नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक १४

महान संकटाचा काळ

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते की या जगात तुम्हाला बहुत कष्ट होतील (योहान १६:३३). त्यानुसार आजवर बहुत ख्रिस्ती जनाचा छळ होऊन रक्तसाक्षीही व्हावे लागत आहे. तरीही येशू मत्तय २४:९,२१ मध्ये एका खास संकट काळाविषयी बोलत आहे. त्या काळाला ‘महान संकटाचा काळ’ असे संबोधले आहे. या पृथ्वीवर येशूचे राज्य स्थापले जाण्यापूर्वी होणार्‍या दैवी न्यायाचा हा काळ आहे. तो सात वर्षांचा काळ असेल. त्याचे भाकीत दानीएल ९:२७ मध्ये आढळते. इतर कोणत्याही भाकितांपेक्षा येशू या काळाविषयी अधिक बोलतो.

इस्राएलांस राष्ट्र म्हणून एकवटण्या संदर्भात जुना करार या महान संकटाच्या काळाविषयी बोलतो. अनुवाद ४:३० मध्ये या काळाविषयी देव त्यांना पूर्वसूचना देताना दिसतो. तर यिर्मया ३०:७ मध्ये ‘याकोबाचा क्लेशमय महादिन’ असे शब्द वापरलेले दिसतात. सफन्या १:१५ मध्ये ‘क्लेशाचा उदासीनतेचा दिवस’ म्हटले आहे. यशया ३४:८ मध्ये त्याला ‘न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा दिन’ असे संबोधले आहे. मत्तय अध्याय २४ व २५; मार्क अध्याय १३; लूक अध्याय २१; प्रकटी अध्याय ६ -२१ मध्ये नवा करार या काळाच्या सविस्तर नोंदी देतो. तोवर चालू असणार्‍या सध्याच्या लढाया, लढायांच्या आवया, दुष्काळ, भूकंप अशा घटनांना प्रसूती वेदनांची उपमा दिली आहे. या काळात येशूच्या शिष्यांना विरोध, त्यांचा तीव्र छळ, विश्वासघात, अनेक खोट्या संदेष्ट्यांचा उदय, अधर्माचा कळस असे सारे चालू असता देवाच्या राज्याच्या जगभर सुवार्तेची घोषणा होतच राहील. आणि यहूदी व विदेशी दोहोंचेही तारण होत राहील. प्रकटी ७:४-९.

दानिएलाने ९:२७ मध्ये प्रथमच नमूद केलेल्या ‘ओसाडीची अमंगळता’ या भाकीताची तेव्हा परिपूर्ती होईल. ही घटना सात वर्षांच्या महासंकटकाळाच्या मध्यावर म्हणजे साडे तीन वर्षांचा पहिला टप्पा संपल्यावर मध्यावर घडेल. त्यावेळी इस्राएलांशी सप्तकाच्या आरंभी केलेला करार ख्रिस्तविरोधी मोडेल व त्यांच्या मंदिरातील उपासना बंद करील. आणि हा आज्ञाभंजक पुरुष त्यांच्या मंदिरात घुसून स्वत:लाच देव म्हणून घोषित करील. २थेस्स.२:३-४. या घटनेनंतर इस्राएलांचा भयानक छळ होईल. म्हणून त्यावेळी तेथे असणार्‍या नागरिकांसाठी येशूने इशारा देऊन ठेवला आहे की त्यांनी नगर सोडून तातडीने पळून जावे. काहीही सामान घेण्यास मागे परतू नये, मत्तय २४:१६-२०. त्या काळी आकाशात व अंतराळात सूर्य, चंद्र, तारे यांमध्ये चिन्हे दिसतील, मत्तय २४:२९. मग येशूचे सर्व देवदूतांसह या भूतलावर गौरवाने व सामर्थ्याने द्वितीयागमन होईल. तो आपल्या निवडलेल्यांना एकवट करील. सर्व राष्ट्रांचा न्याय करून त्याच्या राज्यात भूतलावर असणार्‍यांपैकी कोणी प्रवेश करायचा ते ठरवील. मत्तय २५:३१ -४६ वाचा. प्रकटी ६-१८ अध्यायातील घटनांचा तपशील महासंकट काळातील घटनांचा आहे. शिक्क्यांचे, कर्ण्यांचे व वाट्यांचे न्यायाचे वर्षाव देव एकामागून एक त्या काळातच ख्रिस्तविरोध्यावर व जगातील अविश्वासीयांवर देवदूतांकडून करवून घेईल. सर्व न्यायांची सुरुवात येशू स्वत: शिक्के फोडून करील. देवपिता व येशूख्रिस्त या न्यायांद्वारे आपला क्रोध ओततील.

