Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 19, 2021 in जीवन प्रकाश

तुमच्या लाडक्या चुका सोडून द्या

तुमच्या लाडक्या चुका सोडून द्या

ग्रेग मोर्स

जर आपण अगदी आरंभापासून आपल्या पापाचा इतिहास पाहिला तर आपल्याला सबबींची गर्दी झालेली दिसेल. जेव्हा आदाम आणि हवेच्या ओठाला फळाचा स्पर्श झाला तेव्हा जे घडले त्याचा त्यांच्यावर शिक्का बसला आहे.

नम्र होऊन कबुली देण्याऐवजी आदामाने त्याच्या बायकोला दोष दिला.  “जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले” (उत्पत्ती ३:१२). आदाम त्याच्यासाठी जबाबदार नव्हता तर स्त्री किंवा ज्या देवाने त्याला ती दिली तो. नंतर हव्वेने स्वत:वरचा दोष आणखी पुढे ढकलला.  “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले” (३:१३).

आपले जन्मदाते आदाम व हवा यांना मना केलेल्या फळामध्ये आपली दुष्टता झाकण्याची कल्पना सापडली. आणि हे ज्ञान त्यांच्या मुलांना दिले गेले. मानवांच्या मनाच्या बागांतून  पापाची लाज झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा साठा केला गेला. आपण सगळेच आपल्या चुकांना चांगला पोशाख घालणारे उत्तम शिंपी झालो आहोत.

स्वर्गाकडे जळते निखारे

पतनापासून आदामाच्या कुटुंबाची ही दोष टाळण्याची ही सृजनशीलता अनेक जण दाखवतात. अहरोन आणि नीतिसूत्रातला आळशी ही माझी आवडती उदाहरणे आहेत.

जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला आणि त्याने पाहिले की अहरोन लोकांना मूर्तिपूजेमध्ये पुढे नेत आहे, तेव्हा अहरोनाने स्पष्टीकरण केले की, “त्यांनी ते (सोने) मला दिले; मग मी ते अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले” (निर्गम ३२:२४). बाहेर पडले. कोणी ते घडवले नाही –  सहज अग्नीत सोने  फेकले आणि पाहा ही मूर्ती बाहेर पडली.

किंवा नीतिसूत्रे मधील आळशी माणसाच्या शोधाचे चित्र पाहा. आपण बिछाना सोडून काम करायला का जाणार नाही याबद्दल आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे; भर रस्त्यावर मी ठार होईन”  (नीति. २२:१३). जांभई देत तो म्हणतो, हा नरभक्षक सिंह रस्त्यावर फिरत नसता तर मी नक्कीच काम केले असते. देवाच्या जगात कृतीसाठी दिलेले स्वातंत्र्य हे जबाबदारीशी बांधलेले आहे. आणि आपल्या कृत्यांसाठी जबाबदारी घेणे हे पापी व्यक्तीला नको असते. आपली लायकी नसताना आपण प्रशंसा स्वीकारतो; पण जळत्या निखाऱ्यासारखे दोष बाजूला सारतो.

जर आपण अपराधात पकडले गेलो तर आपणही जोडीदाराला, मूर्ती बनवणाऱ्या अग्नीला किंवा सापाला दोष देतो. किंवा जर आपले कर्तव्य आपण पार पाडले नाही तर आपणही रस्त्यावर फिरणाऱ्या सिंहाचा शोध लावतो. आणि आदामाप्रमाणेच फक्त मानवाला नाही तर देवाला दोष देते. आपले जळते निखारे स्वर्गाकडे निर्देश करतात.

आपण जन्मत:च असे आहोत

मी अशा काही पुरुषांशी बोललो आहे. ते दारू पिणे, अश्लील व्हिडीओ पाहणे, जारकर्म करणे, जगिक सुखासाठी जगणे, असे करणे थांबवतील – जर ते त्यांच्या हातात असेल तर. पण ते थांबवू शकत नाहीत. हे देवानेच त्यांच्यासाठी घडवले आहे. जर त्याची इच्छा वेगळी असती तर ते निराळे जीवन जगले असते. त्यांनी बायबल वाचले आहे. ते पापाचे गुलाम आहेत, अपराधात मृत आहेत – त्यांचा जन्मच असा झाला आहे. त्यांच्या मातेने गर्भधारण केल्यापासून ते असेच आहेत.

आपण असहाय आहोत असे ते समजतात. त्यांचा स्वभाव भ्रष्ट आहे, आदामाखाली ते पापाला विकले गेले आहेत. जर ख्रिस्ताची इच्छा असेल तर कदाचित ते ठीक होतील. पण तोपर्यंत ते पापाच्या दलदलीत रुतले आहेत हा त्यांचा दोष कसा? ते काही स्वत:ला मरणातून उठवू शकत नाहीत किंवा नवे हृदय देऊ शकत नाहीत. ते देवाला संतोष देऊ शकतच नाहीत. जर देवाचे त्यांच्यावरील नियंत्रण बदलत नाही तोपर्यंत ते कसे बदलू शकतील?

इथे त्यांच्या विश्वासात बऱ्याच गोष्टी निसटलेल्या आहेत. ते भ्रष्ट आहेत हे त्यांना माहीत आहे. ख्रिस्त हा त्याच्या लोकांसाठी मरण पावला हे ते स्वीकारतात. त्याच्या कृपेचीच त्यांना गरज आहे हेही ते मानतात. – पण देव देत नाही तोपर्यंत त्यांना प्रतिकार करण्याचा दोष कसा लावता येईल हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणून ते पापात राहतात व अर्धवट अंत:करणाने देवाने मध्यस्थी करून त्यांना वाचवावे म्हणून त्याची वाट पाहतात.

