नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तो पुन्हा उठला – जगाला धोक्याची सूचना देण्यासाठी

जेसन मायर

“मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे” ( स्तोत्र २:७)

बीप…बीप… बीप

टायमर सुरू होतो.  सावकाश. पण मग  तो वेगाने आणि अधिक वेगाने चालू लागतो. बीप…बीप… बीप…

ह्रदयाची धडधड वाढू लागते. वातावरण गडद होऊ लागते. शेवट जवळ येऊ लागतो…बीप…बीप… बीप…

वेग वाढत जाणारे घड्याळ या खेळामध्ये सारा  बदल घडवून आणते. प्रत्येक भिडू आपल्या संघाला शब्द किंवा विधानाचा उच्चार न करता शब्द ओळखण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा शब्द ओळखला की ते साधन  विरोधी संघाला दिले जाते. संघ ते साधन पुनःपुन्हा  देत घेत आहेत. टायमर खाली खाली जातच आहे – प्रथम सावकाश नंतर वाढत्या वेगाने : बीप… बीप… बीप. बीप थांबताच ज्या संघाकडे ते साधन असेल ते हरले जातात.


येशूचे पुनरुत्थान हे वेळ थोडा उरला आहे याचा सिग्नल कसा दाखवते याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. पुनरुत्थान दिन आपल्याला सांगतो की इतिहास हा आता अधिक आणि अधिक वेगाने बीप करत आहे आणि पश्चात्ताप करण्यास पाचारण करत आहे. लवकरच राष्ट्रे पुत्राचे पदासन बनतील (स्तोत्र ११०:१). त्यांनी आणि आपण प्रत्येकाने  उशीर होण्यापूर्वी पुत्राचे चुंबन घेऊन त्याच्यामध्ये आश्रय घेतला पाहिजे  (स्तोत्र २:१२).


आज मी तुला जन्म दिला आहे

पुनरुत्थानाचे हे  धृवपद स्तोत्रांमधून पुन्हा पुन्हा येते. पण पहिल्याने ते स्तोत्र २ मध्ये दिसते. हे धृवपद तुम्हाला ऐकू येते का?

“मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे” (स्तोत्र २:७)

स्तोत्र २:७ चा ‘आज’ हा पुनरुत्थानाचा रविवार आहे. जसं काही स्तोत्रकर्ता गात आहे; “आज प्रभू उठला आहे.” स्तोत्र २ मधला ‘आज’ हा पुनरुत्थानाचा रविवार आहे हे आपल्याला कसं कळतं? प्रेषित पौल काय उपदेश करतो आणि स्तोत्र २ चे लागूकरण कसे करतो ते ऐका.

असे लिहिले आहे

प्रेषित १३ हा अध्याय येशूचे पुनरुत्थान आणि स्तोत्र २ मधील ‘आज’ यांचा संबंध प्रस्थापित करणारा स्पष्ट शास्त्रभाग आहे. येथे पौल जुन्या करारातून अविश्वासी यहुद्यांना सुवार्तेचे शुभवर्तमान सांगत आहे. येथे तो स्पष्ट करत आहे की, देवाने येशूला मेलेल्यातून उठवले  हे त्यांच्या वाडवडिलांना दिलेल्या अभिवचनाची परिपूर्ती होती. हे सिद्ध करण्यासाठी तो कोणता शास्त्रभाग निवडतो?

“आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. देवाने येशूला पुन्हा उठवून ते वचन तुमच्याआमच्या मुलाबाळांकरता पूर्ण केले आहे; स्तोत्र दुसरे ह्यातही असे लिहिले आहे की, ‘तू माझा पुत्र आहेस; आज मी तुला जन्म दिला आहे’” (प्रेषित १३:३२-३३).


ह्या पौलाच्या उपदेशावर आपण विचार करणे भाग आहे. स्तोत्रकर्त्याने कसे म्हटले की, असा एक दिवस (“आज” )  आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे (तू माझा पुत्र आहे) अशी घोषणा केली गेली.
अनंतकालिक देवपुत्राला आरंभ कधीच नव्हता. असा कोणताच क्षण नव्हता की तो अचानक अस्तित्वात आला आणि त्यावेळी देवाने जाहीर केले की हा माझा पुत्र आहे. तथापि हा शास्त्रभाग असे म्हणतो की, असा एक क्षण होता की देवाने पुत्रत्वाची जाहीर घोषणा केली.

राजा म्हणून घोषणा केली

रोमकरांस पत्राच्या आरंभी पौल देवाच्या पुत्राची सुवार्ता उलगडतो (रोम.१:१-३). तो दोन निराळ्या बिंदुतून देवाच्या पुत्राच्या महानतेवर भर देतो – त्याचे जगातील जीवन:  ( शरीराने तो दविदाच्या वंशातून आला). आणि त्याचे पुनरुत्थित जीवन: पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्‍चित ठरला (रोम. १:४).

अनंतकालिक देवपुत्राची  सामर्थ्यशाली देवाचा पुत्र म्हणून केव्हा घोषणा केली गेली?

