Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Sep 9, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा २१.                       १ योहान ४:१-३                  स्टीफन विल्यम्स

धडा २१.  १ योहान ४:१-३ स्टीफन विल्यम्स

तुमचे आध्यात्मिक अन्न कोण बनवत आहे?

हल्ली चौरस आहाराकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. पूर्वी लोक म्हणायचे “ते स्वादिष्ट असेल, मोठ्या कंपनीचे असेल तर चांगले असलेच पाहिजे.” पण जे पदार्थ आपण आपल्या पोटात जाऊ देतो त्यांचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो किंवा प्राणघातकही ठरतात तेव्हा खाण्यापिण्यासाठी काय सुरक्षित आहे आणि काय नाही याविषयीचे आपले अंदाज मोडकळीस येतात. आपल्याला कोणत्या गोष्टींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे?

आत्मिक बाबतीत आपण सहसा आपल्या अन्नपदार्थांविषयी फारसे दक्ष नसतो. आपण अशीच शिफारस करतो की,  “ते कानाला गोड वाटते आणि हे नाव जर विख्यात आहे तर मग ते चांगले असलेच पाहिजे.” प्रारंभीची मंडळी आणि आपल्याविषयी जॉन स्टॉट म्हणतात, “साधेभोळे जीव अशा प्रकटीकरणाने (संदेष्टे व अन्यभाषांनी) इतके प्रभावित होत असत (आजही होतात) की त्यांनी ते दिपून जात.”पण प्रेषित योहान आपल्याला आठवण करून देतो की शरीराला लागणाऱ्या अन्नपदार्थांप्रमाणेच तुम्ही तपासून पाहायला हवे की तुमच्या आध्यात्मिक अन्नात काय वाढले आहे.

शास्त्राभ्यास

आपण आपले आत्मिक अन्न का तपासून घ्यायला हवे?

प्रियजनहो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका , तर ते आत्मे देवापासून आहेत की नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत (१ योहान ४:१).

१. आपण परीक्षा करावी अशी आपल्याला आज्ञा आहे

 • पहिल्या वचनात दोन आज्ञा आहेत. पहिली नकारात्मक आहे:
 •  प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका –
  आरंभी आपल्याला हा विचार बरा वाटणार नाही. योहान आपल्याला “प्रीती” व  इतरांविषयी संवेदनशीलता याविषयी शिकवण देत आहे۰ अशा प्रकारचा इशारा प्रीतीला दडपून टाकणारा आहे. पण वास्तविक दोन्ही जोडीने जातात. आपल्या पाल्याला कोणी गोळी दिली आणि पालकाने हरकत घेतल्यास किंवा सहलीत मुलांना शाळा काय खाद्यपदार्थ देणार याचा तपशील विचारल्यास पालकांना कोणी चुकीचे ठरवणार नाही. अन्नपदार्थांविषयी काळजी घेणे हा प्रेमाचा पुरावा आहे. तसेच परस्परांच्या स्वास्थ्यासाठी व संपूर्ण मंडळीवरील प्रेमाखातर अशी परीक्षा करणे हे प्रीतीचे लक्षण आहे.
  देवाच्या सत्यावर प्रीती आणि आज्ञापालनाची रचना केल्याशिवाय प्रीती व आज्ञापालनाची परीक्षा करणे व्यर्थ आहे.
  खुल्या फाटकाप्रमाणे आपले मन नसावे – तर आपण केवळ सत्याचेच स्वागत करावे.                                                                         प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. चटकन फसणारे असू नका. तर परीक्षा करा. योग्य  बाबींवर विश्वास ठेवा (१ योहान ३:२३).
  आत्म्यांची परीक्षा करा –
  ह्या दुसऱ्या आज्ञेत शिक्षकांसाठी आत्मे हा शब्द वापरला आहे. (आधी आत्मे, मग संदेष्टे म्हटले आहे.) योहान याकडे लक्ष वेधत आहे की संदेष्टे आत्म्याने बोलतात.
  खरे संदेष्टे देवाच्या आत्म्याने बोलतात (वचन २).
  खोटे संदेष्टे भ्रांतीच्या आत्म्याने बोलतात (वचन ६), किंवा ख्रिस्तविरोधकाच्या आत्म्याने बोलतात (वचन ३).
  पण हे लक्षात घ्या की प्रत्येक विश्वासी व्यक्तीला “खाजगी रीतीने पारख” करण्याचा हक्क यात मिळतो. तुम्ही आनंदाने वचनाचा स्वीकार करा पण या गोष्टी अशाच आहेत की नाहीत याविषयी तुम्ही स्वत: खात्री करून घ्यायची आहे (प्रे. कृ. १७:११).
  ते देवापासून आहेत का?

