Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 26, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा ६.    १ योहान १:१०-२:२.                        खरी शांती                           स्टीफन विल्यम्स

धडा ६.    १ योहान १:१०-२:२.     खरी शांती स्टीफन विल्यम्स

 

  • तुम्ही कधी कोणाविषयी कटुता बाळगली आहे का? कटुतेला पूर्ण विराम देण्याचा अतिशय परिणामकारक तुमचा अनुभव कोणता? कटुता मिटली नाही, तर दोन मार्ग राहातात.
    ▫         ज्या व्यक्तीने अन्याय  केला आहे, तीच स्वत: तो मिटवण्यासाठी काहीतरी करते.
    ▫         ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे, ती स्वत:च सर्व यातना सहन करायचे ठरवते.
    •            जेव्हा आपल्या पापाविषयीचा आपण देवाचा दृष्टिकोन पाहतो तेव्हा त्यामागचा विचार हाच आहे – या गोष्टी सुरळीत करण्याचे
    दोनच मार्ग आहेत
    ▫        आपणच आपल्या सत्कर्मांनी आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त करायचे (हे तर अशक्य कारण त्यासाठी देवाचे पूर्णपणे आज्ञापालन                 करणे आवश्यक आहे).
    ▫        आपण केलेले अपराध देव स्वत:वर घेतो.
    •           पुढील काही वचनांमध्ये आपण हेच पाहणार आहोत की येशूच्या वधस्तंभी जाण्याने हेच सिद्धीस गेले. त्यामुळे केवळ ख्रिस्तावर
    विश्वास ठेवण्याने आपला देवाबरोबर समेट होऊन शांती प्राप्त होते.

शास्त्राभ्यास

देव पाप गांभीर्याने घेतो

आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले, तर तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही (१ योहान १:१०).

  • देवाच्या सहभागितेविषयीचे दोन खोटे दावे अभ्यासल्यावर आता आपण तिसऱ्या शेवटच्या खोट्या दाव्याकडे येत आहोत.
    ▫         ती व्यक्ती देवाची ओळख असल्याचा दावा करीत नाही, तरीही ढोंगी जीवन जगत आहे. आपल्या स्वभावात पाप नाही असाही                  दावा ही व्यक्ती करत नाही.
    ▫         ही व्यक्ती अत्यंत हट्टीपणे आपण पाप केले नसल्याचा दावा करते : देवाला ओळखणे म्हणजे प्रकाशात चालणे, याच्याशी ते                     सहमत असतील. सर्व मानवजात पापात जन्मली आहे आणि पाप ही गंभीर गोष्ट आहे हे देखील त्यांना मान्य असेल.
    ▫         ती व्यक्ती गर्वाने दावा करत आहे की ती पाप करू शकत नाही.
    ۰           हे करण्यासाठी तुम्हाला पाप म्हणजे काय याची नव्याने व्याख्या करावी लागेल. किंवा                                                             ۰               तुम्हाला अत्यंत गर्विष्ठ होऊन आपल्या चुकांकडे पूर्णपणे डोळेझाक करावी लागेल.
    •           योहान या मुद्द्यावर भाष्य करून हा दावा किती गंभीर आहे हे निदर्शनास आणून देत आहे.
    ▫       आपण पाप केले नाही असे म्हणणे ही लबाडी तर आहेच (वचन ६) किंवा स्वत:ची फसवणूक तर आहेच (८)  पण प्रत्यक्षात                       देवाविरुद्ध दुर्भाषण आहे. “आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही”
    ▫         देव तर जाहीरच करत आहे की आपल्या सर्वांच्या ठायी पाप आहे (स्तोत्र १४:२-३). त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे येशू मानवधारी               होण्यातील गांभीर्य ते नाकारते. येशू या जगात येण्याचे कारणच हे होते की पापावर तेवढा एकच उपाय होता  (१ योहान ३:८).
    •           पापासाठी देवाने केलेली तरतूद योहान उलगडून सांगत आहे.

देव पाप गांभीर्याने घेतो याचा येशू हा पुरावा आहे

अहो, माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे (१ योहान २:१).

