जॉन पायपर

कोमटपणा म्हणजे काय? कोमटपणाचे सार म्हणजे असे म्हणणे, “ मला कशाची गरज नाही, मला काहीच नको. मला येशू मिळाला ते पुरे आहे. एक दिवस मी त्याला माझ्या ह्रदयात यायला आमंत्रण दिले होते आणि आता तो मला मिळाला आहे. आता मला कशाची गरज नाही.” कोमट लोक हे आध्यात्मिकदृष्ट्या आत्मसंतुष्ट असतात.
आत्मसंतुष्टतेचे मोजमाप
आता तुम्ही या लोकांमध्ये आहात की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये पाहून मी पापी आहे असं मला वाटतंय असा विचार करू नका. कारण आपण सगळे असंच करतो. तसंच आपल्याला शिकवलंय. आपण आध्यात्मिकदृष्ट्या आत्मसंतुष्ट लोकांमध्ये आहोत का हे सांगण्यासाठी तुमच्या प्रार्थनेच्या जीवनाकडे पाहा. हेच मापनसूत्र आहे. आपण आध्यात्मिक आत्मसंतुष्टपणाच्या बंधनात आहोत हे पाहण्यासाठी प्रश्न विचारा: कितादा, किती उत्कंठेने, किती प्रामाणिकपणे, किती वेळ ख्रिस्ताचे खोल ज्ञान होण्यासाठी तुम्ही देवाबरोबर प्रयत्नांची पराकाष्ठा करता? तुमच्या प्रार्थनेमध्ये किती कळकळ आहे? साक्ष देण्यात किती गोडी आहे? पवित्र आत्म्याबरोबर किती आनंद आहे? पापासाठी खोलवर दु:ख व्हावे, हरवलेल्यांसाठी उत्कट कळवळा, प्रीती करण्यासाठी अधिक दैवी प्रीती यावी असं तुम्हाला वाटत का? तुमच्या प्रार्थनेच्या जीवनात तुम्ही देवाबरोबर रोज, नेहमी, बराच वेळ घालवता का?
आणि जर असं नसेल ते हे मापनसूत्र दाखवते की, तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आत्मसंतुष्ट आहात – हे तुम्हाला स्वत:बद्दल काय वाटतं यामुळे नाही. तुमच्या प्रार्थनेच्या जीवनातील निष्काळजीपणा हेच प्रदर्शित करतो की तुम्ही कोमट आहात आणि यामुळे तो तुम्हाला तोंडातून ओकून टाकणार आहे?
दरिद्री आणि दयनीय
जर आपल्या ह्रदयात बदल घडण्यासाठी आपल्याला अस्वस्थता नसेल तर तुम्हाला व मला येशूला काही सांगायचे आहे. प्रकटी ३:१४ -२२ ही वचने कोमट लोकांवर एखाद्या ज्वालामुखीसारखी येऊन आदळणार आहेत. येशूने असे मूल्यमापन केले आहे: “मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही” (प्रकटी ३:१७).
लक्षात घ्या की हे येशू बोलत आहे. चर्चला जाणाऱ्या पण जीवन बदलण्याची इच्छा नसणाऱ्या लोकांना तो वरून असे पाहतो. दिवसामागून दिवस जात असताना देवाला दोन मिनिटे देत ते असेच समाधानी असतात. आणि असे चर्चला जाणारे लोक बदलण्यासाठी काही करत नसतील तर शेवटी तो त्यांना आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. आता हा आरोप आहे आणि धोक्याची सूचना आहे.
ख्रिस्ताकडून मसलत
१८ व्या वचनात यावर सल्ला येतो. सल्लामार्गदर्शन हा सध्या खूप मोठा धंदा आहे. कदाचित तुम्हांतील काहीजण यात गोवलेले असतील. जाता जाता मला सांगू द्या की यावरची फक्त पुस्तके वाचू नका तर सल्ला मसलतीच्या गुरुचा अभ्यास करा. १८ व्या वचनात मसलत हा शब्द आहे हे तुम्ही पाहिलंत का? संपण्यापूर्वी आपण एक सर्वात गोड अभिवचन पाहणार आहोत. पण तिथे जाण्याआधी एक भयंकर धोक्याचा इशारा आहे. पण इथे मसलत आहे. त्यांना काय करायचे आहे?
“म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे” (३:१८).
त्या मंडळीला ओकून टाकण्याची ख्रिस्ताची इच्छा नाही. मंडळीसाठी – आपल्यासाठी त्याची इच्छा आहे की आपले दारिद्र्य जाऊन समृद्धी यावी. आपली नग्नता आणि लज्जेवर धार्मिकता व आज्ञापालनाची वस्त्रे चढवली जावी आणि आपले अंधत्व बरे व्हावे मग आपण देवाला पाहू शकू व तो हे कसे करतो ते पाहू शकू.
हे सोने, वस्त्रे, आणि औषधे मिळण्याचे एकच ठिकाण आहे – ते खुद्द येशूच आहे. म्हणून तो म्हणतो,  “श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे.” आता तुमच्याकडे पैसे नसताना तुम्ही सोने कसे विकत घेऊ शकता? आताच तर तो म्हणाला की, तू दरिद्री, अंधळा, उघडा, दयनीय आणि दुष्ट आहेस. फक्त दरिद्री आणि कफल्लक नाही तर अंधळा. जेव्हा तुम्ही अंध असता तेव्हा तुम्हाला काहीच काम करता येत नाही; तुम्हाला पैसे कमावता येत नाही. आणि फक्त अंधच नाही तर उघडावागडा आहेस. तुम्हाला बाहेर पण पडता येत नाही.