सहा शिक्क्यांच्या न्यायात
१-ख्रिस्तविरोध्याचे आगमन
२- लढाया
३- दुष्काळ
४-मृत्यूचे थैमान
५- रक्तसाक्ष्यांचे मरण
६- भूकंप (प्रकटी ६:२-१२)  ह्या घटना घडतील.
मत्तय २४:४-७ मधील घटनांना लागून ती परिस्थिती हे तीव्र रूप धारण करील. ६ व्या शिक्क्याच्या वेळी पृथ्वीवरील लोकांना समजेल की हा देवाचा व कोकर्‍याचा क्रोध ओतला जात आहे. प्रकटी ६:१६-१७ वाचा. खरे तर ह्या बिंदुपाशी नव्हे तर पहिल्या शिक्क्यापासूनच देवाचा क्रोध सुरू होणार आहे. पण सहाव्या शिक्क्यापर्यंतच्या अनुभवानंतर लोकांच्या लक्षात येणार आहे की हा नक्कीच देवाचा क्रोध आहे.सातवा शिक्का कर्ण्यांचा न्याय घेऊन येईल.

कर्ण्यांचा न्याय

पहिला कर्णा – पृथ्वीवरील एक तृतीयांश भाग झाडे व हिरवळ ही जळून जातील. प्रकटी ८:४-७.
दुसरा कर्णा – पृथ्वीवरील एक तृतीयांश समुद्रातील जलचर मरतील व जहाजे नाश पावतील. ८:८-९.
तिसरा कर्णा – पृथ्वीवरील नद्यांच्या जलांचे पाणी दूषित झाल्याने जलचर व मानव मरतील. ८:१०:११.
चवथा कर्णा – सूर्य चंद्राचा एक तृतीयांश भाग काळा पडेल. ८:१२.
पाचवा कर्णा – टोळ व दुरात्मे लोकांना पीडा देण्यासाठी सोडण्यात येतील. प्रकटी ९:१-११.
सहावा कर्णा – चार दुरात्मे एक तृतीयांश मानवांना ठार करण्यास सोडले जातील. ९:१३-१९.
सातवा कर्णा – ख्रिस्ताच्या राज्याची घोषणा होईल. ११:१५-१८.

अंतिम न्यायाचा कळस  

सात वाट्यांचे फार भयानक न्याय एका पाठोपाठ एक वेगाने वर्षिले जातील.
पहिली वाटी – वेदनादायी फोड. प्रकटी १६:२
दुसरी वाटी – समुद्र रक्तमय होऊन समुद्रातील मासे मरतील. १६:३.
तिसरी वाटी – नद्या व झर्‍यांचे पाणी रक्तमय होईल. १६:४-७.
चवथी वाटी – सूर्याच्या दाहाने व अग्ंनिने लोक भाजतील १६:८-९
पाचवी वाटी – अंधकार व प्रचंड वेदनांनी माणूस त्रस्त होईल. १६:१०-११
सहावी वाटी – पूर्वेकडील राष्ट्रांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून फरात नदी कोरडी पडेल. १६:१२-१६
सातवी वाटी – प्रचंड मोठा भूकंप होईल. महानगराचे तीन भाग होतील. नगरे पडतील. प्रचंड वजनांच्या गारांचा वर्षाव होईल. १६:१७-१८.

महासंकट काळाचा दुहेरी हेतू

१- महासंकट काळाचा वापर करून देव त्यातून इस्राएलांचा बचाव करील व दानीएल ९:२४ या भाकिताची पूर्तता होईल. इस्राएलांना पापांची जाणीव होईल व सार्वकालिक धार्मिकता उदयास येईल. मंदिराला अभिषेक होईल. जरी ख्रिस्तविरोध्याशी करार करून इस्राएल महासंकटात प्रवेश करील तरी मशीहाचा धावा करीत त्यातून बाहेर पडेल.
२- पृथ्वीवरील अविश्वासीयांचा न्याय करण्यास देव महासंकटाचा वापर करील. प्रकटी ३:१०; यशया २४:१ -५. अशा प्रकारे महासंकट काळ हा अधम व बंडखोर जगावर ओतल्या जाणार्‍या देवाच्या क्रोधाचा आहे.

