दिसम्बर 26, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

या ख्रिस्तजन्मदिनी तुमच्या मुलांना पुढील पाच गोष्टी शिकवा

ख्रिस्टीना फॉक्स

मम्मी, ह्या ख्रिसमसला मी घराचे डेकोरेशन करणार.”

सणाचा वेळ आता परत आलाय. दुकाने लाल आणि हिरव्या रंगांनी सजवलेली आहेत. रस्ते, फेसबुक, इमेल जाहिरातींनी भरून गेलेली दिसतात. मुलांच्या डोळ्यांसमोर मात्र सुंदर वेष्टणात गुंडाळलेले बॉक्सेस असतात.

मुलांची ह्रदये सुवार्तेच्या सत्यांनी भरून टाकण्यासाठी ख्रिस्तजन्माचा सोहळा एक पर्वणीच आहे. त्यांना मिळू शकणारी सर्वात उत्तम देणगी म्हणजे ख्रिस्त हे दाखवण्याचा हा एक आदर्श समय आहे.

या ख्रिस्तजन्मदिनी आपल्या मुलांना खाली दिलेली महत्त्वाची सत्ये आपण शिकवू शकू या.

१. उद्धाराची कहाणी

डिसेंबर महिन्यात २५ तारखेची वाट पाहत असताना बायबलमधून येशूच्या जन्माची गोष्ट सांगून मुलांची मने सण साजरा करण्यासाठी आपण तयार करू शकतो. आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला निर्मितीच्या गोष्टीपासून सुरुवात करायला आवडते. आणि त्यापुढच्या इतिहासातून ख्रिस्ताच्या जन्मापर्यंत उद्धाराची गोष्ट कशी प्रगट होत गेली याबद्दलच्या वृत्तांतातून आम्ही जातो. आम्ही मानवाचे पतन आणि देवाचे तारणारा पाठवण्याचे अभिवचन याबद्दल बोलतो. मग आम्ही देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व जुन्या करारात त्याची वारंवार दिलेली खात्री याबद्दल वाचतो. नंतर आम्ही मोशे आणि त्याच्याहून एक महान संदेष्ट येणार असल्याबद्दल चर्चा करतो (इब्री ३:३-६). आम्ही यशयातील भविष्ये वाचतो. सर्व बायबल आपल्या तारणार्‍याकडे कसा निर्देश करते ते आम्ही पाहतो.

२. ख्रिस्ताची नम्रता

जगासाठी हा उत्सव उधळपट्टी करणे, ऐष करणे, आणि प्रत्येक बाब अगदी परिपूर्ण करण्यास झटणे यासाठी असतो. तथापि येशूची गोष्ट ही नम्रतेबद्दलची आहे. ख्रिस्तजयन्तीचा हा वेळ देवाच्या राज्यात महान असणे याचा अर्थ काय
(मत्तय २०:२६-२८) हे आपल्या मुलांना शिकवण्यास एक मोठी संधी देतो. त्याचे आईबाप, त्याच्या जन्माचे ठिकाण, त्याचे मूळ गाव, आणि मानवी देह धारण करण्याची त्याची प्रत्यक्ष कृती हे सर्व त्याची नम्रता प्रगट करतात.

बहुतेक लोकांची अपेक्षा होती की मशीहाचा जन्म एखाद्या राजवाड्यात व्हायला हवा होता, गोठ्यात नाही. बहुतेकांची अपेक्षा होती त्याने रोमी लोकांचा पराभव करावा. त्यांच्याकडून वधस्तंभावर खिळले जाऊ नये. फिली. २: १-११ ही वचने आपल्या मुलांसोबत वाचा आणि त्यांना ख्रिस्ताची नम्रता दाखवा.

