Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 12, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा १७.                         १ योहान ३: ११- १५               स्टीफन विल्यम्स

धडा १७.     १ योहान ३: ११- १५ स्टीफन विल्यम्स

 

प्रीती की द्वेष; काईन की खिस्त

काही वेळा एखादी व्यक्ती कशाचे तरी  चिन्ह बनते. उदाहरणार्थ, अहिंसा म्हटले की गांधीजींचे नाव समोर येते. किंवा समाजसेवा  म्हटले  की मदर टेरेसा, तर अॅडॉल्फ हिटलर म्हटले की अत्यंत अधमता समोर येते. अशा काही व्यक्ती तुमच्या नजरेसमोर येतात का?

आजच्या आपल्या शास्त्रभागात आपण कशा प्रकारची प्रीती करतो याची दोन चिन्हे सादर करतो. एक आहे काईन, तो जग कसे प्रेम करते ते प्रदर्शित करतो. तर दुसरा आहे ख्रिस्त, तो देवाची प्रीती प्रदर्शित करतो. खरोखर, ज्यांच्यामध्ये देवाचे जीवन आहे ते ख्रिस्तासारखी प्रीती करतात.

शास्त्राभ्यास

जे नीतिमानांचा द्वेष करतात त्यांचे प्रतिनिधित्व करणारा काईन आहे

१. जुन्या कराराची शिकवण आठवा  (वचन ११)

जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी (३:११).

 • योहान प्रीतीचा मुद्दा तिसऱ्या अध्यायापूर्वीच मांडत आहे. प्रीती करा ही नवी आज्ञा आहे. ख्रिस्ती प्रीती ख्रिस्ताच्या विजयाच्या युगाची पहाट झाल्याचे प्रगट  करते (१ योहान २:७,८).
  •  पण नवीन आज्ञा हे नवीन जीवनशैलीचे काहीतरी नवीन प्रगटीकरण नव्हे.  तो सुवार्तेचा जुन्या काळापासूनचा संदेश आहे. म्हणून योहान ११व्या वचनात पुन्हा सांगतो की – प्रीती करण्याची आज्ञा ख्रिस्ती लोकांना  मंडळीच्या प्रारंभापासून शिकवली आहे. विश्वासी व्यक्तीच्या जीवनात झालेल्या ख्रिस्ताच्या कार्याचा तो मूलभूत परिणाम आहे.
  ही गोष्ट अत्यंत दिलासा देणारी आहे, कारण काही परिस्थितीत (काही मंडळ्यांमध्येही) आदर्श प्रीती पाहायला मिळणे कठीण आहे.
  पण प्रारंभी असे नव्हते. प्रीती हा येशूच्या शिकवणीचा गाभा आणि आदर्श होता. आपल्यापुढे कित्ता नाही असे नाही.

२.  काईनाच्या पापाची आठवण करा (वचन १२)

काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला ? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती व त्याच्या बंधूची नीतीची होती (३:१२).

 • प्रीतीबद्दल अधिक सविस्तर शिकवताना आपण कसे नसावे यासाठी ती काईनाचे उदाहरण देतो (व. १२).
  ▫काईनाच्या द्वेषाचे मूळ “त्या दुष्टामध्ये” होते.
  ▫काईनाच्या द्वेषाचा परिणाम: खून, क्रूर हत्या. येथे खुनासाठी वापरलेल्या शब्दाचा अक्षरश: अर्थ “गळा चिरणे” असा होतो.
  •    काईनाचा द्वेष सैतानाशी निगडित आहे.
  ▫ पाप सैतानापासून आहे (१ योहान ३:८).
  ▫ पण खून देखील सैतानापासून आहे (योहान ८:४४).
  •    पुढे योहान आपल्याला काईनाचे पाप समजावून सांगतो.
  ▫ हाबेल काईनाविरुद्ध काही वाईट करत होता यामुळे हे झाले नाही. तर सत्य याउलट होते. काईनच अधर्म करत होता व आपल्या              नीतीने वागणाऱ्या भावाचा द्वेष करत होता (वचन ११).
  ▫ ज्या द्वेषामुळे त्याने त्याचा खून केला तो मत्सरी द्वेष होता. आपल्यापेक्षा आपला भाऊ अधिक नीतिमान आहे हे पाहून त्याचे                    अंत:करण जळत होते तसेच त्याचे अर्पण व त्याचे जीवन त्याच्यापेक्षा अधिक देवाच्या इच्छेशी संयुक्त होती. आपण स्वत:                           बदलण्याऐवजी त्याने आपल्या द्वेषाच्या लक्ष्याचाच काटा काढला.

३. जगाची जीवनशैली लक्षात घ्या

बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका (वचन १३).

