नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमचे  ह्रदय चालवा

जॉन ब्लूम

“ तुमचं ह्रदय सांगेल ते करा” हे एक परिचित विधान आहे. ते असा विश्वास पुढे करते की आपले ह्रदय हे जणू एक होकायंत्र आहे आणि त्याचे ऐकायला आपल्याला धैर्य असले तर ते आपल्याला खऱ्या सुखाकडे घेऊन जाईल. असा विचार दिशाभूल करणारा आणि धोक्याचा आहे.

तो दिशाभूल करणारा आहे कारण “ तुमचं ह्रदय सांगेल ते करा” एक पवित्र शोध घेण्यासारखे वाटते – जसं काही जर तुम्ही तुमच्या ह्रदयाचे ऐकले नाही तर तुम्ही तुमच्या खऱ्या स्वयंपणाला गमावून बसाल. पण त्याचा खरा अर्थ आहे: “तुमच्या इच्छांचा पाठपुरावा करा.” आणि मग आपल्याला स्पष्ट दिसू शकते की हे विधान कसे धोक्याचे आहे. कारण इच्छा ह्या आपल्या पतन झालेल्या ह्रदयातून निर्माण होतात. जे “सर्वांत कपटी आहे आणि असाध्य रोगाने ग्रस्त आहे” (यिर्मया १७:९).

यापेक्षा ख्रिस्ती जनांसाठी अधिक उपयोगी विधान आहे “आपले ह्रदय मार्गात चालव” हे नीति. २३:१९ (पं. र. भा.) मध्ये दिले आहे. ते असे म्हणते, “माझ्या मुला सुज्ञ राहा आपले ह्रदय मार्गात चालव.”

ह्रदय चालव किंवा त्याला दिशा दे, हे बायबल जसे आपल्या ह्रदयाशी वागण्याबद्दल सूचना देते त्याला योग्य रीतीने धरून आहे. आपले ह्रदय आपल्या अंतर्मनाचा भाग आहे जो प्रेम किंवा द्वेष करतो, जो व्यक्तींना किंवा बाबींना जतन करतो किंवा तुच्छ लेखतो. बायबलनुसार आपण जर आपले ह्रदय पडताळले नाही तर ते प्रेम किंवा हेवा यांच्या कोणत्याही दिशांना भरकटत जाईल (मत्तय ६:२१,२४). म्हणून आपल्या ह्रदयाने खोटी प्रीती आणि संपत्ती यापासून मागे फिरून जी खरी प्रीती आणि जे मोलाचे आहे त्याकडे वळायला पाहिजे.

नवे ह्रदय आणि जुन्या समस्या

आपल्या ह्रदयाला दिशा देण्यामध्ये गोंधळात पाडणारी गोष्ट म्हणजे, सध्या ख्रिस्ती लोक दोन स्वभावात राहतात. आपल्याला नवा जन्म झाल्याने नवा स्वभाव आहे. नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य आपल्याला मिळाला आहे.” आणि “आपल्याला जुना मनुष्य आहे जो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे” (इफिस ४:२२-२४).

आपल्याला आपल्या अनुभवातून ठाऊक आहे की आपल्या “वासना आपल्या अवयवात लढाई करतात” (याकोब ४:१). माझा नवा मनुष्य  देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो; तर जुना मनुष्य  माझ्या मनातल्या देवाच्या नियमाबरोबर लढतो”  (रोम.७:२२-२३).

तर आता आपल्यामध्ये ह्या दोन मनुष्यांचा अनुभव  येत असल्याने बायबल म्हणते की, ह्रदयाचे ऐकण्याऐवजी त्याला चालवा. दिशा द्या. म्हणजे ज्या जुना स्वभावात आपण आनंद मानत होतो त्या  भ्रष्ट , नाशकारक, गोष्टीपासून आपली ह्रदये दूर करून  देवाने आपल्या नव्या स्वभावाला आनंद देण्यासाठी रचना केलेल्या अद्भुत सत्यांकडे ती वळवतो.

