दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जर तुम्हाला जगण्यास एकच आठवडा असता

जॉन ब्लूम

                  

कुपीत भरून ठेवण्यास वेळ मिळाला असता जर
पहिली गोष्ट केली असती तर
राखून ठेवला असता अनंतकाळ सरेपर्यन्तचा प्रत्येक दिवस
घालवण्यासाठी तुझ्याबरोबर

१९७२ मध्ये जिम क्रोस या एका गीतनिर्मात्या आणि गायकाची आंतरदेशीय कीर्ती उजळू लागली होती. तो एक तरुण पिता होता व त्याचे ह्रदय आपल्या एक वर्षाच्या मुलासाठी प्रीतीने भरून वाहत होते.
जिमच्या  व्यवसायामुळे आपल्या मुलापासून त्याला सतत दूर जावे लागत होते. आणि हे  त्याच्यासाठी फार कठीण होते. आपल्या लाडक्या मुलासोबतचे ते मोजके न साठवता येणारे क्षण भुरकन उडून जात. मग त्याने वर दिलेल्या ह्रदयस्पर्शीस्पर्शी  “वेळ कुपीमध्ये”  या गाण्यामध्ये आपले वरील विचार व्यक्त केले.

त्या गाण्याच्या कोरसमधून त्याची अस्वस्थता आपण समजू  शकतो. त्याचा आशय:
तुम्हाला करायला हव्या त्या गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा त्यांच्यासाठी वेळ कधीच पुरेसा नसतो.

जिमला माहीत होते की त्याच्या मुलासाठी त्याला काही अनंतकाळ नाहीये. पण त्याला वाटले त्यापेक्षा कमी वेळ त्याला मिळाला. २१ सप्टेंबर १९७३ मध्ये विमानाच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तेव्हा तो फक्त ३० वर्षांचा होता.

आपले दिवस गणणे

आपल्याला वेळ थोडा आहे हे आपल्याला ठाऊक असते. पण आपल्याला वाटते त्यापेक्षा तो कमी आहे. मोशेने म्हटले,  “तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणार्‍या गवताप्रमाणे ते आहेत; सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते” (स्तोत्र ९०:५-६). आपल्याला वृद्धत्व आले  तरी हेच सत्य आहे… “आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो” ( स्तोत्र ९०:१०).

आपले जीवन गवतासारखे क्षणिक कसे आहे हे दाखवण्यासाठी मोशे आपल्या वेळाची देवाच्या वेळेशी तुलना करतो:
“कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत” (स्तोत्र ९०:४).
एक हजार वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी. कदाचित पेत्र मोशेने जे लिहिले त्याचे स्पष्टीकरण करत होता जेव्हा त्याने म्हटले,  “तरी प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि ‘हजार वर्षे’ एका ‘दिवसासारखी’ आहेत” (२ पेत्र ३:८). तर त्याचा असा विचार करू या. समजा आपण ७० वर्षे जगलो तर आपले दिवस होतील २५,०००. शक्ती असेल तर समजा आपण ८० वर्षे जगलो तर आपले दिवस होतील २९,२००.  हे लिहीत असताना मी फक्त १८,९०० दिवस जगलो आहे. जॉन पायपर २५,९०० पेक्षा थोडे अधिक जगले आहेत. स्टीव्ह जोबचे दिवस केवळ २१,००० च्या आत होते. जिम क्रोस ११,२००पेक्षा थोडे अधिक दिवस जगला.
आता असा विचार करा. जर आपली १००० वर्षे देवाला एका दिवसासारखी आहेत तर ८० वर्षे जगलेला माणूस देवाच्या एका दिवसाच्या ८% जगला. म्हणजे ते २४ तासाच्या दिवसात २ तास जगल्यासाखे आहे. हे खूपच थोडके आहे.
जर आपण मोशेची रात्रीच्या प्रहराची तुलना वापरली तर आपली जीवने तुलनेने आणखीच कमी ठरतात. मोशेच्या दिवसात रात्रीचा प्रहर हा तीन तासांचा असे. म्हणजे जर आपली १००० वर्षे ही जर देवाला तीन तासांसारखी आहेत तर ८० वर्षांचा कालावधी हा देवाच्या दिवसातील १५ मिनिटांहून कमी आहे. जिम क्रोस पाच मिनिटे जगला.
तुम्हाला किती मिनिटे आहेत असे तुम्हाला वाटते? तुम्हाला नाही माहीत. आणि ती कितीही असली तरी ती फारशी नाहीत.