ख्रिस्तविरोधी

येणार्‍या ख्रिस्त विरोध्याविषयी बायबल भरपूर भाकिते करते. तो पापाचा सैतानाकडचा देहधारी प्रतिनिधी आहे. ‘ख्रिस्तविरोधी’ हा शब्दप्रयोग करताना १ योहान २;१८ मध्ये काय लिहिले ते पहा. “मुलांनो ही शेवटची घटका आहे. आणि ख्रिस्त आणि ख्रिस्तविरोधी येणार हे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्ताविरोधी उठले आहेत. ह्यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटची घटका आहे.”
येथे ख्रिस्तविरोधी येणार असे सांगितले असतानाच पुष्कळ येऊन चुकले आहेत असेही सूचित केले आहे. हे ‘तो’ ख्रिस्तविरोधी नव्हे तर त्याच्या आत्म्याप्रमाणे चालणारे आहेत. आणि येशू जो आहे आणि ज्याविषयी तो ठाम आहे त्याला ते विरोध करत राहतात. व्यक्तिश: एक ख्रिस्तविरोधी येणार आहेच. तरी त्याच्या आत्म्याप्रमाणे चालणार्‍यांचा आपण आताही अनुभव घेत आहोत. ख्रिस्तविरोधी म्हणजे ख्रिस्ताचा विरोधक किंवा ख्रिस्ताच्या प्रतिमेचे ढोंग घेणारा तोतया असाही अर्थ होतो. म्हणूनच दानिएलाचे ९:२७ मध्ये स्पष्ट भाकीत आहे की ‘तो आपणच मशीहा व तारणारा’ असल्याचे सांगून पुष्कळांना फसवील. खर्‍या अर्थाने तो तर ख्रिस्त व त्याच्या पवित्र जणांचा विरोधक असेल.
महासंकट काळाच्या मध्यावर तो इस्राएलांचा अमानुष छळ करील. दानीएल त्याचा अधिक तपशील देतो. ९:२६ नुसार तो दुर्भाषण करणारा एक ढोंगी अधिपती असेल. हेच ते देवाविरुद्ध लढणारे ७: ८, २१, मधील ते पवित्र जनांविरुद्ध लढणारे ‘लहान शिंग’ असेल. तोच ९:२७ मधील यहुद्यांची अर्पणे बंद करणारा, मंदिर भ्रष्ट करणारा व महासंकट काळात केलेला करार मोडणारा असेल. आणि दानी ११:३६-४५ नुसार तो स्वयंघोषित राजा, स्वत:लाच उंचावणारा, देवाविरुद्ध बोलणारा, कोणाही प्रतिस्पर्धी दैवताला धिक्कारणारा व आपल्या सैन्यबलावर भरवसा ठेवणारा असेल. नवीन करारात त्यालाच आज्ञाभंजक, मंदिर भ्रष्ट करणारा म्हटले आहे.
हाच अधम पुरुष प्रभूच्या दिवसाशी जोडला आहे. तोच स्वत:ला आराध्य दैवत म्हणून घोषित करणार आहे. त्यासाठी तो मंदिरात आपले आसन स्थापन करणार आहे. २ थेस्स. २:१-४. ही भयानक घटना इस्राएलांचा छळ घडवून आणील. येशूने याविषयी इशारे दिले आहेत. मत्तय २४:१६-२२. त्याच्याविषयी प्रकटी १३ मध्ये ‘श्वापद’ या नावाने तपशील दिला आहे. सैतानाच्या सामर्थ्याने व त्याच्या अधिपत्याखाली असणार्‍या राष्ट्रांमधून तो उदय पावेल. प्राणघातक घायातून बरे होण्याने व येशूच्या पुनरुत्थानाची नक्कल करून तो जगाला चकित करील आणि पवित्र जणांविरुद्ध लढा उभारील. जगावर अधिपत्य चालवून येथे कायमचे सैतानाचे साम्राज्य स्थापण्याचा प्रयत्न करील. प्रकटी १३:१-८. आणि तो भयप्रद शक्तिशाली असेल. त्याचा कार्यकाळ अल्प असेल. तो त्वरित नाश पावेल. केवळ श्वासाने येशू त्याचा नाश करील. उद्ध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल. २ थेस्स.२:८; दानी ९:२७;११:४५. त्याच्या अंतकाळी त्याला कोणी सहाय्य करणार नाही. अग्निसरोवरात त्याचा शेवट मुक्रर केला आहे. प्रक. १९:२०.

