जॉन ब्लूम

जागरूक न राहणे हे आपल्या जिवांसाठी नाशकारक आहे. हा नाश रूपकात्मक अथवा आभासी किंवा काव्यात्मक नाही – तर खराखुरा नाश आहे.
आपण ख्रिस्तामागे चालत असताना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार हे प्रेषित पौलाला ठाऊक होते.
“सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा; खंबीर व्हा. तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करा.” (१ करिंथ १६:१३-१४).
त्याने स्वत:बद्दल दिलेल्या वैयक्तिक माहितीची मोठी यादी दिल्यानंतर (१ करिंथ १६:१-२४) हा बोध अयोग्य ठिकाणी दिला असे वाटते. पण शास्त्रलेखातली अयोग्य ठिकाणे खास काहीतरी दाखवत असतात. पौल त्याच्या वाचकांनी जागरूक आणि धैर्यवान असावे असे गंभीर ओझे वाहत आहे. यामध्ये खास करून जे लोक मंडळी आणि कुटुंबाचे नेतृत्व व पालन करतात त्यांच्यासाठी हे आहे. “ मर्दासारखे वागा.”  जागरूक राहणे धीर धरावे हा बोध पौलाच्या पत्रात सामान्यपणे असतोच. हा बोध तो पुरुष व स्त्रिया दोघांनाही करतो. पवित्र आत्मा पौलाद्वारे सांगतो की सर्व ख्रिस्ती लोकांनी धैर्याने कृती करावी. मग देवाने त्यांना आध्यात्मिक युद्धात कुठेही ठेवलेले असो.
करिंथकरांसाठी पौलाला दिलेल्या ओझ्यानुसार पवित्र आत्मा आता आपल्यालाही धैर्य धरण्यास पाचारण करत आहे. – सध्याच्या कठीण दिवसात हे पाचारण आपण अधिक ऐकण्याची गरज आहे. त्यामुळे “आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे” (इब्री १०:२३).
जागरूक असा
नव्या करारात जागे राहा (१ पेत्र ५:८) किंवा जागृत राहा (मार्क १३:३७) तसेच सावध असा (प्रेषित २०:३१) ही वाक्ये लेखक वारंवार वापरतात यासाठी की आपल्या भोवती असलेल्या स्पष्ट धोक्यांकडे आपण दुर्लक्ष करू नये.
सकाळी एक ससा गवत खात असताना माझ्या खिडकीतून मी हे पहिले. हा ससा जागरूकतेचे प्रतिक होता. काही झाले तरी तो आपला पहारा सोडत नव्हता. तो काहीही करत असला तरी सतत सावध होता. कुत्री सतत फिरत असतात. सशाला त्यांचा धोका असतो. जर तो सावध राहिला नाही तर त्याचा जीव गमावू शकतो.
अशाच प्रकारची जागरूकता आपण कायम ठेवावी असे आपल्याला पवित्र आत्मा पौलाद्वारे सांगतो. “त्या कुत्र्यांविषयी सावध असा” (फिली. ३:२). “मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे” (प्रेषित २०:२९). ख्रिस्ती व्यक्तीलाही मेंढराप्रमाणे दुष्टाच्या कुत्री आणि लांडग्यापासून इजा पोचू शकते. हा धोका पौल व्यक्तीच्या रूपकामध्ये दाखवत आहे. लांडगे जसे मेंढरासाठी घातक असतात यापेक्षा अधिक घातक हे आध्यात्मिक धोके आपल्यासाठी असतात.
म्हणूनच पवित्र आत्मा आपल्याला सैतानाच्या कृत्यासंबंधी सावध असून जागे राहायला सांगतो (१ पेत्र ५:८). तुमची शिकार प्रत्यक्ष कोण करतोय हे तुम्हाला माहीत आहे? तो तुमच्या संबधात कोठे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का (गलती ६:१)? तुमच्या कुटुंबाच्या, आणि ख्रिस्ती बंधुभगिनीच्या संदर्भात तो कोठे आहे हे तुम्हाला माहीत आहे का (इफिस ६:१८)?
एकमेकांचे संरक्षण करणे हे आपले पाचारण आहे, आणि त्याचा एक भाग म्हणजे प्रार्थनेत सतत जागरूक राहणे होय (कलसै ४:२). याचा अर्थ काय हे आपल्याला ठाऊक आहे. कारण जेव्हा जेव्हा आपल्याला खरा धोका वाटू लागतो तसे आपल्या प्रार्थना अगदी कळकळीच्या व तत्पर असतात. जागरूकता नसणे म्हणजे धोका आपल्या नजीक आहे असा आपला विश्वास नाही. आणि अशी मानसिकता आपल्यासाठी धोका देणारी आहे.
उभे राहा खंबीर व्हा
