ग्रेग मोर्स
पाश्चिमात्य जगात राहत असलेल्या आपल्या ख्रिस्ती लोकांना एका मोहाला (नकळत) तोंड द्यावे लागते. तो मोह म्हणजे आरामशीर, सुखी, समाधानी असणे. आपण जो विसावा निर्माण केला आहे त्याला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करणे.
अमेरिकेत अस्तित्वात असलेल्या इतर अपूर्णता घेऊन आपण आपले स्वातंत्र्य, श्रीमंती, सुविधा, तांत्रिक सुखसोयींचा आपल्या पूर्वीच्या कोणीही लोकांनी अनुभवला नाहीत इतका त्यांचा मनमुराद आनंद घेतो. प्राचीन राजांनाही आपला हेवा वाटावा : आपण पृथ्वीतलाचा काही तासात फेरफटका मारू शकतो, आपले टेक्स्ट मेसेजेस आणि इमेल्स त्यांच्या पत्रासोबत आणि संदेशवाहकासोबत फिरत राहतात. आपल्या गाड्या, वातानुकूलित घरे, हीटर्स, बहुतेक जेवणात मांसाहार, सहज मिळणारी चॉकलेटस, इलेक्ट्रॉनिक टूथब्रशेस, परफ्युम्स, डेन्टिस्ट, दवाखाने, मॉर्फिन आणि अॅन्टीबायोटिक्स, अलिशान शौचालये. अगदी साधे लोकही आपल्याजवळ सुपर कम्प्युटर बाळगून असतात. उपासमार येथून हद्दपार झाली आहे. आपली गरिबी ही इतिहासातील किंवा बायबलच्या काळासारखी नाही.
देवाने आपल्याला खूप सामायिक कृपा पुरवली आहे. या भौतिक पुरवठ्यासोबतच आपले नेते निवडण्याचा अधिकार, मोकळेपणाने उपासना करण्याचा अधिकार तसेच इतर बऱ्याच देशात नाही अशी न्यायपद्धती दिलेली आहे. सामान्य ख्रिस्ती व्यक्तीसुद्धा बायबलमधील दुसरे राजांच्या पुस्तकातील राजघराण्यात आपली जागा बदलणार नाहीत. याचे कारण आपण अधिक चांगल्या करारात आहोत हेच नाही तर आपण खूपच समृद्ध आहोत यामुळे.
समृद्धीची काळी बाजू
तरीही समृद्धीलाएक काळी बाजू आहे. “कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे” (१ तीम. ६:१०). यामुळेच आगूर या सुज्ञ माणसाने प्रार्थना केली की मला श्रीमंत करू नकोस.
“व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन” (नीति. ३०:८,९)
तो इस्राएलांच्या इतिहासातून धडा शिकला होता – जो वारंवार या प्रकारे घडत होता: प्रथम आशीर्वाद, मग विसर, शिक्षा आणि गुलामी, पश्चात्ताप. अगदी प्रथमपासूनच मोशेने स्थूल होणे आणि विसरणे यासंबंधी ताकीद दिली होती:
“सावध राहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील. तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि चांगली घरे बांधून त्यांत राहशील,तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धी होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल,तेव्हा तुझे मन उन्मत्त होऊ नये आणि तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तू विसरू नयेस म्हणून सांभाळ” (अनुवाद ८: ११-१४).
हाच मोह आपण येशूने लावदिकीया येथील समृध्द मंडळीला केलेल्या निषेधात दिला आहे. ते कोमट झाले होते.
“तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही” (प्रकटी ३:१५-१७).
समृद्धीची काळी बाजू ही आहे की ती आपल्याला देवासंबंधी विसर पाडते आणि त्याच्यासाठीचा आवेश मवाळ करते.
तुडूंब भरलेले पोट
स्थूल असणे, धैर्य गमावलेले, आत्मसंतुष्ट असणारे प्रवासी असण्याच्या धोक्याला आपण तोंड देतो. सुलभता आपल्याला मोह घालते की आपल्या सुखसोयींवर प्रेम करा आणि ख्रिस्तासाठी जगलेले क्रांतिकारी जीवन हे ‘मूर्खता’ ‘बेपर्वाईचे’ असे गणा.
