दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देव तुम्हाला क्षमता देईल

जॉन ब्लूम

बायबलमध्ये देवाने समाधान, उत्तेजन, मार्गदर्शन आणि खात्री देणारे मोलवान खडे काही ठिकाणांमध्ये विखरले आहेत.  मला अपेक्षा नसताना मी माझी वैयक्तिक भक्ती करत असताना अगदी किचकट अशा निर्गमच्या काही जागी मला ते दिसले.

पूर्ण खुलासा: एकांतसमयी वाचताना अनेकांप्रमाणे मलाही मोह होतो की निर्गम. लेवीय, गणना, अनुवाद अशी पुस्तके वरवर पहावीत. त्यांच्यामध्ये असलेले तपशील मला क्वचितच आपल्यासंबंधी आहेत असे वाटतात. (वंशावळी, विधींचे नियम, मंदिराच्या वस्तूंची यादी, इ.) आणि ते सर्व माझ्या डोक्यात राहत नाहीत. मग बहुधा मी ते वगळून टाकतो. पण ह्या वेळी मी तसे केले नाही याबद्दल मला कृतज्ञ  वाटले कारण एक दुर्मिळ रत्न मला गवसले.

आता मला काय सापडले हे सांगण्यापूर्वी  रत्ने शोधण्यासबंधी प्रथम काही सांगावेसे वाटते. आपण बायबल पुन्हा पुन्हा वाचतो कारण त्यातील “रत्ने” इतरत्र सरकत असतात. पवित्र आत्मा एखादा तपशील  एखाद्या वेळी प्रकाशित करतो तर दुसऱ्या वेळी दुसरा. निर्गमातील एखादा निरस वाटणारा परिच्छेद पुढच्या वेळी नवी अंतर्दृष्टी व  नवीन शहाणपण देईल. देवाचे जिवंत वचन समजून घेताना न संपणाऱ्या साहसाचा हा भाग आहे (इब्री ४:१२). पवित्र आत्मा आपल्याला चकित करतो. आणि हीच गोष्ट मी मंडप उभारण्याच्या सूचना वाचत असताना घडले.

एक कठीण काम दिले

निर्गम २५-३० अध्यायात देव मोशेला एक लांबलचक यादी देतो व त्यामध्ये मंडप बांधण्याच्या तपशीलवार सूचना आहेत. मंडपाचा आराखडा दिल्यांनतर देवाने कराराच्या कोशाच्या नक्षीकामासाठी, भाकरीच्या मेजासाठी, दीपवृक्ष, यज्ञ करण्याच्या धूपवेदीसाठी, प्रत्यक्ष धूपासंबंधी, घंगाळ, याजकीय वस्त्रे  व अभिषेकाचे पवित्र तेल यांसाठी निश्चित सूचना दिल्या आहेत. या सूचनांनी सहा अध्याय भरले आहेत.

देव किती वेळा मोशेला “तू …कर” म्हणतो हे माझ्या लक्षात आले.  (पं. र. भाषांतरात हे स्पष्ट दिसते.) मी मूळ इब्री भाषेत “तू कर” हा वाक्यांश पाहिला. तेथे मोशे हा शब्द पुल्लिंगी, द्वितीय पुरुषी, एकवचनी वापरला आहे. दुसऱ्या शब्दात  “तू मोशे करशील.”

मोशेसाठी तर अशक्यप्राय असे प्रचंड काम त्याच्या पुढ्यात होतेच. तो प्रमुख संदेष्ट होता. राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमंत्री, सरन्यायाधीश, प्रमुख लष्करी सेनापती, बायबलचा प्रमुख समुपदेशक आणि वीस लाख असमाधानी भटकणाऱ्या राष्ट्राचा नेता होता. आणि हे लोक मार्गदर्शनासाठी, रोजच्या गरजांसाठी आणि संरक्षणासाठी त्याच्यावर अवलंबून होते. आणि आता देव त्याच्यावर “तू हे कर” असा स्पष्ट प्रकल्प त्याच्यावर लादत होता. मोशे हा असामान्य नम्र विश्वासी होता (निर्गम १२:३). माझ्यासारखा एखादा माणूस असता तर मी विचार केला असता, ‘हे आणखी काय? अशक्य काम आणखीच कठीण झाले आहे.’

पुरेशी क्षमता देऊ केली

नंतर मी ह्या मोलवान रत्नांच्या ढिगाजवळ अडखळलो.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे, मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील; सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील. जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात” (निर्गम ३१:१-६)

मोशेला व्यक्तिश: ज्या क्षमता नव्हत्या त्या देवाने समर्थ लोकांच्या स्वरूपात पुरवल्या. त्याने “तू हे कर” याचे रूपांतर “ते करतील” असे विस्तृत केले. एक अशक्यप्राय काम अधिक शक्य झाले.

हे मला इतक्या आशेने आणि आनंदाने कधी भिडले नव्हते. देव त्याच्या लोकांना जे काम देतो ते पूर्ण करण्यास लागणारी क्षमता तो  इतर पुरुष आणि स्त्रियांना  देतो (निर्गम ६:७).

