नवम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाने आपले मुख का बनवले

स्कॉट हबर्ड

सामान्य व्यक्ती दररोज किमान ७००० शब्द बोलते किंवा आठवड्यात ५०,००० – एका लहान पुस्तकाएवढे. आपण सर्व लेखक आहोत. दर वर्षी ५२ पुस्तके छापतो ती एका छापखान्यातून ज्याचे नाव आहे तोंड किंवा मुख.

यामुळे आपण अधून मधून थांबून विचार करायला पाहिजे की आपण जगात कोणत्या प्रकारचे शब्द पाठवत आहोत? आपल्या शब्दांमुळे ते अधिक चांगले बनत आहे का? आपण इतरांना इजा करतो की बरे करतो ( नीति १२:१८)? आपण देवाच्या  भयाची प्रशंसा करतो की मुर्खपणाची बकबक करतो  (नीति १५:२)?  आपण इतरांचा जीव तवाना करतो  की तो भग्न करतो (नीति १५:४)? कारण आपण आपल्या शब्दांचा इतका कमी विचार करतो पण त्यांच्या हाती तर मृत्यू व जीवन आहे (नीति १८:२१).
जर आपण आपले बोलणे जपून वापरणार असू तर देवाने आपल्याला शब्द का दिले यावर  नियमित  विचार करण्याची गरज आहे. “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे”(इफिस ४:२९). पौलाने इफिसकरांस दिलेली आज्ञा ही हा हेतू अगदी स्पष्ट करते.
इथे जेवणाच्या मेजाभोवती, वर्गात, मोबाईलवर , ऑफिसमध्ये, आणि सर्वत्र जेथे आपण तोंड उघडतो त्यासाठी एक सनद दिली आहे: कृपा द्या.

कृपा बोलाइफिसकरांस पत्रामध्ये पोलाने कृपेविषयी जे काही सांगितले आहे त्याच परिमाणात त्याने आपल्या मुखालाही उच्च पाचारण दिले आहे. कृपा ही  आपल्याला खंडून घेणारा देवाचा गुण आहे. याद्वारे तो आपले तारण करतो, आपल्यावर शिक्का मारतो आणि पवित्र करतो.  ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे ( इफिस १:६). त्याने आपल्याला मेलेल्यातून उठवले ( इफिस २: ५-६) आणि पापापासून सुटका केली (इफिस २:८). देवाची कृपा ही मोलवान आहे , अमाप आहे. त्याचे भांडार अनंतकाळही रिकामे करू शकणार नाही (इफिस १:७; २:७).

आता पौल म्हणतो, तुमच्या मुखालाही हेच करू द्या. देवाने जी कृपा तुमच्यावर केली ती घ्या आणि तिला  तुमच्या जिवाची बोली बदलू द्या. मग तुमचे छोटे शब्द घ्या त्याला कृपेची चव द्या आणि त्यांचा उपयोग येशूच्या उद्धाराचे कार्य कुणाच्या तरी जीवनात करायला वापरा.

जेव्हा जेव्हा देव कोणाला तरी त्याच्या कृपेचा विषय बनवतो तेव्हा त्यांना कृपेचा प्रतिनिधी करतो. जसे पौलाला सुवार्ता सांगण्यासाठी “कृपेचे कारभारीपण ‘ मिळाले (इफिस ३:१-२) तसेच आपल्या प्रत्येकाला दया दिली गेली (इफिस ४:७). आपल्याला मोशेसारखे जड जिभेचे आहो असे वाटले ( निर्गम  ४:१०)  तरी जर आपल्याला पवित्र आत्मा आहे तर स्वर्गातून आपल्या अंत:करणात आणि जिव्हेशी  कोणीतरी कुजबुजते. आपल्याला देण्यासाठी कृपा आहे.

येशूमध्ये उभारलेले

व्यावहारिकदृष्ट्या ‘कृपा देणे’ म्हणजे  ‘उन्नतीसाठी चांगले’ असे शब्द बोलणे (इफिस ४:२९).  कृपाळू शब्द वाकलेल्या संताना सरळ करतात. लटपटते गुडघे सरळ करतात, जखमी हात बांधतात. आणि  ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत इतरांना नेतात (इफिस ४:१३).

