Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 7, 2019 in जीवन प्रकाश

सात वचनांमध्ये विवाहाची कहाणी                                                      लेखक : डेविड मॅथिस

सात वचनांमध्ये विवाहाची कहाणी लेखक : डेविड मॅथिस

नुकताच मी एका प्रगल्भ जोडीचा विवाह लावला. वधू आणि वर दोघांनीही तिशी ओलांडली होती. ते दोघेही विश्वासात आणि जीवनात स्थिर होते आणि आपण कशावर उभे आहोत ते त्यांना माहीत होते – देवाच्या वचनावर. आतापर्यंत मी विवाह लावलेल्या जोडप्यांपैकी इतका स्पष्ट, भक्कम, स्थिर पाया मला क्वचितच दिसला होता.

म्हणूनच जेव्हा मी त्यांना लग्नविधीसाठी त्यांचे एकदोन आवडते परिच्छेद  निवडायला लावले तेव्हा त्यांनी आपल्यासाठी तसे करण्यापासून राखले. ते म्हणाले, आमचे देवाच्या वचनावर खूप प्रेम आहे. अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. आणि देवाला त्यांना जे काही सांगायचे आहे ते सर्व करण्यासाठी ते आनंदाने समर्पित आहेत.

मी भारावून गेलो. एखाद्या जोडप्याने मला परिच्छेद निवडावा म्हणून सांगण्याची ही पहिलीच वेळ होती. एकच परिच्छेद निवडण्याऐवजी मला वाटले की ह्यावेळी बायबलमधील विवाहावरचे सात महत्त्वाचे परिच्छेद निवडावेत. हे ते सात परिच्छेद आहेत आणि ते का याची चव तुम्ही घ्याच.

१. उत्पत्ती १:२७
“देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.”

प्रारंभापासूनच देवाने स्त्री पुरुषांना मानव या नात्याने समान प्रतिष्ठा देऊन आणि एकमेकांना पूरक ठरेल असे वैभवी निराळेपण देऊन स्त्री व पुरुष असे निर्माण केले. देवाने त्यांना एक मानवी साचा देऊन शेवटी पुरुषपण व स्त्रीपणाची उपकरणे चढवली असे नाही. तर आपण सर्वजण पूर्णपणे अथपासून इतिपर्यंत पूर्ण स्त्री आणि पुरुषच आहोत. आपण शारीरिक व मानसिक रीतीने अद्भुत रीतीने निराळे आहोत. आणि हे निराळेपण पुरुषांना स्त्रियांपेक्षा उत्तम किंवा स्त्रियांना पुरुषांपेक्षा उत्तम बनवत नाही. पण ते पुरुष आणि स्त्रियांना एकत्रित रीतीने नक्कीच अधिक उत्तम बनवते.

देवाने मनुष्याला निर्माण करून बागेत ठेवल्यानंतर जगाच्या जीवनासाठी नैतिक दृष्टी दिली. देवाने म्हटले, “मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन”  (उत्पत्ती २:१८). उत्पत्तीच्या वृत्तांतात प्रत्येक दिवसाच्या शेवटी देवाने जाहीर केले की, ते चांगले, चांगले …आणि चांगले होते. सहाव्या दिवसाच्या अखेरीस ते फार चांगले होते. पण फक्त पुरुषासाठी? बरे नाही. पहिल्या पुरुषासाठी तरी ते चांगले नव्हते आणि आपल्यापैकी बहुतेकांसाठी नाही.

२. उत्पत्ती २:२४
“ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील,”
पहिल्या स्त्रीला निर्माण केल्यानंतर देवाने ही असामान्य देणगी पुरुषाला सुपूर्त केली. तेव्हा देवाने विवाहाची स्थापना केली. यामध्ये दोन व्यक्तींचे एक नवे अस्तित्व निर्माण होते. देवाच्या निर्मित जगामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री हे मानवी नातेसंबंधाचे एक मूलभूत नाते तयार करतात. हे नाते पालक – बालक या संबंधापेक्षा अधिक मूलभूत आहे. पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहतो. देवानंतर आता तो तिला पूर्ण समर्पित आहे.

तसेच स्त्री आपल्या बापाचे घर मागे सोडून (स्तोत्र ४५:१०) आपल्या पती समवेत एक नवे कुटुंब प्रस्थापित करते. देवानंतर आता ती त्याला पूर्णपणे समर्पित आहे.