                                                          प्रश्नावली


प्रश्न १ ला
विवेचनाचा वापर करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

१- सध्याच्या कोणत्या घटनांना प्रसूतीच्या वेदनांची उपमा दिली आहे?
२- कशा वातावरणात सुवार्तेची घोषणा चालूच आहे?
३- कोणत्या घटनेनंतर इस्राएलांचा छळ सुरू होईल?
४- न्यायाची सुरुवात कोण करील व कशी?
५- ख्रिस्तविरोधी करार मोडेल तेव्हा काय होईल?
६- मत्तय २४:१६-२० मधील इशारे कोणत्या रहिवाश्यांसाठी आहेत?
७- प्रकटीकरण ६-१८ अध्यायांतील तपशीलाचा विषय काय आहे?
८- सहांपैकी प्रत्येक शिक्क्याचा न्याय किवा घटना सांगा.
९- सातव्या शिक्क्याने काय घडेल?
१०- प्रत्येक कर्णा कोणता न्याय आणील?
११- अंतिम न्यायाचा कळस कोणत्या भयंकर न्यायांनी होईल?
१२- महासंकट काळाचे दोन हेतू कोणते?
१३- सध्याचे ख्रिस्तविरोधी कसे चालणारे आहेत? ते काय करतात?
१४- ‘ख्रिस्तविरोधी’ या शब्दाचा अर्थ काय? तो काय करतो? तो कसा असेल?
१५- तो मंदिरात आपले आसन स्थापण्याचे कारण काय?
१६- तो कशाची नक्कल करील? हा प्रयत्न कशासाठी असेल?
१७- त्याचा शेवट कसा होईल?

प्रश्न २ रा- पुढील घटनांना १-६ घटनाक्रम द्या.

१- सैतानाला आगाधकूपात बंदिस्त केले जाईल.—–
२- महानसंकटाच्या मध्यावर ख्रिस्ताविरोधी करार मोडेल.——
३- येशूचे देवदूतांसह गौरवाने पृथ्वीवर आगमन. —–
 ४- महासंकट काळापूर्वी देवाच्या लोकांचा छळ आणि यहूदी व विदेश्यांचे तारण.—-
५- सर्व राष्ट्रांचा न्याय होऊन १००० वर्षांच्या राज्यात कोणी जावे ते ठरेल.—–
६- आकाशात चिन्हे दिसतील.—–

प्रश्न ३ रा- कंसातील संदर्भ / पर्याय योग्य वर्णनापुढे लिहा.
( ७ वर्षे; यिर्मया ३०:७; मत्तय २४:१-२२; सफन्या १:१५; मत्तय २४:१६-२०; दानीएल ९:२७; अनुवाद ४:३०; यशया ३४:८; योहान १६:३३; महान संकटाचा काळ )

१. इस्राएलांचा अमानुष छळ ——-
२. ओसाडीची अमंगळता —–
३. न्याय मिळावा म्हणून सूड उगवण्याचा दिवस —-
४. क्लेशाचा उदासीनतेचा दिवस—
५. येशूच्या शिष्यांना जगात बहुत कष्ट होतील —–
६. महासंकटकाळाची कालमर्यादा——
७. दैवी न्यायाचा काळ —-
८. मोशेद्वारे महासंकट काळाची पूर्वसूचना—-
९. याकोबाचा क्लेशमय महादिन—–
१०. इस्राएलांना इशारे—–

Previous Article

आपल्या श्वासाखाली असलेला शाप

Next Article

लक्ष विचलित झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल

You might be interested in …

जर देवाने मला मुलगी दिली तर ग्रेग मोर्स

“ ते तिचं नाव काय ठेवणार असावेत बरं?” माझी पत्नी म्हणाली. “मला काही कल्पना नाही बुवा, पण जर आपल्याला मुलगी झाली तर मी तिचं नाव प्रथम एलिझाबेथ (अलीशिबा), यायेल किंवा अबिगेल ठेवायचा विचार करीन. माझ्या […]

गेथशेमाने बाग

लेखांक ३                                     ब –  प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]

कृपेद्वारे घडवले जाणे

लेखक: अॅलेस्टर बेग (रोम १२: ९ –१६ही वचने बायबलमधून वाचावी) जी मंडळी देवाच्या कृपेने आकार धारण करते ती कशी  दिसते? पौल रोम.१२ मध्ये १५ व १६व्या वचनात याचे उत्तर देत आहे. हे पत्र त्या काळच्या […]