जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पालकांचा आदर आणि सन्मान

जॉन पायपर

एका किशोरवयीन मुलाचा प्रश्न –

पास्टर जॉन, मी माझ्या पालकांचा मान राखत नाही तर त्यांचा मी आदर कसा करू? की त्यांचा मान राखण्यातच आदर देणे हे गृहीत धरले आहे?

उत्तर :
आदर करणे व  मान देणे यात विशेष काही फरक आहे असे मला वाटत नाही. मला वाटते, मान देणे हे एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचे अथवा त्याच्या कामगिरीचे आपल्या मनात केलेले मूल्यमापन असते; तर आदर करणे म्हणजे शब्दाने किंवा कृतीने आपण त्यांना प्रदर्शित केलेला सन्मान.

म्हणून मला वाटते खरा प्रश्न हा आहे की : ज्या पालकांनी पश्चात्ताप केलेला नाही व ज्यांचे वागणे दोषी आणि लाजिरवाणे असते त्यांचा आदर व मान कसा करायचा? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण येशूने मत्तय १९:१९ मध्ये  “आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,”  या आज्ञेची आठवण करून दिली आहे. तसेच १ पेत्र २:१७  मध्ये पेत्र म्हणतो, “सर्वांना मान द्या.” फक्त आईवडिलांनाच नाही तर सर्व लोकांना. आणि जगात कितीतरी दुष्ट लोक आहेत ज्यांनी सर्व जीवनभर घृणास्पद कृत्ये केली आहेत. आणि अखेरीस लोकांचा दुष्टतेने द्वेष करून, देवाला धिक्कारत  ते मरण पावले आहेत. त्यांच्यामध्ये काहीही मान देण्यासारखे दिसत नाही.

आदर करण्याचे सात मुद्दे

नव्या करारामध्ये कोणाही व्यक्तीचा आदर का करावा याची निदान सात कारणे आपल्याला दिसतात. जर आपण ही सर्व समजावून घेतली तर त्यातील काही लाजिरवाणे किंवा गुन्हेगारीचे वर्तन केलेल्या पालकांनाही लागू पडतात – आणि येथे आपण काही आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावणार नाही. तर ही सहा कारणे अशी आहेत –

१. देवाच्या प्रतिमेमध्ये

मानवांना आदर देण्याची गरज आहे कारण ते देवाच्या प्रतिमेमध्ये निर्माण केले गेले आहेत. यामुळेच त्यांना जनावरापेक्षा वेगळे वागवण्याची गरज आहे. हे वचन वाचा: “तिच्या (जिभेच्या) योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत” (याकोब ३:९-१०).

दुसऱ्या शब्दांत मानवाचे देवाच्या प्रतिमेमध्ये असलेले अस्तित्व हेच त्याला आदर देण्यासाठी आपल्याला पाचारण करते. म्हणून माझे विद्यार्थी मला विचारायचे की, “ मुलांना छळणाऱ्या, बलात्कारी, खुनी, आतंकवादी व्यक्तीचा आपण कसा आदर करू शकतो?” त्यांना दिलेले एक उत्तर होते “ तुम्ही त्यांना हुंदडून मारणाऱ्या बैलाप्रमाणे मारून टाकू नका”  (निर्गम २१:२८ – ३२). तुम्ही त्यांचा न्यायालयात खटला चालवता याचे एकच कारण म्हणजे ती माणसे आहेत आणि जनावरे नाहीत. आणि हा एक प्रकारचा आदर आहे, मग त्या खटल्यामध्ये त्यांना देहदंडाची सजा मिळाली तरी.

२. नैसर्गिक नाती

आदर देण्याचे दुसरे साधे कारण म्हणजे देवाने स्थापन केलेल्या नातेसंबंधाला मान देऊन. येथे मी “आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर,” याचा विचार करत आहे कारण हे देवाने स्थापन केलेले नैसर्गिक नाते आहे. आणि त्याने दिलेल्या क्रमानुसार ते आदर प्राप्त करतात. हे त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून नाही.
ते वयाने मोठे आहेत हे ही एक कारण होऊ शकते. “पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे” (लेवीय १९:३२).

३. देवाने नेमलेला अधिकार

हा आदर देवाने नेमलेल्या अधिकारामुळे येतो. हा मुद्दा दुसर्‍या मुद्द्यालाच जोडून येतो. पण त्याचे मूळ निराळे आहे. निधर्मी जगाच्या कक्षेमध्ये पेत्र म्हणतो, “राजाचा मान राखा” (१ पेत्र २:१७).

 पौल म्हणतो, “मंडळीमध्ये  तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा” (१ थेस्स. ५:१२). दुसर्‍या शब्दांत जगामध्ये देवाने नेमलेला एक अधिकार आहे आणि मंडळीमध्ये देवाने नेमलेला एक अधिकार आहे. आणि देवाने स्वत: हे अधिकार नेमले आहेत या कारणामुळे आपण त्यांना एक प्रकारचा आदर दाखवायला हवा.

४. अमोल श्रम

आदर देण्याचे आणखी एक कारण म्हणजे लोक जे काम करतात त्यांच्या मूल्यामुळे. १ थेस्स. ५:१३ मध्ये पौल म्हणतो,  मंडळीमध्ये त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा.” दुसर्‍या शब्दात हे कामच अमोल आहे व आपल्या मानासाठी पात्र आहे.

