मार्शल सीगल
जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रभूची प्रार्थना शिकवत असाल तर कोणती ओळ जास्त समजवून सांगण्याची गरज आहे?
“हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे; आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव” (मत्तय ६: ९-१३).
ही परिचित प्रार्थना म्हणत असताना कोणती ओळ जास्त स्पष्टीकरणाची अपेक्षा करते? कदाचित पहिली ओळ, विश्वाच्या देवाला आपण “बाप” का म्हणतो? कदाचित दुसरी, नाव पवित्र मानले जावो त्याचा अर्थ काय? देवाची इच्छा म्हणजे काय? ती काय आहे आणि या पृथ्वीवर आपण ती कशी ओळखून घ्यावी? किंवा आपल्याला भंडावून सोडणारी शेवटची ओळ, कोणते वाईट आपल्या सभोवती आहे आणि आपल्याला दहशत घालते?
तथापि आपल्याला म्हणता येईल की आपल्याला या प्रश्नासाठी येशूचे उत्तर आहे. एका ओळीसाठी त्याने बरेच काही सांगण्याचे निवडले आहे. आणि त्या ओळीचा आपण कदाचित विचारही करणार नाही.
आपण आपल्या पापासाठी प्रार्थना करतो का?
जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करण्याचे शिकवले तेव्हा त्याने देवाच्या राज्याने सुरुवात केली, देवाची इच्छा आणि देवाचे गौरव – ह्या सर्वासाठी आपण ‘आमेन’ म्हणून प्रतिसादही देऊ.
पण अचानक तो खाली उतरत आपल्या जगिक जीवनाच्या बारीक सारीक गोष्टींकडे येतो: “आमची रोजची भाकर आज आम्हाला दे” असा पुरवठा कोण नाकारणार नाही?
पुढची ओळ कदाचित अधिकच धक्का देणारी वाटेल:
“जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हांला सोड.”
जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देवाला तुम्ही कसे दुखावले याची आठवण करा असे येशू म्हणतो. आज तुम्ही त्याच्याविरुद्ध काय चुका केल्या ते आठवा. त्याच्या गौरवापासून, त्याच्या राज्याच्या दर्जापासून तुम्ही किती घसरलात याची आठवण करा – आणि मग त्याला क्षमा मागा.
तुम्ही इतर काहीही मागितले तरी यासाठी प्रार्थना करण्याची खात्री घ्या असे तो शिकवतो. दररोज तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला खाण्याची गरज असते आणि तुम्हाला त्याने क्षमा करण्याचीही गरज असते. तुमच्या पोटात कावळे ओरडतील आणि तुमचा जीव बंड करून उठेल. त्याप्रमाणेच प्रार्थना करा आणि त्यानुसार जगा.
ह्रदयातला भुकेचा डोंब
बहुतेक ख्रिस्ती लोक दररोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करतात. जरी देवाने अन्न द्यावे म्हणून नाही तरी जेव्हा ते मेजावर येते तेव्हा तरी प्रार्थना करतात. पण जसे आपण भोजनासाठी प्रार्थना करतो तसे आपण सातत्याने आपल्या पापासाठी प्रार्थना करतो का? असे का असावे बरे?
एक कारण असावे की आपल्या अन्नाची गरज आपल्या लगेचच जाणवते. आपल्याला वेदना जाणवते. एखाद दुसऱ्या वेळेला आपण उपाशी राहतो पण अनेकदा नाही आणि खूप दिवस पण नाही. आणि जर आपण असे केलेच तर आपले शरीर आपल्याला ते ऐकवते. आपण हे गृहीत धरून चालतो पण आपल्या मेंदूशी एक किमया निगडीत आहे जी आपल्या आतड्यांना जोडलेली आहे व आपण केव्हा खाण्याची गरज आहे हे ती आपल्याला सांगते. आपण जगण्यासाठी काय खावे हे आपल्याला सतत नमूद करण्याची गरज नाही. आपले शरीर आपली जेवणाची अथवा नाष्ट्याची व पाणी पिण्याही वेळ झाली की तसा संदेश पाठवते. आपण जेवणाबद्दल विसरणे शक्यच नाही कारण अखेरीस आपली भूक इतर कशापेक्षाही मोठ्याने ओरडते.
