Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 1, 2017 in जीवन प्रकाश

नव्या वर्षात पदार्पण करताना…

नव्या वर्षात पदार्पण करताना…

उच्च डोंगरावर चढ.  यशया ४०:९
प्रत्येक विश्वासी व्यक्तीला जिवंत देवाची तहान हवी आणि देवाचा डोंगर चढून त्याला तोंडोतोंड पहायची आस लागायला हवी.  डोंगराचा कडा आपल्याला साद घालत असताना फक्त दरीच्या धुक्यातच तृप्त राहण्याची गरज नाही. जे पर्वताच्या टोकापर्यंत चढतात त्यांना तेथे ठेवलेया खास प्याल्यातून पिण्याची आणि स्वर्गात डुबून जाण्याची अत्यंत उत्कंठा असते. किती शुद्ध असते पर्वतांवरील दव ! तेथली हवा किती आल्हाददायक असते. तिथे राहणाऱ्यांना किती समृद्धी असते त्यांच्या खिडक्यातून त्यांना थेट नव्या यरूशलेम दिसू शकते.

बरेच  संत कोळशाच्या खाणीतल्या कामगारांसारखे राहणे पसंत करतात . त्यांना सूर्याचे दर्शन होत नसते. जरी त्यांना देवदूतांचे अन्न खाण्याची संधी असते तरी ते सापासारखी धूळ चाखत असतात. जरी राजवस्त्रे घालण्याची त्यांना संधी असली तरी खाणी कामगारांची वस्त्रे घालणे ते पसंत करतात. तेलाचा अभ्यंग होण्याऐवजी  त्यांची मुखे अश्रूंनी डागाळलेली असतात. माझी खात्री आहे की अनेक विश्वासी जरी राजवाड्याच्या गच्चीवर फिरू शकतात तरी त्याऐवजी ते अंधारकोठडीत झुरत असतात. हे विश्वासी माणसा उठ, तुझ्या या नीच स्थितीतून ! तुझा आळस, तुझा थंडपणा किंवा तुझ्या जीवाच्या धन्याला, ख्रिस्ताला शुद्ध प्रेम देण्यास जे काही अडखळण आहे ते झटकून टाक. तुझ्या जीवाच्या क्षेत्रामध्ये त्यालाच तुझा उगम, केंद्र आणि आनंदाचा विषय बनव.

जर तू राजासनावर बसू शकतोस तर त्या खड्ड्यात बसण्यास तुला कोण मोहिनी घालतो? आता बंधनाच्या खोलगट जागी राहू नकोस. तुला तर  पर्वताचे स्वातंत्र्य  प्रदान केले जात आहे. तुझ्या इवल्याश्या संपादनात तृप्त राहू नकोस तर अधिक उच्च व स्वर्गीय गोष्टींकडे पुढे जा उंच , सन्मान्य व पूर्ण जीवनाची आस धर.

चार्ल्स स्पर्जन