आपले नव्या वर्षाचे कितीतरी निर्णय सपशेल पडतात कारण ते येशूच्या नावामध्ये केलेले नसतात. आपण ते आपल्याच नावामध्ये करतो – आपल्याच सामर्थ्याने, आपल्या अटींवर, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी. फेब्रुवारीपर्यंत ते अपयशी ठरतात कारण ते आपल्यावरच – स्वत:वर- केंद्रित असतात.
निर्णय हे लोकप्रिय आहेत कारण ते मानवतेच्या मुळाशी असलेल्या कशाला तरी स्पर्ष करतात. आपण स्वभावत:च स्वत:वर प्रेम करतो (२ तीम ३:२). नवीन ह्रदय नसेल तर आपण आपल्या सर्व जीवनभर आपल्या स्वत:च्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडत राहतो. आपल्यातला असुरक्षितपणा आणि अपयशाचा आपण तिरस्कार करतो तरीही आपण सबब द्यायला, आपली जाहीरात करायला, आणि स्तुती करायला कारणे शोधत असतो. निर्णय हा माझ्या वेदीवरचा एक वार्षिक विधी आणि यज्ञ असतो.
स्वत:ची सुधारणा ही खूप आनंददायी, मुक्त करणारी वाटते (निदान सिद्धांतात तरी). पण निर्णय हे आपले येशूशी नाते खोल करण्याचे टाळण्यासाठी बॅंड-एड सारखे होऊ शकतात. आपल्याला आपण चांगले ख्रिस्ती आहोत असे वाटते तरी आपण ख्रिस्ताच्या जवळ नसतो. आणि त्यामुळे आपल्या ह्रदयामागे असलेली अस्थिरता, असुरक्षितता आणि दोषी भावना यांच्याशी मुकाबला करण्याच्या जवळपासही आपण नसतो.
तर स्वत:च्या सुधारणेची ख्रिस्ती जीवनामध्ये काय भूमिका आहे? स्वत:च्या सुधारणेत विशेष असे काही ख्रिस्तीत्व आहे का?
सर्वेश्वरवादामध्ये दृष्टीक्षेप
डॉन कार्सन यांच्या व्याख्येनुसार सर्वेश्वरवाद म्हणजे – देव आणि विश्व हे वेगळे नसून एकच आहे. सर्वेश्वरवाद पाप आणि दुष्टपणाची समस्या यज्ञ आणि क्षमा याद्वारे सोडवत नाही तर आत्मपरीक्षण आणि बदल घडवणे याद्वारे सोडवतो. आत्म-सुधारणेद्वारे हळूहळू जे चुकीचे ते काढून टाकत. कार्सन म्हणतात, आत्मसुधारणेची नीतिमत्तेच्या राज्याच्या पाठलागाशी गल्लत करू नये.
नव्या वर्षाचे ख्रिस्ती १ जानेवारीला एकाच वेळी अनेक प्रकारचे निर्णय घेतात. – पथ्य, व्यायाम, झोप, अगदी आध्यात्मिक शिस्त सुद्धा – अशी कल्पना करत की जसा एक एक निर्णय पूर्ण होतो तसे ख्रिस्ती असण्याचे कार्य काबीज केले जाते. पण आपले किती निर्णय देवाच्या राज्याच्या नीतीमत्तेला जोडण्याऐवजी आत्मसुधारणेसाठी आहेत?
जे निर्णय टिकून राहतील आणि फळ देतील ते वधस्तंभ वहिल्यासारखे दिसतील, तुमची पात्रता उंचावणारे दिसणार नाहीत. उरलेले क्षणभर चमकतील – ह्या वर्षी मग पुढल्या वर्षी पुन्हा पुन्हा .
आत्मसुधारणेला मरा
तुम्ही म्हणाल “पण चांगले खाणे हे अर्थातच देवाला आनंद देणारे आहे. त्याने दिलेल्या शरीराची मी काळजी घेत आहे” किंवा “आठवड्यातून तीनदा जिमला जाणे हे देवाला आनंद देणारे आहे. जेव्हा मी व्यायाम करतो तेव्हा मला निरोगी आणि चैतन्य पूर्ण वाटते.” किंवा असेही म्हणाल, “दररोज दहा मिनिटे बायबल वाचणे देवाला आनंद देणारे आहे. अखेरीस मी बायबल तर वाचतोय ना”
जेव्हा मी कार्सन यांचे वाचत होतो तेव्हा मला अगदी प्रकर्षाने जाणीव झाली की आपली आध्यात्मिक वाढ ही स्वत:ची काळजी घेण्याने पछाडलेल्या या जगात किती आत्मकेंद्रित बनू शकते. आपली काळजी घेणे ही मोठी ख्रिस्ती बाब वाटू लागते. जग इतर लोकांना कशी स्वत:ची उन्नती केण्यास शिकवते अगदी तसेच – पथ्य, व्यायाम, झोप, मनन, आणि कदाचित प्रार्थना.
तर ‘आत्मसुधारणा’ ही स्वास्थ्य आणि आरोग्य किंवा इतर प्रत्येक प्रणालीपेक्षा ख्रिस्ती केव्हा होऊ शकेल? जेव्हा हा सुधारलेला ‘मी’ अचानक इतरांचा दास होईल – येशूमध्ये इतरांच्या आनंदासाठी स्वत:हून काम करणारी एक नम्र व्यक्ती. प्रेषित पौलाने म्हटले आहे, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पाहा” (फिली. २:३-४).
