Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Aug 19, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा १८.                        १ योहान ३:१६- १८               स्टीफन विल्यम्स

धडा १८.  १ योहान ३:१६- १८ स्टीफन विल्यम्स

ख्रिस्ताचे प्रीतीचे उदाहरण

प्रेमावर रचलेल्या कविता व गाण्यांविषयी तुम्हाला काय वाटते? त्यातून काय साध्य होते असे तुम्हाला वाटते? त्यांना त्यांचे एक स्वतंत्र स्थान आहे असे आपण म्हणू शकतो. पण देवाची प्रीती फार दूर शब्दांच्या पलीकडील कृतीकडे झुकणारी आहे.

आपण ११-१५ वचनांमध्ये पाहतो की द्वेष हे जगाचे चिन्ह आहे. त्याचा नमुना काईन आहे. आणि ते देवाच्या जीवनारहित व प्रीतीरहित असल्याचे चिन्ह आहे. आपल्या शास्त्रभागात योहान पुढे जाऊन याविरुद्ध ख्रिस्ताने आदर्श घालून दिलेल्या प्रीतीचे जीवन वर्णन करून सांगतो.  ते सार्वकालिक जीवनाचा पुरावा आहे. त्याची प्रीती ही कृती आहे.

शास्त्राभ्यास

प्रीतीचे ज्ञान ख्रिस्तामुळे होऊ शकते (व. १६)

ख्रिस्ताने आपल्याकरता स्वत:चा प्राण अर्पिला ह्यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे
(१ योहान३:१६).

 • येथे आपण प्रीतीचे मर्म पाहातो. प्रीती ही द्वेषाच्या अगदी उलट आहे.
  ▫         काईन जो जगाच्या द्वेषाचे  प्रतिनिधित्व करतो तो हाबेलाकडे जे होते त्याचा हव्यास करत होता. ते म्हणजे  देवाची त्याच्यावरील मेहरबानी. त्याचा द्वेष केवळ स्वत:चा स्वार्थ पाहत होता. पण प्रीती याविरुद्ध आहे हे आपण जाणतो. त्याने ( ख्रिस्ताने) “आपल्याकरता स्वत:चा प्राण अर्पिला” ख्रिस्त खरोखर नि:स्वार्थी होता.
  ▫         काईन जो द्वेषाचा नमुना आहे, त्याने दुसऱ्याला इजा करण्याची, जीव घेण्याची खटपट केली.   ख्रिस्त प्रीतीचा कित्ता घालून देताना दुसऱ्यांचे रोगनिवारण करतो. आपला फायदा करून देतो.
  ▫         काईनाने स्वार्थीपणे स्वत:चा फायदा करून घेण्याची खटपट केली. ख्रिस्त स्वत:चे अर्पण करून आपला फायदा करून देतो.         आज प्रेमाच्या खूप व्याख्या उपलब्ध आहेत. काही भावनिक अतिशयोक्ती करतात (हलक्या फुलक्या प्रफुल्लित करणाऱ्या क्षणिक भावना व संवेदनांवर आधारित असतात). तर काही केवळ  कृत्यांवर भर देतात. (मी जर    तुझ्यासाठी काही केले तर माझे ह्रदय कोठेही असले तरी हरकत नाही.)
  ▫         ख्रिस्तावरून योहान आपल्याला प्रीती करण्याचा केवळ दुसरा मार्ग सांगत नाही तर प्रीतीची  व्याख्याच देतो.
  ▫         “यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव होते.” जेव्हा तुम्ही येशूकडे पाहता तेव्हाच तुम्हाला प्रीतीची  जाणीव होते.
 • या प्रकारची प्रीती करणे अवघड आहे. पण जेव्हा आपण ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहतो तेव्हाच ही प्रीती करणे शक्य होते.
  ▫         प्रीतीचे खरे उद्देश वधस्तंभातच पाहायला मिळतात – दुसऱ्यांचा फायदा करून देण्यातील आनंद.
  ▫         सर्व शक्य तेवढे सामर्थ्य वधस्तंभातच दिसते – त्या प्रीतीने खूप काही सहन केले व आपले उद्दिष्ट साध्य केले.