 • काईनाच्या द्वेषाविषयी बोलत असता एकदम योहान जग आपला द्वेष करते याविषयी कसे काय बोलतो?
  • कारण काईन जगाच्या द्वेषाचे प्रतिनिधित्व करतो. काइनाने प्रथम जे वर्तन प्रदर्शित केले तेच वर्तन आज जग   दाखवून देत आहे. जग हे काईनाचे संतान आहे. जग आपला द्वेष करते याविषयी आपण आश्चर्य मानायचे कारण नाही.
  •  का? कारण काईनाने जसा आपल्या सख्या नीतिमान भावाचा तिरस्कार केला तसेच जग नीतिमत्त्वाचा द्वेष करते.
  जग आपल्या आत्मिक मृत अवस्थेचा पुरावाच सादर करते. आणि जे काही त्याच्यासारखे नाही त्याचा ते द्वेष करते (योहान १५:१८,१९).
  दुसऱ्या बाजूने योहान हे दाखवून देतो की जर आपण जगाचे नसून ख्रिस्ताचे असलो, तर आपण नीतिमानांचा द्वेष करण्याचा काईनाचा स्वभाव दाखवणार नाही. तर उलट आपण नीतिमानांवर प्रीती करू – ते लोक कोण? ते देवाचे लोक – त्याची मंडळी.

प्रीती करण्यासाठी जगणाऱ्यांचा प्रतिनिधी ख्रिस्त आहे

आपण बंधुजनांवर प्रीती करतो यावरून आपणास कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो (३:१४).

 • १६ व्या वचनात याउलट नमुना रेखाटला आहे. “त्याने” म्हणजे ख्रिस्ताने आपल्याकरता स्वत:चा प्राण दिला. या संपूर्ण आदर्शाविषयी आपण पुढील शास्त्रवर्गात तपशीलवार पाहणार आहोत.
  •  वचन १३-१४ मध्ये ख्रिस्तात जिवंत असणाऱ्यांचे (काईनाचे जे नाहीत) वर्तन वर्णन केले आहे.
  ▫पहिली गोष्ट म्हणजे ते जगाच्या विरुद्ध आहे. जग द्वेष करते (वचन १२). आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत.
  ▫वचन १३ मध्ये तारणाचे वर्णन कसे केले आहे? “मरणातून निघून जीवनात आलो आहोत.”  येथे  मंडळीच्या परंपरेचा मुद्दाच नाही. एखाद्याला ख्रिस्ताचा शिष्य होण्याचा एकच मार्ग आहे – तो म्हणजे जेव्हा ते मरणातून जीवनात पुनरुत्थित होतात.
  काहीतरी जिवंत असल्याचा पुरावा कोणता असतो? वाढ होते, शरीरस्वास्थ्य असते, पुनरुत्पादन होते. मग ख्रिस्ती व्यक्ती खरोखर जिवंत असल्याचा पुरावा काय?
  ۰         बंधुजनांवर प्रीती करणे (वचन १३).
  ۰         गलती ५:२२; ५:६;  १ योहान २:१० पाहा
  ۰         येथे प्रीतीचा सर्वसाधारण अर्थ नाही. विशिष्ट अर्थ आहे. जिवंत विश्वासी जन कोणावर प्रीती करतात? बंधुजनांवर. हे प्रीतीचे विधान ख्रिस्ती सहभागितेसंदर्भात आहे.
  •           इतके स्पष्टपणे का नमूद केले आहे? सर्वसामान्यपणे प्रीतीविषयी विधान का केले नाही? कारण ते जगाच्या मनोवृत्तीच्या अगदी                विरुद्ध आहे. जग बंधुजनांचा द्वेष करते (वचन १२). ख्रिस्ताचे लोक बंधुजनांवर प्रीती करतात.
  ▫         ख्रिस्त आपल्या लोकांशी समरूप होतो. (प्रे. कृ. ९:४ आठवा) जग नीतिमानांचा द्वेष करते कारण ते                                                        ख्रिस्ताचे प्रतिनिधी आहेत.
  ▫         त्याचप्रमाणे ख्रिस्ताचे लोक बंधुजनांवर प्रीती करतात कारण ते ख्रिस्तावर प्रीती करतात.
  •           कॅल्विन म्हणतात “ज्याचा आम्ही द्वेष करतो त्याचा आम्ही नाश व्हावा असे इच्छितो.” योहान १५व्या वचनाने या शास्त्रभागाचा समारोप करतो. तेथे तो आपला मुद्दा पुराव्यासह पटवतो – तुम्ही द्वेष करून (देवाच्या दृष्टीने खून म्हणजे मत्तय ५:२१,२७) आपल्या ठायी जीवन असल्याचा दावा करू शकत नाही .

चर्चा व मननासाठी प्रश्न

 • तुम्ही ख्रिस्ताचे की काईनाचे अनुकरण करता? मंडळीत तुम्ही परस्परसंबंधांचे विषय कसे हाताळता? तुम्ही द्वेष आवरून धरून त्याला खीळ घालण्याची इच्छा करता का?
  •  कदाचित सरळसोट द्वेष करणे ही तुमची समस्या नसेल. पण तुम्ही कोणत्या सामाजिक गटात अधिक वेळ खर्च करता? तुम्हाला धार्मिकांचा लोकगट प्रिय आहे, की जगिक लोकांची संगत प्रिय आहे? तुम्ही आपल्या        स्थानिक मंडळीत अर्थपूर्ण नातेसंबंधांचे जतन करता का? (इब्री १०: २५).