जॉन पायपर
(बायबलनुसार काळाचा संक्षेप करण्यात आला आहे (१ करिंथ ७:२९). येशूने त्याच्या येण्यासाठी जागृत राहण्यास सांगितले आहे. का बरे? “कारण तो दिवस किंवा घटका कोणालाही ठाऊक नाही.” ख्रिस्ताचे येणे नजीक येऊन ठेपले आहे आणि ते आपल्यासाठी तातडीचे आहे. जर ही तातडीची वेळ आहे तर आपण कसे जगायला हवे? हा प्रश्न प्रत्येक ख्रिस्ती पिढीने विचारलेला आहे. जॉन पायपर यांनी मत्तय २५ मधील १० कुमारींच्या दाखल्यावर स्प्ष्टीकरण करताना याचे उत्तर दिले आहे.)
दाखले असे आहेत. कधी देवाचे लोक वधू म्हणून चित्रित केले आहेत तर कधी ते लग्नाची तयारी करणारे असे दाखवले आहेत. जर दाखल्यांचा तपशील स्पष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर सर्व गोंधळच होईल. दाखले हा एक मुख्य मुद्दा सांगतात आणि इथे तो मुख्य मुद्दा आहे : देवाच्या लोकांनी वराला सामोरे जाण्याची तयारी कशी करावी. या दाखल्यामध्ये वधू तर दिसतही नाही. म्हणून तपशिलात न शिरता आपण मुख्य मुद्दा पाहू या.
मुख्य मुद्दा- देवाच्या लोकांनी वराला भेटण्यास कशी तयारी करावी यासंबंधी सूचना दिल्या आहेत.
मत्तय २५:२-४ या सर्व दहा जणींना एक काम करायचे होते. त्यांना दिवे होते. ते दिवे तयार ठेऊन जेव्हा तो वर येईल तेव्हा उजळायचे होते. प्रकाशित करायचे होते. “ देवाचा मार्ग तयार करा “ मत्तय ३:३ हे यशया ४० :३ चा संदर्भ देते. तो येत आहे. तुमचे दिवे उजळा. त्याला आत येऊ द्या.
हे त्यांचे काम होते. हे एक काम आहे. ह्या दहा कुमारींना एक काम करायचे आहे आणि ते करण्यास त्यांनी तयार असणे आवश्यक होते. अशी ही परिस्थिती आहे.
दिव्यात तेल असणे हे ते काम पूर्ण करण्याचे साधन आहे. जर त्यांच्या दिव्यात तेल नसेल तर काम पूर्ण करण्याच्या साधनाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांनी प्रकाशाने उजळावयाचे आहे. आता त्यातल्या पाच मूर्ख होत्या. प्रकाश देण्याचे त्यांचे काम त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांच्या दिव्याने काम करायसाठी जे एकच साधन आहे त्याची त्यांनी उपेक्षा केली आहे. त्या संस्कृतीमध्ये दिव्याचा काय उपयोग होता? तेल नसणारा दिवा प्रकाश कसा देऊ शकेल? त्यांचे काम होते की जेव्हा प्रकाश येईल तेव्हा तो दाखवणे. आणि वात नसेल तर मेणबत्ती विझते, विजेशिवाय बल्ब जातो , जाळाशिवाय मशाल आणि तेलाशिवाय दिवा विझतो.
त्यांना त्यांची ही स्थिती आवडते. जर आवडली नसती तर त्या सोडून गेल्या असत्या. दिवे असणाऱ्या ही पदवी त्यांना आवडते. “मला एक दिवा आहे, मला एक दिवा आहे माझा दिवा चकाकतो”- पण त्याच्या रितेपणाकडे त्यांचे काहीच लक्ष नाही. त्यांचा मूर्खपणा म्हणजे फक्त धार्मिकतेचे रूप असणे पुरेसे आहे असा विचार करणे. त्यांचे मुर्खपण म्हणजे प्रकाशाची शक्ती शेवटच्या क्षणी उसनी घेता येईल असा विचार करणे. तारणासंबंधी असा विचार करणाऱ्या लोकांचे तुम्ही ऐकलेत का? “ मी आणखी वाट पाहीन, अजून वाट पाहीन” हे फार धोक्याचे आहे.
त्याच्या येण्याला उशीर होणार आहे हे येशूने आधीच सांगून ठेवले आहे
मत्तय २५:५ “ वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.” येथे दोन गोष्टी विचारात घ्या. त्याच्या पहिल्या व दुसर्या येण्याच्या कालावधीच्या दरम्यान उशीर होणार आहे असे येशू सांगतो. हे गेली २००० वर्षे अडखळण्याचे साधन झाले आहे. “हो ठीक आहे. येशू. राजा. त्याने राज्य आणले. पण तो कुठे आहे?”
पेत्राने याला कसे तोंड दिले हे त्याच्या दुसर्या पत्रात पाहा. “ पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही समजून घेतले पाहिजे, ते म्हणजे, शेवटच्या दिवसांत थट्टेखोर लोक येतील जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील. आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचे पूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.” (२ पेत्र ३:३-४). आणि मग तो असा प्रतिसाद देतो : “परंतु, प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरु नका की, प्रभूला एक दिवस एक हजार वर्षांसारखा आणि एक हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. देव त्याच्या अभिवचनाची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही परंतु तो आमच्याशी धीराने वागतो. कारण आपल्यापैकी कोणाचा नाश व्हावा असे त्याला वाटत नाही. वास्तविक सर्व लोकांनी पश्चात्ताप करावा असे त्याला वाटते.” (२ पेत्र ३:८-९). येशूने आपल्याला आधीच सांगून ठेवले आहे की उशीर होणार.
