ग्रेग मोर्स

कुरकुर.
कुरकुर या शब्दात काय आहे? स्वर्गामध्ये न ऐकलेला आवाज, मानेने नाही म्हणणारे ह्रदय, श्वासाखाली असणारा शाप, अनेक मान्यवर पापांचा उच्छवास – अकृतज्ञता, आभार न मानणे, असमाधान. तो एक काबूत असणारा क्रोध आहे, एक तिरस्कार, सैतानाने घातलेल्या दहशतीचा पडसाद, एक भग्न सूर. तो एका सुस्काऱ्यात ऐकू येतो. एका रोगी ह्रदयाची ढास.
संपूर्ण नव्या करारात या कींव करविशी वाटणाऱ्या विनवण्या कानावर पडतात. योहान ६ मध्ये लवकरच प्रेषित होणाऱ्या शिष्यांचा वाढता आवाज आपण ऐकतो, मग द्वेषाने भरलेल्या शास्त्री व परूशी यांच्या संदर्भात. तरीही नव्या कराराचे लेखक मागे वळून त्यांच्या पूर्वजांचे कुरकुरणे ऐकतात. प्रेषित पौल लिहितो;
“त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगांच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत” ( १ करिंथ १०:९-११). देवाच्या आत्म्याने रानातील इस्राएलांचा इतिहास नमूद केला आहे यासाठी की आपण या सहज केलेल्या व दुर्लक्षित पापाबद्दल शिकावे.
बडबडणाऱ्यांपासून धडे
पहिले कुरकुरणारे कोण हे बायबलमध्ये पाहण्याचे धाडस केलं तर ते खुद्द देवाचे लोक आणि तेही त्यांची मिसरातून सुटका झाल्यानंतर, अशी कल्पना तरी करवेल का?
फारोच्या आव्हानामुळे मिसरावर दहा पीडा आल्या. आता त्याचे सैन्य आणि रथ सागराच्या तळाशी गेले होते आणि वरचे पाणी संथ झाले होते – इस्राएल आता मुक्त झाला आहे. देवाची स्तुती स्वर्गात आणि पृथ्वीवर दुमदुमत आहे. तांबड्या समुद्राजवळ गाण्याचे शब्द गजर करत आहेत. ते म्हणतात, “मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत” (निर्गम १५:१).
याच जिव्हा याच अध्यायाच्या शेवटी कुरकुरीचे धृपद गातील अशी कल्पना कोण करेल? सैतानाचे गीत येथे प्रवेश करते. हेच आता त्यांच्या डोक्यात भरून राहिले आहे. परीक्षेनंतर परीक्षा – पाण्याची गरज, नंतर अन्न, मग पुन्हा पाणी- यामुळे ते अधिक आणि अधिक कुरकुर करू लागले बडबडू लागले. निर्गम १५-१६ अध्यायाच्या या परिचित आवाजांमधून काही धडे शिकू या.
देव आपल्याला वंचित करतो ते आपल्या आत काय आहे हे पाहण्यासाठी.
आता ते शूर च्या रानात आले आहेत. लाखो जण पाण्याशिवाय पुढे चालत आहेत. एक दिवस जातो, मग दोन मग तीन. अखेरीस दूरवर पाणी दिसते. ते पिण्यासाठी खाली वाकतात – थू… तहानेने मरत असतानाही ते थुंकून टाकतात. ते त्या ठिकाणाचे नाव ‘मारा’ म्हणजे ‘कडू’ ठेवतात.
“नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले” (निर्गम १५:२२-२३). शेवटी पाणी मिळाले अन तेही न पिण्याजोगे?
देवावरचा भरवसा तुम्हाला येथे नेतो का? कारण पहिल्याच वेळी आपण बायबलमध्ये वाचतो, तेव्हा “आम्ही काय प्यावे?” असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली (निर्गम १५:२४). आणि नंतर जसे देवाने पाण्याचे केले तसे त्याने त्यांच्या पोटाचेही केले. “ त्याने त्यांना कसोटीस लावले” ( वचन २५). “त्याने तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली चाळीस वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले; तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले” (अनुवाद ८:२-३) आणि त्याने त्यांच्या लोकांमध्ये ‘मारा’ पाहिले. ह्रदयात जे असते त्यातून तोंडाद्वारे सुस्कार बाहेर पडतात.
जेव्हा देवाने पुरवलेल्या कडू पाण्याजवळ तुम्ही गुडघे टेकता तेव्हा देव तुमच्याकडून काय ऐकतो? तुमच्या स्वर्गीय बापाकडे मदत आणि दयेची याचना की या अविश्वसनीय देवाविरुद्ध कुरकुर?
२. कुरकुर ही देवाविरुद्ध तक्रार करते.
जर आपण मुभा दिली तर कुरकुर ही आपल्या परिस्थितीला देवाविरुद्धचे शस्त्र बनवते. तरीही तसे वाटत नसते नाही का? मी तक्रार करतोय कारण मला कामाला उशीर झालाय किंवा मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय – मला देव आवडत नाही म्हणून नाही. मोशे इस्राएलांचे कुरकुरीचे विश्लेषण काय करतो ते ऐका.
मोशे आणि अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “परमेश्वरानेच तुम्हांला मिसर देशातून आणले हे तुम्हांला संध्याकाळी कळून येईल, आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.” (निर्गम १६: ६-८).