देवाने आपल्याला शिकवण्याची गरज आहे

जेव्हा आपल्या संक्षिप्त जीवनाची आपल्याला कल्पना येऊ लागते तेव्हा आपण दु:खाने म्हणतो की, आपल्याला जे करायला हवे ते करायला आपल्याला पुरेसा वेळ नाही. आपल्याला हेही लक्षात येते की आपण मौल्यवान दिवस वाया घालवले आहेत आणि ते आपल्याला कधीच परत लाभणार नाहीत. आणि यामुळे आपण आपले जीवन वेगळ्या रीतीने जगावे असे आपल्याला वाटू लागते.
पण आपल्या नश्वरतेच्या सत्यतेने जाग आली तरी त्यामुळे आपल्यामध्ये सुज्ञता निर्माण होत नाही. खरं तर त्यामुळे आणखीच मूर्खपणा निर्माण होण्याची शक्यता आहे.  आपण आणखी जीवन वाया घालवू. जीवनात काही गमावले ही जाणीव कित्येकदा जीवनाच्या मध्यावर येणारे पेचप्रसंग निर्माण करते व कुटुंबाचा नाश करते. बहुतेक आपल्या जगण्याच्या प्रमुख इच्छांच्या यादीच्या असलेली आपली मूल्ये क्षणिक, अनोखी, धाडसी, रोमांचक अनुभव असतात व ते खऱ्या व्यक्ती, खऱ्या प्रेमाची जोपासना यापेक्षा वरचढ ठरतात.

मोशेला हे ठाऊक होते की मरणाच्या भयानक सत्यामुळे जाग येणे लोकांना सुज्ञतेने वागण्याकडे नेत नाही. म्हणून त्याने प्रार्थना केली की; “ह्यासाठी आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल” (स्तोत्र ९०: १२).

फक्त आपले दिवस गणणेच पुरेसे नाही. आपल्याला आपल्या जीवनाचा निर्माता जो देव त्याने आपले दिवस गणणे म्हणजे काय हे शिकवण्याची गरज आहे. देवाने आपल्याला हे शिकवण्याची गरज आहे की आपले हे थोडके दिवस कशासाठी आहेत , म्हणजे आपण त्यांचे योग्य कारभारीपण करू. आणि आपल्याला सुबुध्द ह्रदय प्राप्त होईल.

सुबुध्द ह्रदय

सुज्ञता/शहाणपण म्हणजे नक्की काय? इयोबाद्वारे देव आपल्याला सांगतो, तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय” (इयोब २८: २८).

आणि देवाचे भय म्हणजे नक्की काय? देव आपल्याला शलमोनाद्वारे ते सांगतो: “परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय  (नीती ८:१३).
आणि दुष्कर्म म्हणजे काय? देव ते आपल्याला इब्री लोकांस पत्राच्या लेखकाद्वारे सांगतो की, ते विश्वास न ठेवणारे ह्रदय आहे (इब्री ३:१२). नैतिक दुष्टतेच्या मुळाशी देवावरचा अविश्वास आहे आणि जे  आणि जे विश्वासाने नाही ते पाप आहे (रोम १४:२३), यातून ते निष्पन्न होते.

त्यामुळे सुबुध्द ह्रदय देवाची इतकी भीती बाळगते की ते  देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल करण्यास नकार देते (रोम १:२५). सुबुध्द ह्रदय देवाच्या अभिवचनांवर व संपूर्ण जीवनावर असलेल्या त्याच्या शासनव्यवस्थेवर भरवसा ठेवते. ते स्वत:च्या मर्यादित, कमकुवत  दृष्टिकोनावर वा जगिक चमकत्या रिकाम्या फसवणुकीवर विश्वास ठेवत नाही.

