Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 2, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा २०.                                           १ योहान २०-२४                                     स्टीफन विल्यम्स

धडा २०. १ योहान २०-२४ स्टीफन विल्यम्स

 

आत्मविश्वासाने मागणे

तुमच्या घनिष्ट मैत्रीत तुम्ही कधी ताणतणाव अनुभवले आहेत का? त्यावेळी तुमच्या निकटच्या व्यक्तीचे ऐकून घेणे किंवा तिच्याशी बोलणे तुम्हाला अवघड वाटले आहे का? या ताणतणावाचे कारण काय होते? ती फारकत दूर करून पूर्ववत मैत्री प्रस्थापित करायला कशाची मदत झाली?

तुम्हाला कधी आपल्या प्रार्थनेच्या जीवनात रुक्षता जाणवली का? वाटले की देव आपली प्रार्थना ऐकतच नाही? त्यामागे काही कारणेही असतील. आपले असमर्पित जीवन, देवाशी नातेसंबंधात येणारे अडथळे आणि निष्फळ  प्रार्थनामय जीवन. याउलट आपण आज्ञापालनाचे जीवन जगत असू व सवयीने ख्रिस्तावर भरवसा ठेवत असू तर देव आपल्या प्रार्थना ऐकायला तयार असतो. योहान ३:२१-२३ मध्ये योहान फलदायी प्रार्थनेचे अभिवचन देतो.

शास्त्राभ्यास

खात्रीचा परिणाम आत्मविश्वास (व.२१)

प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे (३:२१).

  • योहानाने १९-२० वचनांमधून आपल्याला तारणाची खात्री मिळवण्याची साधने दाखवून दिली. आणि देवासमोर लाज वाटून न घेता उभे कसे राहता येईल ते सांगितले.
    पहिले सत्य आपण जाहीर करतो ते हे की आपण ख्रिस्ताच्या कार्यामुळे उभे आहोत (व. १९).
    पण केवळ सत्य पुरेसे नाही. ते आपल्या आज्ञापालनातून व प्रीतीतून व्यक्त व्हायला हवे. “आपण सत्याचे आहोत हे आपल्याला त्यावरून कळून येईल” (व. १९).
    शेवटी आपल्याला खात्री मिळते, ती आपल्या आज्ञापालनाच्या व कृत्यांच्या परिपूर्णतेमुळे नव्हे. तर आपले जीवन सर्वसाधारणपणे व प्रामाणिकपणे देवाकडे झुकलेले असल्याने. आपण सर्वस्वी त्याच्यावर विसावलेले असल्यामुळे (वचन २०). पेत्राचे उदाहरण आपल्यासाठी उत्तम आदर्श आहे (योहान २१:१७).
    • पण देवासमोर धैर्याने उभे राहणे आणि शंका काढून टाकणे याचा अर्थ काय? योहान २१ व्या वचनात आपल्याला दाखवून देतो की देवासमक्ष खात्री मिळाल्याने देवासमोर धैर्याने उभे राहता येते.
    अविश्वासूपणा हा ताटातुटी, लज्जा व तुटलेल्या नातेसंबंधांकडे नेतो (२:२८).
    ۰         दोन व्यक्तींच्या मध्ये काही असेल तर त्यांच्या मोकळ्या सुसंवादात अडथळा येतो.
    ۰         नेहमी असा एखादा मोठा अडथळा असतोच.
    • देवाचे वचन इशारा देते की अनेक बाबतीतील आपला अविश्वासूपणा आपल्या प्रार्थनांमध्ये अडखळण आणतो. उदाहरणार्थ :
    ▫         यशया ५९:२; स्तोत्र ६६:१८ – पाप न हाताळल्यास प्रार्थनेला अडथळा येतो.
    ▫         १ पेत्र ३:७ – घरात सतत मतभेद असतील तर प्रार्थनेला अडथळा होतो.
    वचन २२कडे पाहिल्यास त्या वचनाच्या उलट कृतीही त्याबाबत खरी ठरते. जर आपण देवाचे आज्ञापालन करत नसू व त्याला संतोषवणारे जीवन जगत नसू तर आपण जे काही मागू ते त्याच्याकडून आपल्याला प्राप्त होत नाही.
    •  “जर आपले अंत:करण आपल्याला दोषी ठरवत नसेल तर” – प्रामाणिकपणे आपण आपल्या जीवनाकडे पाहिले तर तुम्हाला सचोटी दिसते का? तुम्ही निष्पाप दिसाल असे नव्हे, पण तुम्ही देवाला तुम्हाला हाताळण्याची खरोखर मुभा देता का?
    गुप्त पातके व पश्चात्ताप न केलेला गर्व खात्रीने नातेसंबंधांमध्ये अडथळा आणतातच.
    आपण देवासमोर पूर्ण मोकळे असावे असे योहान इच्छितो.
    ۰         मानवी परिपूर्णतेने नव्हे
    ۰         तर सतत ख्रिस्तावर अवलंबून राहण्याने. आज्ञापालन व प्रीती ही त्याचा पुरावा असतील.

खात्री मिळण्याचे कारण आज्ञापालन (वचन २२-२४)

आणि आपण जे काही मागतो ते आपल्याला त्याच्यापासून मिळते. कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशूख्रिस्त याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा, आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहातो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्या ठायी राहतो (३:२२-२४).