म्हणून जर देवाला आपले ह्रदय चालवायचे असेल तर आपण काय करावे? आणि आपण त्याला कशी दिशा द्यावी ? आपण त्याला कुठे न्यावे?


ह्रदयाला चालवण्यासाठी सल्ला

नीति. २३ :१० आपल्याला ह्रदय चालवण्यास सांगते, तोच अध्याय आपल्याला चांगली आणि व्यावहारिक उदाहरणे देतो. हा अध्याय मुलाला दिलेल्या पित्याच्या सुज्ञ, ह्रदयाला दिशा देणाऱ्या सल्ल्यांनी भरलेला आहे.  या उत्तेजन देणाऱ्या शहाणपणाची काही विधाने आपण पाहू या.

१. देवाचे शहाणपण मिळवण्यासाठी तुमच्या ह्रदयाला दिशा द्या.

लेखकाला ठाऊक आहे की, “मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे, पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो.” आणि देव आपल्याला अशी महत्त्वाची नाती देतो की त्यांच्याकडून आपल्याला अशा सूचना मिळतात. म्हणून तो आपल्या वाचकांना बोध करतो की आपण आपल्या पालकांचे ( वडीलधारी लोकाचे ) ऐकावे (नीति २३:२२-२५). ज्ञान असलेल्या लोकांकडून परिश्रम करून शिक्षण मिळव (नीति २३:१२). आणि प्रेमळपणे आपल्या मुलांना ज्ञान दे -आवश्यक असल्यास छडीचा वापर करून (नीति. २३:१३-१४). देव आणि इतरांकडून शिक्षण मिळवून आपण आपली ह्रदये शहाणपणाकडे चालवावी (नीति.१:७).

२. धोकेबाज लोक ओळखण्यासाठी तुमच्या ह्रदयाला दिशा द्या.

जग अशा लोकांनी भरलेले आहे की त्यांना अशा गोष्टी हव्या असतात की त्यामुळे आपल्याला इजा होईल. सामर्थ्यशाली लोक त्यांचा दर्जा, प्रभाव आणि संपत्ती वापरून आपल्याला तडजोड करायला भाग पाडू शकतात. जर आपण आपले विचार स्पष्ट ठेवले नाही आणि आत्मनियंत्रण केले नाही तर आपण याला बळी पडू शकतो (नीति.२३:१-३). मतलबी लोक प्रथम सज्जन असल्याचे दाखवून नंतर स्वत:चे खरे स्वरूप दाखवून आपल्याला फसवू शकतात (नीति. २३:६-८). आणि दुष्ट लोकांची इतकी भरभराट होते की त्यांचा हेवा करायचा आपल्याला मोह होतो.  (नीति. २३:१७-१८). तरीही त्यांचा शेवट हा नाशच असतो (स्तोत्र ७३ पहा).  सामर्थ्य, हातचलाखी, पापी मार्गाने मिळालेले धन आपल्याला धोक्यात कसे टाकते हे आपण चांगला सल्ला घेऊन समजून घ्यावे व ह्रदयाला दिशा द्यावी.

३. तुमच्या ह्रदयाला दुष्ट  सापळे कसे टाळावे यासाठी दिशा द्या.

पैशाच्या प्रेमात पडण्यापासून सावध राहा. त्याची सेवा करू नका (लूक १६:१३). कारण धन हे क्षणभंगुर आहे. ते समाधान देऊ शकत नाही. ते तुमच्या भक्तीला धोका पोचवेल (नीति. २३:४-५). तुमच्या सामर्थ्याचा कमकुवत लोकांचा फायदा घेण्यासाठी वापर करू नका, कारण देव तुम्हाला त्याचा जाब विचारील (नीति. २३:१०-११). लैंगिक मोहापासून सावध राहा. त्याचे सामर्थ्य कमी लेखू नका. ते तुम्हाला मोह घालील आणि तुमचे आणि तुमच्या जवळच्या लोकांचे जीवन उद्ध्वस्त करील (नीति. २३:२६-२८). आणि जीवनावर ताबा मिळवणाऱ्या व्यसनात पडण्यापासून सावध राहा (नीति. २३:१९-२१). नशांच्या व्यसनांचे गुलाम होऊ नका (नीति. २३:२९-३५). ह्या पाशांचे मोहक आणि दृढ सामर्थ्य समजून घेण्यास आपण आपल्या ह्रदयाला दिशा द्यावी आणि त्यातून सुटण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करावे.

