दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा २७. १ योहान ५: ६- ९ स्टीफन विल्यम्स

पुत्रासाठी देवाची तिहेरी साक्ष

“इंटरनेटवरील विधानांच्या अचूकतेवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही – अब्राहाम लिंकन, १८६४.”  हे विधान तुम्ही इंटरनेटवर पाहिले का?  या हास्यास्पद विधानातून एक नक्की केले आहे की आपण राहत असलेल्या युगात कोणी एखादा दावा केला, किंवा एखाद्याच्या नावाखाली एखादे विधान केले तरी त्यामुळे ते सत्य ठरत नाही.

पुराव्यादाखल दिलेली साक्ष का महत्त्वाची असते? साक्षींची का आवश्यकता असते? आपण साक्षींमधून कशाचा शोध घेत असतो? चर्चा करा. मुद्दा अखेर हाच असतो की आपल्याला सत्याची घट्ट पकड घेता यावी.

ख्रिस्तावरील विश्वासाविषयी जेव्हा योहान चर्चा करतो तेव्हा त्याला खात्री पटवून द्यायची आहे की आपण जो विश्वास धरला आहे, तो सत्य आहे. विश्वास साक्षीवर अवलंबून असतो, आणि साक्ष तर्कशुद्ध असावी म्हणून ती खरी असावी लागते.

शास्त्राभ्यास

तीन भक्कम साक्षी

 जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे तर पाण्याने व रक्तानेही आला. आणि आत्मा हा साक्ष देणारा आहे कारण आत्मा सत्य आहे (व. ५,६).

ख्रिस्त हा व्यक्ती, त्याचे स्वरूप व कार्ययाविषयीच्या साक्षीबद्दल योहान बोलत आहे. पहिली गोष्ट, आपण हे  समजून घ्यायला हवे की तो ज्यांना लिहीत आहे , त्यांच्यासाठी हे सर्व स्पष्ट व उघड होते; पण आपल्यासाठी हे शब्द कसलाच स्पष्ट संबंध दर्शवत नाही. “पाणी व रक्त” ही काय आहेत? आपल्यापुढे तीन प्रमुख पर्याय आहेत.

पहिले, दोन नियम. काही लोक म्हणतात , पाणी बाप्तिस्म्याला उद्देशून व रक्त प्रभुभोजनाला उद्देशून वापरले आहे. पण बहुतांशी हा अर्थ नसेल असे स्पष्ट वाटते, कारण हे विधान भूतकाळ दर्शवते. येशू अशा “चिन्हांद्वारे” आला नाही. त्याने हे विधी स्थापून लावून दिले.
दुसरे, पाणी व रक्त त्याच्या कुशीत भोसकलेल्या भाल्यासंदर्भात आहे (योहान १९:३४,३५). त्यावेळी हे दोन्ही द्रव स्वतंत्रपणे वाहिले. त्यावेळी हे रक्त व पाणी वाहण्यातून तो मृत पावला याचा साक्षीपुरावा सादर झाला. पण या ठिकाणची ही साक्ष येशूच्या दैवी व मानवी स्वरूपाविषयी आहे.                           ▫
पाणी व रक्ताची कल्पना ख्रिस्ताच्या जीवनातील दोन घटनांशी बांधलली आहे. त्यात आपल्याला त्याचे स्वरूप व कार्य यांचे ज्ञान मिळते. पाणी त्याच्या बाप्तिस्म्याचे प्रतीक आहे, तर रक्त त्याच्या मरणाचे प्रतीक आहे.
۰ पाणी: योहान १: २९-३४; ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या वेळी देवाने दिलेल्या साक्षीविषयीचा हा वृत्तांत. मार्क १:९-११ पण पाहा.
۰ रक्त: १ योहान १:७; ख्रिस्ताचे सामर्थ्यशाली मरण झाल्याने आपण शुद्ध होऊ शकलो. योहान १०:१७,१८;  १९:३० एकत्र वाचा. (त्याने स्वत:चा प्राणही दिला आणि ज्या कार्यासाठी तो आला होता तेही पूर्ण केले.) येशू मरणसमयी निष्क्रियपणे बळी गेला नव्हता तर तो विजयी वीर होता.
• खोटे शिक्षक दावा करायचे की येशू व ख्रिस्त ह्या भिन्न व्यक्ती होत्या. ख्रिस्त हा  देव व अमूर्त असल्याने तो मरण पावल्याचे पण ते नाकारत होते.
काही जण शिकवायचे की मानवी येशूला बाप्तिस्म्याच्या वेळी ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला होता आणि त्याच्या मृत्युपूर्वी तो त्याला सोडून गेला.
योहान ठामपणे मांडतो की ज्या येशूविषयी पित्याने त्याच्या सेवेच्या आरंभीच म्हटले की “हा माझा पुत्र आहे” त्याच येशूने आपला प्राण देताना म्हटले, “पूर्ण झाले आहे;” “मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (त्यात स्वत:च्या जिवावर आपला अधिकार असल्याचा तो पुरावा देतो.)
• पण योहान पवित्र आत्मा या व्यक्तीची तिसरी साक्ष देत आहे. साक्षी म्हणून त्याची पात्रता पाहा. त्याला इतर ठिकाणी सत्याचा आत्मा म्हटले आहे (१योहान ४:६; योहान १५:२६; १६:३). येथे त्या आत्म्यालाच सत्य म्हणून संबोधले आहे. केवळ “सत्याचा आत्मा” म्हटलेले नाही. याचा अर्थ असा होतो की तो सत्याविषयीच साक्ष देणार.
• योहान दोन अर्थांनी या भक्कम साक्षींविषयी बोलतो.
भक्कम वस्तुनिष्ठ, ऐतिहासिक साक्ष: पाणी आणि रक्त, त्याचा बाप्तिस्मा आणि मरण यातून तो कोण आहे आणि तो काय करू शकतो हे प्रगट होते.
भक्कम व्यक्तीनिष्ठ, अंतर्गत साक्ष: आत्मा वास्तव सत्य घेतो आणि आपण ख्रिस्ताला पाहावे म्हणून आपल्या अंत:करणाचे नेत्र उघडतो (१ करिंथ १२:३; १ योहान २:२७).

