Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on जुलाई 15, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा १३.                         १ योहान ३:१                   स्टीफन विल्यम्स

धडा १३.   १ योहान ३:१ स्टीफन विल्यम्स

 देवाची आपल्यासाठी अद्भुत प्रीती

 

परदेशी मालाविषयी कोणती गोष्ट आपल्याला भुरळ पाडते? जर्मनी किंवा ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड अथवा अमेरिका येथे बनवलेल्या गोष्टींविषयी आपल्याला विशेष काही वाटण्याचे कारण काय? यावर चर्चा करा.
योहान आपल्याला कदापि प्राप्त होऊ न शकणाऱ्या महान “परदेशी” दानाचे वर्णन करून सांगत आहे. ते म्हणजे  आपण देवाची मुले व्हावे म्हणून प्राप्त होणारी प्रीती. आणि या प्रीती दानाकडे आपण पाहावे असे असे तो   आपल्याला सांगतो. देवाने कशा प्रकारची प्रीती आपल्याला दिली आहे ती आपण “बघायची” किंवा  “पाहायची” आहे. तेच काम आज आपण करणार आहोत.

शास्त्राभ्यास

देवाची प्रीती अवाक् होऊन नवल करावी अशी आहे

पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे, पाहा (३:१).

 • योहान प्रत्यक्षात असे म्हणत आहे की “पाहा, कोणत्या देशाचे प्रेम पित्याने आपल्याला दिले आहे.” काहीतरी परदेशी, काहीतरी परप्रांतीय, काहीतरी निराळ्या प्रांताचे नेहमीच आश्चर्यचकित करते.
  •           अतिशय उल्हसित करणारे, अवाक् करून टाकणारे, आपल्याला कधीच मिळू न शकणारे असे काहीतरी परदेशी आपल्याला मिळणार. “केवढे” / ” कोणत्या प्रकारचे” असा शब्दप्रयोग अनेक ठिकाणी वापरलेला आढळतो.  उदा. मत्तय ८:२७ – कारण  येशू ज्या ठिकाणाहून आला तेथून ते येते. आणि “हा कोणत्या प्रकारचा”  असा उद्गार त्याच्यासाठी अनेक ठिकाणी केलेला आढळतो.
  ▫         २ पेत्र ३:११ जे हे दान प्राप्त करतात ते ही असेच होतात, त्या दानाप्रमाणेच त्यांचा सुगंध असतो.  तुम्हाला ते परदेशी वस्त्र केव्हा प्राप्त झाले होते ते आठवा. जेव्हा ते तुम्ही परिधान करता तेव्हा त्याला  एक विशिष्ट ताजा सुगंध असतो. हीच गोष्ट देवाची प्रीती प्राप्त करणाऱ्यांच्या संदर्भात असते.  लोकांच्या लक्षात येते की तुमच्या जवळ काहीतरी विशेष गोष्ट आहे.

 देवाची प्रीती: दत्तकपणाचे वैयक्तिक दान

आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे (३:१).

 • ही प्रीती “दान” म्हणून “देण्यात”आली आहे. ती फक्त प्रदर्शित केली नाही किंवा फक्त दर्शवली नाही. तर ती आपल्याला “बहाल करण्यात” आली आहे.आणि ती पाठवणारा खुद्द पिता आहे.
 • ती आपल्याला देण्यात आली आहे- ही देणगी वैयक्तिक रीतीने अनुभवता येते. हे वचन योहान ३:१६ सांगते त्या प्रकारचे सर्वसामान्य प्रीतीचे विधान नाही. ती प्रीती आपल्याला “बहाल करण्यात” आली आहे. जर तुम्ही    ख्रिस्ताला ओळखत असाल तर हे दान वैयक्तिक रित्या देवाकडून तुम्हाला प्राप्त होते!
  •           आणि हे दान काय आहे:
  ▫         आपल्याला देवाची मुले “नाव मिळाले आहे.” हा कायमचा किताब आपल्याला मिळाला आहे. ती गौरवाची गोष्ट आहे.
  ▫         हे दान प्राप्त होण्यापूर्वी आपले नाव काय होते? (१ करिंथ ६:९-११) यातून तुम्हीच निवडा.
  ▫         आता ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे आपल्याला “अनीतिमान माणसे” म्हटले जाणार नाही. तर “शुद्ध,” “क्षमा पावलेले” असे म्हटले जाईल. या सर्व गोष्टी सत्य आहेत. पण ही त्याची आपल्यावरील प्रीती शिक्कामोर्तब करण्यासाठी देव अधिक काही करतो. तो आपल्याला ” देवाची मुले” हे नाव देतो.
  ۰         आम्ही जेव्हा मुक्ती योजना शाळा काढली तेव्हा मुले थेट रस्त्यावरून, घाणीतून, दुर्गंधीतून, सर्व प्रकारची केसात घाण घेऊन यायची. पहिली गोष्ट कोणती केली जायची तर त्यांना अंघोळ दिली जायची. नवीन कपडे घातले जायचे. यासाठी की ते स्वच्छ होऊन        शिक्षण घेण्यासाठी सज्ज व्हावेत. पुढे जेव्हा शाळा निवासी झाली तेव्हा ते आपल्या आपण व्यवस्थित तयार होऊन आपले आरोग्य राखू लागले. देव आपल्यासाठी जे काही करतो त्याचे हे अर्धेही उदाहरण नाही.
  ۰         आपण जे केले नाही त्याद्वारे  घेतले तर हे वचन अधिक चांगले समजेल. जर आपले पुत्र व कन्या म्हणून आपण त्या सर्वांना आपल्या घरी नेले असते, त्यांना आपल्या कुटुंबाचे सर्व  कायदेशीर व सामाजिक हक्क दिले असते तर! हेच देवाने केले. त्याचे दान पूर्ण विश्वासाचे  आहे.