५. सेवा

१ थेस्सलनी मध्ये मंडळीचे नेते जे आपले काम चांगले करतात त्यांच्यासाठी पौल प्रीती आणि  आदर यांचा मेळ घालतो हे चित्तवेधक आहे.  १३ वे वचन पुन्हा पहा; “त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा.”  दुसऱ्या शब्दांत जे आपली सेवा करतात त्यांचा आपण प्रीतीने आदर करावा आणि हे केवळ त्यांच्या कामाच्या गुणवत्तेमुळे नाही.

६. कमकुवतपणा

कमकुवतपणामुळे आपण एक प्रकारचा आदर करायला हवा. पतीपत्नीच्या नात्यासंबंधी बोलताना पेत्र हे सांगतो, “पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा” (१ पेत्र ३:७).  दुसर्‍या शब्दांत ख्रिस्तामध्ये कमकुवतपणासाठी प्रतिसाद हा फायदा उठवणे, थट्टा, छळ करणे असा नाही तर आदर  करणे आहे.

७. ख्रिस्तासारखी कृपा

ख्रिस्ती असण्याचा हा गाभा असल्याने हे सर्वात महत्त्वाचे आहे. एक प्रकारचा आदर आहे तो कोणत्याही शिफारसीशिवाय, गुणवत्तेशिवाय, दर्जा किंवा प्रतिष्ठेशिवाय, पद अथवा लायकीशिवाय व्यक्तीला बहाल केला जातो. दुसर्‍या शब्दात आदर देण्याचा एक प्रकार – आदरयुक्त नसले तरीही दिला जातो. तो व्यक्तीला आदरणीय आहे असे वागवतो. आपल्या सेवेला ते पात्र आहेत हे आपल्या कृतीने दाखवून देतो.

पौल या मार्गाचा उगम ख्रिस्ताच्या मनाशी, चित्तवृत्तीशी तसेच ख्रिस्ताच्या त्यागयुक्त देहधारणेशी व वधस्तंभावरील अर्पणाशी जोडतो. “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना…अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही” (फिली. २:३, ५-७).

म्हणजे एक  प्रकारचा आदर जो आपण मुक्तपणे आणि कृपाळूपणे लायक नसलेल्या व्यक्तीला देतो. त्यांच्या लायकीपेक्षा आपण त्यांना सन्मानाने वागवतो. त्यांच्यापुढे आपला दर्जा दासाचा  आहे  असे आपण मानतो.

आणि वस्तुत: ते सेवा करायच्या लायकीचे नसले तरी ते सेवा करायच्या लायकीचे आहेत असा त्यांचा दर्जा आपण उंचावतो. त्यांना आपण एक मोफत मान बहाल करतो, ज्याला ‘कृपा’ असे म्हणतात. जी ख्रिस्ताने आपल्यावर केली. त्याच्या स्वत:चे अर्पण करून त्याने जे आपण मान देण्यास योग्य नव्हतो त्या आपल्यावर आदर, सन्मानाचा वर्षाव केला.

ज्याला मान त्याला मान

आदर करण्यासाठीची ही सातही कारणे आणि मार्ग आपल्याला ढोंग करायला लावत नाहीत. जिथे लोक सन्मानाला पात्र नसताना ते आहेत असा विचार करायला भाग पाडत नाहीत. ते दोष द्यायला पात्र असताना प्रशंसा करायला लायक आहेत असे भासवत नाहीत. बायबल आपल्याला खोटे जीवन जगायला लावत नाही.

Previous Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

Next Article

चिडचिड? विसरून जा

You might be interested in …

ख्रिस्तजन्माच्या वेळचे शिष्य

डॉ. राल्फ विल्सन देवाने ख्रिस्तजन्माच्या वेळी, तसेच त्या घटना घडण्याच्या सुमारास त्याचे शिष्य कसे तयार केले होते हे पाहून मी चकित होतो. उदा. त्याच्या जन्मापूर्वी जखऱ्या, अलीशिबा, मरिया योसेफ. इ. आता आपण त्याच्या जन्मानंतरच्या दोन […]

देवाने जगावर एवढी प्रीती केली

मार्शल सीगल  जग निर्माण करण्यापूर्वी बराच काळ आधी देव पित्याने आपला एकुलता एक पुत्र पृथ्वीवर पाठवण्याची तयारी जगाच्या स्थापनेपूर्वी केली ( योहान १७:२४). आणि तरीही त्यावेळी त्याला ठाऊक होते की बेथलेहेम येथे जन्मणाऱ्या या बाळाला […]

धडा १७.     १ योहान ३: ११- १५ स्टीफन विल्यम्स

  प्रीती की द्वेष; काईन की खिस्त काही वेळा एखादी व्यक्ती कशाचे तरी  चिन्ह बनते. उदाहरणार्थ, अहिंसा म्हटले की गांधीजींचे नाव समोर येते. किंवा समाजसेवा  म्हटले  की मदर टेरेसा, तर अॅडॉल्फ हिटलर म्हटले की अत्यंत […]