दुसऱ्या शब्दात ‘कृपा द्या’ म्हणजे ज्या देवाच्या शब्दाने जग अस्तित्वात आणले  (स्तोत्र ८:३) त्याचे अनुकरण करण्यासाठी पाचारण. जीवन द्या. तुमच्या समोर त्याची प्रतिमा ठेवा आणि कोशल्याने येशूठायी असलेले सत्य वापरा (इफिस ४:२१). देवाचे ठराविक शब्द इतरांच्या ठराविक गरजांशी जुळवा. तुमच्या शब्दांना वजन द्या. त्यांना अर्थभरित करा. असे बोला की जे बोलण्यास लायक असेल. हे सर्व अशासाठी की दुसरे लोक येशूमध्ये वाढत जातील- असत्यापासून रक्षिले जातील, सत्यात स्थिर होतील, कृपेमध्ये  मुळावले व रुजले जातील.

अशी कृपा फक्त उपदेश आणि बायबल अभ्यासाशीच मर्यादित नाही. पौलाची ही आज्ञा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आणि प्रत्येक संभाषणासाठी आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या बिछान्याशी गुडघे टेकता, सहकार्यांसोबत जेवता, मित्रांसोबत शेकोटी करता, पत्नीसोबत चालत असताना, दुकानात असताना, दुपारी कामात गर्क असता तेव्हा कृपा द्या.

ह्या कृपाकारी शब्दाचा आपण चुकीचा अर्थ लावू नये. त्याला आपण दोन गुण लावू या: कृपेचे शब्द नेहमी चांगलेच असतात असे नाही आणि कृपेचे शब्द हे कधीच सोपे नसतात.

कणखर आणि मृदू कृपा

कृपेचे शब्द नेहमी चांगलेच असतात असे नाही. आपण समजतो तशी कृपा नेहमीच कोमल नसते. कृपा ही नेहमी सुखदायी, मऊशार, चांगली नसते. जर चांगल्या शब्दांचे  आपल्याला चांगले वाटावे असे धोरण असेल तर कृपेच्या शब्दांना अधिक उच्च ध्येय असते: आपल्याला अक्षरश: चांगले बनवावे- अगदी ख्रिस्तासारखे.

त्यामुळे कृपेचे शब्द कधी कठोर असतील. ज्या पौलाने कृपा द्या असे आपल्याला सांगितले तो आपल्याला अशीही आठवण करून देतो की  तुम्ही  तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता (इफिस २:१). आपल्याला बोध करतो की, सैतानाविरुध्द खंबीरपणे उभे राहा (इफिस ६: १०-११) व देवाच्या क्रोधाचा धोका दाखवतो (इफिस ५:६).

आपल्या तारणाऱ्याचे  शब्द “कृपा व सत्य” यांनी पूर्ण आहेत  (योहान १:१४). त्याच्या मुखातून कृपा कधी दंवासारखी सौम्य आली तर कधी संदेष्ट्याच्या जोमाने झंझावातासारखी बाहेर पडली. कधी ती मोडलेल्या बोरूला बांधत असे तर कधी द्राक्षवेलची फांदी कापून काढत असे. कधी ती म्हणे, मी सदैव तुमच्याबरोबर आहे (मत्तय २८:२०) तर कधी म्हणे, तुमचा वधस्तंभ उचलून माझ्यामागे या (लूक ९:२३).

आपल्याला सुद्धा जेव्हा अशा संवादापासून पळून जावेसे वाटते तेव्हा बोलायला सुरुवात करायला हवी. कारण जर आपले शब्द फक्त सुंदर, खुष करणारे, राजकीयदृष्ट्या योग्य असे असतील तर आपण फक्त अर्धी कृपा पुरवतो.

कृपेच्या शब्दांची किंमत

कृपेचे शब्द हे लहरी सारखे नसतात – समतोल राखण्यासाठी  कधी कठोर तर कधी मृदू. नाही. कृपा ही त्या क्षणासाठी शब्द आखून वापरते  (इफिस ४:२९). असे शब्द सहज बाहेर पडत नाहीत. कृपेचे शब्द हे नेहमी ठराविक असतात- जे शब्द ह्याच घडीला शोभतील त्या नाही; शब्द जे ह्याच व्यक्तीला लागू पडतील त्या नाही. आपली नेहमीचीच अभिवचने, आवडत्या गोष्टी यापलीकडे आपण जाऊन येशूमधील सत्य (इफिस ४:२१) काबीज करायला हवे. देवाच्या अनेक पैलू असलेल्या कृपेचे भाग  आपल्या विविध अनुभवाला योग्य रीतीने लावायला हवेत. इतरांबरोबर बोलत असताना आपण इतरांच्या मनाच्या खाणीत काम करायला हवे. आपले शब्द काळजीपूर्वक विचाराच्या जाळातून नेऊन त्यातून निश्चित सत्य बाहेर काढायला हवे.