तुझे दरवाजे उघड
ख्रिस्ताची संपत्ती – धार्मिकतेची आणि आज्ञापालनाची वस्त्रे, प्रीती करण्यासाठी सामर्थ्य, देवाच्या शहाणपणाचे अंजन – तुम्हाला कसे मिळते? आणि तेही तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नसताना? उत्तर २० व्या वचनात आहे. तू घराबाहेर जाऊ नकोस. तू दरवाजा उघड आणि येशूला आत घे.
“पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील” (३:२०).
आता हे वचन अविश्वासी लोकांना लागू करता येते, पण इथे त्याचा अर्थ तसा नाही. हे वचन कोमट ख्रिस्ती लोकांसाठी आहे – ज्यांना वाटते की त्यांना ख्रिस्ताची पूर्तता मिळाली आहे. आणि तो तर ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयाच्या दरवाजाबाहेर ठोठावत आहे. हे अशा ख्रिस्ती लोकांसाठी आहे की त्यांना वाटते त्यांना ख्रिस्ताची आणखी गरज नाही. आपल्याला त्याची संपत्ती मिळालीय, त्याची वस्त्रे मिळालीत, त्याचे औषध मिळालंय. आणि तो म्हणतो “ तुला हे मिळालं नाहीये. तू दरिद्री, अंध, दयनीय, उघडा आणि गरजवंत आहेस.” जे लोक त्यांच्या जीवनाचे अगदी आतले दार बंद करून घेतात त्यांच्यासाठी हे आहे. अशा लोकांना ख्रिस्ताला बाहेर उभा करून एखाद्या विक्रेत्याप्रमाणे त्याला वागवायचे आहे. तुम्हाला कदाचित काही विकत घ्यायचे असेल पण त्याने आत येऊन तुमच्या जीवनाच्या खोल भागात ढवळाढवळ करायला तुम्हाला नको आहे. जी वधू ख्रिस्ताला बाहेर ठेवून स्वत: आतल्या खोलीत टी व्ही पाहतेय अशा वधूसाठी काही तो मरण पावला नाही. मंडळीसाठी त्याची इच्छा आहे की आपण दरवाजा उघडावा. आपल्या जीवनाचे सर्व दरवाजे सताड उघडावेत.
आता ते गोड अभिवचन: त्याला तुमच्या जीवनाच्या भोजनगृहात तुमच्याबरोबर यायचे आहे, मंद दिवे लावायचे आहेत, मेज मांडायचे आहे, तुमच्याबरोबर बसायचे आहे, तासभर बोलायचे आहे. जेव्हा तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीबरोबर तुमच्या सर्वात आवडते भोजन तुम्ही घेतलेत त्याची आठवण करा. असाच अनुभव ख्रिस्ताला तुमच्यापैकी प्रत्येकाशी घ्यायचा आहे. आणि आता तो दरवाजा ठोकून त्याची मागणी करत आहे. “ तुम्ही माझ्यासाठी कृपया वेळ काढाल का? – एक तास- म्हणजे मी तुमच्याबरोबर व तुम्ही माझ्याबरोबर जेवू शकाल?”
आणि जेव्हा येशू तुमच्या खोलीत येतो तेव्हा तो स्वत:सोबत सर्व सोने, सर्व वस्त्रे, आणि जगातली सर्व ओषधे आणतो. येशू असणे म्हणजे सर्व काही मिळणे. जेव्हा तुम्ही कफल्लक असता तेव्हा तुम्ही सोने कसे विकत घ्याल? तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही तुमच्या जीवनाच्या अंतरंगातले सर्व दरवाजे उघडायला सुरुवात करा. आणि त्याला विनंती करा की प्रत्येक क्षेत्रात त्याने यावे, घरच्यासारखे राहावे, तुमच्याबरोबर जेवावे आणि तुम्ही त्याच्याबरोबर जेवावे.
अधिक मिळण्यासाठी सामर्थ्य
ख्रिस्ताबरोबर एक जवळकीची सहभागिता आणि सहवास मिळावा यासाठी मला एक तीव्र उत्कंठा आहे हे मी कबूल करतो. हा धडा माझ्यासाठी आहे. मी तुम्हाला दोष देत नाही. मी असा उपदेश करतो कारण ख्रिस्ताच्या पूर्णतेची मला प्रकर्षाने ओढ आहे. आणि सर्व मंडळीसाठी माझी हीच इच्छा आहे.
आणि जेव्हा तो आपल्या प्रीतीच्या आतल्या गाभार्यात येतो आणि तिथे राहू लागतो तेव्हा तेथे सामर्थ्य असणारच – प्रीती करण्यास सामर्थ्य. ह्याचीच आपल्या सर्वाहून अधिक गरज आहे. ज्या आपल्या सगळ्या क्षुद्र इच्छा आपल्याला वेसण घालतात आणि आपल्यावर प्रभुत्व करतात त्यांच्यावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य. जेव्हा येशू आपल्यामध्ये येतो व मंद दिव्याखाली तो आपल्याबरोबर भोजन करतो तेव्हा तुम्हाला जगाच्या सर्व मोहांवर विजय मिळवण्यास सामर्थ्य प्राप्त होते.




 
		 
		 
		 
			 
			 
			 
			 
			
Social