नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्या कुटुंबाला पैशापेक्षा अधिक गरज आहे लेखक: जे हॉफेलर

जेव्हा माझ्या डॉक्टरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि स्पष्ट केले की मला कॅन्सर झाला आहे तेव्हा प्रामाणिकपणे माझी पहिली प्रतिक्रिया होती; “ठीक आहे.”

जरी हे मी मोठ्याने म्हटले नाही तरी मला अचानक स्वस्थ वाटले की आमच्या कुटुंबाच्या पुरवठ्याची योजना अचानक जुळून येत आहे. आमच्या निवृत्तीच्या घरट्याची व्याप्ती मोठी असणार होती. आज वयाच्या ५५व्या वर्षी आयुष्याचा विमा समाप्त होण्यापूर्वी प्रत्यक्ष मृत्यूमुळे “संपूर्ण सुरक्षा” नक्की होत होती. हा विचार अचानक चमकून गेला आणि माझ्या पत्नीचे आणि तीन मुलींच्या जीवनाच्या संरक्षणाचे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले. अगदी प्रथमच मला आर्थिकदृष्ट्या यशस्वी वाटू लागले. माझी कहाणी मी इतर पुरुषांना सांगितली आणि बहुतेक माझ्या भावनांशी सहमत होते. पण झाडून सर्व स्त्रियांना माझी तर्कबुद्धी भयाण वाटली. आणि त्यांचे बरोबर होते. माझे विचार जरी पुरुषांसाठी सामाईक होते तरी ते बिघडलेले होते. ते खोट्या दैवतावर, मुर्तिपूजेवर आधारित होते. माझे डॉक्टर हेही माझे मित्रच आहेत. त्यांनी मी जगाला जोडलेला नाही अशा माझ्या आध्यात्मिक प्रौढतेच्या पलीकडे पाहिले आणि म्हटले; “ठीक, पण मी बेथ आणि तुझ्या मुलींचा विचार करत होतो.”

त्यांचे म्हणणे अगदी अचूक होते.  मी गेल्यानंतर त्यांना कायमसाठी जो आघात आणि तीव्र दु:खाला तोंड द्यावे लागणार होते त्याचा मी नक्कीच विचारही केला नव्हता. मी बेथकडे गेलो आणि माझा मृत्यू आणि सध्या असलेला माझा आयुर्विमा यांचा समतोल तिला स्पष्ट केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही.
“तुला काय वाटतं, ह्या विम्याच्या पैशांचे ढीग तुझी जागा भरून काढतील?”

“हं, एका अर्थाने…हो. मला जाणीव आहे प्रथम तुला खूप जड जाईल. पण तू आणि मुली हळूहळू त्यावर मात कराल- आणि मग तुझं जीवन स्थिर होईल!”

“आम्ही कधीच त्याच्यावर मात करणार नाही. तू आमच्यासाठी असलेली तुझी किंमत कमी करत आहेस – आणि तुझ्याशिवाय जगण्याचा आघात…”

हे संभाषण माझ्या विचारांचा मुख्य बिंदू बनले व तेव्हापासून  देव माझे मन व अंत:करण बदलू लागला. माझा खरंच विश्वास होता की दुसऱ्या कोणत्याही पर्यायापेक्षा माझ्या कुटुंबाला अधिक फायदा हा मोबदला मिळावा: देवाच्या पुरवठ्याखाली जे आहे त्यामध्ये राहणे हा माझा विचार नव्हता. श्रीमंत मूर्खाच्या दाखल्यामध्ये अगदी याच प्रकारच्या मूर्तिपूजेविरुद्ध येशू बोलला. त्यावेळी त्याने इशारा दिला, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही” (लूक १२:१५).

लबाड्यांचा सराव

मानव काही सामान्य लबाड्यांवर विश्वास ठेवतात. त्यांच्यावर मीही विश्वास ठेवला की, माझे काम म्हणजे माझ्या कुटुंबाला मुबलक पुरवठा करणे आणि जर मी भविष्याच्या पुरवठ्यासाठी येशूवर अवलंबून राहिलो तर माझ्या जीवनाचा दर्जा खालावेल. किंवा संपत्ती वाढवणे हे माझे काम आहे त्यामुळे जर माझ्या वैवाहिक जीवनापासून व कुटुंबातील पुढाकारापासून मी जरा दूर राहिलो तरी काही हरकत नाही.

पण त्या आठवडी मरणाच्या दारात असताना दवाखान्यातील बिछान्यावर मी पडून होतो. सकाळी तीन वाजता देवाच्या निषेधाने माझ्या मनात घर केले व तो सतत माझ्या मनाशी बोलू लागला, “देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल” (लूक १२:२०). मी मूर्खपणा करत होतो का? खऱ्या रीतीने कोणती बाब चांगली होती बरे: (१) देवाला सर्व ताबा देऊन आमच्या  सध्या असलेल्या बचतीमध्ये राहणे, किंवा (२) कुटुंबासाठी नोटांचे गठ्ठे मागे ठेवून मरणे?

ह्या प्रश्नाचे उत्तर देव माझे मन बदलून देणार होता. त्यानंतर त्याने पाच वर्षे मला लिम्फोमा (रसग्रंथीचा कॅन्सर)च्या वेदनांतून नेले  आणि त्यानंतर झालेल्या सर्जरीमध्ये मरणाच्या दाढेतून बाहेर काढले. पण देवाने त्याचे बोट त्याला सोडून मी प्राधान्य देत असलेल्या दैवतावर ठेवले. त्यांच्यावर मी या अशा माझ्यासाठी खास तयार केलेल्या परीक्षेशिवाय विजय मिळवू शकलो नसतो.