  • पापाविषयी आणि देवाच्या पावित्र्याविषयी इतके स्पष्ट, पारदर्शक आपण ऐकले तर खालीलपैकी एका प्रकारे आपले वर्तन होणे अपेक्षित आहे :
    आपली नियमांचे पालन करण्याची वृत्ती बळावेल – त्यामुळे आपण असा विचार करू की देवाला संतुष्ट करण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला देवाच्या आज्ञांचे पालन करून नीतिमत्तेचे सरळ जीवन जगायला हवे. आपण खोट्या धार्मिकतेत अडकण्याचा यात धोका आहे.
    हा दर्जा फार उच्च असल्याने आपण तो गाठू शकणार नाही या विचाराने निराश होऊन तसे चालण्याचा तुम्ही प्रयत्नच करणार नाही.
    •           पण योहान नवीन विचारसरणीकडे आपले लक्ष वेधत आहे – नियमांचे पालन करणारे बनणे किंवा मवाळ बनणे  हा यावरचा उपाय नाही. तर येशूच्या उत्तम बातमीला कवटाळणे हा यावरचा उपाय आहे –  पापाच्या पकडीपासून व अपराधी वृत्तीपासून सुटण्याची केवळ देवच तरतूद करतो – सत्कर्मे नव्हे. पापाचे गांभीर्य लपवणे  नव्हे, तर देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर अवलंबून राहणे.
    •           कोणीतरी म्हटले आहे की वधस्तंभ देव तुमच्या पापाकडे किती गांभीर्याने पाहतो याची व्याख्याच आहे. क्षमा  करायला काय                     काय घडावे लागते यावर तुम्ही मनन केल्यास पापाकडे आपण ढिलाईने न पाहता गांभीर्याने    पाहू लागतो, तरीही आपण                         कृपेवर अवलंबून राहायला शिकतो.
    •           योहान येशूला ‘कैवारी’ संबोधतो. या शब्दाचा अर्थ कोणीतरी मध्ये पडून आपली बाजू घेतो. देऊ केलेल्या  मदतीने पुरेशी तरतूद               करून आवश्यक तो आधार दिल्याशिवाय आपल्याला त्या मदतीचा काही फायदा होत नसतो.
    ▫         जर तुमच्या तीन वर्षाच्या मुलाने तुमच्या गाडीचे पंक्चर झालेले टायर बदलण्यास मदत देऊ केली तर  तो एक केवळ विनोदच                 होईल; ती मदत काही कामाची ठरणार नाही.
    ▫         जर तुमच्या घरात काही दु:खद घटना घडली आणि कोणीतरी तुमच्या घरी विदुषकाला पाठवले तर  हा काही विनोद नाही                        किंवा त्याची काही मदतही होणार नाही.
    ▫         त्याचप्रमाणे देव स्वत: आपली पुरेशी मदत होऊ शकणार नाही तोवर पापासाठी असलेली त्याची मदत आपल्याला मदतीची                   ठरणार नाही. आणि याचविषयीची देवाचे वचन आपल्याला हमी देते.
  • पवित्र आत्म्याला ख्रिस्ताचा कैवारी म्हटले आहे (योहान १४: १६, २६). येथे येशूला आपला कैवारी म्हटले आहे. आपल्याला विरोध करणाऱ्या या जगात पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या वतीने आपल्यासाठी विनवणी करत असतो. तर येशू आपला खटला दोषारोप करणाऱ्यांसमोर आपल्या वतीने मांडत असतो.
    ▫         सैतान आपल्या पापांबद्दल आपल्यावर दोषारोप करत असतो (प्रकटी १२:१०) – येथे तो आपल्यावर दोषारोप करण्यासाठी                       सत्याचा वापर करतो, लबाडीचा नव्हे.
    ▫         देवाचा न्याय सतत आपल्यावर दोषारोप करत असतो.
    ▫         आपला विवेकभाव सतत आपल्यावर दोषारोप करत असतो.
    •           पण येशू आपल्यासाठी विनवणी करत असतो. दोन गोष्टी त्याची मदत पुरेशी ठरवतात.

१.  येशू नीतिमान आहे

नीतिमान असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे (१ योहान २:१).