ह्याची सुरुवात जरी आश्वासनात्मक झाली तरी पाप जगात आले. मानव बागेचे रक्षण करू शकला नाही. त्याने ढिलेपणाने सापाला आपल्या पत्नीच्या कानाशी कुजबुज करू दिली आणि ती फसली. तसेच देवाची आज्ञा प्रत्यक्ष  ऐकली असतानाही मानवाने आपल्या पत्नीचा आवाज ऐकला आणि देवाविरुद्ध पाप केले. आणि आता या पतित व शापित जगामध्ये विवाहाचे मूलभूत नाते दु:ख व समस्या यांनी व्यापून गेले आहे (उत्पत्ती ३:१६).

३. मत्तय १९:६
“ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”

आता आपण या येशूच्या शब्दांकडे काही हजार वर्षे पुढे जातो. जरी पापाने देवाच्या निर्मितीमध्ये शिरकाव केला आहे  आणि पतीपत्नी बहुधा एकमेकांशी दु:खद रीतीने झगडताना दिसतात तरी अशा वेळी येशू देवाची निर्मितीमधली विवाहाबाबतची दृष्टी समर्थपणे मांडतो:  “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” पाप आव्हान करीत असले तरी ते देवाची मूळ रचना उलथून पाडत नाही. विवाह खरा तर पाप राखून धरण्यासाठी केला आहे. देव म्हणतो दोघे एक होतील आणि ते त्या एकाला दोघांमध्ये फाडून टाकण्यासाठी नाही.

विशेष करून पुरुषाला देव विश्वासूपणासाठी पाचारण करतो – येथेच आदामाचे पतन झाले. देव प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे व विवाहाचे सरंक्षण करण्याचे व काळजी घेण्याचे पवित्र आवेशाने पाचारण करतो. हे प्रथम त्याने स्वत:च्या पापापासून व नंतर इतरांपासून करावे. तिच्या चुका ही त्याची सबब नाही. आणि पतीच्या चुका ही पत्नीची सबब नसावी. स्त्री व पुरुष एकमेकांशी करार करतात की, “मरणाने वियोग होईपर्यंत.”

अर्थातच ते एकमेकांविरुद्ध पाप करतीलच. पाप त्यांच्या नात्यातील सुसंवादाला कोणत्यातरी प्रकारे आव्हान देतच राहील. पण देवाने हा विवाहाचा करार अगदी कठीण काळातही त्यांना धरून ठेवण्यासाठी तयार केला आहे. कठीण काळ हे विवाहाला काही आश्चर्यचकित करत नाहीत. विवाह हा कठीण काळासाठी निर्माण केला आहे. करार हा सोप्या काळासाठी नाही तर कठीण काळासाठी आहे.

४. इफिस ४:३२

“आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.”

माझ्या स्वत:च्या १२ वर्षांच्या विवाहासाठी हे सर्वात महत्त्वाचे वचन आहे. आणि इतर विवाहांमध्येही कनवाळूपणाला बरेच कमी लेखले जाते अशी शंका मला आहे.

विवाहाच्या कराराच्या अद्भुत मर्यादा, सीमा व समर्पण यामुळे पतीपत्नीला एकमेकांशी क्षुद्र वृत्तीने वागणे, सतत समोर असलेल्या व जीवन कठीण करणाऱ्या हट्टी जोडीदाराची खरडपट्टी काढणे, असा मोह व प्रेरणा होऊ शकेल. देवाच्या विवाहाच्या दृष्टान्तामध्ये पतीपत्नीमध्ये असा क्षुद्रपणा, असा तिरस्कार असण्याला वाव नाही. होय. प्रीतीने सुधारणा. होय. कठीण संवाद. होय. नियमितपणे व रोजही क्षमा मागणे व करणे, पण नीचतेने वागणे नाही.

जे पतीपत्नी ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना समजते की देव प्रत्येक वळणावर त्यांना कनवाळूपणे वागवतो. याचा अर्थ हे सहजीवन कठीण होणार नाही असे नाही. पण देवाच्या मुलांच्या त्याच्या सार्वभौमत्वाने नेमलेल्या समस्या ह्या दयामय असतात. म्हणून तुम्हीही ख्रिस्तामध्ये नेहमी “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा.”

५. कलसै ३:१९

“पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.”

देवाचे पतीला खास पाचारण आहे की त्याने पत्नीवर प्रीती करावी. प्रीती हे फक्त उत्स्फूर्त प्रेम नाही. ते प्रेम आहेच पण त्याहून अधिक आहे. ते कराराला समर्पित असणे व त्यागपूर्वक कृती करणे आहे. त्याच्या वाईट क्षणी त्याला थंडपणे किंवा कठोर वागण्याचा मोह होईल. पण देवाने त्याला बोलावले आहे व त्याच्या पत्नीची गरज आहे की त्याने तिच्याशी सौम्यपणे वागावे निर्दयपणे नाही – आणि कृतीशीलतेने, निष्क्रियतेने नाही. सौम्य कृती. सौम्यता हा कमकुवतपणा नाही. सौम्यता ही काबूमध्ये असलेली शक्ती आहे जी जीवनदायी असते. ती देवाच्या आत्म्याद्वारे वाढत जाते व प्रगल्भता आणते.