पण असा आत्मा हा आपल्या प्रभूच्या पाचारणाच्या विरोधात आहे. त्याने मला (आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला) एका महान कामगिरीचा आदेश दिला आहे. – त्याच्या राज्याचा फैलाव करा, हरवलेल्या आत्म्यांना वाचवा, सैतान आणि त्याचा काळोखातील दुरात्मासमूह यांच्याशी युद्ध करा. हे धाडस मला सुलभ सुखसोयींची परिश्रम आणि वधस्तंभ यांच्याशी अदलाबदल करायला सांगते (लूक ९:२३). दुसऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी मी स्वत:चा त्याग करावा, माझ्यामध्ये जे जगिक आहे त्याचा मी त्याग करावा, अधर्मात गुंतलेल्या बंधूंना जाब विचारावा, त्याच्या गौरवापुढे माझे जीवन तुच्छ मानावे, या जगाला, सैतानाला आणि देहाला पसंत असलेल्या गोष्टींविरुद्ध मी उभे राहावे, आणि जर वेळ आली तर सर्व सोडून त्याच्या नावाकरिता मी मरावे यासाठी त्याने मला नेमले आहे. आणि दररोज तो मला या अफाट विश्वामध्ये बोलावतो – मग ते कदाचित शेजारी असलेल्या व्यक्तीला त्याची सुवार्ता सांगणे असेल.
जेव्हा ख्रिस्त चोरासारखा रात्री येईल, तेव्हा आपल्यातले किती जण आपले नाईट ड्रेस आणि सतापा घालून आरामखुर्चीत बसलेले असू आणि स्वत:ला सांगत असू, “हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर” (लूक १२:१९)? आणि अशा आरामखुर्चीत बसले असताना तो श्वापद करीत असलेला क्रूर छळ, अविश्वासी शेजाऱ्याचा होणारा विनाश, आणि ख्रिस्ताचे नावही न ऐकता या जगातून पडणारे हरवलेले अगणित आत्मे हे सर्व खूप दूर आहे असे असे भासते.
समृद्धीला तोंड द्यायला शिका
जेव्हा समृद्धी असते तेव्हा त्यासोबत येणारा मोह तुम्ही किती वेळा ओळखू शकता? सन्मान्य जगिकतेचा मोह? या जगात आपल्या जीवनावर प्रेम करण्याचा मोह? यार्देनेच्या अलीकडच्या बाजूस मुक्काम करण्यासारख्या काही बाबी आहेत ज्या ख्रिस्तीत्वाचा जोम सपाट करतात. आरामशीर असणे, स्थूल बनणे, जगिक बाबींचा पाठपुरावा करण्यात गुंतून जाणे, स्वर्गीय राजा आणि देश याची सेवा करण्यापासून माघार घेणे, युद्ध करण्याचे धाडसच गमावून बसणे.
आपल्या आरामखुर्च्या आणि टी व्ही यांच्यामध्ये खूपच रस घेणे.
आपल्यापैकी अनेकांसाठी तर मग पापुआ न्यू गिनीला जा असे याचे लागूकारण होणारच नाही. आपण काही समुद्रापार जाऊन या आपल्या रहाणीमानातून सुटका करून घेणार नाही. तर आपल्यापैकी बहुतेकांना देव आपल्याच परिस्थितीत राहून त्याच्यासाठी विश्वासूपणे राहायला पाचारण करतो. यासाठी आपण असे शिकायला हवे की समृद्धीला आपण कसे तोंड द्यावे. हाच आपला प्रतिसाद हवा.
“दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्वकाही करण्यास शक्तिमान आहे” (फिली.४:१२,१३).
एकटेपणा, भूकमार यांना तोंड देत प्रभूच्या मदतीची हताशपणे वाट पाहणे कसे असावे याची आपण कल्पना करू शकतो. पण पौलाला दुसरे कोणते रहस्य शिकायचे आहे ते पहा. भरपूर असण्याला कसे तोंड द्यावे याचे रहस्य तो शिकला होता. त्याला ठोसे खाणे आणि मृदू गालिचे दोहोंमध्ये मदत हवी होती. आणि समृद्धीमध्ये भ्रष्ट न होता कसे जगावे याचे रहस्य तो शिकला होता : त्याला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताच्या ठायी सर्व गोष्टी तो करू शकत होता.
ज्या जगात सुरक्षित वाटते त्यापासून काही धोका नाही असे आपण गृहीत धरू शकतो. आपल्याला गरीबी आणि छळ सोसणाऱ्या मंडळीसारखी शक्तीची गरज नाही असे आपल्याला वाटते. पण आपल्याला गरज आहे. आपण ज्या समृद्धीला तोंड देतो त्यासाठी आपल्याला ख्रिस्ताच्या सामर्थ्याची गरज आहे. स्वर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, प्रसिद्धी व धन यांच्या धोक्याला तोंड देण्यासाठी, आपल्याला ख्रिस्त आणि त्याचे सामर्थ्य हवे आहे. मग आपण या समृद्धीच्या देशातून सुखरूप पार पडू कारण आपण एका अधिक चांगल्या – स्वर्गीय देशाची वाट पाहत आहोत.
Social