ख्रिस्ती निर्णय आणि शिस्त ही आत्मपूर्ती किंवा आत्मसंरक्षणासाठी नसते तर प्रीतीसाठी स्वत:ला मरण्याची पात्रता वाढवण्यासंबंधी आहे.
आत्मत्यागाचा निर्णय
कदाचित तुम्ही धावत जाऊन बायबलमध्ये आत्मसुधारणेची वचने धुंडाळत राहाल. पण ज्यामुळे इतरांवर थेट परिणाम होणार नाही अशी कोणतीच आत्मसुधारणेची वाढ, अशी आज्ञा (किंवा परवाना) तुम्हाला शोधून सापडणार नाही.
स्वत:ची काळजी ऐवजी तुम्हाला स्वत:वर ताबा (इंद्रियदमन) आणि स्वनाकार आढळेल. जे ख्रिस्तीत्व तुम्ही शास्त्र लेखात पाहता ते आत्मसुधारणेसबंधी नाही तर स्वत:चा त्याग करण्यासबंधी आहे. येशू म्हणतो, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (लूक ९:२३). हे स्वत:ची काळजी घेण्याच्या आधुनिकतेपेक्षा कमालीचे निराळे आहे.
तसेच पौल म्हणतो “चोरी करणार्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे” (इफिस ४:२८). यासाठी की त्याला आणखी चोरी करायचा मोह होऊ नये असे नाही तर त्याला इतरांना द्यायला काहीतरी असावे म्हणून. हे काम करणे आणि बजेट करणे याला लागू असले तरी ते व्यायाम, पथ्य, झोप, बायबलवाचन या सर्वांबाबत आहे. व्यायाम करून दुसऱ्यावर प्रीती करण्यासाठी शक्ती वाढवा. तुम्ही जे खाता त्यामुळे स्वास्थ्य व शक्ती मिळवा यासाठी की तुम्ही इतरांवर प्रेम करू शकाल. बायबल वाचा आणि तुमच्या ह्रदयामध्ये साठवा म्हणजे तुम्ही इतरांना प्रीतीने ते सांगू शकाल.
येशूच्या नावाने लावलेली शिस्त ही नेहमी सेवेच्या ह्रदयाची असते स्वत:ची सेवा करणारी नाही.
आपली फळे
पण आत्म्याच्या फळाबद्दल काय? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही” (गलती ५:२२-२३).
जर ही यादी तुम्ही वाचली आणि मला, मला, मला असे ऐकता तर तुम्ही पौलाचा मुख्य मुद्दाच गमावला आहे. हे आत्म्याचे फळ आपण आपल्या प्रार्थनेच्या फडताळात बंद करून एकटेच खात बसत नाही. त्यातली प्रत्येक बाब ही खरा ख्रिस्ती विश्वास प्रगट करते आणि दुसऱ्या कोणासाठी आनंद व्यक्त करते.
हे आपल्याला समजते कारण पौल ह्या नऊ बाबी इतर कशाच्या तरी विरोधात सांगतो. “देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी” (गलती ५;१९-२१).
ही काही गुप्त पातके नाहीत. ही कुटुंब उध्वस्त करणारी, मंडळी दुभागणारी, नाती बिघडवणारी पापे आहेत.
आत्म्याचे फळ (पुढचे वचन) याउलट आहे: कुटुंबाची उभारणी करणारी, मंडळी जोडणारी, नाती बळकट करणारी कृपा ! येथे एकाकी आत्मसुधारणेचा मागमूसही नाही. हे आपल्या महान देवाचे आपल्यामधून होणारे दैवी काम आहे. हे काम पती किंवा पत्नी, पालक व मुले, अधिकारी, शेजारी आणि मंडळीच्या कुटुंबासाठी होते.
तुमचे निर्णय भरून वाहत आहेत का?
जर आपल्या नव्या शिस्तीमुळे आपल्याला अधिक वैयक्तिक समाधान आणि आत्मप्रतिष्ठा वाटत असेल पण त्यामुळे तुमच्या भोवतालच्या लोकांवर काहीही प्रभाव पडत नसेल तर आपले निर्णय येशूबद्दल काहीच होकारात्मक सांगत नाहीत. जो आनंद भरून वाहत नाही तो ती प्रीती करत नाही. आणि जो आनंद प्रीती करत नाही तो ख्रिस्ती नाही. आणि आपली जी लायकी आहे असे आपल्याला वाटते तसे आपण नाहीत ( १ करिंथ १३:३). संसर्गजन्य आनंद, त्याग करणारा आनंद, भरून वाहणाऱ्या आनंदाचा पाठपुरावा करा.
हा बोध निर्णय किंवा वैयक्तिक शिस्त व पथ्य व्यायाम झोप यांच्या निरोगी सवयी सोडून देण्यासाठी नाही. मुळीच नाही. सर्व प्रकारे वैयक्तिक आरोग्य, वाढ, प्रगल्भता यांच्या मागे लागा – पण केवळ स्वत:साठी ते करू नका. निर्णय घ्या आणि पाळा यासाठी की ते फक्त आत्मसुधारणाच करणार नाहीत तर प्रीती निर्माण करतील.
Social