Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 28, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा २८.                                     १ योहान ५: १०-१२                              स्टीफन विल्यम्स

धडा २८. १ योहान ५: १०-१२ स्टीफन विल्यम्स

                                                                      पुत्रावर विश्वास ठेवणे हेच जीवन

सत्याविषयी दोन प्रसिद्ध उदाहरणे आहेत. या रेखाटनांवरून आढळणाऱ्या समस्यांवर चर्चा करा.
पहिले उदाहरण आहे, अंधळा मनुष्य व हत्ती – हत्ती हे सत्य आहे, आणि धार्मिक अंधांप्रमाणे आहेत व ते त्या हत्तीची चाचपणी करतात. एक म्हणतो, तो दोरीसारखा आहे (शेपूट). एक म्हणतो तो झाडासारखा आहे (पाय). एक म्हणतो तो सापासारखा आहे (शेपूट). समस्या काय आहे?
पुढारी: मुख्य समस्या ही आहे की हे उदाहरण दाखवू इच्छिते की सत्य हे तुलनेशी संबंधित आहे. हे उदाहरण सिद्ध करते की मानवांचे चूक असो की बरोबर असो; हत्ती (खरा) हा नेहमी हत्तीच आहे (सत्य).
दुसरे उदाहरण;  सत्य हे डोंगरमाथ्याकडे जाणाऱ्या अनेक वाटांप्रमाणे आहे. सत्याकडे नेणारे अनेक मार्ग आहेत; पण ते सर्व एकाच ठिकाणी येऊन मिळतात. या उदाहरणात कोणती समस्या आहे?
पुढारी: खरे तर या उदाहरणातून काहीच साध्य होत नाही. मला लोणावळ्यास जायचे आहे, आणि तुम्ही मला सांगितले की रस्त्यावर खाली जा आणि पहिली दिसेल ती बस घे; अशाने मी मुळीच लोणावळ्यास पोहंचणार नाही. मला माझ्या इच्छित स्थळी पोहंचण्यासाठी तेथे जाणारी बसच घेतली पाहिजे. असेच सत्याबाबत आहे – एखादी विचारसरणी तुम्हाला जिथे घेऊन जाईल तेथेच तुम्ही जाणार. प्रत्येक विचारसरणी तुम्हाला भिन्न ठिकाणी घेऊन जाईल.

या अभ्यासात, योहान येशू व विश्वासाविषयी महत्त्वाच्या मुद्दयांची मांडणी करणार आहे. मुद्दा आहे जीवन.

शास्त्राभ्यास

विश्वास आणि अविश्वास

जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठायीच साक्ष आहे. ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे. कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही (१ योहान ५:१०).

देवाने आपल्या पुत्राची जी साक्ष पुराव्यादाखल दिली आहे त्याविषयी योहान बोलत आहे. देवाने जी साक्ष आपल्या पुत्राविषयी दिली तिचे वस्तुनिष्ठ व ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध करणारे पुरावे देवाच्या वचनात आहेत.    तारणासाठी जे त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतात त्यांच्या अंत:करणात ती व्यक्तीगत रीतीने सिद्ध होते.
आता आपण येशूविषयीच्या साक्षीच्या परिणामांकडे पाहू.
१० वे वचन दाखवते की देवाने आपल्या पुत्राविषयी साक्ष देण्यामागचा उद्देश “सत्य दूर कोठेतरी आहे” असे दाखवण्याचा नाही.
देव त्याच्या पुत्राला उंचावतो याचे कारण हे की लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा (योहान १:७).
१० वे वचन आपल्याला दाखवते की “पुत्रावर विश्वास ठेवणे” आणि “देवाने आपल्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर विश्वास ठेवणे” या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. देवाने ख्रिस्ताबद्दल त्याच्या  वचनात दिलेल्या प्रगटीकरणावर विश्वास ठेवणे ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासारखेच आहे.
• विश्वास ठेवण्याचे दोन परिणाम १०व्या वचनात दिले आहेत:
जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना आत्म्याकडून अधिक खात्री मिळते – ज्याने देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला आहे त्याला स्वत:च्या ठायीच साक्ष पटते. येशू म्हणाला होता ना, की ज्याच्याकडे  आहे त्याला अधिक देण्यात येईल? (मार्क ४:२५).
उलटपक्षी अविश्वासाचा परिणाम पण पाहा:
۰ कोणी म्हणेल की अविश्वास ही वैयक्तिक बाब झाली – लोकांचा काय विश्वास आहे आणि काय नाही यावरून तुम्ही त्यांचा न्याय करू शकत नाही. ती वैयक्तिक निवड आहे. आपण अशा युगात राहतो की जेथे “सहिष्णुता” म्हणजे तुम्ही कोणाला काही चूक आहे असे सांगू        शकत नाही. तुम्ही फक्त पाहायचे असते की त्यांनी “दुसरा” मार्ग निवडला आहे.
۰आपण एखाद्याच्या अविश्वासाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करू शकतो.
۰ पण योहान अविश्वासाचे समर्थन करत नाही. १० व्या वचनात तो स्पष्ट म्हणतो, देवाने आपल्या पुत्राबद्दल दिलेल्या साक्षीवर जो अविश्वास दाखवतो, तो देवाला लबाड ठरवतो.
۰देवाला व त्याच्या सत्याला लबाड ठरवल्यामुळे जीवन प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नसल्याने, अविश्वास हे प्राणघातक पाप ठरते.
• त्यामुळे एका बाजूला जो विश्वास ठेवतो त्याला गहन खात्री देण्यात आली आहे. तर जो विश्वास ठेवत नाही तो देवाला लबाड ठरवून दूर सारत असल्याने या अपराधाबद्दल त्यांना शिक्षा म्हणून आणखी पुढच्या साक्षी प्राप्त होण्याची शक्यता उरत नाही.

