पॉल ट्रीप
उजेडण्यापूर्वी जेव्हा आम्ही अंधारात बसायचो तेव्हाचे ते क्षण माझ्या कुटुंबाला खूप आवडायचे.
दरवर्षी माझी मुले माझ्यामागे लागायची की आपण ते कधी करणार? एकमेकांमध्ये ती चर्चा करायची की ते किती मोठे असणार आहे? मग आम्ही मुलांना कारमध्ये बसवायचो आणि जंगलातून जेथून आम्ही नेहमी ख्रिसमस ट्री आणायचो तेथे जायचो. सर्वांच्या मताने आम्ही झाड ठरवायचो ते आमच्या कारच्या टपाला बांधून घरी परतायचो. त्या रात्री सर्व कुटुंब मिळून आम्ही आमचे ख्रिसमस ट्री सजवायचो. सर्व सजावट करून त्या झाडाचे वैभव खुलवल्यावर घरातले सर्व लाईट्स बंद करून आम्ही ख्रिसमस ट्री अंधारात किती सुंदर दिसते हे कौतुकाने न्याहाळत राहायचो.
अशा प्रकारचे क्षण मला आवडतात, कारण मला वाटते विश्वासी या नात्याने आपण या जगात उत्सव साजरा करणारा समाज असायला हवे. ज्या ज्या चांगल्या गोष्टींचा आपण आनंद घेतो आणि जे कौटुंबिक प्रेम आपण अनुभवतो ते मधुर आहे. या देणग्यांसाठी आपण लायक नसतानाही आपल्या स्वर्गीय पित्याकडून त्या आपल्याला बहाल केल्या आहेत. पण माझी कळकळ ही आहे की आपण या गोष्टीची आठवण करावी व आपल्या मुलांनाही आठवण करून द्यावी की हा उत्सव एका झाडासंबंधी आहे. पण तो तुमच्या दिवाणखान्यातील तुम्ही सजवलेल्या त्या सुंदर
झाडाबद्दल नाही.
निराळ्या प्रकारचे झाड
त्याचा जन्म झाल्या क्षणापासून त्या गोठ्यातील बाळाचे जीवन त्या झाडाकडेच पुढे चालले होते. ते झाड काही सुंदर असणार नव्हते किंवा उत्सव करण्यासाठी नव्हते तर ते त्याग आणि मरण याचे होते. ते कोणाच्या घरात सणाची प्रथा म्हणून भाग होणार नव्हते, पण ते गावाच्या वेशीच्या बाहेर एका वधावयाच्या टेकडीवर असणार होते. ते बाळ त्याच्या ह्या झाडासमोर उभे राहून त्याच्या सौंदर्याने स्मित करणार नव्हते तर त्यावर त्याचा छळ होणार होता – इतर गुन्हेगारामध्ये. त्या आशाहीन दिसणाऱ्या टेकडीवर त्या मरणाच्या झाडाने मानवजातीला जीवन व आशा दिली.
ख्रिस्तजन्माचा सण आपल्याला अशी कहाणी सांगतो की आपले श्वास रोखून धरले जातात. एक अटळ गरज, एक वैभवी देहधारण, आपल्याऐवजी जगलेले एक जीवन, प्रायश्चित्त घेणारे मरण आणि एक विजयी पुनरुत्थान या सबंधीची ही गोष्ट आहे. अशी कहाणी फक्त देवच लिहू शकत होता व देवच हे कथानक पूर्ण करू शकत होता. आपल्याला चकित करणारी, नम्र बनवणारी, वाचवणारी व रूपांतर करणारी व विस्मयात जीवन जगून उपासना करायला लावणारी ही गोष्ट आहे. ही गोष्ट तुमच्या व्यक्तित्वाला व खऱ्या गरजेला अर्थ देते. ही गोष्ट आशा कुठे मिळते हे दाखवते व तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा अर्थ व हेतू याकडे निर्देश करते.
ख्रिस्तजन्माची चुकीची कहाणी
सोहळ्याच्या वेळी बर्फावरची घसरगाडी , स्नो मॅन, बक्षिसे आणि गोड पदार्थ यांच्या गोष्टी ऐकण्यात मला समस्या येत नाही. किंवा नाताळाची काही अर्थहीन गाणी गाण्याचाही मी विरोध करत नाही. मला काळजी याची वाटते की प्रत्येक नाताळाच्या सोहळ्यात आपल्या मुलांना एक खोटी गोष्ट सांगितली जाते.