बऱ्याच वेळा माझे शब्द कृपा देत नाहीत कारण माझ्या समोरच्या व्यक्तीकडे मी योग्य लक्ष पुरवलेले नाही. मी संवादातून आत बाहेर जात असतो. माझे मन संबंध नसलेल्या गोष्टींकडे भरकटतअसते. जेवण काय आहे? आज रात्री मी काय करणार? तो शर्ट मला फिट होईल का? अशा विचलित मनातून आलेले शब्द हे कृपाविरहीत असतात. इतके हलके की वाऱ्याबरोबर उडून जातील. आपल्या जिभा कृपा देताना सहज वळत नाहीत . अर्थभरित  शब्द बोलताना त्यांना पूर्ण लक्ष देणे, सुज्ञ विवेक, विचारांची निर्मिती, भावनिक गुंतवणूक या सर्वांची किंमत द्यावी लागते. पण ते किती मोठे प्रतिफल देतात!  (नीति १५:४; १८:२१).

प्रश्न आणि प्रार्थना

अशा प्रकारचे संभाषण आपण कसे वाढवू शकू? येशूमुळे आपल्याला समजते की जर कृपा आपल्या ह्रदयात असेल तरच ती कृपा आपल्या मुखातून येईल ( मत्तय १२:३४). परंतु जरी कृपा आपल्या आतमध्ये  मोडून पाडणे, उभारणे आणि नवीकरण करणे हे काम करत असेल तरी कृपा घेऊन ती शब्दात कशी वापरावी हे शिकायला नेहमी सराव लागतो.

एक साधी पायरी म्हणजे तुम्ही संभाषणात प्रवेश करताना एक प्रश्न विचारा आणि एक प्रार्थना करा.

प्रश्न : या व्यक्तीची काय गरज आहे? या प्रसंगी कोणते दयाळू शब्द योग्य आहेत? बऱ्याच वेळा गरज स्पष्ट दिसणार नाही पण असा प्रश्न विचारल्याने तुम्ही लक्ष द्यायला तयार व्हाल.

प्रार्थना : प्रभू, माझ्या मुखातून कुजके शब्द येण्यापासून मला दूर ठेव. माझे मुख कृपेने भरून टाक.

मग संभाषणात  प्रवेश करा हे जाणून की, तुम्हाला – एक अशक्त, झगडणाऱ्या तुम्हाला – कृपा द्यायची आहे. देवाच्या हातात तुमचे शब्द एका भावाला / बहिणीला येशूच्या प्रतिमेमध्ये साकारणारे साधन बनतील.
मग ऐका, लक्ष द्या, आकलन होईल असे प्रश्न विचारा , तुमच्या मनाला चालना द्या. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचे मुख उघडा आणि कृपा पुरवा.    

Previous Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

Next Article

तुझा हात तोडून टाकून दे

You might be interested in …

भावंडातील वैमनस्य

जॉन पायपर स्टेफनीचा प्रश्न पास्टर जॉन , माझा प्रश्न भावंडातील वैमनस्यासबंधी आहे. उत्पत्तीमध्ये दिसते की प्रत्येक कुटुंबावर  भावंडातील हेव्याचा परिणाम झाला. त्यापैकी काही – काईन आणि हाबेल, याकोब आणि एसाव, राहेल आणि लेआ, योसेफ आणि […]

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल? जॉन ब्लूम

जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख आपल्याला प्रमुख […]

वाया गेलेले जीवन कसे वाचवावे

ग्रेग मोर्स न उमललेले फूल, न पिकलेले फळ, गर्भधारणा न झालले उदर, न उबवलेले अंडे: एक वाया गेलेले जीवन. जे तुम्ही बोलला नाहीत आणि केले नाहीत ते बोलायला, करायला, फारच थोडा वेळ उरला आहे. तुम्ही […]