साक्ष विश्वास आणि जीवन

ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले  आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही
त्याला जीवन लाभले नाही (५:११, १२)
वचन ४:९ मध्ये देवाने जगाला अशी कोणती देणगी दिली आहे?  देवाचा पुत्र.
• येथे ११व्या वचनात देवाने कोणती देणगी दिली आहे? सार्वकालिक जीवन .
मग या विधानानुसार, हे जीवन कोठे सापडते? पुत्रामध्ये. येशू जगाचा तारणारा कसा? (४:१४). कारण तो जीवन देणारा देखील आहे
(वचन ११).
आता याचा अर्थ पाहू: जीवन म्हणजे काय? सर्वसाधारण अर्थ मरण न पावणे. सार्वकालिक जीवन म्हणजे सदासर्वकाळ जिवंत राहणे. बायबल अशा स्पष्टीकरणापेक्षा  जीवन व मरणाविषयी अधिकच स्पष्ट बोलते.
۰  शारीरिक मरण (२ करिंथ ५:८) हा आपल्या शारीरिक अस्तित्वाचा शेवट नाही. तर  आत्म्याचे शरीरापासून विभक्त होणे आहे.
۰  आध्यात्मिक मरण ( इफिस ४:१८) हा आपल्या आत्मिक अस्तित्वाचा शेवट नाही. तर  व्यक्ती देवापासून विभक्त होणे आहे. याचे कारण हे आहे की आपण पापी आहोत ( रोम ६:२३).
۰ सार्वकालिक मरण (प्रकटी २:११) याला दुसरे मरण म्हटले आहे. त्यात पापी व्यक्तीची देवापासून कायमची सर्वकाळाकरता ताटातूट होते.
۰ अशा प्रकारे मरणाचा गाभा हा आहे की विभक्त होणे. मग येशू देत असलेले जीवन कोणते आहे?
योहान १७:३ वाचा. त्यात सार्वकालिक मरणाच्या उलट असलेल्या सार्वकालिक जीवनाची व्याख्या देत आहे – केवळ सदासर्वकाळ जिवंत राहणे एवढेच नाही तर देवाशी असलेल्या संबंधातील ऐक्यात सदासर्वकाळ राहणे. देवाशी नाते जोडणे. सार्वकालिक जीवन म्हणजे “देवाला व ख्रिस्ताला सदासर्वकाळ ओळखणे.
कसे? जेव्हा ख्रिस्त आपल्या पापाशी वधस्तंभावर सामना करतो व क्षमा आणि शुद्धी बहाल करतो, तेव्हा आपल्याला देवापासून काहीही विभक्त करू शकत नाही. हाच देवाचा पुत्र जीवन कसा आहे याचा अर्क आहे. आणि जेव्हा आपण ख्रिस्ताशी संयुक्त होतो तेव्हा आपण जिवंत राहतो.
• आता वचन १२ पाहा. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला प्राप्त करता तेव्हा तेव्हा तुम्हाला जीवन प्राप्त होते. जर तुम्ही ख्रिस्ताला प्राप्त केले नाही तर तुम्हाला जीवन प्राप्त होत नाही. तुम्हाला भवितव्य प्राप्त होण्याची जागा एकच आहे, आणि ती ख्रिस्तामध्ये आहे.
•  आता ही पायरी कशी प्रगत होत जाते ते लक्षात घ्या: देवाने आपल्या पुत्राविषयी साक्ष दिली. का? तर त्याचे जे ऐकतील ते त्याच्यावर विश्वास ठेवतील. त्यामागे उद्देश काय? तर आपण विश्वास ठेवावा व जिवंत राहावे. देव जाणतो की आपण पापात मृत आहोत. आणि विश्वास ठेवणे हाच त्यावरचा उपाय आहे. आपण इत:पर विभक्त असू नये अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो आपल्या पुत्राला प्रगट करतो यासाठी की आपण जगावे (योहान २०:३१; ३:१५).
•सार्वकालिक जीवन हे दान असून ते विकत घेता येत नाही. देवाने आपल्याला दिलेल्या पुत्रामध्ये ते सापडते. ते वर्तमानकाळातील आपली मालमत्ता असून येणाऱ्या युगातही आपलेच असणार.

मनन व चिंतनासाठी प्रश्न
एका बाजूला असे लोक आहेत की जे कसलाच शोध घेण्यासाठी धडपड करीत नाहीत त्यामुळे ते जीवनाचा शोध घेण्याचीही धडपड करीत नाहीत. पण आपल्याला एक मोठा धोका आहे की आपण देवाचा निष्फळ शोध करत राहू. योहान ५:३९, ४० वाचून चर्चा करा:
आस्थेने बायबलचा अभ्यास करणारा विद्यार्थी असूनही ख्रिस्ताच्या जीवनाला मुकणे शक्य आहे का?  कसे?
• तुमच्या शास्त्राभ्यासाचे उद्दिष्ट काय आहे? उत्तम कौटुंबिक जीवन असावे हे आहे का? सुज्ञ आर्थिक जीवन     दिसावे हे आहे का? ख्रिस्ती मुले वारशाने मिळावी हे आहे का? अधिक चांगली नीतिमूल्ये असणारी व्यक्ती असणे हे आहे का? जर या कोणत्याही प्रश्नाला तुमचे होकारात्मक उत्तर असेल तर सावध असा. तुम्ही  परूश्यांसारखे होत असण्याचा धोका आहे. ख्रिस्त प्राप्त करण्यासाठी वचनात शोध घ्या. मग त्याच्याबरोबर  वाटचाल करा. आणि मग तो तुमचे जीवन त्याच्या इंधनाने प्रज्ज्वलित करील.