अनेक कारणांमुळे आपल्या पापी ह्रदयाच्या भुकेची ही कावकाव ऐकण्यास आपल्याला कठीण जाते. ह्रदयाला त्याचा स्वत:चा आवाज असतो पण शारीरिक भुकेसारखा हा आवाज आपल्याला ग्रासून टाकत नाही. हा आवाज सामान्य भुकेपेक्षाही मोठा असू शकतो पण आपण त्यासोबत राहायला शिकतो. अस्वस्थता. काळजी. चिडखोरपणा. आळशीपणा. अधीरता. कुरकुर. ह्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्याच तर आपण त्यांचा मुलाबला करण्याऐवजी त्यांच्याबद्दल सबबी सांगतो.
आपल्यामधल्या ह्या उरलेल्या पापाची लक्षणे येशूने जे शिकवले तेच सांगतात: आपल्याला क्षमा करण्याची गरज आहे आणि ती आपण ओळखून घेतो त्यापेक्षा कितीतरी वेळा अधिक. “आमची ऋणे आम्हांला सोड” ही प्रार्थना आपल्या सततच्या गरजेची एक प्रमाणिक, कृपामय आठवण आहे .
क्षमा संपलीय ना?
कदाचित आपण क्षमेसाठी विशेष प्रार्थना करत नाही कारण आपण गृहीत धरून चालतो की आपल्याला क्षमा केली गेली आहे. जर आपले ऋण पूर्णपणे फिटले गेले आहे तर देवाला आपण क्षमा कर असे का मागावे? जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने घोषणा केली की “ पूर्ण झाले आहे” (योहान १९:३०). तर क्षमा ही चालू राहणारी गरज आहे अशी प्रार्थना करण्यास त्याने का शिकवले?
नीतिमान ठरवणे अथवा दोषनिराकरण होते तेव्हा विश्वासाद्वारे देव आपल्याला स्वीकारतो. पण ही दररोजची गरज नसते. जर आज विश्वासाद्वारे कृपेने तुमचे तारण झाले आहे तर उद्या पुन्हा तुम्हाला नीतिमान ठरवण्याची गरज नाही. “आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे” (रोम ५:१). आणि ही शांती आजच्या किंवा उद्याच्या पापामुळे भंग पावत नाही. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच (रोम ८:१). अनंतकालिक दंडाज्ञा हे काही बागेत रात्रीतून पुन्हा तण उगवते तसे नाही. जे खऱ्या रीतीने ख्रिस्तामध्ये आहेत त्यांची पापे कायमची गेली आहेत.
तरीही येशू आपल्याला प्रार्थना करायला (आणि करीत राहायला ) शिकवतो की “आमची ऋणे आम्हांला सोड” का? कारण नीतिमान ठरवलेले पापी हे अजूनही पापी आहेत. आणि पाप अजूनही देवाशी आपल्या संवादाला अडथळा आणते. नीतिमान ठरवलेल्या व्यक्तीचा पाप नाश करू शकत नाही. – त्यांचे ऋण रद्द केले आहे, त्यांचा शाप त्यांच्यापासून दूर उठवला आहे. क्रोध दूर सारला आहे. याचा अर्थ असा नाही की पाप इजा पोचवू शकत नाही किंवा देवाशी आणि इतरांशी आपला संबंध बिघडवू शकत नाही. नियमितपणे देवाला क्षमा मागण्याद्वारे आपण ख्रिस्ताने पूर्ण केलेले कार्य आजच्या मोह व चुकांसाठी आपल्यासाठी घेतो. आणि त्याच्याबरोबरचा सहवास पुन्हा नव्याने अनुभवतो व त्याच्या आनंद घेतो.
