नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कदाचित उद्या

स्कॉट हबर्ड

ज्यांना चालढकल करायला आवडते त्यांना ‘उद्या’ हा जादूचा शब्द वाटतो. उद्याच्या एका साध्या झटकाऱ्याने खरकटी भांडी नाहीशी झाल्यासारखे वाटते, कठीण संभाषणे नाहीशी होतात, इमेल्स लपल्या जातात, घराचे प्रकल्प शांतपणे बाजूला उभे राहतात. आज नको असलेल्या गोष्टी उद्याच्या धुक्यात पाठवणे किती अद्भुत वाटते – आणि उद्या पण हे स्वीकारायला किती तयार असतो! या सर्व जबाबदाऱ्यांची आज आपण काळजी घेऊ शकतो हे खरे आहे, पण उद्या हा नेहमी असतोच तर आजच का?

आणि मग उद्या येतो आणि न संपलेल्या कामाच्या दबावाखाली जादू नाहीशी होते. आणि मग आपल्याला  अलेक्झांडर मॅकलॅरन यांचे हे सुद्न्य शब्द पटतात:

नकोसे वाटणारे कोणतेच काम उद्यावर ढकलून ते कमी नकोसे होत नाही. जेव्हा ते संपवून मागे टाकले जाते तेव्हाच आपल्याला जाणीव होऊ लागते की नंतर आपल्याला एक गोडवा लाभला आहे. नकोशी कर्तव्ये शांतपणे संपवणे हे योग्य आणि आनंददायक आहे.”

जर नकोसे काम हे एक काटा आहे तर उद्या काही ते गुलाब बनणार नाही. काटा हा तसाच असणार, नेहमीच नकोसा. आणि आज किंवा उद्या आपल्याला तो धरावा लागणारच.

आज आणि उद्या

आज आणि उद्या. बऱ्याच समस्या ह्या दोन दिवसांची योग्य विभागणी न करण्यातून उद्भवल्या जातात.

चिंतेचे उदाहरण घ्या. येशूने एकदा समुदायाला सांगितले, “कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे” (मत्तय ६:३४). देव आपल्याला या २४ तासांच्या मर्यादेत, जिला ‘आज’ म्हणतात तिच्यामध्ये राहायला सांगतो. पण चिंता या कुंपणापलीकडे जायचा प्रयत्न करते आणि उद्याचे काही त्रास आत ओढायला पाहते. येशूचा प्रतिसाद? उद्यापासून तुझा हात मागे ओढ; ‘आज’ला त्याचे स्वत:चे त्रास पुरेसे आहेत.

चालढकल करणारे अर्थातच याच्या अगदी विरुद्ध करतात. उद्याचे त्रास आज ओढून आणण्याऐवजी ते आजचे त्रास उद्यामध्ये ढकलतात – कदाचित ते कुंपणापलीकडे नाहीसे होतील अशा आशेने. त्याला येशू कदाचित असा प्रतिसाद देईल : “तुम्ही भर घातली नाहीत तरी उद्याला त्याचे खूप त्रास आहेत. आजच्या त्रासांना आजच तोंड द्या. उद्याच्या त्रासांना उद्या.”

हे अगदी समंजसपणाचे वाटते, नाही का? अर्थातच. दुर्दैवाने आपली आंतरिक चालढकल हेकट असते  (नीति. २४:३०).  “नकोसे वाटणारे कोणतेच काम उद्यावर ढकलून ते कमी नकोसे होत नाही” हे त्याला त्याच्या अनुभवातून  पक्के ठाऊक असते, तरीही तो ते पुन्हा करण्यासाठी काहीतरी मार्ग काढतोच.

म्हणून समंजसपणासोबत आपला प्रभू अधिक कृपा पुरवतो. जेव्हा आपण आजची कामे पाहतो आणि “उद्या, उद्या” असे म्हणण्याचा आपल्याला मोह होतो तेव्हा तो दुहेरी अभिवचन देतो: आजसाठी सामर्थ्य, आणि उद्या भरघोस पीक.   

