नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा ११.   १ योहान २:२०,२१, २४-२७ स्टीफन विल्यम्स

                                                             ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग २

  • आपण पुष्कळदा “अभिषेक” किंवा “अभिषिक्त” असे शब्द वापरतो. या शब्दाचा वापर कोणत्या अर्थाने  केला जातो यावर चर्चा करा.
    सर्वसामान्यपणे मंडळीतील खास लोकांना ” खास अभिषेक” झाल्याचे बोलले जाते. योहान आपल्याला समजावून सांगत आहे की हे खरे नाही; आपणा “सर्वांना” अभिषेक झाला आहे. पण आणखी एक विचार मांडला जातो तेव्हा पवित्र आत्म्याच्या “दुसऱ्या आशीर्वादाविषयी” बोलले  जाते; ते तारणानंतर घडते असे म्हटले जाते. आज आपण हे पाहत असताना समजेल की हे सुद्धा या  वचनातून सादर केलेले नाही, तर मंडळीत देवाने आपणा सर्वांना किती आशीर्वादित केले आहे ते दिसेल.
    •           दुसऱ्या अध्यायातील ख्रिस्ती जीवनाविषयीचे चार फरक (आज्ञापालन – अवज्ञा; प्रीती -द्वेष; देवकेंद्रितता –    जगकेंद्रितता; ख्रिस्ती – ख्रिस्तविरोधी) आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत की ख्रिस्तविरोधक, खोटे     शिक्षक व या मंडळीला चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्यांच्या तुलनेत ख्रिस्ती व्यक्तीची लक्षणे कोणती आहेत.
    •           देवाने आपल्याला चुकांपासून सुरक्षित राहता येण्यासाठी दोन साधने पुरवली आहेत: पवित्र आत्म्याचा  अभिषेक आणि प्रेषितीय वचने. ही दोन्ही आपल्याला परिवर्तनाच्या वेळीच प्राप्त झाली आहेत.

शास्त्राभ्यास

आपणा सर्वांना अभिषेक झाला आहे

जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे; म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे (:२०).

  • मागे आपण १९ वे वचन अभ्यासले. ख्रिस्तविरोधकांचे एक लक्षण आपण पाहिले की ते जेव्हा सहभागिता सोडतात तेव्हा ते अविश्वासी आहेत, (“आपल्यातील नाहीत”) हे स्पष्ट कळते. 
    •           येथे हा फरक दाखवून योहान वाचकांना खात्री करून देत आहे. “जे विश्वास ठेवतात” (५:१३) हा त्यांचा  स्वत:चा दर्जा आहे. तुम्ही विश्वासी आहात असे तो फक्त म्हणत नाही तर त्यांची आध्यात्मिक सत्यता वर्णन करून तो विश्वासी व अविश्वासी या दोहोंमधील फरक स्पष्ट करतो . 
    ▫   “ते” सोडून जातात कारण ते “आपल्यातील नाहीत.” 
    ▫   पण तुम्हांला पवित्र आत्म्याकडून “अभिषेक झाला आहे;” आणि तुम्हा “सर्वांना” ज्ञान आहे
    •      योहानाच्या ह्या वाक्यरचनेत कोणालाही खास असण्याला जागा नाही. ख्रिस्ताच्या विश्वासीयांच्या शरीरातील  सर्वांसाठी हे दान                    असल्याचे तो वर्णन करतो; आणि त्याचा परिणाम या शरीरातील सर्वांवर होतो.
    ▫   “अभिषेक” होण्याचा अर्थ काहीतरी ओतले गेल्याने त्याचा विशिष्ट परिणाम झाला आहे. दाविदाला अभिषेक झाला आणि त्याची                भावी राजा म्हणून नेमणूक झाली. येशू जो मशीहा त्याला बाप्तिस्म्याच्या वेळी पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला; आणि त्याने सेवेला            सुरुवात केली. (लूक ४:१८; प्रे.कृ. ४:२७; १०:२८)