ख्रिस्ताला जाणून घेण्याचा आवश्यक परिणाम हा प्रीती आहे (१६,१७)

. प्रीती स्वत:चा जीव जमेस धरत नाही

तेव्हा आपणही स्वत:च्या बंधुकरता आपला प्राण अर्पिला पाहिजे (३:१६).

 • ख्रिस्ताची प्रीती उपासना व प्रशंसा करण्यास पात्र आहे. पण केवळ तिची प्रशंसाच व्हावी असे नव्हे कारण ती रूपांतर करणारी प्रीती आहे.
  •           ख्रिस्ताकडे व त्याच्या वधस्तंभाकडे पाहत राहिल्याने जेव्हा तुम्हाला प्रीतीची जाणीव होऊन ती समजते तेव्हा ती प्रीती त्या बदल्यात तुम्हाला प्रीती करायला भाग पाडते. ख्रिस्ताची प्रीती समजल्याचे चिन्ह म्हणजे प्रीती करणे.
  •           म्हणून योहान म्हणतो, त्याची प्रीती कळल्यामुळे आपण आपल्या बांधवांकरता आपला प्राण अर्पिला पाहिजे
  (किंवा बाजूला ठेवला पाहिजे).
  ▫         ” बाजूला ठेवणे” हा शब्दप्रयोग अर्थ समजण्यासाठी अधिक योग्य होईल.
  ▫         योहान हा शब्दप्रयोग करतो ( वाचा : योहान १०: ११-१७; १३:३७,३८;  १५:१३) तेव्हा एखादी व्यक्ती आपले वस्त्र काढून बाजूला               ठेवते; किंवा “आपले कपडे काढून ठेवते” (योहान १३:४) तसे आपले जीवन बाजूला ठेवण्यासंदर्भात तो बोलतो.
  ▫         प्रीतीची मर्यादा काय आहे? आपण किती दूरवर जावे याची मर्यादा येथे दिली आहे. योहान म्हणत आहे की जो ख्रिस्ताला                        ओळखतो. त्याचे लक्षण हे असते की तो आपले जीवन जमेस धरत नाही. “माझी कितीही गैरसोय झाली तरी मला त्याची पर्वा                    नाही.   मी सेवा करणार कारण ख्रिस्ताने माझी सेवा  केली.”

२.  दुसऱ्यांच्या नित्याच्या गरजांविषयी प्रीतीचे अंत:करण खुले असते

मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? (३:१७).