उत्तर: “ त्याच्या मेलेल्यांतून पुन्हा उठण्याने.” ही घोषणा राज्यरोहणाचा क्षण आहे कारण आता तो “अधिकाराने ” देवाचा पुत्र आहे. अधिकाराने हा शब्द “दाविदाच्या वंशाचा” ह्या विधानाशी संबंधित आहे. हा दाविदाचा राजेशाही पुत्र यरूशलेमातील त्याच्या राजासनावर बसून राज्य करणार हे अभिवचन पूर्ण करतो. ह्या पूर्तीचा क्षण आहे त्याचे पुनरुत्थान.

दोन राजासनांची कथा

नव्या करारातील देवाच्या पुत्राच्या राज्यरोहणामुळे जुन्या करारातील गोंधळून टाकणारा तणाव दूर केला जातो. देव राजा आहे – त्याचे राहण्याचे ठिकाण स्वर्गात आहे. पण त्याने असेही सांगितले की त्याचे वसतीस्थान यरुशलेमातील मंदिरात आहे. आणि तिथेही एक राजासन होते. – दाविदाच्या वंशातील एक मानवी राजा त्या राजासनावर बसणार होता.  इस्राएलच्या राजांनी वारंवार  देवाच्या अधिकाराविरुद्ध बंड केले. त्यामुळे विश्वाच्या राजाला वारंवार इस्राएलच्या राजांचा न्याय करावा लागला. ही दोन राजासने कशी आणि केव्हा एकत्र येऊ शकतील आणि एक म्हणून राज्य करतील?

उत्तर: येशूचे पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण. येशू दाविदाच्या पुत्राला अभिवचन दिलेल्या राजासनावर बसला. ते राजासन कोठे आहे? जगिक दाविदाला जगिक सियोनात (यरुशलेमात) राजासन होते. परंतु महान दाविदाच्या महान पुत्राचे राजासन स्वर्गीय सियोनात आहे. येशू जिवंत आहे आणि तो मरू शकत नसल्याने हे स्वर्गीय राजासन सर्वकाळ व्यापलेले असणार (इब्री १:१-५).

धोक्याची पूर्वसूचना

पुनरुत्थान दिनासाठी स्तोत्र २ मध्ये आपल्याला काय संदेश आहे? राष्ट्रांनी हा स्वर्गीय निर्णय तातडीने ऐकण्याची गरज आहे: तो उठला आहे. स्तोत्र २ हे सर्व राष्ट्रांना आणि सर्व राज्यकर्त्यांना क्रोध थांबवण्यासाठी सांगत आहे ( स्तोत्र २:१-३) आणि पश्चात्तापासाठी पाचारण करत आहे (स्तोत्र २:१०-१२). का? देवाने त्याच्या पुनरुत्थित राजाचा विश्वाच्या राजासनावर अभिषेक केला आहे.

पुनरुत्थान ही पूर्वसूचना आहे की न्याय येत आहे. राजा उंचावला गेला आहे. बंड सपशेल अयशस्वी झाले आहे. पुनरुत्थान सर्व काही बदलून टाकते. पुत्र मेलेल्यातून पुन्हा उठल्यापासून इतिहास आता न्यायाकडे वेगाने धावत आहे.

हाच मुद्दा पौल प्रेषित १७ मध्ये मांडतो. पुनरुत्थान झाले आहे. अज्ञानाचा काळ संपला आहे आणि पश्चात्तापाची वेळ आली आहे.

“अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे” ( प्रेषित १७:३०-३१)

इतर बाबींसोबत पुनरुत्थान हे ही सांगते देव जे करणार ते करणार. न्याय येत आहे सर्व लोकांना ही धोक्याची सूचना मिळू देत. आणि ज्यांनी ह्या पुत्रापुढे गुडघे टेकले आहेत ते  “कंपित होऊन हर्ष करू देत” कारण  “ त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत”   (स्तोत्र २:११-१२).

Previous Article

तू माझा त्याग का केलास?

Next Article

पुनरुत्थानदिन दहा प्रकारे सर्व काही बदलतो

You might be interested in …

कमकुवतपणाशी युद्ध थांबवा

स्कॉट हबर्ड त्यावेळी मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी जसा काही एक युद्धभूमीवरचा सैनिक होतो. तुम्ही मला शोधले असते तर मी वाचनालयातच सापडलो असतो. पुस्तकात डोके खुपसून बसलेला. माझी बोटे भराभर ओळींवरून फिरत होती. […]

कदाचित उद्या

स्कॉट हबर्ड ज्यांना चालढकल करायला आवडते त्यांना ‘उद्या’ हा जादूचा शब्द वाटतो. उद्याच्या एका साध्या झटकाऱ्याने खरकटी भांडी नाहीशी झाल्यासारखे वाटते, कठीण संभाषणे नाहीशी होतात, इमेल्स लपल्या जातात, घराचे प्रकल्प शांतपणे बाजूला उभे राहतात. आज […]

वाया गेलेले जीवन कसे वाचवावे

ग्रेग मोर्स न उमललेले फूल, न पिकलेले फळ, गर्भधारणा न झालले उदर, न उबवलेले अंडे: एक वाया गेलेले जीवन. जे तुम्ही बोलला नाहीत आणि केले नाहीत ते बोलायला, करायला, फारच थोडा वेळ उरला आहे. तुम्ही […]