तुमचे आध्यात्मिक अन्न – कोण खात आहे?
प्रत्येक पावसाळ्यात आपल्याला कॉलरा, कावीळ अशा त्या मोसमातील रोगांचा इशारा दिला जातो आणि सतर्क लोक लगेच त्याबाबत प्रतिबंधक उपायांची तजवीज करायला सुरुवात करतात. त्यात पुढील दोनपैकी एक मार्ग अवलंबला जातो – एक म्हणजे कोणाकडचे अन्नपदार्थ तम्ही आपल्या शरीरात जाऊ देता आणि दुसरी गोष्ट तुमची रोगप्रतिकारक शक्ती उच्च पातळीवर ठेवायची व तुमचे शरीर निरोगी राखायचे.
“खोटे आत्मे” सत्याचा बुरखा घेऊन शिक्षकाच्या किंवा उपदेशकाच्या वेशाने सतत दहशत निर्माण करत असता आपल्यालाही वरीलप्रमाणे निरोगी राहण्याबाबत सूचना देण्याने मदत पुरवली आहे. १ योहान ४:४-६ मध्ये खोटेपणाविरुद्ध पुरेशा बळाने उभे राहण्यास सांगितले आहे.
शास्त्राभ्यास
आपल्याला सामर्थ्य कोठून प्राप्त होते? पवित्र आत्म्याकडून
मुलांनो, तुम्ही देवाचे आहा आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हांत जो आहे तो मोठा आहे (१ योहान ४:४).
टीप म्हणून दुरात्म्यांना हे वचन लागू करू या – विश्वासी व्यक्तीला दुरात्मा लागू शकत नाही.
• प्रथम हे लक्षात घ्या की या वचनाचा संदर्भ प्रथम आणि प्रामुख्याने सत्याशी आहे. आत्मिक संघर्षासंबंधीचा बायबलचा सध्याचा भर प्रामुख्याने भूतबाधेसंदर्भात नाही; तर अंत:करणातील संघर्षासंदर्भात आहे. (२ करिंथ   १०: ४-५ ही वचने आत्मिक लढ्याविषयी आहेत: देवाच्या ज्ञानाविरुद्ध वाद व तर्कवितर्क याविरुद्ध हे युद्ध आहे.)
• योहान इतक्या ठामपणे कसे काय सांगू शकतो की त्याचे वाचक देवापासून आहेत? केवळ त्याला प्रकर्षाने तसे वाटते म्हणून ? प्रामुख्याने तसे मुळीच नाही. वचन २ सांगते की कारण ते ख्रिस्ताविषयीची सत्ये मान्य करून  त्यांचे आज्ञापालन करतात. ते सत्याविषयीच्या वस्तुनिष्ठ परीक्षेत उत्तीर्ण होतात.
• योहान आपले वाचक खोटे संदेष्टे व खोट्या शिक्षकांवर जय पावले आहेत याविषयी बोलत आहे. यासंदर्भात ते त्यांचे सत्याविषयीचे दावे टीकात्मक परीक्षा करून तपासण्यास ते सक्षम आहेत (व.१). शिवाय ते देवापासून आहेत का याचे त्यांचे दावे ते तपासून पाहतात.
यावरून ग्रहण करणारे हे लोक त्या खोट्या शिक्षकांपेक्षा “उत्तम, चतुर व बलवान” म्हणून श्रेष्ठ ठरत नाहीत. हे जय पावणे गर्व किंवा अभिमानाचे कारण नाही तर नम्रतेचे कारण आहे.
योहान त्यांना उच्चस्थानी चढवत नाही तर त्यांना जो देवाचा आत्मा देण्यात आला आहे त्याच्या सहाय्याने पारख करून खोट्या शिक्षणावर जय मिळवल्याने ते विजयी झाले आहेत याविषयी तो बोलत आहे.
विश्वासी व्यक्ती ज्याच्याशी सामना करत आहे तो  विरोध किती मोठा आहे? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून पाहता निष्कर्ष निघतो की जगात जो आहे तो मोठा आहे, क्षुल्लक नाही पण पवित्र आत्मा त्याच्यापेक्षा महान आहे.
• आजही हे आपल्याला सहाय्यक ठरते. कारण “ज्या मंडळीला योहानाने लिहिले, त्यांच्याप्रमाणे मीही विजयी होऊ शकायला हवे” एवढेच आपल्याला म्हणायचे नाही. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तेच आपल्याही बाबतीत तितकेच खरे आहे! आपणही विजयी होऊ शकतो कारण “आज जगात जो आहे त्यापेक्षा आपल्या ठायी जो आहे तो मोठा आहे!”
आपल्यालाही तेवढेच सामर्थ्य आहे. आपल्यामध्ये देवाचा आत्मा असल्याने आपणही आज ऊत आलेल्या खोट्या शिक्षणाच्या विरोधात भक्कमपणे उभे राहू शकतो.
• लक्षात ठेवा की तो, पवित्र आत्मा “सत्याचा आत्मा” आहे (वचन ६). तो अभिषेक आहे जो आपल्या सर्वांमध्ये वस्ती करतो (१ योहान २:२०,२७).
