ग्रेग मोर्स
सेवेची मानसिकता
“तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला” (योहान १३:३-५)
आपण केवळ त्याच्या बाह्यकृतीची आठवण करतो. येशूने पाय धुतले आणि म्हणून आपणही तसे करायला हवे. पण बायबलचे सांगणे हे आपल्या आठवणीपेक्षा कितीतरी चांगले आहे. त्यामध्ये दोन विधाने वगळली जातात.
“शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला” (योहान १३:२-५).
पवित्र आत्मा जो देवाचेही मन शोधतो ( १ करिंथ २;१०) तो पवित्र आत्मा येशू ख्रिस्त वाकून सेवा करण्यापूर्वी योहानाला खुद्द ख्रिस्ताच्या मनाची अंतर्दृष्टी देतो. येशूच्या जिवाचे मनन पाहण्यासाठी आपल्याला दरवाजा उघडला जातो. हा तपशील या प्रसंगाला सोडून नाही. त्याला सेवा करण्यास कोणी राजदंड दिला हे सांगितल्याशिवाय येशूच्या हाताला धुण्यास परवानगी देली जात नाही. येणाऱ्या वधस्तंभाची सावली येशूवर पडलेली असताना पवित्र आत्मा आपल्याला येशूच्या स्वर्गीय दासपणाची मानसिकता दाखवतो. म्हणून तो भोजनावरून उठण्यापूर्वीचे त्याचे दोन विचार पाहू या. आणि जे आपण पाहू त्यामुळे आपल्या सर्व जीवनभर अशा नम्र सेवेचे अनुकरण करू या.
१. मी देवामध्ये धनवान आहे
“तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे… हे जाणून.. येशू भोजनावरून उठला… व शिष्यांचे पाय धुऊ लागला” (योहान १३:३-५).
पित्याने ख्रिस्ताच्या हातात अवघे, ‘सर्वकाही’ दिले हा येशूसाठी काही नवा विचार नव्हता. त्याच्या सेवेच्या सुरवातीपासूनच ह्या परिपूर्णतेची जाणीव त्याला होती. “पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे” (योहान ३:३५). ख्रिस्ताची सेवा पहिल्यापासून आणि आताही कमकुवत सेवा नव्हती. आपल्या हातात काही नाही असा विचार त्याने कधी केला नाही किंवा काही नाही तर मानवी पाय त्या हातांनी धरावे असे काही नव्हते. त्याच्या शिष्यांपासून त्याला काही गरज नव्हती यामुळे तो त्यांना भरपूरपणे देऊ शकत होता. एक धनवान राजा खाली उतरला.
देवाने त्याला जे सर्व दिले ते येशू पुन्हा पाहतो असे पवित्र आत्म्याद्वारे योहान मुद्दाम नमूद करतो. त्याला त्याच्या मनात आणि ह्रदयात असलेल्या संपत्तीची जाणीव होते. अशी कोणती सोन्याची नाणी त्याच्याकडे होती? पित्याने त्याला दिलेले काम त्याने आतापर्यंत पूर्ण केले होते (योहान १७:४) – शिकवण, त्याची परिपूर्ण नीतीची कृत्ये, जगातल्या पुस्तकात मावणार नाही अशी त्याची सामर्थ्याची कृत्ये (योहान २१;२५). – आता त्याच्यापुढे मुख्य रत्न होते. कदाचित आपले जीवनच उसळत आहे असे त्याला वाटले असेल किंवा सर्व जीवमात्रावरच्या अधिकाराचा तो विचार करत असेल (योहान ५:२५-२७; १७:२). गौरवाची हिरे माणके आपल्याला दिली आहेत असे त्याला वाटले असेल ह्यात शंका नाही. आणि जे गौरव त्याचे पुन्हा होणार होते – आता तो पित्याच्या सान्निध्यात देव-मानव म्हणून उंचावला जाणार होता (योहान १७:५). पण योहानाच्या शुभवर्तमानात येशू वारंवार पित्याने त्याला लोक दिले होते त्याबद्दल बोलतो. (योहान ६:३५-४०, १०:२८-२९; १७:१-३; ६-९; ११-१५; २२-२५).
त्या रात्री तो “जे तू मला दिले आहेत” त्यांच्यासाठी अशी प्रार्थना करतो (१७:९). “ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले” (योहान १७:११,१२).
पित्याने त्याला लोक दिले होते त्या रात्री त्याला पकडण्याच्या वेळी तो त्यांच्या पुढे पाउल टाकतो यासाठी त्याने दिलेले वचन पूर्ण व्हावे ते म्हणजे “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही” (योहान १८:९). मृत्यू , सैतानाचा दोषारोप , पित्याचा न्याय्य क्रोध त्याचा पाठलाग करत होता. तो काही मोलकरी नव्हता – तो आपल्या मेंढरांकरता आपला जीव देणारा होता. त्यांचा जर उद्धार व्हायचा होता तर हे करणे त्याला आवश्यक होते. तो त्याच्या गुडघ्यावर खाली गेला आपल्या वधूचे पाय धुण्यासाठी. – आणि खोलवर खाली गेला तिला आपल्याकडे आणि स्वर्गातील पित्याकडे वर उचलण्यासाठी. ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले (योहान १३:१).