ख्रिस्तजयंतीची खोटी गोष्ट सादर करताना मानवी सुख केंद्रस्थानी ठेले जाते. ते मुलांना सांगते निर्मात्याकडे न पाहता निर्मितीकडे पाहा. ती कोण आहेत व त्यांना कशाची गरज आहे यासंबंधी त्यांना खोटे सागितले जाते. ती गोष्ट असे जग सादर करते की त्याला समर्पणाच्या झाडाची, कोकरा असणाऱ्या मशीहाची आणि जीवन देणाऱ्या पुनरुत्थानाची गरज नाही .
ती गोष्ट विसरते की ज्या जगात आपली मुले जगत आहेत ते दु:खद रीतीने भंग पावलेले आहे आणि ते आपल्या मुक्ततेची वाट पाहत आहे (रोम ८:२२-२३). ही गोष्ट आपल्या मुलांना सांगण्याकडे दुर्लक्ष करते की त्यांच्या आतमध्ये जे पाप राहत आहे त्यामुळे ते भयानक धोक्यात आहेत. आणि ती हे नक्कीच सांगत नाही की त्यांना यासाठी निर्माण केले गेले आहे की त्यांनी जाणीवपूर्वक आपली जीवने देवाच्या गौरवासाठी व महान हेतूसाठी समर्पण करावीत.
ख्रिस्तजन्म सोहळा ही पालकांना मिळालेली देणगी आहे
ख्रिस्ती पालकांना ख्रिस्तजन्म सोहळा ही एक देणगी आहे. जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गहन गोष्टी आपल्या मुलांना सांगण्यास पालकांनी लक्ष केंद्रित करण्यासाठी ते त्यांना संधी देते. ख्रिस्तजन्मामुळे उद्भवणाऱ्या मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जाण्याची गरज आहे.
हा सण कशासाठी आहे?
येशू कशासाठी आला?
मला कशाची गरज आहे?
या गरजा कशा पुरवल्या जातील?
मी कोण आहे आणि माझे जीवन कशासबंधी आहे?
मी कशा रीतीने जगायला हवे?
अशा आणि इतर अनेक प्रश्नाची उत्तरे येशूख्रिस्ताच्या देहधारणाच्या जन्मामुळे दिली जातात. ही गोष्ट इतर सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करते. ही एकमेव गोष्ट खऱ्या जीवनाचे अभिवचन देते आणि आपल्या मुलांना आशा देते.
ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगा
तर पालकांनो, या सणाच्या वेळी अनेक वेळा व डिसेंबरच्या आरंभापासूनच तुमच्या मुलांना ह्या सोहळ्याचा गोंधळ कसा झाला आहे याच्यासबंधी सांगण्याची तयारी करा. येशूची गोष्ट त्यांना पुन्हा पुन्हा सांगा. त्याला का यावे लागले याच्या कारणाची वाईट बातमी ही सांगा – कारण त्यानंतरच त्याच्या येण्याद्वारे त्यांच्यासाठी काय साधले गेले हे त्यांना समजेल व ते उत्सव साजरा करतील. त्यांना सांगा की सर्वात व केव्हाही दिलेली सर्वोत्तम देणगी म्हणजे येशू आहे कारण या गोष्टीमध्ये आपल्याला ज्याची गरज आहे ते सर्व दिले गेले आहे.
सोहळ्यामध्ये झाडाबद्दलचे संभाषण करा पण ते तुमच्या दिवाणखान्यातल्या झाडाचे नसावे. गोठ्यातले बाळ झाड सजवण्यासाठी आले नाही तर तुम्हाला तारण्यासाठी त्यावर टांगले जाण्यासाठी आले हे सांगा. त्यांना आठवण द्या की पापाने अंधारलेल्या या जगात हे समर्पणाचे व तारणाचे झाड अनंतकाळासाठी आशा देत दिव्याप्रमाणे प्रकाशत आहे व ही आशा कधीही नष्ट होणार नाही.
Social