▫   आपले चुकांपासून रक्षण व्हावे म्हणून विश्वासी जनांना अभिषेक केला आहे. त्याचा परिणाम २० व्या  वचनात दिला आहे.
۰   लक्षात घ्या, जो पवित्र पुरुष, तो अभिषेक करत आहे – हा देव आहे,  पुत्र आहे (योहान ६:६९; इब्री ३:३).
۰   अभिषेक पवित्र आत्म्याचा आहे (२ करिंथ १:२१, २२).
۰   पवित्र आत्मा आपल्यामध्ये ज्ञान प्रभावी करतो.
۰   अभिषेक आणि त्याचा परिणाम ही दोन्ही सर्व विश्वासी जनांसाठी आहेत. एका विशिष्ट  गटासाठी केवळ नाहीत (१ करिंथ १२:१३). योहान           यिर्मया ३१:३४ मधून संदर्भ घेत असावा  – “सर्व ओळखतील”
•           ही महत्त्वपूर्ण शिकवण आहे. आजच्या (अभिषिक्त म्हणवून घेणाऱ्यांविषयी) आणि योहान लिहीत असलेल्या  काळातील अज्ञेयवादी  लोकांविषयी. काही लोक आपल्यालाच देवाकडे खास मार्गाने जाता येते असा दावा करत होते. योहान दावा करीत आहे की सर्व विश्वासी जनांमध्ये तितकाच पवित्र आत्मा वसतो. सत्याकडे जाण्यासाठी आपल्या सर्वांसाठी एकच मार्ग आहे.

लागूकरण : पवित्र आत्म्यावर अवलंबून राहा, मानवावर नव्हे.

तुम्हास बहकवणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हास लिहिले आहे. तुम्हाविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून जो तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहातो, तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक – तो सत्य आहे, खोटा नाही – तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो. त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा (१ योहान २:२६,२७).

  • पण फसवणूक ही फार मोठी समस्या आहे (वचन २६). पायाभूत सुवार्तेखेरीज आपल्याला अधिक भक्कम आपल्या स्वत:पलीकडचे काहीतरी हवे असते. म्हणून योहान आपल्या बलशाली मदतीवर जोर देत आहे – आपल्या ताकदीने आधारासाठी कसेबसे बिलगून राहायला देवाने आपल्याला फक्त सत्य दिलेले नाही. त्याने आपल्याला त्याचा आत्मा, अभिषेक दिला आहे.
    •        आपल्याला हा पवित्र आत्मा, अभिषेक कसा सहाय्यक होतो? तो आपला खरा व परिपूर्ण शुद्ध शिक्षक आहे.  योहान पुढे अगदी              जबरदस्त विधान करतो – “तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही” उलट पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवतो.
    ▫   सहाजिकच याचा अर्थ असा नाही की शिक्षकांची अजिबात गरज नाही. योहान स्वत: त्यांचा शेवटी  शिक्षक आहे. आणि देवानेच                मंडळीला शिक्षक लावून दिले आहेत (१ तीमथ्य ५:१७).
    ▫   तो तर पवित्र आत्म्याच्या अत्युच्च अंतिम शिक्षकी सेवेविषयी बोलत आहे. हा आत्मा “सत्याचा  आत्मा” आहे (योहान १६:१३), त्याची          मूलभूत सेवा ख्रिस्ताला उंचावण्याची आहे (योहान  १६:१४).
    ▫   मंडळीचा अतिशय वाईट काळ म्हणजे, जेव्हा देवाचे वचन दडपले जाते आणि जेव्हा वचनाचा अर्थ  योग्य लावला गेला आहे की                नाही याची पडताळणी न होता ते काम आता एका छोट्या गटाच्या हाती  देण्यात येते. सर्व खरी संजीवने लोकांच्या हातात व                    अंत:करणात देवाचे वचन पडणे याभोवती  केंद्रित झाली आहेत.
    ▫   आपल्याला “मध्यस्थी करणाऱ्या” शिक्षकांची गरज नाही. देवाच्या आत्म्याद्वारे आपणा सर्वांना देवाचे मन समजते.
    •       शेवटी ख्रिस्ती लोक असहाय नाहीत. पवित्र आत्मा आपल्याला वचन समजायला व देवाच्या वचनाच्या पानापानात येशूला                          न्याहाळायला मदत करतो.

आपण सर्व सत्य समजण्यास समर्थ आहोत

तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला लिहिले असे नाही; तुम्हाला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही; म्हणून लिहिले आहे (१ योहान :२१).

  • योहान आपल्या वाचकांना खात्री देत आहे: तुम्हाला दुसऱ्या सत्याची गरज नाही. तो पुष्टी द्यायला व त्यांना काय माहीत आहे व प्राप्त झाले आहे याचे स्मरण करून द्यायला लिहीत आहे:
    ▫   त्यांना सत्य माहीत आहे.
    ▫   पण हे आणखी सखोल पाहिले पाहिजे. कारण ते देखील पवित्र आत्म्याद्वारे सत्य व लबाड पारखू शकतात.
    •      ही साधने लक्षात घेऊन ( पवित्र आत्मा आणि सत्याचे वचन) आपण चुका करण्यापासून स्वत:ला सुरक्षित कसे  राखू शकतो याचे             मार्ग योहान सांगतो.