देवाची प्रीती : वास्तव बदलणारी

आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले – आणि आपण तसे आहोच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही (३:१).

 • पण योहान एक पाऊल पुढे जातो. त्याने फक्त आपले शीर्षक बदलले नाही की: “माझी मुले म्हणून मी तुम्हाला कायदेशीर दर्जा दिला आहे.” तर हे प्रत्यक्षात झालेले वास्तव कार्य आहे.
  ▫         मी सर्वात उत्तम कोणती गोष्ट करू शकतो तर कोणाला तरी माझ्या कुटुंबात दत्तक घेऊ शकतो.
  ▫         देवाचे सामर्थ्य असे आहे की जेव्हा तो दत्तक घेतो, तेव्हा नवा जन्म देऊन तो या मुलांना आपली  स्वत:ची मुले करून घेतो. आपण केवळ नावाची मुले नसतो. योहान म्हणतो, “आम्ही तसे आहोच.”
  •           कशा प्रकारे?
  ▫         वास्तव तपासा (रोम ८:१५-१७).
  ▫         पण अजून हे सर्व वास्तव आज आपण पूर्णपणे घडलेले पाहू शकत नाही याचे कारण आपल्या दत्तकपणाचे खरे वास्तव पुढे समोर येणार आहे. वास्तविक रोम ८:१७ मध्ये म्हटले आहे की आपले त्याच्याप्रमाणेच गौरव प्राप्त होण्यापूर्वी  आपल्याला आता दु:ख सोसायचे आहे. जी आपण पित्याची  मुले ती आपण आरशाप्रमाणे ख्रिस्त या पुत्राचे जीवन आपल्यामधून प्रतिबिंबंत करतो.
  ۰         रोम ८:१९ – संपूर्ण निर्मिती आपल्या मुक्ततेची वाट पाहत आहे.
  ۰         पण मुक्तीच्या अग्रस्थानी पित्याची महान प्रीती व्यक्त होते. पुत्रत्व – ख्रिस्तासोबत वारीस, पूर्ण गौरव, जे काही ख्रिस्ताचे ते सर्व                   आपले आहे.
  •          दरम्यानच्या काळात आपण जगत असता लोकांना या वास्तवाचे आकलन होणार नाही. (वचन १):
  ▫        जग त्याला ओळखत नाही. ते आपल्यालाही ओळखणार नाही.
  ▫        वास्तव हे आहे की महान दान जेव्हा मिळते तेव्हा त्यानंतर दुरावा येतोच.
  ۰   आपल्या संस्कृतीत आपण ही खेळी पाहतो की ज्या लोकांना मोठी बक्षीसे मिळतात त्यांना उत्तेजन व आनंदाच्या बदल्यात निंदा,               लज्जा, मत्सर हीच प्राप्त होतात.
  ۰         देवाची मुले होण्यातही असेच घडते. जे देवाच्या मुलांना सुगंधदायी वाटते ते इतरांना मरणदायी वाटते (२ करिंथ २:१५-१६).                     येशूने  या दुराव्याच्या सत्याबद्दल सांगितले- त्याच्या अनेक विरोधकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही कारण तो सत्य बोलत                 होता (योहान ८:४५).

चर्चेसाठी प्रश्न

 • या जगात ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून वावरत असताना जेव्हा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ही सत्ये आपल्याला समाधान देऊन कशी सहाय्यक ठरतात?
  • देवाचे दत्तक घेणारे प्रेम अनुभवण्यातून व खऱ्या अर्थाने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यातून आपण कोणत्या  वाईट भावनांपासून व दुर्वर्तनापासून मुक्ती पावतो?