दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मी ख्रिस्ताच्या पूर्णपणे स्वाधीन आहे का?

जॉन पायपर


मरियाचा प्रश्न
– पास्टर जॉन मी ख्रिस्ताच्या  पूर्णपणे स्वाधीन आहे का नाही  हे मला कसे समजेल?

उत्तर – या प्रश्नाचे उत्तर देताना मरिया जे ध्येय व्यक्त करते तेथून सुरुवात करू या, ते म्हणजे : ख्रिस्ताच्या  पूर्णपणे स्वाधीन असणे – काहीही राखून न ठेवता. स्वाधीन असणे ही भाषा जरी नव्या करारात स्पष्ट नसली तरी त्याचे वास्तव तेथे आहे.

पूर्णपणे स्वाधीन

स्वाधीन असण्याचे चित्र म्हणजे एके काळी आपण शत्रू होतो आणि आपली जीवने देवाविरुद्ध होती , आपण त्याच्या अधीन नव्हतो, त्याला शरण गेलो नव्हतो. आपण आपले स्वत:चे धनी होतो. आपल्या इच्छेने चालत होतो. देवाने जे आपल्याला दिले ते सर्व,  एवढेच नव्हे तर आपले जीव सुद्धा लुबाडत होतो. मग एक आश्चर्य घडले: आपला नवा जन्म झाला आणि सर्व पालटून गेले. आता आपल्याला देवापासून कोणतीच गोष्ट राखून ठेवायची नाही. आपले सर्वस्व त्याच्यासाठी देण्यास आपण उत्सुक आहोत. त्याला हवे ते करण्यास काहीही किंमत देण्यास आपण तयार आहोत. तो जे सामर्थ्य आपल्याला पुरवतो त्याद्वारे हे आपल्याला करण्याची इच्छा आहे. यासाठी की सर्वामध्ये त्याचा गौरव व्हावा. जुन्या मार्गापासून तारले जाणे याचा अर्थ हाच आहे.


ख्रिस्ताच्या पूर्ण स्वाधीन होणे याबद्दल बायबल असे म्हणते:

लूक १४:३३- “ त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.”

मत्तय १०:३७ –“जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही.”

मत्तय २२:३७ – “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.”

फिली. ३:७-८ – “तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.”

मरियाला हेच हवे आहे आणि आपण हेच करत आहोत की काय हे तिला समजायला हवे. तिला माहीत व्हायला हवे की, “मी खिस्ताला पूर्णपणे समर्पण केले आहे का? मी ख्रिस्तावर पूर्ण ह्रदयाने प्रीती करते का? मी त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे का? येशू सर्व जगापेक्षा मला मोलवान आहे का?” हे तिला कसे समजेल?

मी स्वत:ची फसवणूक करत आहे का?

आता मनाला सुन्न करणारा विचार असा आहे की आपल्यापैकी कोणीच ख्रिस्ती प्रौढतेच्या अशा पातळीला पोचणार नाही की जेव्हा आपल्या समर्पणाबद्दल आपण शंका बाळगणार  नाही. तुम्ही कितीही व काहीही केले तरी तुम्ही पूर्णपणे समर्पित कधीच असू शकत नाही.

यावर विचार करा: पौलाने करिंथ १३:३ मध्ये म्हटले, “मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.”  जर तुम्ही तात्त्विक दृष्टीने नव्हे तर अक्षरश: तुमचे सर्व जीवन दिले पण तुमच्यामध्ये प्रीती नसली तुम्ही केलेल्या शेकडो कृती तुम्हाला तुम्ही पूर्ण समर्पण केले आहे अशी खात्री देत नाहीत. हे सत्य धक्क्कादायक  नाही का? आणि आपण कदाचित स्वत:ची फसवणूक तर  करत नाही ना?

पूर्ण खात्रीकडे नेणाऱ्या तीन पायऱ्या

तर मग आपण काय करावे? आपण जे करावे अशी येशूची अपेक्षा आहे त्यासंबंधी आपण चुकतो म्हणून नेहमीच आपण शंका आणि भीतीत राहावे का? “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही” (मत्तय १० :३७ ). याला पर्याय नाही. आपण आपल्या माता -पित्याची प्रीती त्याला वाहून टाकली आहे का? आपल्या मुला-मुलीसाठी असलेली प्रीती त्याला इतकी वाहून टाकली आहे का की ख्रिस्तावर तुमचे सर्वाधिक प्रेम आहे?