आजसाठी सामर्थ्य

उद्याची जादूची कांडी आपल्यातील काही जण सतत का फिरवतात? बहुधा याचे कारण असते की आपल्याला वाटते आज हे आपल्याला पेलवणार नाही. आज आपल्याला बाथरूम धुवायला शक्ती नाही. आज तो रिपोर्ट आपल्याला लिहावा असे वाटत नाही. आज काही नवनिर्मिती  करण्यास आतून स्फूर्ती मिळत नाही. कदाचित आपण शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करतो; कदाचित नाही. तरीही आपण आपण “उद्यासाठी” खांदे झटकतो.

अशा क्षणांमध्ये नकोशा कामाकडे जेव्हा आपण बघत असतो आणि हे करण्याची आपल्याला शक्ती नाही असे आपल्याला वाटते तेव्हा आपण विसरू शकतो की, जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो तेव्हाच देव आपल्याला बहुधा शक्ती पुरवतो. यार्देन नदी वाहण्याची थांबली जेव्हा याजकांनी पाय पाण्यात टाकले ( यहोशवा ३:१३). विधवेचे तेल वाहू लागले जेव्हा तिने ओतायला सुरुवात केली (२ राजे ४:१-६). दहा कुष्टरोगी बरे झाले जेव्हा ते येशूपासून दूर चालू लागले ( लूक १७:११-१४). आणि बहुधा देव आपल्याला त्याची शक्ती पुरवू लागतो जेव्हा आपण काम करण्यास सुरुवात करतो (फिली. २:१२-१३).

काही जण समर्थ वाटेपर्यंत वाट पाहतात; इतर जण काम करायला सुरुवात करतात आणि अपेक्षा करतात की आपल्याला सामर्थ्य पुरवले जाईल. या लोकांना ठाऊक असते की नकोसे काम पूर्ण करण्यासाठी जे त्याची अपेक्षा करतात त्यांनाच सामर्थ्य मिळते. आजची कृपा आजच्या त्रासांसाठी पुरी आहे – जरी आता ती कृपा आली असे दिसत नसले तरी. म्हणून जेव्हा आपल्यापुढे  नकोसे काम असते आणि आपल्याला आपला आंतरिक कमकुवतपणा जाणवतो, तेव्हा जे शहाणे आहेत ते असे म्हणायला शिकतात की, “उद्या नाही – आज”- असा विश्वास धरत की मदत येत आहे.

उद्याची कापणी

नीतीसूत्रे हे  पुस्तक चालढकल करणे हे कापणीच्या संदर्भात दाखवते. “हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही” (नीति २०:४). आपल्या आंतरिक चालढकलपणाला उद्या खूप  आवडतो. याचे कारण त्याला उद्या स्पष्ट दिसत नाही. जर त्याने तो पाहिला असता तर त्याला उद्याची कापणी दिसली असती आणि समजले असते की आजची झोप उद्याच्या रुक्ष शेतीसाठी कारण ठरेल. दुसर्‍या शब्दात आज जे आपण पेरतो त्याचे उद्या आपल्याला फळ मिळते.

उदा. एखादा तरुण कधीमधी नाही तर सर्वच वेळा चालढकल करत असेल तर काय होते? जेव्हा चालढकल हेच बीज तो नेहमी परत असेल तर? लवकरच त्याचे कुटुंब आणि मित्र समजतील की त्याच्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्याने आजसाठी दिलेली वचने नेहमी उद्यावर जातात. त्याच्या सहकार्यांना त्याचे काम नेहमी निराशाजनक वाटेल- असे काम की ज्याच्यावर अकराव्या ताशी केलेला शिक्का असेल. जसा वेळ जाईल तसे इतर लोक त्याला काही विचारणार नाहीत: आपणंच केलेलं बरं, नाहीतर दुसर्‍या कोणाला तरी शोधू. अखेरीस त्याचे जीवन काट्याकुट्यांनी भरून जाईल, जे काढायला तो तयार नसणार (नीति १५:१९).