२. मी माझ्या पित्याकडे जात आहे
येशूने आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून … शिष्यांचे पाय धुऊ लागला (योहान १३:३-५).
येशूप्रमाणे आपण पित्यापासून आलेलो नाही. तो पुत्र आहे, पूर्ण देव, अनंतकालापासून अस्तित्वात असलेला. “तो प्रारंभी देवासह होता” (योहान १:१-२). देवाने पुत्राला अनंतकालापूर्वी पाठवले ( योहान ७:२९). पुत्राने देह धारण केला व आपल्यामध्ये वस्ती केली (योहान १:१४); देव स्वत:च आपल्या कहाणीत उतरला.
येशूला हे माहीत होते. अब्राहामापूर्वी मी आहे असे म्हणून त्याने यहूदी लोकांना संतप्त केले होते (योहान ८:५८). त्या रात्री त्याने प्रार्थना केली, “तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर” (योहान १७:५). येशूमध्ये देवाची पूर्णता वसत होती. तो आपल्या लोकांना पापापासून सुटका करण्यासाठी पित्यापासून जगात आला होता. भोजनाच्या वेळी येशूचे विचार पित्याबरोबरच्या त्याच्या भविष्याने भरून गेले. त्याआधीच्या काही वचनात योहान हा सर्व भयानक वधस्तंभ एका सुंदर विधानात मांडतो. “येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून” (योहान १३:१). येशू आपले येणारे मरण, अत्यंत भयानक मरण, हे त्याला त्याच्या पित्याकडे नेणारे साधन म्हणून पाहतो. यातनांवर आनंदाने मात केली. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, त्याच्यासाठी (आणि त्याच्या लोकांसाठी) मरण हे नरकात बुडून जात नाही. ते आत्मा देवाकडे घेऊन जाते – ज्याला ते पिता म्हणतात. पाय धुण्यापलीकडे आणि वधस्तंभांपलीकडे आणि त्याचे लोक आणि गौरवापलीकडे येशू त्याच्या जिवाचे प्रेम ‘आब्बा’ याचा विचार करतो.
कोणतीही सेवा खालच्या पातळीची नाही
धन्याने पाय धुणे हे पुढे होणाऱ्या क्रूसावरच्या शुद्ध करणाऱ्या कार्याचे भविष्य सांगत होते. आणि त्याबरोबरच त्याने आपल्याला उदाहरण घालून दिले.
“कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणार्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात” (योहान १:१५-१७).
ख्रिस्त आपला महान स्वामी आणि आपली घाण धुणारा याने आपल्यापुढे उदाहरण ठेवले आहे. – फक्त त्याच्या कृतीतच नाही तर त्याच्या विचारांतही. देव-मानव त्याच्या सेवेत आपल्याला दाखवतो की आपणही त्याच्या मधले आपले भविष्य व आपली पूर्णता समजून घेऊन सेवा करावी.
आपल्याला काही गरज आहे म्हणून आपण सेवा करत नाही. दुसऱ्यांची सेवा करून आपल्या तुटीत भर पडते असा आपला विश्वास असतो. तरीही येशूमध्ये सर्व काही तुमचे आहे ही जाणीव ठेवा. तुमची बाह्यवस्त्रे काढून ठेवा तरी तुमच्यावरील देवाची कृपा तुम्ही काढून ठेवली नाही. दासाचा पंचा तुमच्या कमरेभोवती बांधा तरी तुम्ही तुमच्या पित्याच्या घरातील जागा सोडून दिलेली नाही. संतांचे आणि पाप्यांचे चिखलाने बरबटलेले, दुर्गंधी, घाणेरडे पाय
तुमच्या हातात घ्या तरीही तुम्ही पुत्राच्या शेजारचे, राज्य करण्याचे तुमचे ठिकाण धरून ठेवले आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला काय विभक्त करू शकेल? जर तुम्ही आणि मी इतक्या आशीर्वादात लपेटलेले आहोत तर कुणाचे पाय आपण धुणार नाही?
किंवा विचार करा की ख्रिस्तासारखे आपण पित्याकडे चाललो आहोत. येशूनेच हे केले आहे, तो कालवरीकडे गेला पित्याच्या घरात आपल्यासाठी जागा तयार करण्यासाठी (योहान १४:२-३). पेत्र वधस्तंभांविषयी लिहितो, “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले” ( १ पेत्र ३:१८). देवापासून जन्मल्याने आपले भविष्य कायमचे पित्याबरोबर असणे हेच आहे. जर भविष्य इतके उंच आहे तर कोणती सेवा अगदी खालची असू शकते?
तुम्ही आता देवामध्ये धनवान आहात. आणि जसे तुम्ही देवाकडे, तुमच्या पूर्ण वतनाकडे जात आहात तसे तुम्ही अधिक धनवान होत आहात. अशा गौरवी रस्त्यावर तुम्ही कोणाची सेवा करू शकत नाही? आपल्या सेवेद्वारे इतरांना आपली देवामध्ये असलेली तृप्ती दिसू दे.
Social