जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे  (उत्तरार्ध) क्रिस विल्यम्स

ब. काळजी घेणाऱ्या पित्याची सुरक्षा

मत्तय ६:२५-३४ या वचनांचा भर आहे की आपला स्वर्गीय पिता आपली काळजी घेतो. ३२ वे वचन हे दाखवते –
“तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” सहाव्या अध्यायात मागे जा. सहावे वचन म्हणते –“तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल.”

आठवे वचन म्हणते – “तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे.”

प्रार्थना कशी करावी याच्या दिलेल्या नमुन्यामध्ये आपण देवाला पिता म्हणून ओळखावे व त्याच्याकडे विनंती करावी असे त्याने शिकवले. आपला पिता आपल्याला पाहतो, आपल्या गरजा त्याला माहीत आहेत आणि तो आपल्याला पारितोषिक देईल असेही त्याने शिकवले.

ज्यांना ठाऊक नाही आणि ज्यांना पिता नाही त्यांच्यासारखे तुम्ही होऊ नका यावर येशूने भर दिला. आपल्याला पिता आहे. खरे तर दोन गट आहेत. एका गटाला माहीत आहे की त्यांना स्वर्गात  पिता आहे आणि जो त्यांची खऱ्या रीतीने काळजी घेतो आणि दुसरे आहेत ज्यांना असा स्वर्गीय पिता नाही. आपल्याला स्वर्गामध्ये पिता आहे हे ठाऊक असणे किती दिलासा देणारी गोष्ट आहे.

मत्तय ६:२५ ते ३४ कडे वळू या. देव कसा सार्वभौम आहे, किती सामर्थ्यवान आहे असे त्याचे इतर गुण सांगण्याऐवजी येशू आपले लक्ष अगदी क्षुल्लक गोष्टींकडे वळवतो – पक्षी आणि गवत. आकाशातल्या पाखरांकडे आपण नेहमी किती पाहतो आणि त्याहूनही कमी फिकीर करतो ते रानातल्या गवताची.

येशू आपल्या मुलभूत गरजांविषयी आपल्याशी बोलत आहे. “आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?”

आपण जे जीवन जगतो त्याची देवाला खरोखरच काळजी आहे आणि त्यात काय येते? आपण काय खातो, पितो व आपले कपडे. पक्षांकडे पाहायला लावण्याचे कारण हे उडणारे पक्षी काळजी करत स्वत:साठी तरतूद करत नाहीत. तरीही- तरीही हा शब्द महत्त्वाचा  आहे – आपला स्वर्गीय पिता त्यांना पुरवतो. त्यांनतरचा प्रश्न  “तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही?” हा आपल्या स्वर्गीय पित्यावरील विश्वास व भरवसा याला उत्तेजन देण्यासाठी केला आहे. अर्थातच देव ज्या पक्षांना पुरवतो त्यांपेक्षा आपले मोल खूपच अधिक आहे. २८ व २९ वचने अजूनच उत्तेजन देतात. इतक्या श्रीमंत आणि सामर्थ्यशाली शलमोन राजाला सुद्धा काही दिवसच टिकणाऱ्या गवत आणि फुलांच्या सौंदर्याचा साज नव्हता. म्हणून प्रश्न- “अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाही काय?” पुन्हा ही नकारार्थी टीका नाही. येशू आपल्या स्वर्गीय पित्यावरील विश्वासाला चालना देत आहे. तो तुम्हाला गवत आणि फुले यांपेक्षा अधिक वस्त्रे लेण्यास देईल. देव त्याच्या मुलांची काळजी घेण्यास जे करील त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.

या परिच्छेदातून आपण उरलेल्या वचनांतून अजून बरेच काही शिकतो. सत्य हे आहे की अशा संकटाच्या काळामध्ये आपल्याकडे सच्ची उत्तरे नाहीत. परिस्थिती बदलेल का? आपण अशी आशा धरू शकतो आणि प्रार्थना करू शकतो पण अशी खात्री देणारे कोणी आहे का? परिस्थिती अजून बिघडेल का? बायबल स्पष्ट सांगते की असे होणार आहे- अजून तर हा अखेरचा न्याय नाही. तो दिवस येईपर्यंत भीतीजनक गोष्टी घडत राहतील आणि जोपर्यंत आपण येशूला त्याच्या येण्याच्या वेळी भेटत नाही तोपर्यंत विश्वासीयांची यापासून सुटका नाही. तर विश्वासी जनहो, जेव्हा तुमच्या भोवतालच्या गोष्टी कोसळत असताना देवाच्या वचनाच्या सत्यावर जसा तुम्ही विचार करता तशी तुमच्यासाठी आशा आहे. आणखी एक विचार सांगून मी हा लेख संपवतो.

