Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 16, 2023 in जीवन प्रकाश

एक स्थिर अस्तित्व

एक स्थिर अस्तित्व

जो रिनी

आपल्या कुटुंबाचे संरक्षण करून  त्याला पुरवठा करण्यासाठी बापांना पाचारण करण्यात आले आहे. हे चांगल्या रीतीने करण्यासाठी त्यांनी सावध  वृत्तीचे आणि स्थिर / खंबीर असण्याची गरज आहे. असे वडील आपल्या कुटुंबाला आनंदाने, धैर्याने, शहाणपणाने आणि लवचिकतेने चालवतात.

पुरवठा करणे किंवा तरतूद करणे  याचा अक्षरश: अर्थ आहे “पूर्वीच पाहणे.” म्हणून तरतूद यामध्ये महत्त्वाचा घटक आहे अपेक्षा करणे. आपल्या कुटुंबाच्या गरजा, धोके आणि मोह हे पूर्वीच ओळखून घेण्याची पित्याची जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबाच्या काय समस्या आहे हे स्पष्टपणे समजून घेणे हे त्याचे ध्येय असावे. आणि त्यासोबतच सुज्ञतेने त्याला तोंड देण्याची त्याची तयारी असायला हवी. हे तो एकटा करू शकत नाही. ही तरतूद  स्पष्टपणे समजून घेताना पित्याने आठवण ठेवायला हवी की याच हेतूने त्याला देवाने मदतनीस दिला गेला आहे. हे एकटे पाहण्यापेक्षा दोघे मिळून अधिक चांगले पाहू शकतील. विश्वासू पिता आपल्या कुटुंबाच्या गरजासंबधी असलेली त्याच्या पत्नीची अंतर्दृष्टी आणि सुज्ञता यांचा स्वीकार करतो


सावध असा पिता

पित्याच्या नेतृत्वामध्ये होणारी सर्वसामान्य चूक म्हणजे आपल्या पत्नीची अंतर्दृष्टी, कोमेंट्स याना उत्तेजन न देता बचावात्मक पवित्रा घेणे. उदा. आई आपल्या मुलाच्या जीवनात पापी वृत्ती पाहू लागते. त्याबाबत काही करावे म्हणून ते ती आपल्या पतीला सांगते. तो बचावात्मक पवित्रा घेतो किंवा तिच्यावर ओरडतो किंवा काहीच बोलत नाही किंवा दुसऱ्या कोणाला दोष लावतो.  हे सर्व दाखवते की तो सावध नाही.

जरी त्याच्या पत्नीने ही बाब योग्य रीतीने त्याच्या लक्षात आणून दिली नसली तरीही हे खरे आहे. समजा मुलांमधल्या पापामुळे तिच्यामध्ये भीती निर्माण झाली असेल . तिला माहीत आहे की जर हे असेच सोडून दिले तर ते आणखी मोठे पाप होईल. यामुळे ती तिच्या पतीच्या हे लक्षात आणून देते. ते या पापामुळे तिच्यामध्ये निर्माण झालेल्या काळजी, चीड आणि कदाचित निराशा यामधूनही असेल.

अशा परिस्थितीत सावधपणाची गरज असते. मूलत: सावधपणा हा दारूची नशा किंवा बेतालपणाच्या विरुद्ध आहे (१ थेस. ५:६-८). बेतालपणा हा खूप दारू प्याल्याने शारीरिक, बौद्धिक, नैतिक तोल बिघडवून टाकल्याने येतो. दारूची नशा एखाद्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी करते आणि इतर पापे करण्यास प्रवृत्त करते. दारू प्यालेल्या लोकांना स्पष्ट दिसत नाही, ते स्थिर उभे राहू शकत नाही किंवा शहाणपणे वागू शकत नाहीत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त दारूच नशा चढवत नाही. तीव्र इच्छा/भावना सुद्धा- मग त्या आपल्या असोत व इतरांच्या- आपली निर्णयक्षमता धुरकट करतात आणि शहाणपणाची कृती करण्यास बाध आणतात. भावनांच्या भरात आपण प्रतिकार करतो,  दोन्ही बाजूमध्ये हेलकावे खातो. आपण बचावात्मक पवित्रा घेतो, चिडतो किंवा गप्प बसतो किंवा दुसऱ्याला दोष देतो.

म्हणून सावध असणे म्हणजे स्पष्टपणे पाहणे, स्थिर उभे राहणे आणि सुज्ञतेने कृती करणे. संयमी पुरुष आपल्या स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवतात आणि त्यामुळे ते इतरांच्या भावना, प्रतिक्रिया, चिडचिड पेलू शकतात.


संवेदनशील पिता बनणे

असा सावधपणा कोठून येते? माझ्या जीवनात  संवेदनशीलता वाढावी म्हणून मी पुन्हा पुन्हा कलसै ३:१२-१७ कडे वळतो. म्हणून या भागावर आपण विचार करू या. केवळ सर्व ख्रिस्ती लोकांसाठी म्हणून नव्हे तर खास करून पती आणि पिता यांनी हे लागू करावे म्हणून.


सद्गुणांचा पेहराव

प्रथम पौल हे मुख्य गुण परिधान करा असे आव्हान देतो. “तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा”   (कलसै ३:१२). हे गुण आपल्या कुटुंबाला चालवताना प्रत्येक पित्यासाठी अत्यावश्यक आहेत. आपण “देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक” आहोत म्हणून हे गुण आपल्याला परिधान करायचे आहेत. दुसऱ्या शब्दात आपण देवाला प्रिय आहोत या जाणीवेतून ते बाहेर दिसू लागतात. स्थिर पिता हा त्याच्या स्वर्गीय पित्याच्या प्रीतीमध्ये रुजलेला असतो.


