नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

क्रिस विल्यम्स

  “दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण विश्वासू मनुष्य कोणास मिळतो? जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.” निती २०:६-७

हे फळ नीति. ३१ सारखे आहे. जसे  सुद्न्य स्त्री मिळणे कठीण आहे तसेच विश्वासू पुरुष मिळणे कठीण आहे. विश्वासूपणा म्हणजे काय? याचा अर्थ रोम १२: ३ या वचनातून खूप छान रीतीने समजतो. “कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.”

देव स्वत:च हा विश्वास आपल्याला देतो, ज्याद्वारे आपण देवावर व त्याच्या संदेशावर विश्वास ठेवू शकतो. हे वचन सूचित करते की मानव स्वत:च्या प्रयत्नाने हा विश्वास मिळवू शकत नाही. विश्वास हा देवाने माणसामध्ये निर्माण केलेला दैवी प्रतिसाद आहे. ही एक खोलवरची खात्री आणि भरवसा असतो जो कशानेही ढळत नाही. याच विश्वासातून पवित्र आत्मा ‘विश्वासूपणा’ निर्माण करतो. यामध्ये विश्वसनीयता, सातत्य, निष्ठा, अवलंबून राहता येणे या गुणांचा समावेश होतो.

देव हा एकच पूर्णपणे व सतत विश्वासू आहे. यामुळे शास्त्रलेखांत या गुणाला फार मोल दिले आहेच पण जे देवाचे लोक आहेत त्यांच्याकडून याची अपेक्षा केली आहे. विश्वासूपणा हा देवाचा गुण आहे आणि ज्यांचा आत्म्याद्वारे नवा जन्म झाला आहे ते काही प्रमाणात तरी त्यांच्या जीवनातून हाच विश्वासूपणा प्रगट करतात. अनेक स्तोत्रे देवाच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात. त्यापैकी एक वचन वाचू या.

स्तोत्र ८९:३३ – “तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही, मी आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही.”

देवाच्या विश्वासूपणाची आणखी काही वचने:

विलापगीत ३:२२,२३- “आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.”

रोम ३:३- “कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय?”

प्रकटी १९:११- ‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’ तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.

१. आपल्याकडून विश्वासू असण्याची अपेक्षा आहे.

१ करिंथ ४:२- “कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.”

तीत २:१०  –  “…अवघा चांगला विश्वासूपणा दाखवावा यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत देव आपला तारणारा याच्या शिकवणीस शोभवावे.”

तरुणांनो तुम्ही इतर आध्यात्मिक बाबींसोबत विश्वासूपणाचाही पाठलाग करा. २ तीम. २:२२ म्हणते, “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.”

याची अपेक्षा इतकी मोठी आहे की अविश्वासूपणाविरुध्द देव क्रोध प्रकट करतो. नहेम्या  १ :८-९ “तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर; ते हे की, ‘तुम्ही पातक केल्यास मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरीन; पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’”

अविश्वासूपणासाठी देवाने त्याच्या लोकांना शिक्षा दिली. तसेच यहेज्केल संदेष्टयाद्वारे सागितले की देव त्यांच्या अविश्वासूपणाची क्षमा करण्यास  तयार नाही.  परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून माझ्याविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवीन, त्याच्या अन्नाचा आधार तोडीन, देशात दुष्काळ पाडीन, आणि त्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन” (यहेज्केल १४:१२).

२. विश्वासूपणामध्ये चिकाटीसुद्धा येते.

चिकाटी म्हणजे टिकून राहणे. तुम्ही ज्यामध्ये स्वत:ला गोवून घेता त्यात यशस्वी होण्यासाठी ही गुरुकिल्ली आहे. चिकाटी म्हणजे सोडून न देणे.

येशूने शिष्याकडून विश्वासूपणाची अपेक्षा केली. लूक १६:१० मध्ये त्याने म्हटले; “जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.”