  • ही “नीतिमत्ता” इतकी का महत्त्वाची आहे?
    • जेव्हा तुम्हाला कशाचे शुद्धीकरण करायचे असेल तर परिसर व शुद्धीकरणाचे साधन देखील निष्कलंक असणे आवश्यक असते.
    ▫         रंगांचे उत्तम सादरीकरण करायच्या केंद्रांमध्ये सर्व प्रकारची अशुद्धता दूर करून स्वच्छता मोहरबंद                                                        केलेली दिसते. कामगार पडद्यावर दाखवले जातात.
    ▫         शस्त्रक्रिया चालतात ती खोली जंतूंचा संसर्ग होणार नाही अशा प्रकारे जंतूंविरहित ठेवलेली असते.
    •            येशू हा नीतिमान देव आहे.
    ▫         त्यामुळे तो आपल्याला “सर्व प्रकारच्या अनीतीपासून” शुद्ध करू शकतो (१ योहान १:९)
    ▫         तो त्याची परिपूर्ण नीतिमत्ता आपल्याला लागू करू शकतो (२ करिंथ ५:२१).
    •            येशूची मदत पुरेशी होण्याचे दुसरे एक कारण आहे.

२.   तो आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त  आहे

आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही  पापांबद्दल आहे (१ योहान २:२.)

  • अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर येशूने वधस्तंभावर सिद्धीस नेलेले काम आपली क्षमा विकत घेण्यासाठी अगदी पुरेसे होते. ते कसे हे बारकाईने पाहू या.
    •           ” प्रायश्चित्त” या शब्दाचा अर्थ “संतुष्ट करणे” किंवा “तृप्त करणे” असा होतो.
    ▫         आपला कैवारी न्यायाधीशापुढे आपण निरपराध आहोत असा दावा मांडत नाही. आपली बाजू  मांडताना तो आपली सर्व
    दुष्कृत्ये घेऊन येतो. आपण ती कबूल करतो आणि तो सहमत होतो.
    ▫         आपण अपराधी असल्याने देवाने आपला न्याय केलाच पाहिजे. तो म्हणजे त्याने आपल्याला आपल्या पापाबद्दल संपूर्णपणे
    पुरेशी शिक्षा त्याने दिली पाहिजे. त्याला आपण दिलेल्या न्यायाबद्दल समाधान वाटले पाहिजे. ही गोष्ट आपल्या क्रोधासारखी नाही
    की जो विनाकारण मोजमाप न करता ओतला जातो. आपले पाप जितके गंभीर आहे अगदी बरोबर तितक्याच प्रमाणात देवाचा                क्रोध व्यक्त  होत असतो.
    •           येशू आपला कैवारी आहे. तो आपले प्रायश्चित्तही आहे. प्राथमिक रीतीने देवाचा क्रोध शमवण्याचे ते काम नाही. तर तो व्यक्ती                  आहे, रदबदली आहे. आपला वकील म्हणतो, “माझा वादी अपराधी आहे. मला त्याच्या  बदली घ्या.”
    •           १ योहान १:७ त्याच्या रक्ताविषयी आपल्याला सांगते. त्याच्या वधस्तंभावरील घायाळ होऊन झालेल्या मरणासाठी तो संक्षिप्त
    शब्द आहे. जेव्हा येशू मरण पावत होता तेव्हा देव हे मान्य करीत होता की जे कोणी पश्चात्ताप करतील व विश्वास ठेवतील अशा
    तुमच्या व माझ्या पापांसाठी तो शिक्षा घेत आहे. आणि जेव्हा हे    यज्ञार्पण झाले तेव्हा त्याचा क्रोध पूर्णपणे शमला.
    ▫         जे जळण्याजोगे ते सर्व जळून खाक झाले की मगच आग विझली जाते.
    ▫         देवाच्या क्रोधाच्या अग्निने पुत्राला पूर्णपणे जाळून खाक केले. आणि न्याय पूर्ण करण्यात आला.
    •           किती पुरेसा? केवळ आपल्यापुरता नव्हे. तर जगातील जे सर्व विश्वास ठेवतील अशा सर्वांसाठी. “आपल्याच पापाबद्दल केवळ
    नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे,” हे विधान प्रीती व पुरेसेपणाविषयी म्हणजे  ख्रिस्ताने  केलेल्या पुरवठ्याच्या
    तरतुदीविषयी तर बोलतेच – पण जर समजा संपूर्ण जगाने येशूवर विश्वास ठेवला  तर त्या  सर्वांसाठी ही तरतूद पुरेशी आहे
    असेही सूचित करते. अजून बहुतांसाठी त्याच्याकडे जागा आहे.

चर्चेसाठी प्रश्न

  • ख्रिस्ताचे काम पुरेसे नाही असे दिसून येणारे वर्तन ख्रिस्ती लोक कोणत्या प्रकारे दाखवतात?