दोन साक्षी का? (व. ७-९)

 आत्मा हा साक्ष देणारा आहे कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तिघे आहेत: आत्मा, पाणी व रक्त. या तिघांची साक्ष एकच आहे. आपण माणसांची साक्ष स्वीकारतो पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली, तीच ही त्याची साक्ष आहे (५:७-९).
इतक्या अनेक साक्षींची गरज काय? देव वास्तवतेस नव्हे तर सत्य हाताळत आहे. कारण त्याचे स्वत:विषयीचे प्रगटीकरण सत्य असलेच पाहिजे. तसे नसेल तर ते धरून राहण्यात काही अर्थच उरणार नाही.
दंतकथेतील दावे काहीही असले तरी ते आत्मिक फायद्याचे नसतात. कल्पना व स्वप्ने तुमच्या भावनांना बरी वाटतील पण ती वास्तविक सुटका देत नाहीत .
अनुवाद १५:१५, योहान ८:१७,१८ वाचा.
• ख्रिस्तासबंधी जेव्हा दरबारात साक्ष येते तेव्हा त्यात परस्परविरोध असतो. ख्रिस्ताविरुद्धचा खटला लक्षात आणा.
तो खटला खोटेपणे चालवण्यात आला. त्याच्याविरुद्ध पुष्कळ साक्षी देण्यात आल्या. पण त्या आरोपांविषयी त्यांचे एकमत झालेच नाही
(मार्क १४:५६).
पण या वस्तुनिष्ठ ऐतिहासिक साक्षींमध्ये व आत्म्याच्या व्यक्तिनिष्ठ साक्षींमध्ये तुम्हाला एकमत दिसते. तिघेही सहमत आहेत.
• ९वे वचन पाहा. मानवी कायद्यांच्या कोर्टदरबारात बहुत साक्षीदार असले तर ते तो खटला धरून ठेवतील नाहीतर मोडतील. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण हे मान्य करू. योहान म्हणतो की जिवाच्या बाबींसाठी देवाची साक्ष कोणत्याही मानवी साक्षीपेक्षा महान आहे.

चर्चा व मननासाठी प्रश्न
तुम्हाला आठवते का, येशू म्हणाला होता की त्याची एकट्याची स्वत:विषयीची साक्ष ग्राह्य धरली जाऊ शकत नाही.
येशूबद्दल कोणी साक्षी दिल्या? योहान ५:३१-३९ पाहा.
देवाने आपल्या पुत्राविषयी साक्ष देण्यामागे त्याचा मुख्य उद्देश काय होता? या साक्षीचे महत्त्व काय? योहान ५:४० वाचा.

Previous Article

ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? लेखक: ए डब्ल्यू पिंक

Next Article

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का? लेखक: स्टीफन विटमर

You might be interested in …

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा

दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. […]

तुमच्या सर्वस्वाने स्वर्गाकडे नेम धरा

मार्शल सीगल  जर स्वर्गात संपत्ती कशी साठवावी हे जर तुम्ही शिकला नसाल तर अर्थातच तुम्ही जगात संपत्ती साठवण्यात जीवन घालवाल – आणि एक अपार अक्षय आणि समाधानकारक गोष्ट गमवाल. जेव्हा “स्वर्गात संपत्ती साठवा” हे आपण […]

प्रभू काहीही कर पण मला शिस्त लाव

जॉन ब्लूम .  जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखी माझी बुद्धी असे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत ( १ करिंथ १३:११). याचा अर्थ; […]