क्षमा करण्यास तयार

दुसरे म्हणजे स्थिर पिता हा सहन करतो आणि लगेचच इतरांना क्षमा करतो (कलसै ३:१३). तो सहनशील असतो आणि दुसऱ्यांच्या चुका विसरून जातो. असे लोक द्वेष बाळगत नाहीत किंवा कटूपण वाढू देत नाहीत. ते प्रीतीने पापांची रास झाकून टाकतात. किंवा पाप दाखवून क्षमा व समेटाचा मार्ग धरतात. पण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या ह्रदयात पाप वाढू देत नाहीत कारण प्रभुने त्यांना फुकट क्षमा देऊ केली आहे.


शांतीने चालवले जाणे

तिसरे सावध पिता प्रीती पांघरतात आणि ख्रिस्ताच्या प्रीतीला स्वत:वर राज्य करू देतात (कलसै ३:१४-१५). ख्रिस्ताची शांती ही शांत चित्ताचे मूळ आहे. तो आपली शांती आहे. तो आपली स्थिरता आहे. आणि जो देवभीरू पिता ख्रिस्ताची शांती आपल्या ह्रदयात येऊ देतो त्याला त्याच्या कुटुंबासाठी शांतचित्त हा नांगर लाभतो.  ख्रिस्ताची शांती ही तुफान व संकटात त्यांच्यासाठी एक आध्यात्मिक बंदर होते.


वचनामध्ये भरपूर

चवथे: ख्रिस्ताची प्रीती आपल्या अंत:करणात राज्य करते जेव्हा देवाचे वचन आपल्यामध्ये भरपूर राहते ( कलसै ३:१६). देवाचे वचन  हे दाखवते की आपल्या जीवनात देवाच्या वचनाची भरपुरी  आणि परिपूर्णता हवी. ही पूर्णता आपल्यामधून शिक्षण देण्याने व गीते गाण्याद्वारे ओसंडून बाहेर येते. सावध पित्याच्या जिभेवर देवाचे वचन असते. आपल्या कुटुंबाला तो बायबलमधून सूचना, बोध सुज्ञपणे करण्यास नेहमी तयार असतो. स्तोत्र, गीते आध्यात्मिक स्तवने हे तर त्यांच्या जीवनाची संगीतपट्टी असते. त्याला आपल्या कुटुंबासमवेत देवाची गीते गायला आवडते.


नेहमीच  कृतज्ञ

शेवटची बाब स्थिर पिता हा कृतज्ञ पिता असतो. कलसै ३  मध्ये तीन वेळा पौल कृतज्ञ असा असे  पाचारण करतो.

“तुम्ही कृतज्ञ असा” (कलसै ३:१५). आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा (३:१६). “आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा” (३:१७). स्थिर पित्याच्या आनंदी ह्रदयातून देवाला स्तुती करण्याचा प्रवाह सतत वाहत असतो. सर्व गोष्टींसाठी तो देवाची उपकारस्तुती करतो. देव त्याच्याशी  दयाळू आहे ही जाणीव त्याला सतत असते आणि तो आपल्या कुटुंबासह स्तुती व आराधना करण्यात पुढारपण घेतो.


कृतीमध्ये सावधपणा

तर आता आपण पहिल्या मुद्द्याकडे वळू या. कलसै ३ मधल्या या  पित्याने  त्याच्या पत्नीच्या अंतर्दृष्टीला कसा प्रतिसाद द्यावा व आपल्या मुलाचे पालन कसे करावे?

पहिली गोष्ट म्हणजे सावध पिता हा पत्नीची अंतर्दृष्टी धोका समजत नाही. तर तो ती नम्रतेने, सौम्यतेने व कृतज्ञतेने स्वीकारतो. कारण तो देवाच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या शांतीमध्ये मुळावलेला आहे. तो ऐकण्यात शीघ्र व बोलण्यात सावकाश आहे. देवाच्या वचनानुसार तो या परिस्थितीचे मूल्यमापन करील.

दुसरे, तो ही बाब लक्षात आणून दिल्याबद्दल तो तिला कृतद्न्य असणार. ती  अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने वागणार ( १ पेत्र ३:७). त्याच्या सावधपणामुळे दोघे मिळून त्यांच्या मुलाला कसे पुढे न्यायचे याकडे लक्ष देतील.

तिसरी बाब म्हणजे ही समस्या हाताळताना मुलाशी बोलण्यात तो स्वत: पुढाकार घेईल. हे तो ममतेने आणि धीराने करील व याच वृत्तीने तो मुलाला सुज्ञतेने बोध करील व शिकवेल . यामुळे मुलाचा बचावात्मक पवित्रा अथवा दुसऱ्यावर दोष ढकलणे  दूर जाईल. खंबीर पिता हा आपल्या मुलाच्या कमकुवतपणाबद्दल सहनशील असेल आणि त्याने देवाची आज्ञा नेहमी पाळावी याचा आग्रह करीत राहील.

शेवटी क्षमा करणे व समेट करणे हेच त्याचे ध्येय असेल. प्रथम देवाशी आणि मग कुटुंबाशी. देवाची ख्रिस्तामध्ये असलेली क्षमा ही मूलभूत आहे पण ती नेहमी इतरांपर्यंत जात राहते. आपल्या कुटुंबामधला प्रत्येकजण एकमेकांशी पटकन समेट करतो, आपले पाप कबूल करून प्रामाणिकपणे क्षमा मागत आहे हे  तो पाहतो.

आणि हे सर्व शक्य होते कारण तो  देवाच्या पवित्र व प्रिय निवडलेल्या  लोकातील एक आहे  आणि करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही त्याने धारण केली आहेत.