Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 6, 2018 in जीवन प्रकाश

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

लेखक: गेविन ऑर्टलंड

येशूने क्रूसावर त्याचा शेवटचा श्वास सोडल्यानंतरच्या तासांचा आपण फारसा विचार करत नाही. पवित्र आठवड्यामध्ये आपण गुरुवार, शुक्रवार आणि रविवार यावर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि ते योग्यच आहे. पण येशू मरण पावला आणि उठला याच्या मधल्या गोंधळाच्या तासांबद्दल काय?
आपण निदान कल्पना तरी करू शकतो – समजा येशूचे मरण व पुनरुत्थान यामध्ये हा शनिवारचा वेळ नसता तर? येशूने वधस्तंभावर कित्येक तास वेदना भोगल्या असत्या, त्याच्या ह्रदयाचे स्पंदन थांबताच लगेचच तो जिवंत झाला असता – कदाचित त्या वधस्तंभाच्या हजार  ठिकऱ्या उडवून. किंवा जर शुक्रवारी संध्याकाळी त्याचे पुनरुत्थान झाले असते तर येशूला पुरण्याच्या लज्जेतून वाचवले गेले असते आणि त्याचा मरणावरचा विजय सर्व जनतेसमोर झाला असता. पण तसे घडणार नव्हते. कबरेवर विजय मिळवण्यासाठी त्याला तिच्यामध्ये खाली जावे लागले. येशूला फक्त मरावेच लागले नाही तर काही काळ मृत स्थितीतच राहावे लागले.
आज आपण शुक्रवार दुपारच्या भयाण घटना व रविवार सकाळचे गौरवी समर्थन यांच्या मधल्या काळाचा विचर करीत आहोत.  येशूचे शरीर थंड, ताठ होत असताना नरक जिंकत आहे असे भासतानाचा  हा समय मतभेद, काय घडणार याची अनिश्चिती आणि गोंधळाने व्यापला होता.

देवाने एक उदास दिसणारा शेवट घेतला आणि त्याचे वैभवी आरंभात रूपांतर केले.
त्या दिवशी जगणे म्हणजे काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. निराशा म्हणजे काय हे त्यावेळी नक्कीच अनुभवले असेल. आणि इथे या काळ्याकुट नि सर्वात निराशाजनक तासांमध्ये शुभवर्तमान आपल्याला बेपर्वा, भावनाहीन, निराशाजनक वृतांत देत नाहीत. तर येशूला केलेल्या एका सुंदर भक्तीचा, विश्वासूपणाचा वृतांत देतात. यावेळी अरिमथाईकर योसेफ पिलाताकडे जाऊन  येशूचे शरीर पुरण्यासाठी मागितले.

हे कृत्य किती शौर्याचे होते हे लगेच आपल्या लक्षात येत नाही. ही धाडस आणि त्यागाची एक अद्भुत कृती होती जिच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनातील  गडद व एकाकी रात्रीमध्ये देवाचे आज्ञापालन करण्यास प्रेरणा मिळेल.

धाडसी आज्ञापालन

पहिले म्हणजे ही धाडसाची कृती होती. आरोप शाबित केलेल्या गुन्हेगाराशी संबंध दाखवणे हे धोक्याचे होते – यामुळेच येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून गेले (मार्क १४:५०) आणि पेत्राने येशूला नाकारले (मार्क १४:६८,७०,७१). ज्यांनी यात अधिक रस दाखवला त्यांना धरले गेले (मार्क १४;५१). म्हणूनच मार्क १५:४३ मध्ये म्हटले आहे “ योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.”

तथापि योसेफ व निकदेम (याचा उल्लेख योहानाने केला आहे) यांना बरेच काही गमवावे लागले – ते दोघेही वरच्या हुद्द्यावरचे परूशी होते. –  सन्हेद्रीनचे – यहूदी न्यायसभेचे सभासद होते. मार्क सांगतो की  ““योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता” (मार्क १५:४३). मत्तय सांगतो की तो श्रीमंत होता (मत्तय २७:५७). मागील वर्षांमध्ये येशू व परूशी यांच्यातील संघर्ष टोकाला पोचला होता आणि त्याचा शेवट आताच आपण पाहिला. जर तुम्ही परूशी असाल तर येशूचे शरीर पुरून त्याचा सन्मान करणे म्हणजे तुमचा हुद्दा, सुरक्षा सोडून देणे आणि पराभव होत असलेल्या बाजूशी जोडले जाणे.
जेव्हा पिलातासमोर योसेफाला नेण्यात आले तेव्हा त्याच्या मनात काय विचार येत असतील बरे?

खिन्न आज्ञापालन
दुसरी गोष्ट म्हणजे ही खिन्नतेची कृती होती. निकदेम आणि योसेफ यांच्यासारखी श्रीमंत , सुशिक्षित माणसे सहसा मृत शरीराला पुरण्याचे हलके काम करत नसतात. हे घाणेरडे, दुर्गंधीचे काम नोकरावर सोपवले जात असे. सन्ह्रेद्रीनच्या सभासदांवर नव्हे.