ह्या सल्ल्यातील शहाणपण आपल्यातील बहुतेकांना परिचयाचे असेल. या पित्याच्या सूचनाहून अधिक चांगला सल्ला देव आपल्याला देतो आणि हे आपल्यासाठी शक्य करतो.

चांगल्या धनामागे जा

हा अधिक चांगला सल्ला स्तोत्र ३७:४ मध्ये आहे.

“ तू यहोवाच्या ठायी आनंद कर, म्हणजे तो तुझ्या ह्रदयाची मागणी तुला देईल.” (पं. र. भा)

यामध्ये अभिवचन तर आहेच पण  हा नव्या व्यक्तीचा, नवा जन्म झालेल्या व्यक्तीचा वाढता अनुभव आहे. महान संपत्ती म्हणून जितके आपण देवामध्ये आनंद मानू तितके आपण देवाला अधिक पाहतो आणि त्याची चव घेतो. आणि  “ जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती” (फिली ४:८) यावर प्रेम करत राहू. त्याच्यावर प्रीती करण्याने आपल्याला  इतर सर्व प्रकारच्या प्रेमाला दिशा मिळते आणि ते शुध्द केले जाते.

अशा रूपांतराचे चित्र येशू मत्तय १३: ४४ मध्ये देतो “स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.”

जेव्हा आपला नवा जन्म होतो तेव्हा ही संपत्ती आपल्याला दिसते व आपण तिची इच्छा करतो : खुद्द देव. आणि जितके अधिक आपण त्याला पाहतो तितके  अधिक आपण त्याची आणि त्याची आपल्यासाठी असलेली इच्छा धरू लागतो. आणि ही संपती आपल्यापासून हिरावून घेणाऱ्या गोष्टींचा आपण अधिक द्वेष करू लागतो.

म्हणून तुमचे ह्रदय चालवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे ह्रदय प्रभूमध्ये आनंद करण्यात चालवा. कारण जर तुम्ही असे केलेत ते देव स्वत: तुमच्या ह्रदयाच्या इच्छा पूर्ण करील.

Previous Article

तुमच्या मुलांना देवावर प्रेम करणे सोपे करा

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

लैंगिक पापाशी लढण्याचे चार मार्ग सॅम अॅलबेरी

देवाने मानवाला जसे असावे तसे केलेल्या निर्मितीविरुध्द लैंगिक पाप आहे. हा धडा बायबल आपल्याला नीतिसूत्राच्या ५व्या अध्यायामध्ये देते. येथे सुज्ञ मनुष्य तरुण विवाहित पुरुषाला व्यभिचारिणी विरुध्द सांगत आहे. तुम्ही तरुण असाल, विवाहित असाल किंवा पुरुष […]

 वधस्तंभावरील सात उद्गार (॥)

आता अंधार नाहीसा होऊन उजेड पडताच येशू एकामागून एक पुढील उद्गार स्वत: विषयी काढत आहे. चौथा उद्गार : “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास” ( मत्तय २७:४६)? बदलीच्या मरणाची ती पापाची शिक्षा […]

धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स

  ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात? •           हे मुद्दे संदर्भासाठी लक्षात घेतल्यास कोणाला “ख्रिस्ती आहे” किंवा “ख्रिस्ती नाही” असे घोषित […]