दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

त्याला दगा दिला जाणारच होता

ग्रेग मोर्स

“जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे” (स्तोत्र ४१:९)


ते दोघेही त्या दिवशी झाडावरच मरणार होते. एक वधस्तंभावर टांगला गेला; दुसरा झाडाच्या फांदीवर लोंबकळत. तीन वर्षांची त्यांची मैत्री होती.  ते एकत्र जेवले, एकत्र  हसले, देवाच्या राज्याची एकत्र घोषणा केली,  एकत्र भुते काढली, परूश्यांशी एकत्र लढा दिला. स्वर्गाच्या राजाने आपल्या सिंहासनावरून खाली उतरून या माणसाला आपल्या बारा जणांच्या आतल्या वर्तुळात आमंत्रित केले होते. दिवसन् रात्र या माणसाने आपल्या निर्माणकर्त्याशी सहवास ठेवला होता.

आणि दोघेही त्या दिवशी झाडावर मरण पावले. दोघेही देवाचे शापित झाले होते. “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे (गलती ३:१३). एकाला दगा दिला गेला, एकाने दगा दिला. या कुप्रसिद्ध कटामध्ये एक परिचित चेहरा होता.

शिष्यांमध्ये सैतान

दलीला आणि शमशोन, दावीद आणि अहिथोपेल यांच्या नमुन्याप्रमाणे स्तोत्र ४१ मध्ये दिलेली पुनरावृत्ती घडून यायची होती: “ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे” (स्तोत्र १३:१८; स्तोत्र ४१:९). ते अनावर जनावर आपल्या मालकाला, त्याच्या उपकारकर्त्याला, धन्याला लाथ मरणारच होते.


मरीयेने सढळतेने येशूच्या चरणावर  ओतलेल्या सुगंधी तेलामुळे अजूनही त्याचे मन दुखावलेले होते (योहान १२:३-८). जे पैसे त्याला मिळाले नव्हते  त्यातून चोरून घेण्यापूर्वीच – तो येशूच्या शत्रूंकडे गेला व त्याला गुलामाच्या किंमतीत म्हणजे तीस चांदीच्या नाण्यांना  विकले. हे अगदी पूर्वी भाकीत केल्याप्रमाणे घडले (जखऱ्या ११:१२; मत्तय २६:१४-१६). हा नाग आपल्याला अखेरीस दंश करणार हे ठाऊक असल्याने  पुढच्या संध्याकाळी येशू आत्म्यात   आत्म्यात व्याकूळ झाला व निश्‍चितार्थाने शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल” (योहान १३:२१). स्तोत्रकर्त्याने पुढील शब्दांत त्याची अस्वस्थता पकडली आहे; “कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो; पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास” (स्तोत्र ५५:१२,१३).


आपण शत्रूची क्रोधाची गर्जना सहन करू  शकू पण खोट्या मित्राचा शांत हेवा कोण सहन करेल? सोबत्याचा खंजीर पार जिवाला भोसकून जातो – नात्याची व्यर्थता सिद्ध होते. येशू  त्या रात्री कुठे असणार हे त्याला ठाऊक होते. “माझ्यामागे या, मी तुम्हाला त्याच्याकडे नेतो.”  
“यहूदा तू?”

या नीचपणाला काय नाव द्यावे यासाठी आपण भाषेच्या तळाला जाऊन शब्द शोधू लागतो.  पिता स्वर्गातल्या दूतांना म्हणतो, “हे पाहून भयचकित हो; थरथर काप, शुष्क होऊन जा” ( यिर्मया २:१२). येशू म्हणतो,  “ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो, त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते” (मार्क १४:२१). त्याचे नाव स्वर्गाचा शाप बनले : यहूदा इस्कर्योत.

स्वच्छ पाय, घाणेरडे कृत्य

त्याच्या शेवटच्या भोजनासाठी मेज मांडले होते. धोका देण्याची रात्र आली होती. “आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले”   (योहान १३:१). मरण आता आपल्याला पित्याकडे नेणार आहे हे जाणून येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला” (योहान १३:३-५).


हे घाणेरडे कृत्य स्वच्छ पायांनी केले होते. येशू हा ढोंगी नव्हता. त्याने म्हटले, “तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा”  (लूक ६:२७). त्याला का हे पूर्वीपासून ठाऊक नव्हते? अर्थातच ठाऊक होते. जेव्हा यहूदा गवतात सळसळत होता तेव्हाच त्याला ठाऊक होते की त्याने कुणाला निवडलंय. “तुम्हा बारा जणांना मी निवडून घेतले नाही काय? तरी तुमच्यातील एक जण सैतान आहे”  (योहान ६:७०). त्या रात्री त्याने म्हटले, तुमच्या सर्वांचे पाप धुतले जाणार नाही. जे मी निवडले ते मला माहीत आहेत (योहान १३:१८).


त्याच्या अखेरच्या भविष्याने त्याचा हेतू साध्य झाला: तो पवित्र “मी आहे” (योहान १३:१९) याची खात्री देणे – खासकरून आत्ताच. तो  थरकाप होणारा यहूदा आपल्या डावपेचांनी येशूवर मात करू शकणार नव्हता. या माणसाच्या दुर्बल निर्णयाला त्याच्या बळीच्या संमतीची गरज  होती; त्यानंतरच त्याची दुष्टता तो उबवणार होता. (योहान १३:२७). तो दगा दिला जावा यासाठीच आला होता. त्या सापाच्या चुंबनासाठी अदृश्य देवाने आपला गाल पुढे केला.