  • जेव्हा नातेसंबंधात दोषारोप नसतो तेव्हा त्या नात्यातील फळे चाखण्याची मजा सर्वतोपरी लुटता येते.
    • देवाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधांमध्ये श्रेष्ठाकडून कनिष्ठाकडे आशीर्वाद येतात. म्हणजे देव या  नातेसंबंधात प्रत्येक आशीर्वादाची ओतणी करायला तयार असतो.
    •           अटीसह असलेले हे विधान पाहा:
    ▫         कारण: आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला आवडेल तेच करतो
    ▫         परिणाम: आपण जे काही मागू ते तो आपल्याला देतो.
    •  हे वाक्य खरे तर जीवनरहाटीचे वर्णन करते. अवेळी केव्हातरी केलेली फलदायी प्रार्थना नव्हे – आपण जे मागू ते आपल्याला प्राप्त होते. कारण आपण पाळतो… व करतो…

त्याच्या आज्ञांचे पालन करणे म्हणजे काय?

  • वचन २३ मध्ये अत्यंत महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत. “त्याच्या आज्ञा पाळणे याचा अर्थ काय?

पुन्हा आपण गैरसमज करून घेऊ नये की आपल्यामधील ख्रिस्ताचे जीवन दर्शवणाऱ्या रूपांतरित अंत:करणाविषयी योहान बोलत आहे. तो आज्ञा कोणत्या आहेत याविषयी स्पष्टीकरण करत आहे.
ती आज्ञा ही आहे:
۰ देवाचा पुत्र येशूख्रिस्त याच्या नावावर विश्वास ठेवा, हे विधान ख्रिस्तावर प्रभू म्हणून पूर्णपणे अवलंबून राहण्यास बांधिल व समर्पित राहण्याविषयी सारांश रूपात सांगते (योहान ८:३; मत्तय ७:२१; लूक ६:४६).
۰एकमेकांवर प्रीती करा (समर्पणाने अवलंबून राहण्याचा हा परिणाम आहे).
۰ योहान २४ व्या वचनात याचा अर्थ काय ते स्पष्ट करतो – जेव्हा सवयीने तुम्ही ख्रिस्तावर अवलंबून राहता (त्याच्या नामावर विश्वास ठेवत) आणि त्याच्यावर अवलंबून असल्याचे दाखवत राहता (परस्परांवर प्रीती करत). हे देवाचा आत्मा आपल्यामधून फळ देत असल्याचे चित्र आहे.
۰ देवाच्या कृपेने व सामर्थ्याने व  त्याच्या पोषणाने आपण फलदायी होत आहोत, असे जेव्हा देव पाहातो तेव्हा तो पूर्णपणे आपल्या विचारात व कृतीत आपल्याला पुढे आणखी फलदायी व वाढ करायला स्वेच्छेने सरसावतो.

मागणे याचा अर्थ काय?

  • प्रार्थना म्हणजे आपल्याला हवे ते प्राप्त करण्याचे जादूचे प्रवेशद्वार नाही, असे वचन आपल्याला शिकवते हे आपण समजून घेतले पाहिजे. खरे तर आपण कशा पद्धतीने प्रार्थना करतो ही गोष्ट देखील देवाला उत्तर द्यायला       अडखळण ठरू शकते (याकोब ४:३).
    •           दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्याला “देवाच्या इच्छेत”  प्रार्थना करायला सांगितली आहे (१ योहान  ५:१४).
    •           पण योहान देवाची इच्छा या ठिकाणी सांगत नाही. तर तो जीवनशैलीविषयी बोलतो.
    योहान असे सांगत नाही की आपली प्रार्थना आपण अशी रचून सादर करावी की देवाची इच्छा पूर्ण होत असल्याचे त्यातून व्यक्त होईल.
    त्याला आपण हे समजून घेतलेले हवे आहे की आपले जीवन आपण त्याच्या इच्छेनुसार ठेवले  पाहिजे.
    आपल्या अंतर्यामात आपली इच्छा देवाच्या इच्छेशी समरूप झालेली असल्याचा पुरावा आपले आज्ञापालन असते.
    •           एवढे सर्व सांगून झाल्यावर आपण देवाच्या येथे दिलेल्या अभिवचनाच्या मर्मावर मनन करायला हवे – या सर्व गोष्टी झाल्यास आपण अपेक्षा करू शकतो की “- आपण जे काही मागू ते आपल्याला त्याच्याकडून प्राप्त होईल?”

 

चर्चा व मननासाठी प्रश्न

  • तुमचे प्रार्थनेचे जीवन कसे आहे? तुम्ही सवयीने ख्रिस्तावर अवलंबून नसल्याने ते शुष्क आहे का?
    • तुम्ही धैर्याने प्रार्थना करता का?
    ▫         केवळ तुमच्या इच्छांची पूर्तता व्हावी म्हणून नव्हे.
    ▫         परंतु धैर्याने देवाच्या राज्यासाठी? प्रियजनांच्या तारणासाठी? भ्रष्टता, दुष्टता व अन्यायासाठी?                                             तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात देवाचे रूपांतराचे काम व्हावे म्हणून?
    तुम्ही विश्वासी आहात की कुरकुरे आहात ? विश्वासी अपेक्षेने प्रार्थना करतात, कुरकुर करणारेआशाहीनतेने तक्रारी करत राहतात.
    •           बायबलमधील कोणत्या प्रार्थनांकडे आपण आदर्श प्रार्थना म्हणून पाहू शकतो?