जेव्हा याकोब आपल्याला बोध करतो तेव्हा आपण हे पाहतो, “तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा” (याकोब ५:१६). हे विश्वासी नीतिमान ठरलेले आहेत पण ते अजूनही पाप करत आहेत आणि पापाचे भयानक परिणाम अनुभवत आहेत यामुळे त्यांना प्रार्थना करायला, पाप कबूल करायला आणि क्षमा मागायला सांगितले आहे. आणि जेव्हा ते प्रार्थना करतात तेव्हा पापाने घातलेला गोंधळ ते बाजूला सारतात. ह्या उदाहरणामध्ये ते बरे होतात.
क्षमा कशी मिळवायची नाही
येशूने ह्या ओळीचे काय स्पष्टीकरण दिले हे अजून आपण पाहिले नाही. ही प्रार्थना संपल्यावर तो खास करून ह्या क्षमेच्या विनवणीकडे वळतो. “कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही” (मत्तय ६:१४,१५).
येथे तो देवाची इच्छा किंवा वाईटाचा धोका याचा आढावा घेत नाही तर तो त्यांना ठामपणे सांगतो, क्षमा करणे ही आध्यात्मिक दृष्ट्या किती तातडीची जरुरी आहे. तो त्यांना धोका दाखवतो की जर त्यांनी कटुता बाळगली आणि क्षमा केली नाही तर त्यांच्या प्रार्थना – त्यांच्या इतर कोणत्याही प्रार्थना ह्या ऐकल्या जाणार नाहीत. हा धोका प्रार्थनेत गोवलेला आहेच. “क्षमा करण्यासाठी देवाकडे केलेल्या प्रार्थनेत गृहीत आहे की आपण इतरांना पूर्वीच क्षमा केली आहे. आपण केली आहे?
आपण जितके वेळा जेवतो तितके वेळा तरी आपल्याला क्षमेची गरज आहे. आणि जितक्या वेळा आपल्याला क्षमेची गरज आहे तितक्या वेळा आपण क्षमा करण्याची गरज आहे. आणि जर आपण तसे केले नाही तर आपल्याला क्षमा मिळणार नाही. तर आपण कोणाला क्षमा करण्याची गरज आहे? जर आपण देव म्हणतो तशी क्षमा केली नाही तर प्रभूची प्रार्थनेच्या पुढच्या ओळी खऱ्या अर्थाने आपण म्हणूच शकणार नाही.
क्षमा प्रार्थना करणे शक्य करते
येशूची ही सोपी प्रार्थना आपल्याला सांगते की पापाची समस्या ही आपली रोजची समस्या आहे. दररोजच आपण जे करू नये ते करतो आणि जे करावे ते करत नाही. आपण जे बोलू नये ते बोलतो आणि जे बोलावे ते बोलत नाही.
ज्याचा विचार करू नये तो करतो आणि ज्याचा विचार करावा तो करत नाही. देवासंबंधी असलेली आपले उरलेले बंडखोरी ही प्रभूची प्रार्थना उघड करते. आणि आपल्याला आठवण करून देते की जितक्या आपण प्रार्थना करतो तितक्या वेळा देव आपल्याला क्षमा करतो. आजही, तुम्हालाही – जर तुम्ही नम्रतेने त्याला विचारले तर.
येशूने असे म्हटले नाही की, “ तुमच्या पापाची आठवण करा व लज्जा आणि दोषाने चूर व्हा.” नाही त्याने त्यांना शिकवले की तुमची पापे देवापुढे आणा आणि त्या बदल्यात त्याच्याकडून क्षमा घ्या. आणि त्यांनी क्षमा होण्याची अपेक्षा का करावी? कारण त्याला ठाऊक होते की लवकरच त्याचे खिळ्यांचे व्रण ही प्रार्थना शक्य करणार होते.
त्याने त्यांना फक्त प्रार्थना करण्यासच शिकवले नाही. तो मरणार होता यासाठी की देवाच्या राजासनापुढे त्यांच्या प्रार्थनांना जीवन आणि सामर्थ्य मिळेल. त्याला खिळे, काटे, खांब मिळण्यापूर्वीच तो त्याच्या मित्रांना शिकवत होता की त्यांनी वधस्तंभ कसा स्वीकारावा.
Social