जेव्हा मी आजारी होतो तेव्हा कुणाला माझी गरज आहे असे मला वाटले नाही. जीवन पुढे जात होते. प्रत्येक जण व्यस्त होता. मी एकेक मार्ग योजत होतो तरी पैशांची काहीच भर टाकू शकत नव्हतो.  विम्याद्वारे माझ्या कुटुंबाचे रक्षण व्हावे अशी मी योजना करत होतो. पण माझ्या मुलींना त्यांच्यासोबत वेळ घालवणारा बाबा हवा होता जो अजूनही देवाच्या हाताकडे विश्वासाने पाहत होता. ते इतके मूलभूत आणि महत्त्वाचे होते. मी भविष्याला न भिता कुटुंबाची अधिक किंमत करावी अशी माझ्या पत्नीची इच्छा होती. माझ्या पत्नीला माझ्यामध्ये  धैर्य आणि विनोदीवृत्ती पहायची होती – उपहास, शंका करणे कमी करून. आणि आम्ही अशा गोंधळात उभे असतानाही देवाची सुटका येत आहे हे जाणून घ्यावे असे वाटत होते. माझ्या कुटुंबाला पैशांपेक्षा माझीच अधिक गरज होती, हा धडा मी जरा उशिरानेच शिकलो.

सत्य पुन्हा पुन्हा सांगणे

आता ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवायचा मला मोह होतो त्यावर विजय मिळण्यासाठी मी ही सत्ये पुन्हा पुन्हा मला सांगत असतो.
“हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवले आहे, असे तू मनात म्हणू नकोस; पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे (अनुवाद ८:१७,१८). संपत्ती मिळवण्यासाठी लागणारी शक्ती देव देतो- मी नाही.

“कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात! जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील! हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे” (लूक १२:२४, २८, ३२). देवाच्या दृष्टीने मी फार मोलवान आहे. मला कशाची गरज आहे ते त्याला ठाऊक आहे. त्याने आनंदाने मला राज्य देऊ केले आहे.

मी फक्त पैसा पुरवल्याने माझे काम पूर्ण होत नाही

कमी पैसा निष्फळ जीवन आणत नाही. खोटी दैवते आणतात.
माझ्या प्रिय जनांना माझी गरज आहे – माझ्या भरभराटीची नाही.

आज ही सत्ये वापरात आणण्याचा आम्ही अजूनही सराव करीत आहोत. जरी मी पुन्हा काम करण्यास सुरवात केली आहे तरी मोठा वैद्यकीय खर्च, कॉलेजला जाणाऱ्या तीन मुली व पाच वर्षांच्या आजारपणात नोकरी न केल्यामुळे आमची निवृतीच्या योजना बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आल्या आहेत.

त्या वर्षांमुळे विचार न करता येणारी हानी आम्हाला सोसावी लागली. तरीही तो माझ्या जीवनातील अत्यंत महान मोसम ठरला. देवाने जे बदललेले जीवन मला पुरवले त्यासाठी मी ते पुन्हा करायला तयार आहे. पण तरीही अजूनही ते कठीणच आहे. आम्हांला आमच्या भविष्याची काळजी वाटते पण उपहास, शंका नाही. बायबलमध्ये आम्ही देवाचे गुण पाहतो व त्याच्या मुलांच्या मुक्तीसाठी त्याचा सतत स्थिर व  झुकलेला हात पाहतो.

जेव्हा येशूने पौलाला म्हटले माझी कृपा तुला पुरे आहे तेव्हा त्याचा अर्थ काय असावा हे जाणण्याची माझी नेहमीच इच्छा होती. आता मी ते स्वत: माझ्यासाठी पाहतो. तो उदार व जोरदार प्रवाह आहे – कंजूषपणाचे ओघळ नाहीत. कित्येक वर्षांमागे दवाखान्यात मी सुटकेसाठी माझ्या भरपूर पुरवठ्यावर अवलंबून होतो. आज मी सुटकेसाठी त्याला बिलगतो. आणि मी त्याच्यामागे कोठेही जाईन. अगदी छोट्या घरट्याकडेही – जोपर्यंत तो मला चालवत आहे. विपुलतेमध्ये राहणे याचा अर्थ हाच आहे.

Previous Article

त्याच्याबरोबर वृध्द होताना भिऊ नका लेखक : जेराड मेलीन्जर

Next Article

देवावर भरवसा (तुम्ही जसे आहात त्याबद्दल) लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

You might be interested in …

लैंगिक पापाशी लढण्याचे चार मार्ग सॅम अॅलबेरी

देवाने मानवाला जसे असावे तसे केलेल्या निर्मितीविरुध्द लैंगिक पाप आहे. हा धडा बायबल आपल्याला नीतिसूत्राच्या ५व्या अध्यायामध्ये देते. येथे सुज्ञ मनुष्य तरुण विवाहित पुरुषाला व्यभिचारिणी विरुध्द सांगत आहे. तुम्ही तरुण असाल, विवाहित असाल किंवा पुरुष […]

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

  लेखक- डेविड मॅथीस जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला […]

गर्वाची सात मार्मिक लक्षणे फेबियन हार्फोर्ड

गर्व तुम्हाला ठार करेल. कायमसाठी. गर्व हे असे पाप आहे की ते तुम्हाला आपल्या तारणाऱ्याकडे आक्रोश करण्यापासून दूर ठेवते. ज्यांना आपण निरोगी आहोत असे वाटते ते डॉक्टरांकडे पाहणारही नाहीत. गर्व हा जितका गंभीर आहे तितकेच […]