चिकाटी किंवा टिकून राहणे हे खऱ्या विश्वासी व्यक्तीचे चिन्ह आहे. येशूने जगाचा शेवट आणि त्याच्या दुसर्‍या येण्यासंबंधी शिक्षण देताना हा गुण तारणासाठी आवश्यक आहे असा उल्लेख केला. जे खरे तारलेले आहेत ते टिकून राहतील. या जगाचा न्याय होण्यापूर्वी महान संकटाच्या काळात ज्या भयंकर छळाला त्यातील विश्वासीयांना तोंड द्यावे लागणार आहे त्यामध्ये फक्त खरे विश्वासीच टिकून राहतील. मत्तय ३: ९-१३ वाचू या.

“तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील.

पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.

३. विश्वासूपणावर दाखला

विश्वासूपणावर भर देण्यासाठी येशूने हा दाखला सांगितला.

लूक १९:१२-१७: “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या
दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’ त्याच्या नगरचे    
लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’
मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’ मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’
मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”

तिघातले दोन दास विश्वासू होते. त्यांनी आपल्या धन्याच्या व्यवसायात इतके लक्ष घातले की त्याला खूप नफा मिळवून दिला. आपला धनी आणि मालक याच्याशी विश्वासू राहण्यात त्याची इच्छा पुरी करणे, तसेच फळ देणे या दोघांचाही समावेश होतो. येशूने योहान १५:८ मध्ये हेच म्हटले. “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.”

म्हणूनच फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो (योहान १५:२).

या दाखल्यातल्या  तिसऱ्या दासाला त्याच्या धन्याचा स्वभाव व चारित्र्याबद्दल बरेच ठाऊक होते. तरीही आपल्या मालकाच्या सेवेत व्यस्त राहण्याचे त्याने नाकारले आणि त्याने फळ दिले नाही. त्याचे जे होते ते देखील त्याच्या पासून काढून घेण्यात आले. आणि त्याच्या मालकाने त्याचा धिक्कार केला. त्याचा मालक त्याला विश्वासू नाही तर दुष्ट म्हणाला.

पहिल्या दासाला मालकाने काय म्हटले ते पुन्हा वाचू या. व.१७ – ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’

त्याच्या विश्वासूपणाचे पारितोषिक होते आणखी जबाबदारी. “मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल” (व. २४-२७).

विश्वासूपणाचे पारितोषिक आहे अधिक जबाबदारी. जे विश्वासू आहेत त्यांच्यावर देव भरवसा ठेवतो.

समारोप

विश्वासूपणा हा देवाचा गुण आहे. देव त्याच्या  दयेने आणि कृपेने आपल्याला तारतो. तसे तो तुमच्यामध्ये विश्वासाची जोपासना करतो की त्याच्या विश्वासार्हतेचा आपण पाठलाग करावा. जसजसे तुम्ही त्याच्या आत्म्याद्वारे चालता, त्याच्या आत्म्यामध्ये राहता, तसतसे तुम्ही आत्म्याने चालवले जाता आणि त्यामुळे अशी व्यक्ती बनाल की जी देवाच्या आत्म्याचे विश्वासूपणा हे फळ दाखवत राहाल.

Previous Article

उगम शोधताना

Next Article

आपला मृत्यू पुढे ठेपला असता कसे जगावे

You might be interested in …

मानव होणारा राजा     जॉन मॅकआर्थर

  येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या देशात […]

विश्वासी ख्रिस्ती उत्क्रांतीवादावर विश्वास ठेऊ शकतात का? लेखक : ग्रेग अॅलीसन

उत्क्रांतिवाद हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. मी कॉलेजमध्ये असताना सायन्स शाखा निवडली होती व मी अभ्यास करत असलेला प्रत्येक विषय – बायॉलजी, बॉटनी, इकॉलजी, मायक्रोबायॉलजी – हे सर्व विषय उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून शिकवले जात असत. […]

वधस्तंभाचा अभिमान

स्टीव्ह फर्नांडीस शिक्षण देऊन वधस्तंभावरच्या ख्रीस्ताविषयीची तळमळ वाढवण्याची गरज आहे. असे जीवन जगावे आणि अशा प्रकारे बोलावे की वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचे मोल अधिकाधिक लोकांच्या दृष्टीस पडेल व त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. येशुप्रमाणेच आपल्यालाही ते महागात […]