२. परीक्षा करण्याची तातडीची गरज आहे

 • केवळ येशूच्या नावे आल्यामुळे आपण कोणाचाही स्वीकार करायची आपल्याला मुभा नाही. सैतान बहुधा “तेजोमय दुताचे रूप घेऊन येत असतो” (२ करिंथ ११:१३-१४). आपण शिक्षणाविषयी कसा विचार केला पाहिजे याबाबत ही जागृतीची घंटा आहे.
  योहान परिस्थितीचे तपशीलवार स्पष्टीकरण करतो – जगात पुष्कळ खोटे संदेष्टे झाले आहेत.
  जर तेव्हाच पुष्कळ खोटे शिक्षक होते तर आता साथच सुरू आहे.
  तुम्हाला ऑनलाइनवर संपूर्ण जगभरातील शिक्षण सापडेल. ते कोण आहेत ते अधिकृत आहेत की नाहीत याची काहीच कल्पना  नसते.
  अनेक उपदेशक व स्वयंघोषित शिक्षक सल्ला देत व बायबलमधून (त्यांचा तसा दावा असतो) अनेक गोष्टींवर भाष्य करत जगभर  फिरत असतात. ते कोणत्याही स्थापित संस्थेशी संलग्न नसतात.
  पुस्तके, दृक् श्रवण साहित्ये, आधुनिक तंत्रे, कौशल्ये, मार्गदर्शिका, सर्व उपलब्ध असून त्यांचा वापरही केला जातो.
  काही पंथ आहेत तर पुष्कळ खोटे शिक्षक आहेत. बहुतेक देवाच्या वचनातून बोलत असल्याचा दावा करत असतात. आपण चांगले कोणते हे कसे ओळखावे?

▫    आपण एक गोष्ट ओळखायला हवी, काळजीपूर्वक अविश्वास करा (प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका). ख्रिस्तावरील विश्वासात आत्मिक           वृद्धी झाल्याची ही कसोटी असते.
•        योहान सर्व साधारण खोट्या शिक्षणाविषयीच्या परिस्थितीचे वर्णन करत असेल किंवा ज्या मंडळ्यांना उद्देशून तो हे पत्र लिहीत होता                    त्यांच्या विशिष्ट परिस्थितीबाबत लिहीत असेल. (दुसऱ्या अध्यायात तो   “ख्रिस्तविरोध्यांचे” वर्णन करतो या प्रकाशात आपण सत्यामध्ये                प्रौढ होण्याविषयी धडा घ्यायचा आहे.
▫     काहीच विश्वास न धरणारी उपहासात्मक व्यक्ती होऊ नका. पण एवढेही खुले मन ठेऊ नका की तुमचे मन काहीच धरू शकत नाही.

आपण आपले आत्मिक अन्न कसे तपासायचे

देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करत नाही, तो तो देवापासून नाही, हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार आहे हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे (४:२).