मला हे स्पष्टपणे माहीत आहे की आपण अशा भीतीत राहावे अशी नव्या कराराची इच्छा नाही. आपण दर रात्री आपली मान खाली घालून म्हणायला नको की, “ आज मी खरा जगलो की नाही मला कळत नाही.”
अशा युद्धाला तोंड देण्यासाठी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो.

१. पूर्ण समर्पणाचे सत्य बोला

पूर्ण खरेपणाने येशूशी हे समजून उमजून बोला, “ येशू मी तुझ्यावर प्रेम करतो. मी इतर सर्वांहून तुझ्यावर अधिक प्रेम करतो.” हे बोला. मोठ्याने बोला. लोक जवळ असोत किंवा नसोत, मोठ्याने बोला. त्याला सांगा, “इतर सर्वांसाठी असलेली माझी प्रीती तुझ्या प्रीतीपेक्षा मी कमी लेखतो.  हे म्हणण्यात जर मी स्वत:ची फसवणूक करीत असेल तर ती तू दूर कर. आणि मला खरेपणाने आणि अस्सलपणे बोलायला शिकव.”

मी स्वत: देवाशी असे नियमितपणे बोलतो. माझी प्रीती, माझी निष्ठा , माझा भरवसा मी त्याला व्यक्त करतो. आणि मग प्रामाणिकपणे मी त्याला कबूल करतो की माझं ह्रदय फसवं आहे , त्याच्यामध्ये चुका दडलेल्या आहेत आणि मी कबूल केलेल्या या समर्पणाच्या विरुद्ध त्यामध्ये काही असेल तर ते तू मारून टाक. आणि मला शुद्ध व सच्चा बनव. तुम्हाला आश्चर्य वाटेल की उघड , मोठ्याने केलले समर्पणाची घोषणा तुमची खात्री किती दृढ करते.

२. पूर्ण समर्पणाच्या सत्याची कृती करा

पहिली बाब होती बोला, आता दुसरी बाब आहे वागा.  देवाने जो  देवभीरू कल तुम्हाला दिला आहे त्यावर कृती करा. त्यामुळे तुमची कुवत, आत्मविश्वास ताणला जाईल आणि देवाच्या दयेसाठी व सामर्थ्यासाठी तुम्ही याचना कराल. जर तुम्ही कृती केली नाही तर हे घडणार नाही. त्याला सांगा तुम्हाला हे सच्चेपणाने  करायचे आहे यासाठी की त्याच्या नावाला महिमा मिळेल. तुम्हाला नवल वाटेल की समर्पणाच्या कृतीमुळे व तशी प्रार्थना करण्याने तुमचे समर्पण किती खेखुरे होते.

३. पूर्ण समर्पणाच्या खात्रीसाठी प्रार्थना करा

ही अखेरची पायरी आहे. तुम्ही करत असलेल्या कृतीच्या आत्मविश्वासाची नेहमीच शंका घेता येते – यामुळे तुमच्या स्वर्गीय पित्याला मागा की, रोम ८:१६ चे आश्चर्य त्याने तुमच्या जीवनात करावे . त्याने तुमच्या मनातील शंका दूर करावी . तुम्ही स्वत: जर ती शंका दूर करण्याचा प्रयत्न केला तर तर ती कधीच दूर होणार नाही. फक्त तोच ती दूर करू शकतो.  रोम ८:१६ –  “तो आत्मा स्वत: आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहोत.”

१. पूर्ण समर्पणाचे सत्य बोला.

२. पूर्ण समर्पणाच्या सत्याची कृती करा.

३. पूर्ण समर्पणाच्या खात्रीसाठी प्रार्थना करा.

Previous Article

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

तुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का?

मार्शल सीगल कोणत्याही पुस्तकाच्या स्टोअरमधून चक्कर टाका आणि तुम्हाला वाटेल की येथे आपल्यासाठी सुखाचा एक कोपरा  आहे. प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठ काहीतरी नव्या आणि खोल समाधानाचे अभिवचन देत असते. प्रत्येक पुस्तकाचा खप हजारो प्रतींचा असतो. सवयी, […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १० ५ वा – दाविदाचा करार हा  विनाअटींचा करार आहे. दावीद देवाच्या निवासाप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याच्या विचारात असताना, दावीद युद्धप्रिय असून त्याच्या हातून अत्यंत रक्तपात झाल्याने मंदिर बांधण्यास देव त्याला मना […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ८ बायबलमधील करारांचा तपशीलवार अभ्यास देवाने केलेले करार त्याच्या राज्याच्या योजनेची उकलून सांगणारी साधने आहेत. करार म्हणजे दोन पक्षांनी अटी व नियमांनी मान्य केलेला, मोडता न येणारा जाहीरनामा असतो. पण […]