याउलट जर त्याच तरुणाने आपली दृष्टी कापणीवर ठेवली तर काय घडेल? हळूहळू त्याची नैतिक पातळी वाढू लागेल: असा मनुष्य की ज्याचे ‘आज’ हे आजच असणार आणि ‘उद्या’ हे उद्याच असणार  (याकोब ५:१२). असा मनुष्य जो देवाने दिलेल्या सामर्थ्याने काटे उखडून काढतो.  असा मनुष्य जो थोडक्याविषयी विश्वासू असतो व त्यामुळे नंतर पुष्कळाविषयीही (लूक १६:१०). असा मनुष्य ज्याचे परिश्रम त्याच्या कुटुंब, मित्र, शेजारी, सहकारी यांच्यासाठी जीवनाचे झाड बनते.

अशा माणसाला माहीत असते की जीवनाचा सर्वात उत्तम भाग सुद्धा शेकडो नकोशा कामांनी भरलेला असतो. नकोसे ते कवटाळून घेऊनच घरे उभारली जातात, नातेसंबंध सुधारले जातात, मैत्री टिकवली जाते, वचने पाळली जातात, मुलांना शिस्त लावली जाते व त्यांची जोपासना केली जाते. मंडळ्यांचे रोपण केले जाते आणि त्यांची वृद्धी होते, व्यवसाय पूर्ण केले जातात. यामुळे जेव्हा जेव्हा ‘उद्या’ सुचवला जातो तेव्हा तो कापणीकडे पाहतो.

काटे उपटून काढा

आता आपण काटेकुसळे असलेल्या भूमीमध्ये राहतो जिच्यामध्ये नकोशी कामे ही दररोजची यादी  भरून टाकतात. एक दिवस देव ही भूमी स्वच्छ करेल आणि “काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल” (यशया ५५:१३). पण आता आपण काट्यांमध्येच राहत आहोत. आणि एका प्रकारे  आपण देवाला गौरव देऊ शकतो तो म्हणजे, आजच्या कृपेने आजचे काटे उपटून टाकण्याने.

आपला विवेक आपल्याला सांगतो की , “नकोसे वाटणारे कोणतेच काम उद्यावर ढकलून ते कमी नकोसे होत नाही.”  पण त्यापेक्षा देवाची अभिवचने आपल्याला हे करायला सांगतात कारण दररोजच्या त्रासासोबत दररोजचे सामर्थ्य येते. आणि एका येणाऱ्या ‘उद्या’च्या दिवशी आज पेरलेले बी एका मोठ्या गौरवी कापणीमध्ये  वाढेल.

Previous Article

जर तुम्हाला जगण्यास एकच आठवडा असता

Next Article

खरे आशीर्वादित होणे म्हणजे काय?

You might be interested in …

लेखांक ५ माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरीजाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (७) माझ्या दु:खांतून वाटचाल करताना माझा देवावर जो विश्वास आहे तो कितपत’खोल’आहे हेही मला कळून चुकले.मला हे उमजले नाही की माझ्यावर […]

दिवसातले व्यत्यय काबीज करा

स्कॉट हबर्ड “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर” हे कोणाही ख्रिस्ती व्यक्तीला एक महान आणि सन्मान्य पाचारण वाटते. येशूचे हे शब्द आपल्या त्याग करण्याच्या ध्येयाला, चांगली कृत्ये करण्याच्या धाडसाला  प्रेरणा देतात. आपण प्रीती करण्याच्या […]

देवाला अंधाराची भीती नाही

मार्शल सीगल “कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास” (१ योहान ५:४). या जगात इतका भरपूर अंधार आहे की तो आपल्या कोणाचाही थरकाप […]