तुमचा देवाबरोबरचा निवांत वेळ तुम्ही न झोपता कसा घालवणार? टी व्ही बंद करा आणि झोपायला जा.
मत्तय २५;५ “ वराला यायला उशीर झाला.” दुसरी गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे: सर्व दहाही जणी झोपून गेल्या, फक्त मूर्खच नाही. याचा अर्थ या दाखल्याम्ध्ये झोप ही नकारात्मक बाब नाही. असं म्हणू नका की “या दाखल्यामध्ये जागृत राहा अशी शिकवण आहे कारण आपल्याला ती घटका ठाऊक नाही. म्हणून झोपू नये.” हे चुकीचे आहे. शहाण्या कुमारी झोपल्या, याचा अर्थ झोप ही आपण जगतो ते नित्याचे दररोजचे सर्वसाधारण जगणे दाखवते. म्हणजे थकल्यावर झोपणे , उठणे, करावयाची कामे करणे पुन्हा थकल्यावर झोपणे, उठणे , आवश्यक विसावा घेणे व आपले काम करत राहणे. त्या सर्व झोपी गेल्या म्हणजे मागणी आणि लग्नाच्या दरम्यानच्या काळात देवाची अपेक्षा आहे की: तुमचे कर्तव्य पार पाडा आणि आवश्यक तो विसावा घ्या.
मी वाढत असताना दुसर्या येण्यावर बरीच पुस्तके व चित्रपट निघत होते. “थीफ इन द नाईट” नावाचा एक चित्रपट होता. तो संपताना एक वाक्य पडद्यावर आले “ जागे राहा कारण तो दिवस व घटका तुम्हाला माहीत नाही.” हे संपूर्ण चूक आहे. याचे कारण यामध्ये “जागृत राहा” याचा अर्थ “वर पाहत राहा” असा काढला जातो. म्हणूनच लोकांनी आपली मालमत्ता विकून ते पर्वतावर राहायला गेले आणि वाट पाहत बसले कारण त्यांना काहीतरी चिन्ह दिसले होते. जागृत राहा याचा अर्थ : “वर ढगांकडे पाहत राहा” असा काढला जातो. जागृत राहा याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे? रात्री १२ ऐवजी १० वाजता झोपायला जा नाहीतर सकाळी तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या मंद असाल आणि सैतान तुमच्यावर हल्ला करेल. जागृत राहा याचा अर्थ “ सावध असा , दक्ष असा . तुमच्या सामान्य जीवनात जिवंत देवाशी एकसूर होण्यासाठी जे करायला हवे ते करा. आणि न झोपता देवाच्या वचनात वेळ घालवा.
तुमचा निवांत वेळ तुम्ही कसा घालवता? रात्री टीव्ही बंद करा आणि झोपायला जा. हा दाखला शांत चित्त, विचारी , सामान्य कर्तव्य पार पाडणारे जीवन जगण्यासंबंधी आहे म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा हेच करताना तो तुम्हाला पाहील. तो येईल तेव्हा तुम्ही काय करताना त्याने पाहावे असे तुम्हाला वाटते? ढगाकडे पाहत असलेले? मी एखाद्या आजारी व्यक्तीच्या बिछान्याजवळ प्रीतीने सेवा करत असावे, शहरात गरिबांची सेवा करत असावे, त्याची सुवार्ता सांगत असावे, असे करताना आढळावे. आकाशाकडे बघत बसलेले नसावे . तो येईल तेव्हा आपण धार्मिकतेची कृत्ये करताना दिसावे व खूप परिश्रमानंतर झोप घेताना दिसावे . अशा रीतीने त्याला भेटणे किती सुंदर असेल.
येशू येईल तेव्हा तुही काय करत असावे?
मत्तय २५:६ “मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, ‘वर येत आहे! बाहेर जाऊन त्याला भेटा!’ “ आता याचा संबंध १ थेस्स ४:१६ शी लावा. कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभू स्वतः स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील. ती वाणी म्हणते “ तो इथे आहे . त्याला भेटा. तुमचे दिवे जीवनाने पाजळू द्या. आनंद , विश्वास, आशा, प्रीती , अपेक्षा , स्तुती, आश्चर्य यांनी. मित्रानो हे घडणार आहे. एक दिवस येशू परत येईल.”
तुम्ही तयार आहत काय? तुमचे जीवन विश्वास , आशा प्रीती , सत्यता यांच्या तेलाने भरलेले आहे की तुमचा औपचारिक दिवा तुम्ही घेऊन फिरत आहात? “मी चर्चला जातो , बायबल सोबत नेतो, जेवणाआधी प्रार्थना करतो दहा आज्ञा पाळायचा प्रयत्न करतो” असा तुमचा एक छोटा दिवा आहे का? आणि आत देवासाठी आध्यात्मिक प्रेम नाही , वरासाठी प्रीती नाही, उत्कट इच्छा नाही अशी का तुमची स्थिती आहे?
Social