“विश्वासात खंबीर उभे राहा” हा फक्त नव्या वर्षासाठी एक निर्णय किंवा चांगली इच्छा नाही. हा खराखुरा ठराव आहे; पवित्र, खंबीर ठराव. ती परत माघारे न फिरण्याची खूण आहे. काही झाले तरी तग धरून राहण्याची इच्छा आहे.
पौल हे विधान वारंवार वापरतो (२ करिंथ १:२४; गलती ५:१, फिली १:२७; २ थेस्स. २:१५). ही युद्धाची भाषा आहे: “ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या” (इफिस ६:१३).
आध्यात्मिक युद्ध हे रूपक नाही. ते खरेखुरे आणि अगदी धोकादायक आहे. जरी लढाईमध्ये प्रत्येक लढवय्याला माघार घेण्याचा मोह होत असला तरी ते कच्च्या दिलाच्या लोकांसाठी नाही. सैनिकांना खंबीर राहण्याची आठवण करून द्यावी लागते.
एक कारण आहे ज्यासाठी सैनिकांनी लढण्याची गरज आहे व शत्रूला नामोहरम करणे आवश्यक आहे अशी त्यांनी आठवण ठेवायची आहे.
जी काही भीती आणि धोका आपल्या निर्धारापासून आपल्याला थोपवतो त्याविरुद्ध आपण उभे राहायला पाहिजे. पौलानुसार “खंबीर असणे” असणे म्हणजे धोका समोर असताना देव जी शस्त्रे आणि सामर्थ्य देतो ते घेऊन धैर्याची कृती करणे (इफिस ६:१०,१४-१७). विश्वासहीन सामर्थ्य अथवा शस्त्रे या युद्धामध्ये कुचकामी आहेत (२ करिंथ १०:४-५).
प्रत्येक गोष्ट प्रीतीने होऊ देत
वरवर वाचले तर सावध राहा, खंबीर व्हा , समर्थ व्हा अशा सूचनांचा सर्व काही प्रीतीने करण्याशी (१ करिंथ १६:१३-१४) काय संबंध आहे असा विचार आपण करू. पण त्यामध्ये विसंगती नाही.
देव आणि मानवामध्ये सर्वात मोठे कार्य करणारे सामर्थ्य म्हणजे प्रीती (१ करिंथ १३ :१३). अंधाराच्या सामर्थ्याचा नाश करणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे प्रीती. येशू हा सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच प्रकट झाला” (१ योहान ३:८). आपल्या पापांचे प्रायश्चित्त घेताना जेव्हा त्याने स्वत:चा प्राण दिला तेव्हा त्याने हे केले. आणि आता तो आपल्याला सूचना देतो तुम्हीही “आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे” (१ योहान ३:१६). शुभवर्तमान प्रकट करणारे व स्पष्टपणे बोलणारे प्रीतीसारखे दिसरे काही नाही (योहान १३:३५). प्रीतीसारखे आरोग्यदायी दुसरे काही नाही (१ पेत्र ४:८).
आणि जेव्हा प्रीतीची कमतरता असते तेव्हा तो सैतानाचा प्रभाव असल्याचा पुरावा आहे (१ योहान ३:१०).
म्हणून “प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या” (इब्री १०:२४). प्रीतीचे शब्द व कृती हे मानवी जिवाला सर्वात अधिक आरोग्यदायी आहेत. आणि ते आपल्या आध्यात्मिक शत्रूविरुध्द केलेली सर्वात नाशकारी कृती आहे. प्रीती ही सर्वात मोठे आध्यात्मिक दान आहे (१ करिंथ १३:१३). आणि प्रीती हे सर्वात समर्थ असे आध्यात्मिक शस्त्र आहे (रोम १२:२०-२१).
जागरूक राहण्याची आपली गरज
पौलाच्या ह्या बोधाची गरज आपल्याला आताच आहे कारण आपल्याला सावध आणि धैर्यवान प्रीतीची गरज आहे. आपल्याला सावध व खंबीर प्रीतीची गरज आहे. ही गरज नेहमीचीच आहे, पण सध्याच्या ख्रिस्ताला विरोध करणाऱ्या जगात याची वाढती गरज आपल्याला जाणवते.
आपल्याला पवित्रतेने जागरूक राहण्याची गरज आहे म्हणजे आपल्या कळपाकडे खोट्या शिक्षकांचे लांडगे नजर टाकणार नाहीत. आपल्याला धैर्य हवे आहे, समाजासाठी लढण्यास नाही तर नव्या कराराचे आध्यात्मिक योद्धे म्हणून लढण्यासाठी. समाजाची मूल्ये ढळली, प्रशासनाची धोरणे बदलली तरी आपल्यामध्ये एक निर्धार हवा की खर्या सुवार्तेच्या जमिनीच्या एक इंचाचाही भाग आपण देणार नाही. आपली जागरूकता व धैर्य हे ख्रिस्तासारखे आहे याची आपण खात्री करून घ्यायला हवी. आणि हे सर्व काही प्रीतीनेच होऊ देत.




 
		 
		 
		 
			 
			 
			 
			 
			
Social