दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स

लेखांक ३
(ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे  ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.)

प्रस्तावना

देवाच्या सामर्थ्यशाली वचनाचा पुन्हा शोध घेतल्यामुळे धर्मजागृती होऊ शकते व होऊ शकेल. मध्ययुगीन काळाच्या गडद अंधारात अनेक दिवे उजळायला सुरुवात झाल्याने तेव्हा प्रचंड अस्वस्थता झाली होती. मंडळीचे शिक्षण झुगारून पुष्कळ रंगारी, कलाकार, वैज्ञानिक व इतर लोक मंडळीपासून विभक्त होत होते. काहींना आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले.

तेव्हा विद्येचे पुनरुज्जीवन होऊन श्रेष्ठ दर्जाचे पुरातन वाड्:मय व भाषा पुन्हा आकार घेऊ लागल्या होत्या. विज्ञानाचे शोध लागत होते, कलेत परिवर्तन होत होते. त्यामुळे धर्मजागृतीच्या भक्कम पायाची तरतूद झाली होती. मूळ भाषांचा पुन्हा शोध लावल्याने मनुष्यांनी  इब्री व ग्रीक भाषेतील बायबलचा मूळ ग्रंथ वाचायला सुरुवात केली. तेव्हा लॅटिनमध्ये रोमन कॅथॉलिक चर्चने केलेले बायबलचे भाषांतर व देवाने मूळ ग्रंथात जे काही कथन केले त्यात त्यांना मोठी तफावत आढळून आली.

मार्टिन लूथर, विल्यम फॅरेल, जॉन कॅल्विन यांच्यासारख्या कित्येक मनुष्यांनी बायबलमधून उपदेश केले. भाष्यग्रंथ व हस्तपत्रिका लिहिल्या. त्यामुळे युरोप व इंग्लंडमध्ये वचनाच्या शिक्षणाचा पूर वाहू लागला. बायबलचे भाषांतर होऊन लोक ते वाचू लागले. बायबल उपलब्ध झाल्याने धर्मजागृतीच्या वणव्याची आग सर्वत्र फैलावली. धर्मसुधारकांनी देवाच्या वचनाची सर्वोच्चता घोषित केली आणि बायबलच्या सिद्धांतांच्या शुद्धतेविषयी पाचारण केले. धर्मजागृती म्हणजे खरे तर बायबलकडे पुन्हा वळण्यासाठी केलेले पाचारण होते.

देवाच्या वचनाचे सामर्थ्य !

व्हिटेनबर्गमध्ये धर्मजागृतीचा शिरकाव व्हावा म्हणून मार्टिन लूथरने आपला ९५ पानांचा प्रबंध तेथील चॅपलच्या दारावर लावला. सर्वसमर्थ देवाने आपल्याला त्याचे सामर्थ्यशाली वचन दिले आहे. देवाच्या वचनाचे पुरेपण, अधिकार, अस्सलता, त्याची ईश्वरी प्रेरणा व अचूकता आणि विश्वसनीयता यासाठी कळकळीने लढा द्यायला हवा. आपण देवाचे वचन हे खुद्द देवाचा शब्द आहे हे सांगितले पाहिजे.

धर्मजागृतीमध्ये या मूलभूत सत्यांचा पुन्हा शोध घेण्यात  येऊन त्यांना मंचाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले. इरॅस्मसने ग्रीक नवा करार लॅटिनमध्ये भाषांतर करून प्रकाशित केला. तो रोमन कॅथॉलिकांच्या लॅटिन भाषांतरापेक्षा निराळा होता. मार्टिन लूथरने तो वाचला आणि त्याचे अंत:करण असे ढवळून निघाले की ज्या पोपच्या विश्वासात तो जन्मला होता व ज्यासाठी त्याने स्वत:ला समर्पित केले होते त्यावर तो खोल विचार करू लागला. धर्मजागृती सुरू होण्याच्या १५० वर्षे आधी जॉन विक्लिफने  बायबलचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले होते व ते इरॅस्मसने ग्रीक नव्या कराराचे जे लॅटिन भाषांतर केले होते, अगदी तसेच होते. त्याचा थॉमस बिल्नी व विल्यम टिंडेल सारख्या इंग्लिश धर्मसुधारकांवर प्रभाव पडला आणि त्यांनीही बायबल व सुवार्तेचा पुन्हा शोध लावला. ते ही बायबलचे भाषांतर करण्यामागे आणि बायबल इंग्लिशमध्ये उपलब्ध करून देण्याच्या कामी  लागले .

देवाच्या वचनाचे सामर्थ्य पुन्हा प्रस्थापित झाले. धर्मसुधारकांना  देवाचे पुस्तक सापडले, त्यांनी ते वाचले, समजून घेतले व त्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार जगण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याचे त्यांनी भाषांतर केले, ते शिकवले, सर्व लोकांना ते उपलब्ध केले व लोकांना पुन्हा बायबलकडे वळण्यास पाचारण केले. लोकांना ख्रिस्तावरील विश्वासाचा शोध लागला व त्यांना ज्ञान झाले की ते केवळ देवाच्या कृपेने, त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे मोफत ते नीतिमान ठरले जातात – बाकी कशानेही नाही. युरोपपासून ते इंग्लंडपर्यंत देव कार्यरत होता आणि धर्मसुधारक शिक्षणाने अखेर भारत व उरलेल्या आशियासारख्या प्रांतांमध्ये मिशनरी पाठवले.