सार्वभौम देवाखाली पापी

ते पापामध्ये मेलेले आहेत (इफिस २:१) हे बरोबर आहे. त्यांना नवीन ह्रदयाची गरज आहे व ते फक्त देवच देऊ शकतो (यहे.३६:२६; योहान ३:३-५). ख्रिस्ताशिवाय ते पापाचे गुलाम आहेत (रोम ८:६ ६-८). आणि जगाचा प्रत्येक तपशील, तसेच त्यांचे तारणही देवाच्या नियंत्रणाखाली आहे (इफिस १:११) हे सर्व बरोबर आहे. पण हे सर्व शास्त्रलेख देत असेलेले मानवी इच्छा व मानवाला असलेले पापाचे व्यसन याचे परिपूर्ण चित्र ते मानत नाही.

असे लोक जे स्वत:ला देवाच्या पुरवठ्याच्या वाऱ्यावर हेलकावणारे चित्र रेखाटतात. त्यामुळे स्वत:च्या पापासाठी आपण जबाबदार नाही असा निष्कर्ष काढतात. परंतु त्यांनी यावर विचार केला नाही की देव त्याच्याविरुध्द केलेले बंड हे कृतीशील आणि इच्छेने केले आहे असे म्हणतो व पापी हे त्यांच्या घातक मार्गाचे कारण आहेत, बळी नाहीत असे म्हणतो.

  • तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही (योहान ५:४०).
  • …तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
     (लूक १३:३४)
  •  मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती (योहान ३:१९).
  • त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली ( रोम १:२५).
  • ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले (यिर्मया २:५).
  • त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो (निती ५:२३).

देवाच्या जगतात देव हा सर्व पापावर सार्वभौम आहे आणि मानव हा त्याच्या पापासाठी पूर्ण जबाबदार आहे. जगातील सर्वात दुष्ट पाप म्हणजे “देवाच्या पुत्राला ठार मारणे” यासंबंधी असेच म्हटले आहे. “तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले” (प्रेषित २:२३).

देव जो आपली पापे वाहतो

देवाच्या सार्वभौम दिशेमध्ये त्याने आपल्याला निवड करण्याचा सन्मान दिला आहे. आपण  (याकोब १:१४-१५) मधील मनुष्याप्रमाणे  वासनेने ओढले जातो – हे देवाकडून नाही. पण सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे खुद्द देव व्यासपीठावर आला. पुत्राने मनुष्यरूप धरण केले आणि इतरांच्या पापाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.  आकडीतून  सुटण्यासाठी आपण आपले बोट  कोणाकडेही व कशाकडेही दाखवत असताना तो आपल्या आकडीने घायाळ झाला, दोषी म्हणून शांत उभा राहिला आणि पापाच्या परिणामाचे भयानक परिणामाचे भीषण ओझे वाहत राहिला : क्रोध आणि मरण.

आणि तो सबबींसाठी मरण पावला नाही तर पापासाठी. जे इच्छेने आज्ञा मोडतात व त्यांच्या अपराधात पकडले जातात अशा सबब देत राहणाऱ्या पुरुषांसाठी नाही. जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून तो आला. प्रीतीने तो दोष स्वत:वर घेणारा देव आहे.

दोष घेण्यास मुक्त

तर अशा देवाचा सर्वांनी, सर्वत्र शोध करू नये का? जरी आपण आपल्याला वाचवू शकत नाही  किंवा आपल्या पापाच्या गुलामीचे भयानक जू  दूर करू शकत नसलो तरी पापात गुरफटून जात नरकाची वाट पाहण्यापेक्षा अधिक काही सर्व पापी जण  करू शकतात. ते या अद्भुत देवाकडे जाऊ शकतात नव्हे त्यांनी गेलेच पाहिजे. तो त्यांना बोलावत आहे.
“परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा; दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील” (यशया ५५:५-७).

जर असा बाप जो पर्वतावर राहत आहे आणि त्यांना भेटण्यास तो धावत येणार असेल तर त्यांनी डुकरांच्या खुराड्यात का खितपत पडावे? कोणीच आपले तारण करू शकत नाही पण जो तारण करतो त्याच्याकडे जाण्यासाठी व त्याला घट्ट धरून राहण्यासाठी त्यांना बोलावले आहे.

आणि जेव्हा आपल्याला तो मिळतो तेव्हा आपल्या अनुज्ञेसाठी सबबी देण्याऐवजी आपल्याला त्याचा पुरवठा मिळतो व तोच आपल्या आज्ञापालनासाठी कारण होतो. “मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे” (१ करिंथ १०:१३). देवाच्या कृपेने आता प्रत्येक मोहाला बाहेर जायचा रस्ता असतो.

आणि जेव्हा त्यातून आपण जायला चुकतो तेव्हा आपला भाग कबूल करण्यापूर्वी, इतरांनी त्यांचा भाग कबूल करायलाच हवा याची दखल घेण्याची जरुरी नाही. आपल्याला माहीत नव्हते म्हणणे किंवा आपल्या परिस्थितीला दोष देणे किंवा वाटेवर हल्ला करणाऱ्यांचा शोध लावण्याची गरज नाही. फक्त ख्रिस्ती लोकच आपल्या पापाकडे थेट डोळा लावून पाहू शकतात व ते स्वत:चे आहे असे मानू शकतात आणि क्षमा मागू शकतात. कारण फक्त आपल्यालाच तो तारणारा माहीत आहे ज्याने आपली क्षमा करण्यासाठी स्वत:चा प्राण दिला.