३. देव दुर्बलतेद्वारे कार्य करतो

त्याच अनुषंगाने देव दुर्बलतेद्वारे कसे कार्य करतो हा या सणामध्ये शिकण्याचा आणखी एक विषय होऊ शकेल. देव बहुदा असंभवनीय आणि दुर्बल लोकांची आपल्या उद्धाराच्या गोष्टीमध्ये निवड करतो. मरीया ही साधी, गरीब, आणि एका दुर्लक्षित गावातली मुलगी होती. पेत्र हा अशिक्षित कोळी होता. जेव्हा देव आपल्या दुर्बलतेमधून कार्य करतो तेव्हा त्याचे गौरव प्रगट होते. हे येशूच्या मरणाच्या वेळी जास्त प्रकर्षाने दिसून येते. येथे तो आपल्या बदली वधस्तंभावर मरण पावला व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आपले पाप व मरण यावरील विजय त्याने अशा रीतीने शिक्कामोर्तब केला.

४. देव त्याचे अभिवचन पूर्ण करतो

या सणाच्या वेळी आणखी एक सत्य तुम्ही मुलांच्या मनावर ठसवू शकता की देव आपले अभिवचन नेहमी पूर्ण करतो. याची सुरुवात तुम्ही मानवाचे पतन झाल्यावर देवाने तारणारा पाठवण्याचे अभिवचन दिले येथून करा. मग जुन्या करारातल्या गोष्टी सांगून आपल्या लोकांना देवाने मुक्ती करण्याची अभिवचने दिली ती पहा. आणि त्याची परिपूर्ती ख्रिस्तामध्ये कशी झाली ते दाखवा.

५. ख्रिस्ताची नावे

गेल्या डिसेंबर महिन्यात दर दिवशी माझी मुले येशूची निरनिराळी नावे शिकली. मशीहा, देवाचा कोकरा, इम्मानुएल, अल्फा, ओमेगा, शांतीचा राजा, अशा नावांचा आम्ही अभ्यास केला. येशूची नावे व त्याचा अर्थ शिकवल्याने मुलांना येशूचा स्वभाव, आणि त्याने काय केले हे समजायला मदत होते. आम्ही पेपरच्या पट्टीवर एकेक नाव लिहून त्याची एक साखळी तयार केली. नावे शिकण्याचा दुसरा मार्ग म्हणजे सजावटीमध्ये मधून मधून अशा नावांच्या फिती जोडणे. प्रत्येक नाव शिकून झाले की अशी एक फीत तयार करा.

या वेळेचा फायदा घ्या आणि बाळ येशूबद्दल आपल्या मुलांना शिकवा. वचनामध्ये वेळ घालवा आणि वचनदत्त मशीहा त्यांना दाखवा. हा वचनदत्त मशीहा म्हणजेच बेथलेहेममध्ये जन्म झालेले बाळ आहे हे त्यांना दाखवा. त्यांना पाहायला मदत करा की येशू हीच त्यांना मिळू शकणारी सर्वात महान देणगी आहे व ही महान देणगी ते इतरांनाही देऊ शकतात.

Previous Article

सुलभतेवरच्या प्रीतीचा धोका

Next Article

येशूचे वंशज – येशूच्या कुटुंबातील कुप्रसिध्द स्त्रिया

You might be interested in …

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ

(१७२६ ते १७९७) लेखांक १३ राजदरबारी ख्रिस्ताचा सेवक श्वार्टझ् नित्याचे सुवार्ताकार्य करत असतानाच ब्रिटिशांचा वकील म्हणून दूतावासाची कामगिरी हाती घेण्याची गव्हर्नरची विनंती श्वार्ट्झने स्वीकारल्याचे आपण पाहिले. त्यासाठी आपल्याला सरकारने वारंवार केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी […]

धडा १४.           १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स

    त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक  व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान […]

फार जोराने धावण्यापासून सावध राहा

जॉनी एरिक्सन टाडा जेव्हा मी ३० वर्षांची होते तेव्हा माझ्या जॉनी ह्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभली होती. जॉनी हा चित्रपट राष्ट्रभर गाजत होता आणि मी कॅलिफोर्निया येथे जॉनी अॅंड फ्रेंड्स ही संस्था स्थापण्यास स्थलांतर केले. […]