आपल्याला सामर्थ्य कोठून प्राप्त होते? प्रेषितांच्या सैद्धांतिक शिक्षणातून
ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहो. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो (४:५,६)
जगाचे कोठून पोषण होते व जे आत्म्याचे आहेत त्यांचे पोषण कोठून होते यातील फरक वचन ४ व ५ मध्ये आहे.
• जग आपले जे आहेत त्यांना ओळखते. आणि जे खोटा ख्रिस्त व खोटा संदेश घेऊन येतात त्यांची या जगात वाढती प्रसिद्धी असते. (आपण संख्यावाढीच्या विरोधात नाही. पण यातून हे स्पष्ट होते की खूप मोठ्या उपदेशकांचे लक्षावधी चाहते असतात आणि त्यांच्याकडे अल्प प्रमाणात सत्य असते. संख्या पाहून तुम्ही फसू नये.)
•याउलट “आम्ही” म्हणजे प्रेषित देवापासून आहेत (व.६). आणि ज्यांना देवाचा आत्मा आहे, जे “देवाला ओळखतात” ते प्रेषितांकडे आकर्षिले जातात.
हा उर्मटपणा नव्हे. जर एखादी व्यक्ती किंवा लोकगट एखाद्या सत्याविषयी दावा करून त्यावर हक्क दाखवत बसला तर तो उर्मटपणा होईल.
जर एखादी मंडळी म्हणू लागली की “जर आमचेच  ऐकाल तरच तुमचे तारण होईल” तर तो पाखंडी पंथ किंवा खोटी मंडळी आहे असे म्हणता येईल.
योहान स्वत:च्या नावे किंवा एका लोकगटाचे मत म्हणून बोलत नाही हे समजून घ्या. मुद्दा हा आहे की हे “आम्ही” कोण आहेत – हे प्रेषित कोण आहेत ? पुढील वचनातून पाहा.
۰ १ योहान १:१-३ ख्रिस्त ह्या व्यक्तीचे, तिच्या गौरवाचे व कार्याचे प्रत्यक्ष साक्षी.
۰ योहान १६:१२ -१३ प्रकटीकरणाचे ते कारभारी, जे म्हणून शिकण्याची गरज आहे ते सर्व शिकवणाऱ्या पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली ते नव्या कराराचे लिखाण करणारे.
۰हे “प्रेषितांविषयी” नाही तर ते ज्या मनुष्यांना देवाने सत्याचे कारभारी म्हणून निवडले आहे त्यांचा हा गट. आणि आज ते सत्य कोठे सापडते? प्रेषितांमध्ये नव्हे, तर नव्या करारातील प्रेषितीय सैद्धांतिक शिक्षणात सापडते.
۰कोणीही व्यक्ती, कोणताही गट, कोणतीही मंडळी याविरुद्ध कोणताही दावा करू शकत नाही. आपण कोणत्याही व्यक्तीकडून किंवा मंडळीकडून नव्या कराराशी समांतर किंवा त्याहून वरचढ ठरवलेल्या रूढीपरंपरांना मान्यता देऊ शकत नाही. केवळ हे देवाचे वचन,               केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिलेले हे देवाचे वचन, केवळ ख्रिस्ताद्वारे आलेले वचन आम्ही मान्य करतो. याखेरीज सर्व खोटे आहे
सत्य व असत्य यातील भेद ओळखण्यासाठी हाच (याद्वारेच) साधा सोपा मार्ग आहे. हे उपदेशक प्रेषितांना येशूने जे प्रकटीकरण केले त्याचेच शिक्षण व स्पष्टीकरण देतात का? की ते नवीन प्रकटीकरणाचा दावा करतात?
देवाची मेंढरे आपल्या धन्याची वाणी ऐकतात. खोट्या मेंढपाळांची नव्हे.
चर्चा व मननासाठी प्रश्न
तुम्ही बलवान की दुर्बल ख्रिस्ती आहात? दुर्बलतेचे एकच कारण असते. देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिला आहे. त्याने आपल्यामध्ये वृद्धी पावण्याची क्षमता ठेवली आहे. पण आपण वचनातून आत्मिक आहार घेतला पाहिजे व देवाच्या वचनाच्या सत्याद्वारे पवित्र आत्म्याला फळ उत्पादन करण्याचे काम करण्यास मुभा द्यायला हवी.
तुम्हाला स्वत:चे बायबल आहे का? ते वाचून पाने जीर्ण होईपर्यंत वापरत राहा. फाटत होण्याच्या लागास आलेले जीर्ण बायबल हे नाश न होणाऱ्या जीवनाचे लक्षण आहे. आत्म्याला इंधन द्या. वाढा!




 
	 
		 
		 
			 
			 
			 
			 
			
Social