अप्रैल 6, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पवित्र स्थानातील पडदा

तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मत्तय २७:५१.

इतका जाड व मजबूत पडदा फाटून दुभागणे हा काही हलकाफुलका चमत्कार नाही; तसेच तो फक्त सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याकरताही केला नाही – यामध्ये बरेच धडे गोवलेले आहेत.

यामुळे कायदेकानून असलेले जुने नियम जुन्या जीर्ण वस्त्रांसारखे बाजूला सारले गेले. जेव्हा येशू मरण पावला तेव्हा सर्व यज्ञांची समाप्ती झाली कारण ते त्याच्यामध्ये पूर्ण केले गेले. त्यामुळे यज्ञ करण्याचे स्थळ जे मन्दिर त्याच्यामध्येच हा स्पष्ट बदल घडून आला.

पडदा फाटला गेल्याने जुन्या समर्पित वस्तू उघडपणे दिसू लागल्या: दयासन आता दिसू शकत होते. आपल्या येशूच्या मरणामुळे आता आपल्याला देवाचे स्पष्ट प्रकटीकरण झाले आहे. कारण येशू हा मोशेप्रमाणे नव्हता जो  २ करिंथ ३:१३ नुसार आपल्या चेहऱ्यावर आच्छादन घेत असे. जीवन व अविनाशित्व ही आता प्रकाशात आणली गेली. आणि ज्या गोष्टी जगाच्या स्थापनेपासून गुप्त राखल्या होत्या त्या येशूमध्ये दाखवल्या गेल्या.

प्रायश्चित्ताचा वार्षिक विधी आता रद्द केला गेला. जे रक्त दर वर्षी पडद्याच्या आत प्रायश्चित्तासाठी महायाजक शिंपडत असे, ते चिन्ह म्हणून असलेले विधीसंस्काराचे स्थळ आता संपुष्टात आले.  आता कोणत्याही गोऱ्ह्याच्या अथवा मेंढ्याच्या रक्ताची गरज नाही कारण येशूने पडद्याच्या आत स्वत:चे रक्त घेऊन प्रवेश केला.

यामुळे देवाजवळ आता आपण सरळ प्रवेश करू शकतो आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वासीयाला ही संधी प्राप्त झाली आहे. एका छोट्याश्या भगदाडातून अर्धवट दिसणाऱ्या दृश्याने आपण दयासन पाहत नाही तर हा पडदा वरपासून खालपर्यंत फाटलेला आहे. आपण धैर्याने या दयासनाकडे येऊ शकतो.

अशा अद्भुत रीतीने परमपवित्र स्थानाकडे जाण्यासाठी आपल्या प्रभूने अखेरीस  केलेली आरोळी सर्व संतांना स्वर्गाचे द्वार उघडणारी होती नव्हे का? आपल्यासाठी रक्त सांडलेल्या आपल्या प्रभूकडे स्वर्गाची किल्ली आहे. तो उघडतो आणि कोणीही ते बंद करू शकत नाही. त्याच्याबरोबर स्वर्गीय स्थानामध्ये आपण प्रवेश करू या आणि आपला शत्रू कायम पदच्युत होईपर्यंत आपण तेथेच असू या. २ करिंथ ३:१३.

Previous Article

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

Next Article

तुमचे दु:ख व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते का?

You might be interested in …

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का?

ट्रेवीस मायर्स गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या […]

माझी चोरी माझ्या आत्म्याबद्दल काय सांगते?

जॉन पायपर चोरी ही निरनिराळ्या प्रकारे दिसून येते. लुटणे, दुकानातून उचलगिरी करणे,  कामामध्ये टाळाटाळ, टॅक्समध्ये घोटाळा. पण अशी चोरी करण्यामागची आतील धारणा आपल्याबद्दल काय सांगते? त्यासाठी प्रथम इफिस ४:२८ वाचू या. “चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी […]

आपल्या श्वासाखाली असलेला शाप

ग्रेग  मोर्स कुरकुर. कुरकुर या शब्दात काय आहे? स्वर्गामध्ये न ऐकलेला आवाज, मानेने नाही म्हणणारे ह्रदय, श्वासाखाली असणारा शाप, अनेक मान्यवर पापांचा उच्छवास – अकृतज्ञता, आभार न मानणे, असमाधान. तो एक काबूत असणारा क्रोध आहे, […]