सुबुध्द ह्रदय खुद्द  देवाद्वारे मिळणाऱ्या खजिन्याद्वारे होणारा आनंद गमावण्याची इतकी भीती बाळगते की अविश्वास हा चोर आहे व तो फक्त चोरतो, घात करतो व नाश करतो हे त्याला दिसते.

सुज्ञतेचे प्रतिफल
जगिक जीवन हे फारच लहान आहे, आपल्याला वाटते त्यापेक्षा. आपल्याला हव्या त्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवण्यासाठी तर ते खूपच लहान आहे.

आपण फक्त आपले दिवस गणत राहत नाही तर देवाकडून आपले दिवस गणण्यास शिकतो. कारण जर आपण आपले दिवस आपल्या दृष्टिने मोजत बसलो तर तर जीवनासाठी अन्न, कपडे ह्या गोष्टी (मत्तय ६:२५) बळकावण्याचा किवा आपल्या इच्छायादीतील अनुभव मिळवण्याच्या किंवा व्यवसायात यशस्वी होणाच्या खटपटीत किंवा प्रिय व्यक्तीमध्ये वेळ घालवू आणि जीवनाच्या अखेरीस आपल्या लक्षात येईल की सुबुध्द ह्र्दय हे ह्या कोणत्याच बाबीत अथवा लोकांमध्ये नव्हते. आपण दिवस गणण्याने आपल्याला सुबुध्द ह्रदय प्राप्त होत नाही.

“ जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा”  १ तीम. ६:१९ नुसार जीवन दृढ धरून ठेवायचे असेल तर हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे (१ योहान ५:११).  ख्रिस्त हेच जीवन आहे आणि जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकालिक जीवन आहे (योहान ३:३६). म्हणूनच आपण एकाच गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करावे अशी देवाची इच्छा आहे ती म्हणजे त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवणे.
सुबुध्द ह्रदय म्हणजे म्हणजे जगातील आपल्या या थोडक्या दिवसात आपण काय कमावतो, संपादन करतो, किंवा अनुभवतो हे नाही तर खऱ्या जीवनावर मनापासून विश्वास ठेवणे (योहान १४:६) हे आहे. सुबुध्द ह्रदय शिकवते की एकच गोष्ट जीवन वाया घालवते ती म्हणजे अविश्वास.
आणि सुबुध्द ह्रदयाचे प्रतिफल आहे अनंतकाळ. जेथे आपल्याला वेळ कुपीत भरून ठेवण्याची गरज नाही तर इतका अमाप वेळ आहे की, आपल्याला जे हवे ते आपण करू शकू आणि ते सुध्दा देवाने दिलेल्या यादीनुसार. ती यादी इतकी मोठी असेल की ती संपवण्यास अनंतकाळ लागेल.  

Previous Article

ख्रिस्तजन्माच्या वेळचे शिष्य

Next Article

कदाचित उद्या

You might be interested in …

ईयोबाच्या संदेशाचा आढावा

जॉन पायपर एका पित्याने हा प्रश्न मला पाठवला आहे. “माझ्या चवदा वर्षांच्या मुलीने नुकतेच ईयोबाचे पुस्तक पहिल्यांदाच वाचलं आणि इथं देवाचे जे चित्रण आहे ते पाहून ती गोंधळून गेली आहे. कारण आतापर्यंत तिने देव प्रेमळ […]

धडा ९.    १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स

  फरक तिसरा – देव आणि जग •           या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती आपण प्रौढता धारण करावी अशी इच्छा करते. मग प्रौढता म्हणजे तरी काय ?  ▫       सामान्यत: […]

तुमच्या काळ्याकुट्ट दिवसामध्ये देवावर भरवसा ठेवणे डेविड मॅथिस

“कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९). देव […]