पिता या नात्याने देवाने मला जी जबाबदारी दिली आहे, खास त्यासबंधी माझी आशा पल्लवित झाली. ख्रिस्ती वडील (आणि आई) यांना “त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा” (अनुवाद ६:७) या देवाच्या आज्ञेचा भार वाटू लागतो. पालकत्व हे दडपून टाकणारे काम वाटते. माझ्या मुलांना अजून काय काय माहीत व्हायला  हवे – फक्त ऐकून नाही तर त्यांनी ते नीट समजून विश्वास ठेवायला हवा –  या जाणीवेने मला कधी चिंता करण्याचा मोह होतो. त्यांना समजावयाला लावून विश्वास ठेवायला लावण्यास मी असमर्थ आहे याची मर्यादा  मला समजते. आणि माझी मुले आता किशोरवयीन असल्याने वेळ कमी होत आहे हे मला समजते. त्यांना गरज असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सज्ज करायला मी मुळीच पुरेसा नाही – आणि आता या वयात अनेक गोष्टी त्यांचा वेळ आणि लक्ष वेधून घेतात.

निर्गम ३१:६ मधील मोलवान रत्नांनी माझ्या जिवाला  आठवण करून दिली की वडील या नात्याने देवाने मला जे पाचारण केले आहे ते पूर्ण करण्यास तो सर्व पुरवठा करील. त्यामध्ये मी एकटा करू शकत नाही अशा गोष्टी करण्यास ज्या लोकांना त्याने क्षमता दिल्या आहेत त्यांचाही समावेश आहे (फिली. ४:१९).

तुम्ही एकटे नाहीत

अर्थात हे आपल्याला दडपून टाकणारी जी कामे देव देव देतो त्यासंबधीही आहे. देव आपल्यावर काम सोपवतो त्यामध्ये आपण कधीच एकटे नसतो. आपल्याला गरज असलेली सर्व क्षमता देव आपल्याला पुरवील. येशूने म्हटले, “मागा म्हणजे तुम्हाला मिळेल” (मत्तय ७:७). हडसन टेलर यांनी म्हटले, “देवाचे कार्य, देवाच्या मार्गाने केले तर त्याला देवाचा पुरवठ्याची कधीच कमतरता पडणार नाही यावर भरवसा ठेवा” आणि जेव्हा देव क्षमतांचा पुरवठा करतो तेव्हा तो इतर पात्र लोकांच्या द्वारे करतो. ‘तू कर’ हे बहुतेक प्रत्येक विधान देवाने ‘ते करतील’ मध्ये विस्तृत केले. निर्गम ३१:६ या वचनाच्या  नव्या कराराची आवृत्ती आहे १ करिंथ  १२:१८-२०. त्यानुसार देवाने शरीराचा प्रत्येक अवयव, अगदी प्रत्येकाची आपल्या निवडीनुसार रचना केली. “जर सर्व शरीर एकच अवयव असता तर शरीर कोठे? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे.”

देवाची आपल्याकडून जी अपेक्षा असते ती बहुतेक प्रत्येक वेळी संताच्या समाजामध्ये किंवा शरीराच्या संदर्भातच पूर्ण करायला हवी असते. कारण आत्म्याचे प्रकटीकरण प्रत्येकाला उपयोगासाठी दिलेले आहे (१ करिंथ १२:७). जसजसे प्रत्येक जण आपल्या क्षमता (कृपादाने) वापरतो आणि एकत्र रीतीने काम करतो, “तसे आपण सर्व विश्वास व देवाच्या पुत्राची ओळख यांच्या ऐक्यात येऊन पूर्ण मनुष्यपणास ख्रिस्ताच्या पूर्णतेच्या वाढीच्या परिमाणास पोचू लागतो (इफिस ४;१३). अशा रीतीने आपली अशक्य कामे शक्य करायला देवाला आवडते.

निर्गम ३१ च्या त्या एका वचनाने मला खूप समाधान मिळाले. ते इथे मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. त्याने मला एक चांगली आठवण करून दिली की देव फक्त मला सर्व पुरवतो एवढेच नाही तर तो त्याच्या समाधानाची रत्ने उत्तेजन, मार्गदर्शन, आणि खात्री ही आश्चर्यकारक ठिकाणी ठेवून देतो.

Previous Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

Next Article

छिन्नविछिन्न जीवनातून देव काय करू शकतो

You might be interested in …

शिमोनाने वधस्तंभ उचलण्यामागचा अर्थ

जॉन पायपर प्रश्न पास्टर जॉन, या आठवड्यात मी वधस्तंभाचा वृतांत वाचत होतो. त्यातील एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले. लूक २३:२६ मध्ये आपण वाचतो, “पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत […]

देवाची प्रीती लेखक: जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

  “ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? उलट ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो” (रोम ८:३५, ३७). […]

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का? लेखक: स्टीफन विटमर

येशूच्या काळापासून लोक दावा करत आहेत की अखेरच्या दिवसातील घटना त्यांच्या स्वत:च्या दिवसातच होणार. १९व्या शतकात विल्यम मिलर नावाच्या एका बायबल पंडिताने येशू मार्च २१, १८४४ या दिवशी येणार असा दावा केला. तसे काही घडले […]