देवाने प्रत्येक राष्ट्र, भाषा आणि वंशांचे लोक त्याच्या मंडळीत व त्याच्या राज्यात आणले. आपण देवाच्या वचनाच्या सामर्थ्यावर खोलवर मुक्काम ठोकला पाहिजे. रोमन कॅथॉलिक चर्चने देवाच्या वचनाला व्यंगचित्रासारखे रूप दिले होते. सामान्य जनतेपासून देवाचे वचन त्यांनी लपवले होते. त्यांना ते जवळ बाळगण्याचीही मनाई केली होती. लोकांना आपआपल्या बोली भाषेत बायबल उपलब्ध होऊ दिले नव्हते. आता त्याच्या सामर्थ्याने सुवार्तेचा फैलाव होऊ लागला. लोकांना त्यांच्या अंधकाराविषयी व त्यांच्या पापाविषयी जागृत केले गेले व तारणासाठी फक्त ख्रिस्ताकडे वळवले. बायबलचा तो स्वभावधर्मच आहे. ते जीवनात स्फोट घडवून आणते! देवाच्या वचनाच्या सामर्थ्यावर जोर देणारी बायबलमधील काही प्रमुख वचने पाहा :

“ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सर्पण असे करीन आणि तो त्यांस खाऊन टाकील” (यिर्मया ५:१४).

” परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय” (यिर्मया २३:२९)?

” देवाचे वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांस भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे” (इब्री ४:१२).

देवाच्या वचनाला देवाचे सामर्थ्य आहे. त्याचे वचन जीवनाचे रूपांतर करते आणि पापी व्यक्तीचे संतामध्ये परिवर्तन करते. रोम १:१६ मध्ये प्रेषित पौलाने जी घोषणा केली त्यात आश्चर्य नाही. ती अशी की, ” प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती ( देवाची सुवार्ता) तारणाप्राप्त्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे ; प्रथम यहुद्यांस आणि मग हेल्लेण्यांस.”  संपूर्ण जगभर, आजवरच्या इतिहासात, काळ्या मध्ययुगात, संपूर्ण नाशकारक अशा मानवी दुष्कृत्यांमुळे माजलेल्या अंदाधुंदीच्या काळात, देवाच्या सामर्थ्यशाली वचनाने, सामर्थ्यशाली सुवार्तेने प्रचंड लोकसमुदायास ख्रिस्ताकडे वळवले व त्यांचे तारण करून त्यांना सुरक्षित राखले. जगातील या काळोखी काळात देवाच्या सामर्थ्याने तारलेल्यांच्या व राखलेल्यांच्या पुष्कळ कथा सापडतील.

रोमन कॅथॉलिक चर्चने सुमारे बारा शतके बायबलवर आपला ताबा ठेवून ते रोखून धरले होते. पण तरीही धर्मजागृतीपूर्वीच्या काळातही देवाचे वचन व सुवार्तेचे सामर्थ्य त्या काळोखातही झळकत राहिले. आपल्या निवडलेल्यांचे व अवशिष्ट लोकांचे देवाच्या सामर्थ्याने कसे रक्षण केले याचे धर्मसुधारणा हे एक प्रचंड महान उदाहरण आहे. रोमी सामर्थ्याच्या खोट्या धर्माच्या शृंखला नष्ट करण्यासाठी ठिणगी उडवून देण्याकरता देवाने त्याचे लोक उभे केले.

क्रमश:

Previous Article

तुम्हाला निर्माण केल्याचा देवाला पस्तावा होतो का?

Next Article

पवित्र शास्त्राचा परिचय

You might be interested in …

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १४ महान संकटाचा काळ येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते की या जगात तुम्हाला बहुत कष्ट होतील (योहान १६:३३). त्यानुसार आजवर बहुत ख्रिस्ती जनाचा छळ होऊन रक्तसाक्षीही व्हावे लागत आहे. तरीही […]

आपण अधिक चांगल्या देशाची उत्कंठा धरतो

डेविड मॅथीस गेल्या दोन तीन वर्षात टाळेबंदी व सामाजिक अस्थिरता यासोबतच  कित्येक शहरांना नवे अडथळे आणि धोक्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारी यंत्रणा, अधिकारी यांच्याकडे न्यायासाठी ओरड करून या मानवी प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला […]

 विल्यम केरी

(१७६१- १८३४) लेखांक १४                                        आतापर्यंत आपण जर्मन व डॅनिश मिशनरी पाहिले. डॅनिश मिशनचा अस्त झाल्यावर इंग्लंडने भारतात जे मिशनरी पाठवले, त्यातील हा पहिला मिशनरी. १६०० मध्ये भारतात ब्रिटिश कंपनी आली. व्यापारात उत्तम जम बसूनही भारतात […]