 • संदेष्ट्यांविषयी नेहमीच मार्गदर्शन केलेले आहे (अनुवाद १३:१-५).
  ▫         हे खरे घडले आहे का?
  ▫         जर हे खरे घडले तरी देवाच्या वचनाशी ते विसंगत आहे का?
  ۰           खोट्या भविष्याचे परिणाम वाचा.
  ▫         देवाविषयीच्या शब्दांच्या वापराने व्यक्ती ख्रिस्ती होत नसते. मग ते कितीही मनोवेधी असोत.
  •            नव्या करारातही उत्तम सिद्धांतांची पारख करण्याविषयीच्या कसोट्या दिल्या आहेत.
  ▫         १ करिंथ १२:३ – पाया: येशूविषयी त्यांचा विश्वास काय आहे व ते कसे जगतात आणि येशूविषयी काय कबुली देतात ह्या सर्वातून                “येशू माझा प्रभू आहे” असे ते व्यक्त करतात का? हे फक्त मुखाने बोलण्याविषयी नाही.
  ▫         गलती १:८ – आशय: पौल व प्रेषितांनी घोषित केलेल्या सुवार्तेशी तो सुसंगत आहे का? की ते पूर्वी  कधी ऐकिवात नाही असे                    “नवीनच” प्रकटीकरण आहे; की देवाच्या वचनाशी विसंगत आहे?
  •           नव्या करारातील तत्त्वांशी सांगड घातल्यास (ख्रिस्त या व्यक्तीचा सन्मान होतो का? प्रेषितीय शिक्षणाशी ते    जुळणारे आहे                      का?); योहानाने सामना केलेल्या खोट्या शिक्षणाशी तो हे लागू करत आहे ( योहानाने ज्या खोट्या शिक्षणाशी सामना केला                      त्यासारखेच सर्व खोटे शिक्षण असते नाही. म्हणून आपण फक्त या तत्त्वांचा वापर करायचा):
  ▫         वचन २ – ते ख्रिस्ताचे देवत्व व मानवत्व मान्य करतात का?
  ▫         वचन ३ – एकदा तुम्ही कसोटी घेतली की तुम्ही न्याय करायचा आणि मग त्यानुसार कृती करायची (२ योहान ९-११).

चर्चा व मननासाठी प्रश्न

 • आपण सध्या झटपट आत्मिक अन्नपदार्थांच्या युगात राहत आहोत. भिन्न नावांनी पुष्कळ प्रकारची शिकवण, बहुत पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही गुगलवर गेलात की लागलीच कोणत्याही विषयावर अमर्याद माहिती व साधने उपलब्ध होतात – पण यातून चांगले कोणते? आज योहानाची “परीक्षा करा” ही आज्ञा आपल्यासाठी अगदी समर्पक आहे. ऐकायला अगदी उत्तम वाटणारे विचार पूर्णपणे पाखंडी असू शकतात.
  कोणती पुस्तके, वेबसाइट, शिक्षण, किंवा उपदेशकांस तुम्ही आपल्या जीवनात थारा देता? त्यांची काळजीपूर्वक परीक्षा करून तुम्ही त्यांचा आपल्या जीवनात शिरकाव होऊ दिला आहे का?
  काही वेळा परीक्षा करणे अवघड जाते. पण देवाने आपल्याला पुढारी दिले आहेत. ते आपल्याला  सहाय्य करू शकतात. जशी तुम्ही आपल्या शारीरिक आहाराची काळजी घेता तशी आपल्या आत्मिक आहाराचीही काळजी घेतली पाहिजे. आपल्या पाळकाकडे विचारपूस करत जा. केवळ तर्क करत जाऊ नका. तुम्ही आपल्या घरात विष आणू शकता.
  महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आत्मिक आहार घेत असता का? देवाच्या वचनावर तुम्ही स्वत:चे स्वत:च पोषण करत असता का? तुम्ही देवाचे वचन वाचता /ऐकता/ त्यावर मनन करता का? तुमच्या ताटात अन्नच नसेल तर तुम्ही काय खाता यावर चर्चा करणे व्यर्थ होईल. योहानाची इच्छा आहे की आपण खावे, सकस अन्न खावे, म्हणजे आपली वृद्धी होईल.