३. मोलवान मुले असण्याची सुरक्षा

मी स्वत:ला प्रश्न करतो, नष्ट होणाऱ्या पक्षी आणि फुले यांच्यापेक्षा माझी किंमत का अधिक आहे?  येशू या परिच्छेदात जे शिकवतो ते मी पाहतो आणि समजण्यापलीकडे असलेल्या शांतीने मला गहन आशीर्वाद मिळतो. माझे ह्रदय आणि मन ख्रिस्त येशूमधील खात्रीने राखले जाते (फिली ४:७). येशू ख्रिस्तामध्ये असणे इतके महत्त्वाचे का आहे? ख्रिस्त येशूमध्ये मी देवाचे मूल बनतो ही सर्वात खात्रीची बाब आहे. मी अधिक मौल्यवान आहे कारण मी केवळ पक्षी किंवा फूल नाही. मी देवाचे मूल आहे.

ह्या सत्याकडे आपण विश्वासी जनांनी पुन्हा यायला हवे आणि तिथे स्थिर राहायला हवे. जेव्हा मला भीती वाटेल – आणि जेव्हा मी बातम्या व मिडियाकडे लक्ष देतो आणि हा विषाणू कसा पसरत आहे हे मित्रांकडून ऐकतो, आणि त्यासाठीचे प्रतिबंध कसे दिले जात आहेत व अंमलात आणण्यात येत आहेत हे ऐकत राहतो तेव्हा मला भीती वाटते. ह्या आणीबाणीच्या समयी आपल्या योजना कशा विस्कळीत होत आहेत, कसे त्रास होतात व आपल्या जीवनावर व आर्थिक व्यवस्थेवर त्याचा कसा परिणाम होतोय यावर चालणाऱ्या चर्चा मी ऐकतो तेव्हा मला भीती वाटते. पण मी ख्रिस्त व त्याचा वधस्तंभ याकडे वळतो. येशूने खरा मानवी देह धारण केला आणि मानव म्हणून राहिला. तो आपल्यासारखाच सर्व प्रकारे पारखला गेला. अशा प्रकारे तो आपला विश्वासू महायाजक झाला; जो आपल्या बाजूला येतो आणि आपला त्रास, दु:ख, गोंधळ आणि इतर सर्व समजू शकतो कारण तो या सर्वांतून गेलेला आहे. आणि त्याला हे सर्व समजते अशी आपल्याला खात्री वाटायला हवी. ह्या गोष्टी इब्री लोकांस पत्रामध्ये सांगितल्या आहेत तसेच हेही सांगितले आहे की आपल्या कोणत्याही गरजेच्या वेळी मदत मिळावी म्हणून आपण त्याच्याकडे धावू शकतो.

जेव्हा मी सभोवताली काय चालले आहे हे पाहतो, बातम्या ऐकतो आणि ह्या समस्येच्या गुंतागुंतीच्या चर्चा ऐकतो तेव्हा मला भीती वाटते. त्याऐवजी मी माझे मन ख्रिस्त आणि माझे तारण करण्यासाठी त्याचे येणे यावर लावायला पाहिजे. तेव्हा त्याला समजते यामुळे मला फक्त समाधानच मिळत नाही तर मी यापलीकडे त्याचे वधस्तंभावरचे मरण याकडे जातो. तेथे त्याने माझी सर्व पापे स्वत:वर घेतली आणि मला ती क्षमा मिळावी व माझी पापे धुतली जावी म्हणून त्याने शिक्षा घेऊन पूर्ण किंमत भरली. मग देवाने मला भग्न ह्रदय दिले यासाठी की मी पश्चात्ताप करावा, पापापासून फिरावे व प्रभू येशूवर माझा तारणारा व प्रभू म्हणून विश्वास ठेवावा. देवाने त्याच्या नीतिमान पुत्राच्या धार्मिकतेची वस्त्रे मला घातली आणि माझ्यामध्ये त्याचा आत्मा दिला. आता मी देवाचे मूल बनलो आहे आणि देवाला बाप म्हणून मी ओळखतो. माझा जीव कसा शांतीने भरून वाहतो. त्याच्यामध्ये मला किती आनंदाचा अनुभव येतो. ख्रिस्तामध्ये जो मी आहे व जे काही मला मिळाले आहे याचे कारण येशू मानवी देहामध्ये आला आणि माझ्यासाठी मरण पावला; यावर मी मनन करतो तेव्हा देवामध्ये कितीतरी आशा व दृढ विश्वासाची खात्री माझ्यामध्ये निर्माण होते.

 

Previous Article

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे (पूर्वार्ध) क्रिस विल्यम्स

Next Article

पडली, मोठी बाबेल पडली पील वॉरन

You might be interested in …

माझ्या पापाने तेथे त्याला धरून ठेवले

ग्रेग मोर्स उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो. त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू […]

 लोकांतरण व द्वितीयागमन

१ ले थेस्सलनी प्रस्तावना ख्रिस्ती धर्म म्हणजे देवाची तारणाची महान योजना. त्या तारणाच्या योजनेतील भूमिकेत खुद्द त्र्येक देवच आहे. “सर्व काही त्याच्या द्वारे, त्याच्यामध्ये व त्याच्यासाठी आहे.” असे पौल म्हणतो. का बरं? “प्रभूचं मन कोणाला […]