लागूकरण : सत्याबाबत सनातनी असा, क्रांतीकारक असू नका.

तुमच्याविषयी म्हणायचे तर, जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले, ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन आहे (१ योहान २:२४,२५).

  • योहान अगदी सडेतोड असे विधान करीत आहे की जे आजही लागू आहे. आपण रोज नवी फॅशन आणू      पाहणाऱ्या जगात राहातो – काहीतरी नवीन करायचे, नवीन ख्रिस्तीत्व, नवीन पद्धती. पण चुकांपासून सुरक्षित   राहण्याचा हा उपाय योहान पुरवत नाही. तो काय आज्ञा देतो? “जे तुम्ही आरंभापासून ऐकले आहे, ते  तुम्हामध्ये राहो”
    ▫   ख्रिस्ताची सुवार्ता तेव्हा बदलली नाही, तेव्हापासून आजवर बदललेली नाही, पुढेही बदलणार नाही. ती अजूनही “तारणाप्राप्त्यर्थ                देवाचे सामर्थ्य अशी आहे.”
    ▫   सुवार्तेला इजा करण्याचे काम आपण कसे करतो तर तिच्यात राहणे बंद करण्याने. म्हणून ही आज्ञा देत आहे. त्यात राहण्यासाठी           परिश्रम करावे लागतात, काम करावे लागते – योहान सांगत आहे की क्रांतीकारक होण्यासाठी नव्हे तर सनातनी राहण्यासाठी              लढा  द्या.
    ▫   शेवटच्या काळाचे लक्षण म्हणजे सत्याबाबत नवे काहीतरी सुरू करणे. (२ तीमथ्य ३:१,७; ४:३; प्रे. कृ. १७:३१).
    •      ख्रिस्ती सत्याचा पाया तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून योहान म्हणतो की आपण त्या जुन्या युगाच्या येशूच्या  सत्यात घट्ट व खोलवर           रुजले गेलो तर ते आपल्याला त्याच्याशी प्रामाणिक ठेवील. (“तुम्ही पुत्रामध्ये व  पित्यामध्ये राहाल”)
    •      खोटे शिक्षण व चुकांचे परिणाम जीवनाचा नाश होय. पुत्राशी व पित्याशी एकनिष्ठ व जडून राहण्याचे अभिवचन सार्वकालिक जीवन          होय (वचन २५; योहान १७:३).

चर्चेसाठी प्रश्न

  • मानवी शिक्षकांकडे जाण्याचे योग्य व अयोग्य मार्गही आहेत. यापैकी योग्य मार्गांविषयी चर्चा करा. आपण मंडळीच्या पुढारी/ शिक्षकाला वाजवीपेक्षा जास्त मान कसा देतो? किंवा मंडळीच्या पुढारी/ शिक्षकाला योग्य    मान कसा देत नाही? (इब्री १३:१७)
    •           सर्व ख्रिस्ती पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेले आहेत म्हणून त्यांना सत्य समजू शकते. पण देवाच्या वचनात सहज समजू                           शकणार नाही अशा गहन गोष्टी पुष्कळ आहेत. त्यासाठी आपण पवित्र आत्म्याची मदत कशी घेऊ      शकतो? ( स्तोत्र ११९:                 १७,१८)

 

 

Previous Article

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस

Next Article

मी असले कृत्य करणार नाही लेखक: मार्शल सेगल

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर                             अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १६ भग्न शरीरे  (मार्क ५:७-८; १०: ३३-३४) ‘तुम्ही कधी शत्रूला ताब्यात घेतले आहे का?’ — ते कां कूं करत आहेत असे दिसले. मी […]

कावकाव … की..?    

लेखक: शेली स्टायर काही दिवसांपूर्वी मी बाहेरच्या बागेत बसून गावातल्या वातावरणाचा आनंद घेत होते. अचानक जवळच्या गर्द झाडांमध्ये गोंधळ आणि धामधूम ऐकू येऊ लागली. माझ्या निवांत दुपारच्या मननामध्ये अचानक अडथळा आला कारण अचानक कावळ्यांची कावकाव […]

लेखांक २: जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत […]