Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 17, 2020 in जीवन प्रकाश

तुमचा पिता असण्यात देवाला खूप आनंद आहे                                  मार्शल सीगल

तुमचा पिता असण्यात देवाला खूप आनंद आहे मार्शल सीगल

अनेक मुले देवाबरोबर चालण्यास सुरुवात करतात पण हे त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दाखवलेले नसते. “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे” (नीती २२:६) हे वचन ते ऐकतात आणि त्यांना प्रश्न पडतो, पण माझे काय?  देव म्हणतो, “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा” (इफिस ६:४)  असे ते ऐकतात, पण त्यांच्या वडिलांनी तर कधी बायबलही उघडलेले नसते.

ते त्यांच्या विश्वासात वाढण्यासाठी, देवभीरूपणात प्रगल्भ होण्यासाठी आणि देवामध्ये खोलवरचा आनंद घेण्यासाठी धडपड करतात पण त्यांना दररोज दिसेल असा आदर्श किंवा मार्गदर्शक नसतो. त्यांची ही कहाणी ‘कुऱ्हाड’ या कथेसारखी आहे. या गोष्टीत १३ वर्षांच्या ब्रायनच्या आईवडिलांचा घटस्फोट झालेला असतो. आणि हा विमानातून जाताना ते कोसळते आणि तो एकटाच कॅनडाच्या जंगलात वाचला जातो. तेथे तो फक्त एका कुऱ्हाडीच्या मदतीने सहारा कसा बनवायचा, शिकार कशी करायची, मासे कसे पकडायचे, अन्नपदार्थांचा शोध कसा घ्यायचा, जाळ कसा करायचा हे स्वत:ला शिकवतो.  ख्रिस्तामधील नवीन मुलांना त्यांच्या स्वत:च्या घरात स्वत:ची काळजी घ्यावी लागते. प्रार्थना कशी करायची, देवाच्या वचनातून त्याचे कसे ऐकायचे, आणि शुद्ध जीवनाचा पाठपुरावा कसा करायचा हे फक्त बायबलमधून ते स्वत:ला शिकवत असतात आणि त्यांच्या स्वर्गीय बापाकडून. जर तुमचे आईवडील तुमच्या विश्वासात तुमच्यावर आध्यात्मिक प्रभाव टाकत नसतील तर तुम्हाला वाटते तसे त्यामध्ये तुम्ही एकटेच नाहीत. अनेक जण देवभीरू आईवडील नसताना त्यांची ख्रिस्ताशी ओळख झाली आहे आणि ते त्याच्या मागे चालले आहेत. आणि तरीही एका खोल आणि अर्थपूर्ण रीतीने त्यांना बापासारखे सांभाळले गेले आहे.

वडिलाशिवाय मूल

जर तुम्हाला वाटत असेल की फक्त आशा आणि कुऱ्हाडीवर तुम्हाला जीवन काढायचे आहे तर हिज्कीया राजाशी तुम्ही समरूप होऊ शकाल. त्याच्या वडिलांपुढे तर दुष्ट बापही चांगले वाटतील. इस्राएलचा राजा असताना त्याने खोट्या दैवतांची भक्ती करण्यासाठी वेद्या व धातूंच्या प्रतिमा बनवून सर्व इस्राएल राष्ट्राला बहकवून टाकले. देवाच्या मंदिराचे संरक्षण करून ते शुद्ध ठेवण्याऐवजी आहाजाने त्यातील वस्तू चोरून त्याचे दरवाजे बंद करून टाकले. देवाने त्याला दिलेल्या अमोल पुत्रांची काळजी घेण्याऐवजी त्याने हिज्कीयाच्या भावांना खोट्या दैवतांच्या यज्ञात होम करून त्यांना मारून टाकले.

आहाजाने हिज्कीयाच्या आचरणात मदत केली असेल तर कसे नसावे हे दाखवूनच.

आणि तरीही  आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते हिज्कीया करीत असे. “हिज्कीया राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने एकोणतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे” (२ इतिहास २९:१-२). आहाज ह्या त्याच्या पित्याप्रमाणे नाही तर त्याचा आध्यात्मिक पूर्वज (आणि राजकीय पूर्वज) दावीद ह्याच्याप्रमाणे चालला. जेव्हा हिज्कीया त्याचा बाप आहाज याचे अनुकरण करू शकला नाही तेव्हा त्याला विश्वासू, अनुसरण करण्यास योग्य असा देवाचा माणूस मिळाला.

त्याचा पिता असा असतानाही

मंदिरातून चोरण्याऐवजी आणि देवाच्या लोकांना देवाचे मंदिर बंद करण्याऐवजी “त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली” (२ इतिहास २९:३). ते लगेचच म्हणजे त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या महिन्यातच केले.

आपल्या पित्याचे अघोर उदाहरण अनुसरण्याऐवजी त्याने त्याच्या बापाचा अधर्म आणि दुष्टता कबूल केली. “आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले” (२ इतिहास २९: ६). आपल्या वडिलांना दोष देण्याऐवजी आणि त्याचे परिणाम टाळण्याऐवजी त्याने आपल्या बापाच्या अपयशाचे ओझे उचलून त्याची जबाबदारी घेतली. “आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल” (२९:१०).

इतरांना देवापासून दूर नेऊन अधर्मात लोटण्याऐवजी त्याने देवाच्या लोकांना मोहाचा धिक्कार  करून परत देवाकडे फिरण्यासाठी पाचारण केले.
“इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा…तुम्ही आपल्या वाडवडिलांप्रमाणे व आपल्या भाऊबंदांप्रमाणे होऊ नका; त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा अपराध केल्यामुळे त्याने त्यांची दुर्दशा केली हे तुम्हांला दिसतच आहे. तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा” (२ इतिहास ३०:६-८).

कृपा आणि दया गृहीत धरण्याऐवजी हिज्कीयाने देवाची दया व करुणा होणारच असे न मानता लोकांना पश्चात्ताप करण्यास कळकळीने विनंती केली. “तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंद व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्यांच्यावर दया करतील व ती ह्या देशास परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरवणार नाही” (३०:९).

आपले कुटुंब व राष्ट्र यावर न्याय व नाश आणण्याऐवजी त्याचा स्थिर विश्वास व देवानुसार असलेले नेतेपण यामुळे तेथे निरोगीपण आले (२ इति. ३०:२१). “यरुशलेमेत फार आनंद झाला; इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता” (३०:२६). त्याच्या वडिलांमुळे मोठी दुर्दशा म्हणजे काय हे त्याला माहीत होते. आता त्याने मोठा आनंद फैलावला कारण त्याचा देवावर भरवसा असून तो त्याच्या आज्ञा पाळत होता. त्याच्या बापाच्या दुष्ट अशा आध्यात्मिक उदाहरणाने झालेल्या धोकेबाज अशा आध्यात्मिक अरण्यात हिज्कीयाला एक खरा पिता सापडला आणि त्याच्यावरील विश्वासाने तग कसे धरून राहावे आणि त्याची कशी सेवा करावी हे तो शिकला.

जर तुम्ही त्याचे मूल आहात

तुम्हाला चांगला पिता नसला तरी जर तुम्ही ख्रिस्तामागे जात आहात तर तुम्हाला एक चांगला पिता आहे. जर पवित्र आत्मा तुम्हाला पश्चात्ताप, पापकबुली आणि आज्ञापालन यात चालवत आहे तर  -हिज्कीयाप्रमाणेच- तुम्हीही अनंत प्रीती व सामर्थ्याचा जो देव त्याचा निवडलेला व अमोल पुत्र आहात. “कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे” (रोम ८:१५). तुम्हाला त्याने दत्तक घेण्यापूर्वी तुम्ही भीतीने ग्रस्त होता आणि ते योग्यच होते. पण आता पित्याचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो आणि शासनाची भीती त्याने तुमच्यातून दूर केली आहे (१ योहान ४:८).

पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो आणि आठवण करून देतो की आता तुम्ही अनाथ नाहीत (रोम ८:१६). “आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत” (८:१७). आणि आता तुम्ही ख्रिस्ताबरोबर सर्व गोष्टींचे वारस आहात. एकदा तुम्ही एकटे होता, टाकलेले होता, आध्यात्मिक रीतीने असहाय होता. तुम्ही पित्याविरहीत होता. आता तुम्हाला दैवी दत्तकपण मिळाले आहे. एक अनंत वारसा, कल्पनेपलीकडचा गौरव आणि पित्यांचा पिता मिळालेला आहे. देवाने तुम्हाला नाख़ुशीने दत्तक घेतले  नाही तर प्रेमाने घेतले आहे. आपल्या मुलांसाठी ज्या प्रकारची उत्तम प्रीती त्याला वाटते. त्याची झलक दाखवणारे पिता पुत्राचे नाते त्याने निर्माण केले आहे. त्याने आपला स्वत:चा पुत्र आपल्यासाठी पाठवला की त्यामुळे तुम्ही त्याचे व्हावे (१ योहान ३:१-२).

जी मुले आणि मुली मानवी पित्याच्या प्रेमाला पारखे आहेत ते प्रीतीसाठी मुकलेले नाहीत. ज्यांना ज्यांना खरी प्रीती समजलेली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची प्रीती मिळाली नसली तरी खरी प्रीती ते देवाने प्रेम केल्यामुळेच शिकलेले आहेत (१ योहान ४:९). जे आध्यात्मिक रीतीने पित्याशिवाय आहेत त्यांचा हा चांगला पिता.