मोशे स्पष्टपणे सांगतो, तुमच्या तक्रारीचे बाण प्रभूकडे सोडले आहेत. हेच आपल्या बाबतीत खरे आहे. आपल्या मानवप्राण्यांचे आक्षेप तो त्याच्या राजासनाविरूढ असलेला निषेध असा ऐकतो. आणि खरे तर त्याच्या डोळ्याला डोळा भिडवणे आपल्याला शक्य नसते. एखादा बॉस, किंवा वंध्यत्व, किंवा उधळलेल्या योजना किंवा कॅन्सर काय आहे की ज्यांना आपण इतकी मोठी आपत्ती करतो? देव हा अनंत सुज्ञतेने आणि काळजीपूर्वक राज्य करतो. त्याच्या विरुद्ध, त्याच्या विरुद्धच आपण कुरकुर केली आहे आणि त्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले आहे.
३. कुरकुर ही फक्त जवळचे पाहते.
“मग ते एलीम येथे आले, तेथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला” (निर्गम १५:२७).
झरे नसलेले शूरचे रान बहुधा एलीमच्या भरपुरीकडे नेते. शूरमध्ये सुद्धा ह्या लोकांच्या तीरीमिरीला दयाळूपणे उत्तर दिले, तिथले कडू पाणी गोड करून. पण सुटका पोचण्यापूर्वी आणि त्यांचे कोरडे घसे तो गोड घोट घेण्याआधी किती जणांनी विश्वास ठेवला होता?
एलीमला आता हा बिंदू कळस गाठतो – आणि माझ्या ह्रदयाला भेदून जातो. किती वेळा मी अखेरीस बारा झरे व खजुरीची झाडे असलेल्या एलीमपाशी अखेरीस पोचलो आहे जेथे देव मला नेत होता – आणि माझ्या अविश्वासामुळे मला पश्चात्ताप होतो? त्याने मी कसाही असलो तरी आशीर्वाद दिला आणि मी सर्व रस्ताभर कुरकुर करत होतो.
मला शरम वाटावी – आणि त्याच्या धीराचा गौरव व्हावा – म्हणून आपल्या कुरकुरीपेक्षा देव अधिक दयाळू आहे. पण यामुळे आपण आपल्या कुरकुरीचा द्वेष करायला हवा. आपला प्रतिकार आणि कुरकुरणे हे आपल्या नाकापलीकडचे पाहत नाही. अगदी वळणावरच हसत्या पुरवठ्याचा विसावा आहे. आपला देव मिसरातून आपल्याला बाहेर काढून रानामध्ये आपल्यासाठी मेजवानी सादर करतो (निर्गम ५:१). पण मधल्या वेळात ज्याने देवाला शाप दिले नाहीत तो धन्य.
४. कुरकुरणारे ह्रदय वास्तव विपरीत करते.
इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे” ( निर्गम १६:३).
बडबडणारे ह्रदय देवाबद्दल दुष्ट विचार करते आणि पूर्वीची दु:खसहने उत्तम मानते. देव त्यांना पुरवठा करणारा व रोगमुक्त करणारा होणार होता (निर्गम १५:२६). तरीही मटणाची पातेली आणि मिसरच्या खानावळी अतृप्त मनात उसळी घेतात. रानामध्ये कमतरतेला तोंड देण्यापेक्षा देवाच्या हाताखाली त्या पिडांमध्ये मरणे ते पसंत करतात.एक महिन्यापूर्वी शत्रूला दगडासारखे बुडवून टाकल्याबद्दल त्यांनी देवाची स्तुती केली होती. आता त्यांना तो दगड बनण्याची इच्छा होते.
जेव्हा वाट वळणे घेऊ लागते व हरवल्यासारखे वाटते, जेव्हा पुरवठा संपून जातो. जेव्हा परिस्थिती इतकी खराब होते की ध्येयच उरत नाही तेव्हा देव त्याच्या लोकांबरोबर असतो त्यांन मौल्यवान सत्ये शिकवत. “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले; तुझी उपासमार होऊ दिली, आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले” (अनुवाद ८:३).
देवाचा महान इस्राएल येशू ख्रिस्त अरण्यातील चाळीस दिवसात हा धडा शिकला आणि जेव्हा सैतानाने त्याला मोह घातला तेव्हा त्याने या वचनाचा संदर्भ दिला (मत्तय ४:४). हे मोसम सुद्धा आपल्याला विश्वासाने चालायला, त्याच्या वचनाने आपल्या जिवाचे पोषण करायला, त्याच्या अभिवचनावर धाडसाने विश्वास ठेवायला शिकवतात. आणि हे धडे आपल्या जीवनाला दिशा देणारे आणि स्वर्गात अभिमानाच्या आठवणी बनतील.
तृप्त आणि प्रकाशित
हा ख्रिस्ती व्यक्तीचा वाट आहे- कुरकुरीची उपासमार करणेच नाही तर उपासनेवर पोषण करणे. देवाने आपल्याला याहून मोठ्या निर्गमनातून पार नेले आहे आणि त्याच्या पुत्रामध्ये याहून महान प्रीती दाखवली आहे. “परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला”
( रोम ५:८). आपण आता असे लोक आहोत की आपण “एकमेकांना आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गातो” (कलसै ३:१६).
तर मग आपण आपला दिवस गीत गाऊन सुरू करतो आणि तीच सकाळ संपताना चिडचिड आणि नाखुषी व्यक्त करतो हे जेव्हा देवदूत पाहतात तेव्हा त्यांना कसा धक्का बसत असेल? पौल याविरुद्धच्या युद्धासाठी शिंग फुंकतो.
“जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता” (फिली. २:१४-१६)
पौल हा भरवसा ठेवणाऱ्या संतांचे अंधारमय व कृतघ्न अशा जगातील प्रकाशित जीवनाचे वर्णन करतो. हे सर्व उपासनेच्या दैवी जीवनाद्वारे होते. असे प्रकाशमान जगण्यास तुम्हाला हवे ना? ख्रिस्ताचा गौरवासाठी, देवाचे वचन घट्ट धरून अगदी वळणावर असलेल्या त्या महान एलीमकडे जात असताना.
Social