 • प्रीती केवळ बाह्यस्वरूपी नसते. वचन १७ सांगते की ती अंत:करणातून सुरू होते.
  हे लक्षात घ्या की सर्वच सेवा वीराप्रमाणे प्राण देण्याच्या नसतात. आपल्या नित्याच्या ऐहिक जीवनाच्या गोष्टीत देखील आपल्याला प्रीती व्यक्त करण्यास पाचारण केले आहे. मंडळीत स्वत:पेक्षा  इतरांना प्रथमस्थान दिले पाहिजे.
  ▫         भव्यदिव्य अर्पणाविषयी बोलण्यापेक्षा नित्याच्या जीवनात छोटे छोटे त्याग करण्यातून प्रीती व्यक्त होऊ शकते. कोणाच्या तरी फायद्यासाठी मला संपन्न करणाऱ्या गोष्टीचे समर्पण करायची मी तयारी  दाखवायला हवी. ख्रिस्तासाठी जर तुम्ही आपले जीवन बाजूला सारले तर तो खऱ्या अर्थी कोणत्या प्रकारचा त्याग होतो?
  ▫         पण पहिल्याने तुमचे अंत:करण खुले असायला हवे. योहान अशा व्यक्तीविषयी बोलत आहे की ज्याला एक “गरजवंत” बंधू आढळतो. यावरून आपल्या सभोवतालच्या गरजांविषयी संवेदनशील असावे हे तो सूचित करतो. प्रीतीचे अंत:करण शरीराच्या वरवरच्या ज्ञानाने समस्या हाताळत नाही.
  ۰         गरजा समजून घेण्यासाठी आधी काळजीने प्रश्न विचारून माहिती घेण्यासाठी परस्परसंबंध यायला हवेत तेव्हाच त्या व्यक्तीची गरज तुम्हाला समजू शकेल.
  ۰         शारीरिक गरजा समजण्यासाठी आपले नेत्र उघडण्यासाठी वरवरचे परस्परसंबंध उपयोगी पडणार नाहीत.
  ▫       दुसरी गोष्ट योहान म्हणतो की “जवळ संसाराची साधने असून” म्हणजे तुमच्याजवळ पुरेसे सर्व काही आहे असे तो सूचित करतो. तुम्ही त्यासाठी श्रीमंत असायला हवे असे तो म्हणत नाही. त्यांना ज्याची गरज आहे ते तुमच्याजवळ आहे असे तो म्हणतो.
  ۰         यासाठी सुज्ञतेची गरज आहे – जर मदत म्हणून त्याला देण्यामुळे कोणी गरजेत पडत असेल तर त्यामुळे त्या परिस्थितीत काहीच मदत केली गेली नाही.
  ۰   याचा अर्थ असाही नाही की दुसरे कोणी अधिक मदत करू शकते म्हणून तुम्ही सबब  सांगून अंग काढून घेता.
  •           जर एखाद्याला स्वार्थत्यागाने अशी मदत करणे आवडत असेल तर यावरून हे सिद्ध होते की देवाच्या प्रीतीने त्यांच्या मनात मूळ धरले आहे (वचन १७). एखाद्याच्या खरोखरच्या गरजेकडे कानाडोळा करणे म्हणजे   तुमच्या ठायी देवाची प्रीती नसल्याचे दर्शवणे.

.  खरी प्रीती तुमच्या शब्दातून नव्हे तर तुमच्या कृतीतून प्रकट होते. (व. १८)

मुलांनो आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी (३:१८).

 • आपली पिढी प्रीतीचे खूप शब्द बोलणारी आहे. आपल्याला प्रेमावरील काव्य, प्रेमावरील गाणी, प्रेमावरील चित्रपट आवडतात. कोणाला प्रेम व्यक्त करण्यासाठी काय वाक्ये म्हणायची तेही आपल्याला माहीत असते.
  • ख्रिस्तामधील देवाच्या प्रीतीचा आदर्श आपल्याला केवळ शब्दापासून खूप दूर घेऊन जातो. जेव्हा खऱ्या     गरजेचा प्रश्न येतो तेव्हा केवळ शब्दांचे कायमस्वरूपी फायदे होत नाहीत याची योहान आठवण करून देतो.
  ▫         जर प्रीती खरी असेल (प्रामाणिक)
  ▫         तर प्रीती कृती करते (कृत्य)
 • हे लक्षात ठेवणे सहाय्यक ठरेल की प्रीतीची कृती करण्याची कल्पना खुद्द देवामधून येते. देवाने जगावर प्रीती केली आणि फक्त “मी तुझ्यावर प्रेम करतो” एवढेच म्हटला नाही. तर देवाने जगावर प्रीती केली आणि आपला एकुलता एक पुत्र देऊन टाकला.

चर्चा/मनन

 • तुम्ही इतरांवर प्रीती करण्यात व त्यांची सेवा करण्यात कोठवर जाऊ शकता? तुम्ही आपल्या गैरसोयींना मर्यादा घातल्या आहेत का? तुम्ही आपल्या कामाच्या केलेल्या आखणीचा, तुमच्या आरामाचा, तुमच्या सुखसोयींचा कोणाची तरी सेवा करण्यासाठी त्याग करायला तयार आहात का? त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून बंधूसाठी “आपल्याला आपले जीवन” बाजूला सारायला हवे.
  • आपल्यापैकी पुष्कळांची जीवनशैली अशी बनली आहे की आपण एखाद्या वेळी प्रीतीची  सत्कृत्ये करतो.   सातत्याने प्रीतीची कृत्ये करणारी सवय लागावी म्हणून आपण आपल्यात कशी सुधारणा करू शकतो?