विवाह आपली जीवने सोपी (आणखी कठीण) करण्यासाठी नाही. पण ती अधिक आव्हानात्मक (आणि चांगली) करण्यासाठी आहे. (१पेत्र ३:७ वाचा.)

६. कलसै ३:१८

“स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.”

पत्नीसाठी देवाचे पाचारण आहे की तिच्या पतीच्या प्रेमळ नेतृत्वाला तिने दृढ करावे, स्वीकारावे व जोपासावे. तिचा पती तिच्यासाठी एकमेव आहे. देव पत्नीला सर्व पुरुषांना समर्पण करायला सांगत नाही. कधीच नाही. फक्त तिच्या स्वत:च्या पतीला. (इफिस ५:२२, तीत २:५, १ पेत्र ३:१,५ वाचा.) आणि तिचे हे समर्पण संपूर्ण नाही. कलसै ३:१८ म्हणते, “स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.” येशू ख्रिस्तावरच तिची आणि तिच्या पतीचीही संपूर्ण निष्ठा आहे आणि तोच त्यांचा अधिकारी आहे. जसे तिचा पती ख्रिस्ताची आज्ञा पाळेल आणि ख्रिस्ताप्रमाणे स्वत:चा त्याग करेल आणि जसे ती त्याला हमी व दृढता देईल तसतसे त्यांचा विवाह फुलू लागेल. आणि तो कधी झाला नसता इतका चांगला पुरुष बनेल.

दैवी अधीनता ही निष्क्रिय किंवा कमजोर नसते. आधुनिक गर्विष्ठ लोकांसाठी ही गोष्ट करणे फार कठीण आहे. पण तीच गोष्ट येशू हा प्रभू आहे असे म्हणणारे लोक करतात.

७. इफिस ५:३२

“हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे.”

सर्वांत चांगले आम्ही शेवटी राखून ठेवले आहे. जेव्हा देव म्हणतो की विवाह हे रहस्य आहे  तेव्हा ते आकलन न होणारे, गोंधळात टाकणारे आहे असे तो म्हणत नाही. आपल्याला त्याच्या अर्थाचा थांग लागत नाही असे नाही. तो म्हणतो की काही हजारो वर्षे हे रहस्य होते. पण आता नाझरेथकर येशूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाद्वारे आता विवाह हे गूढ राहिले नाही. हे रहस्य उघड केले गेले आहे.

ते रहस्य असे होते: एक स्त्री व एक पुरुष एकमेकांशी मरणाने वियोग होईपर्यंत करार का करतात? देवाने हे याच प्रकारे का केले? त्याने मानवी समाज अशा रीतीने का उभारला? याचे उत्तर आपला पुत्र पाठवण्यापूर्वी देवाने मानवी जीवनाच्या मूलभूत गोष्टींमध्ये येशूकडे एक सूची रोखली. आरंभापासून देवाला ठाऊक होते की तो आपल्याला पापांपासून वाचवण्यासाठी येशूला पाठवणार होता. आणि त्याची वाट पाहण्यासाठी त्याने विवाह नेमला – येशूच्या सुवार्तेला जगाची तयारी करण्यासाठी.

विवाहाचा अर्थ आहे की येशूने आपल्या लोकांसाठी त्याच्या वधूसाठी – त्याचे जीवन दिले आहे. पतीला पाचारण आहे – देण्याद्वारे नेतृत्व करावे घेण्याद्वारे नाही. ते येशूकडे दाखवते. त्याने स्वत:ला राखून न ठेवता, स्वत:चा आराम न पाहता स्वत:ला देऊन टाकले. येशू हा असा पती आहे की तो स्वत:चे विशेष हक्क पाहत नाही तर आपल्या वधूची प्रीतीने, निष्ठेने व कृतीशीलतेने सर्व जबाबदारी उचलतो.

येशूची त्याच्या मंडळीसाठी असलेली प्रीती हा विवाहाचा अंतिम अर्थ आहे. हाच संदेश ख्रिस्ती जन आपला करार करताना जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि कोकऱ्याच्या मेजवानीची प्रतीक्षा करतात (प्रकटी१९:९).