हणून योहान रडू लागला. तेव्हा एक वडील जन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, ‘रडू नको; पाहा यहूदा वंशाचा सिंह व दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे.’ तोच केवळ स्वर्गात व पृथ्वीवर एक असा आढळला कारण तो पापात पतन पावलेला मानव नव्हता. तो देवमानव आहे- देव मानवी स्वभावात आलेला आहे यासाठी की मानवाचे त्याला तारण करता यावे आणि त्याचवेळी देवालाही संतुष्ट करता यावे. तो जणू काही देव व मानव यांना पुलाप्रमाणे जोडणारा दुवा आहे. त्यामुळे पापी त्यावरून पलीकडे जाऊ शकतील. तोच एकमेव मार्ग आहे आणि ख्रिस्ती जनांना ही गोष्ट माहीत आहे. त्याची कृपा व दया ही अमर्याद आहे. तो आता आपला आश्रय व विसाव्याचे ठिकाण आहे. यशया ८:१४ वर जॉन ओवेन देताना ‘तो तुम्हांस पवित्रस्थान देईल ‘ या वाक्याविषयी असे म्हणतात:-

‘तो पवित्र स्थान आहे . जे कोणी तेथे येतील त्यांच्यासाठी ते खात्रीचे आश्रयस्थान आहे. संकट, क्लेशात असणाऱ्या मानवाला या पवित्रस्थानी काय सापडेल? तर त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा पुरवठा, सर्व भयांपासून सुटका , प्रत्येक धोक्यापासून बचाव यांची तो अपेक्षापूर्ती करील. प्रभू येशू पापाने त्रस्त झालेल्या जीवांसाठी असाच आहे. सर्व आत्मिक क्लेश व अस्वस्थतेमध्ये तो आमचा आश्रय आहे. आपण पापाच्या जाणीवेच्या ओझ्याने दडपून गेलो आहोत का? मोहपरीक्षांमुळे आपण पेचात पडलो आहोत का? कोणत्याही आत्मिक शत्रुमुळे दबून वाकून गेलो आहोत का? कोणत्याही कारणाने आपण अंधारात चालत असून आपल्या ठायी प्रकाश नाही का? ख्रिस्ताच्या गौरवाचे दर्शन आपल्याला दिलासा देईल, आधार देईल व आपल्याला हायसे वाटेल. तो आपल्यासाठी काय करणार नाही? ज्याने स्वत:ला रिक्त करून नम्र व लीन केले , ज्याने स्वत:चे विशेष हक्काचे गौरव व आपल्या अमर्याद समृद्धीत असताना त्या परमोच्च स्थानावरून खालच्या पातळीवर येण्याची अमर्याद कृपा केली व लवून नम्र होऊन स्वत:ला रिक्त केले यासाठी की आपल्यासाठी त्याला मध्यस्थी करता यावी; तो आपल्याला सर्व संकट क्लेशातून सोडवणार नाही का? आपण गरजेने उभे असता तो आपल्यासाठी अभय देणारे पवित्रस्थान होणार नाही का? आपल्यावरील त्याच्या अमर्याद अनुग्रहामुळे जो संकटग्रस्त मानवांसाठी परमोच्च पातळीवरून खाली निचावस्थेत आला त्याच्या सामर्थ्याविषयी आपल्याला भय धरण्याचे काहीच कारण नाही. सर्वसमर्थ देव म्हणून त्याने आपले सामर्थ्य अजिबात गमावलेले नाही. त्याची गौरवी कृपा व अमर्याद ज्ञान ही त्याने गमावलेली नाहीत. युगारंभापूर्वीपासूनचा देव म्हणून जे काही तो करू शकतो , ते सर्व आता तो देखील करू शकतो. त्यामुळे क्लेशयुक्त पापी जनांसाठी जर अभय देणारे पवित्रस्थान रचायचे झालेच तर ते सर्व अगर कोणत्याही बाबींसाठी ख्रिस्त येशुमध्येच तयार केलेले आहे.

अजूनही तो जो पूर्वी होता तोच देव आहे. त्याने आपला दैवी स्वभाव गमावलेला नाही. त्यामुळे या देवमानवाठायी अभय देणारे पवित्रस्थान असून  तो आपला मध्यस्थ आहे ही गोष्ट मला विलक्षण अद्भुत वाटते. माझे तारण होऊन काही काळ लोटला आहे त्यामुळे देवाच्या वचनानुसार हे सत्य आहे हे सिद्ध झाले आहे. तो मला कधीच सोडणार नाही व टाकणार नाही. स्तोत्रामध्ये काही वचने अशी आहेत: ‘मी तुला वृध्पपणातही फलद्रूप करीन . तुझ्या उतारवयात तुझी भरभराट करीन. तू वृद्धपणीही रसभरीत व टवटवीत असशील.कल्याण व दया तुला आयुष्यभर लाभतील.