मेंढराच्या वेशामध्ये


धोका दिला जाणार असे सांगून त्याने त्याच्या अस्वस्थ जिवाला आवाज दिला. त्यावेळी शिष्यांच्या अस्थिर प्रतिसादाबद्दल योहान सांगतो. तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले (योहान १३:२२).
त्यांचे डोळे एकमेकांना भिडले. त्यांच्यामध्ये दोषी बसलेला आहे हे कसे शक्य आहे? आता आपल्यामध्ये मोठा कोण याच उहापोह न करता त्यांना हे सत्य उमगले की एक सैतान आपल्याबरोबर खात होता, झोपला, सेवा केली. त्यांच्यातल्या कोणीच यहूदावर गुरगुरले नाही आणि त्याच्या कानाशी कुजबुजले नाही की मला ठाऊक होते. कोणीच आपली तलवार उचलून त्याचा कान कापून टाकला नाही. त्याऐवजी ते येशूला विचारत होते, “ मी आहे का तो”  (मार्क १४:१९)? प्रत्येकाला यहूदामध्ये होता तितकाच अंधार स्वत:मध्येही दिसला.


तो एक सभ्य, भक्तिमान तरुण दिसत होता. त्यानेही येशूमागे जाण्यासाठी सर्वस्व सोडून दिले होते. त्यानेही चिन्हे व अद्भुते केली होती. त्यानेही इतर शिष्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानेही येशूचे उपदेश ऐकले, चमत्कार पाहिले, आणि जेव्हा परिस्थिती कठीण झाली तेव्हा तो सोडून गेला नाही. जेव्हा तो गरिबांची मोठी काळजी असल्याचे ढोंग करत होता तेव्हा त्याला खूप सन्मान दिला गेला असेल (योहान १२:५-६). व्यवहारचतुर असल्याने त्यांनी त्याला खजिनदार केले. ह्या अंधाराच्या मुलाने प्रकाशाचा झगा ओढून घेतला होता.

झाडावर दोन व्यक्ती


आपण एक सैतान आहोत हे यहूदाला ठाऊक होते?

हो, आपण चोरी करतोय हे त्याला ठाऊक होते, पण पुन्हा एखाद दुसरे नाणे इथे तिथे घेतल्यास काय मोठे? आपण काही कुणाला दुखावत नाही त्याला वाटले. तरी  त्यामुळे त्याच्या पापी जीवनाचा नाश झाला. खरंतर तोच नाशाचा परिचित मार्ग होता. यहूदाचा मार्ग हा तडजोड करण्याचा मार्ग होता.


आणि आपण सुद्धा गुप्तपणे पापात राहतो तेव्हा आपण सैतानाचे असल्याचे दाखवतो. “ पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला” (१ योहान ३:८). तुम्ही यहुदाच्या मार्गाने चालत आहात का? त्याचे लोंबकळत असलेले शरीर तुम्हाला आठवण करू देत की पाप आणि सैतानाचे अभिवचन कोठे घेऊन जाते.


दुसऱ्या मनुष्याचे गौरव पाहा, ज्याने आपला जीव आपल्या मित्रांसाठी दिला. यहुदाच्या कळपातील लोकांना वाचवावे म्हणून त्याने पित्याबरोबर वायदा केला की तो त्यांच्या बदली शिक्षा घेईल. त्याने स्वखुशीने दगा पत्करला, तुच्छता स्वीकारली, छळ सोसला, देवाच्या क्रोधाखाली भरडला गेला यासाठी की शापाखाली असलेल्या लोकांना अनंतकालिक नाशापासून सोडवावे. दगा देणाऱ्याचे पाय  त्याने कवटाळले यासाठी दगा देणाऱ्यांची सुटका करावी.

जर तुम्ही त्याला गमावणार असाल तर तीस किवा तीस हजार चांदीच्या नाणी घेऊन  तुम्ही काय कराल? अशा कसल्याही आणि कोणत्याही संधीचा तुम्ही धिक्कार करा. अनंतकालिक जीवन म्हणजे पित्याला व त्याच्या पुत्राला ओळखणे. त्याचे नाव : येशू ख्रिस्त. हे नाव स्वर्गाचा सुगंध झाले आहे. आपला धोका हा त्याच्या वेदना होत्या यासाठी की त्याचे गौरव ही आपली संपत्ती व्हावी.

Previous Article

वधस्तंभ – देवाची वेदी

Next Article

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

You might be interested in …

संतापाचं भांडण: पौल व बर्णबा (॥)

(ब) योहान मार्कावर झालेला परिणाम – पहिल्या फेरीत हा तरूण होता पौल व बर्णबाबरोबर (प्रे. कृ. १३:५). त्याचं यहूदी नाव योहान आहे, तर त्यानं जे एक विदेशी नाव घेतलं आहे ते आहे मार्क. त्याचा मार्क […]

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

क्रिस विल्यम्स   “दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण विश्वासू मनुष्य कोणास मिळतो? जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.” निती २०:६-७ हे फळ नीति. ३१ सारखे आहे. जसे  सुद्न्य स्त्री मिळणे […]