मत्तय नमूद करतो की योसेफ हा येशूचा शिष्य होता (मत्तय २७:५७). लूक “ तो  चांगला आणि धार्मिक मनुष्य होता” (लूक२३:५०) असे म्हणतो. त्याला येशूला क्रुसावर देणे मान्य नव्हते आणि “तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता” (लूक २३:५१). येशूशी संभाषण झाल्यापासूनचे निकदेमाचे वर्तन चांगल्या प्रकारेच मांडलेले आहे (योहान ३, ७;५०-५१; १९:३९).

तर या लोकांचे येशूवर प्रेम होते. जेव्हा त्यांनी त्याचे निर्जीव शरीर हाताळले असेल तेव्हा त्यांना झालेल्या दु:खाच्या भाराचा विचार करा. मृत शरीरे नेहमीच भीतीदायक वाटतात. निर्जीव डोळे आपल्याकडे पाहत आहेत हे आपल्याला अनैसर्गिक वाटते. पण जर त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तर हे दु:ख अजूनच वाढते.
खुद्द देवाच्या पुत्राचे निर्जीव डोळे रोखून पहातानाच्या त्यांचे दु:ख त्यांना व्यक्त करणे अशक्य होते.
किंमती आज्ञापालन

तिसरी गोष्ट म्हणजे ही कृती  किंमती होती. लूक २३:५३ सांगते की  “ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणाला ही ठेवले नव्हते.”  नवीन कबर खोदणे तसेच तागाचे तलम वस्त्र व सुगंधी पुरवणे हे फार महागाचे होते. योहानाने सांगितल्याप्रमाणे “निकदेम शंभर पौंड गंधरस व अगरू घेऊन आला”  (योहान १९:३९). ही फार मोठी रक्कम होती .
इतिहासात बदल घडवणाऱ्या क्षणाची तयारी
येशूचे पुरणे ही शुभवर्तमानाच्या कथेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रेषितांचा मतांगिकारात  ते आहे: “ज्याला क्रूशी दिले जो मरण पावला ज्याला पुरले.” हा शुभवर्तमानाचा महत्त्वाचा सारांश आहे. पौल पण लिहितो, “ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला  व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले”  (१ करिंथ १५:३-४). कोणी म्हणेल: योसेफ आणि निकदेमस यांच्या धाडसाव्यतिरिक्त ईस्टरच्या घटना कशा बदलल्या असत्या? देवाने तर येशूचे शरीर दुसरीकडे कोठेही असते तरी ते नक्कीच उठवले  असते. किंवा त्याचे शरीर त्याने दुसऱ्या कोणत्याही प्रकारे कबरेत नेण्याची व्यवस्था केली असती. पण देवाने या दोघांचा विश्वासूपणा आणि त्याग याचा सन्मान करून त्यांना शुभवर्तमानाच्या कथेत महत्त्वाची भूमिका दिली.
आपल्या आजच्या परिश्रमाचे देव उद्या काय करील हे आपल्याला ठाऊक नाही पण खरे आज्ञापालन कधीही वाया जात नाही.

योसेफ व निकदेम यांना त्याची कल्पना नव्हती. शनिवारचे आगमन जवळ येत असताना (लूक २३:५४) आपले जीवन संपले आहे असा विचार करणे त्यांना सोपे होते. त्यांनी त्यांचे पैसे खर्च केले होते आणि त्यांची बहुतेक प्रतिष्ठा गमावली होती. त्या क्षणी तरी त्यांचे भविष्य आशादायी दिसत नव्हते. परंतु त्यांच्या ह्याच कृतीद्वारे देवाने इतिहासात बदल घडवून  आणणाऱ्या क्षणाची तयारी केली. देवाने त्या उदास दिसणाऱ्या अंताला घेतले आणि त्याची गौरवी आरंभामध्ये सुरुवात केली.
खरे आज्ञापालन कधीही वाया जात नाही
मित्रांनो आज्ञापालनाच मार्ग तुम्हाला गडद आणि कठीण वाटतो का? तुम्ही तुमच्या स्वत:च्या शुक्रवार दीर्घ रात्रीत किंवा एकाकी शनिवार मध्ये आहात का?
लक्षात ठेवा की अखेरीस रविवारची सकाळ – सर्व गोष्टींची पुन:स्थापना – अजून येणार आहे. योसेफ आणि निकदेमाप्रमाणेच आपल्या आजच्या परिश्रमांचे देव उद्या काय करील हे आपल्यला ठाऊक नाही. खरे आज्ञापालन कधीही वाया जात नाही. आतापासून अब्जावधी वर्षांनी तुम्ही आज केलेल्या कठीण आज्ञापालनाचे कोणते प्रतिध्वनी दुमदुमतील याची कोणाला कल्पना असेल?