लहान असल्यापासून येशूच्या मागे जाणे ही कल्पना मला आवडत होती. येशूबद्दल मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचे. कॉलेजमध्ये मी मिशनरी होण्यासाठी अभ्यास करत होते. एका खाजगी शाळेत शिक्षिका असताना मी मुलांना तन्मयतेने सुवार्ता सांगत असे. पाळकाची पत्नी झाल्यावर मी स्त्रियांना शिष्यत्वाचे शिक्षण देत असे आणि देवभीरू होण्यासाठी मी खूपच परिश्रम घेत असे.
हा जो वेळ मी प्रीती करण्यात, प्रयत्न करण्यात, शिकवण्यात, शिष्य करण्यात आणि परिश्रम करण्यात घालवला तो सर्व वेळ – मी खरी ख्रिस्ती नव्हते. माझं तारण झालं आहे असं मला वाटत होतं. पण ते झालं नव्हतं.
तारणाच्या मार्गाची सुरुवात झाली जेव्हा मी व माझ्या पतीने एका मिशनरी एजन्सीला सामील होण्याचा प्रयत्न केला. मिशनरी होण्यामध्ये काय गोवलेले हे दाखवून दिल्यानंतर एखादे ठराविक मिशनरी क्षेत्र निवडण्यापूर्वी आम्हांला अनेक कामे व धडे नेमून दिले. पहिल्याच कामाने माझे जीवन आमूलाग्र बदलून टाकले.
कठीण सुरुवात ते उत्सुक महत्वाकांक्षा
आमचे पहिले प्रयत्न होते एका स्थानिक मंडळीमध्ये गोवून घेणे. म्हणून आम्ही आमच्या पाळकांशी एक बैठक आयोजित केली. ही बैठक आमच्या अपेक्षेप्रमाणे पार पडली नाही. सुरुवात जरी प्रेमळ अभिवादनाने झाली तरी शेवटी मी ती सभा अश्रू गाळत सोडली. पाळकांनी मला फक्त एवढेच विचारले की शुभवर्तमानाचे स्पष्टीकरण करा. आणि मला हा संदेश जरी चांगला ठाऊक होता तरी माझ्या शब्दांनी दुसरेच काही दाखवून दिले. मला ओशाळवाणे वाटले. पण देवाने माझ्यावर संवादामध्ये आलेल्या या अचानक संकटाचा उपयोग माझे कठीण ह्रदय फोडण्यास सुरुवात केली. अनेक वर्षे सुवार्ताप्रसार, मिशनरी क्षेत्रांना भेटी आणि सेवा केल्यानंतर मी ख्रिस्ती नव्हते हे कबूल करणे ही नमवणारी गोष्ट होती. ती मुलाखत मला लवकर संपवणे भाग होते. पण काहीतरी बरोबर नाही ही भावना मी झटकू शकत नव्हते. सुवार्ता काय हे सांगणे ही समस्या नव्हती तर माझ्या जिवामध्ये खोलवर एक अपुरेपणा भरून राहिला होता. मला समजले की मला मरणाची भीती वाटत होती. खरं तर मला नरकाची भीती वाटत होती. तरीही जेव्हा मी माझ्याशी अगदी प्रामाणिक होते तेव्हा मला वाटले माझे पाप नरकाची शिक्षा भोगण्याइतके मोठे नाही. पण माझे विचार मी माझ्याजवळच ठेवले व माझे ख्रिस्ती कार्य करीतच राहिले.
आता माझ्या पतीने सेवेमध्ये नोकरी स्वीकारली आणि हे आंतरिक विचार मला जोराने ऐकू येऊ लागले. आता मी पाळकाची पत्नी म्हणून माझे ख्रिस्ती कार्य करत होते. बाहेरून मी खूपच ख्रिस्ती दिसत होते पण माझ्या आध्यात्मिक व्यस्तपणाखाली मी माझ्या तारणाबद्दल प्रश्न करत होते.
आणि एका सुंदर संध्याकाळी कोड्याचा हरवलेला तुकडा त्याच्या योग्य ठिकाणी बसला.
मान्य करण्याचा दिवस
२००७ मधील तो उत्तम शुक्रवारचा दिवस होता, ज्यावेळी मला समजले की मी पापी आहे. मला समजते तेव्हापासून पापाचे तत्त्व मी तोंडाने मान्य करत होते पण त्या संध्याकाळी माझी मानवजातीच्या पापाच्या ज्ञानाची जाणीव बदलली व तिचे रूपांतर माझ्या वैयक्तिक आणि व्यक्तिगत पापामध्ये झाले आणि त्यामुळे माझे ह्रदय भग्न झाले.
स्पष्ट सांगायचे तर, माझ्या जीवनभर इतर लोकांपेक्षा मला पापाबद्दल वाईट वाटत असे. पण लहानपणची ही जाणीव बाहेरच्या प्रभावामुळे निर्माण झाली होती – चांगले बायबल शिक्षण, योग्य व अयोग्य काय हे शिकवणारे आईवडील आणि आपल्या कृपेने पापाची खात्री देणारा पवित्र आत्माही (योहान १६:८). तरीही ही खात्री जो अंत:करणात वास करतो त्या आत्म्याद्वारे माझ्या मनाच्या गाभ्यामध्ये झाली नव्हती (यहेज्केल३६:२६-२७).
पण त्या शुक्रवारी माझ्या किळसवाण्या पापामुळे मला देवाचा शत्रू केले आहे याची पूर्ण जाणीव मला झाली. माझ्या पापाने माझ्या निर्माणकर्त्या देवापासून मला अनंतकाळसाठी दूर केले आहे आणि माझ्या पापाने येशूला वधस्तंभावर खिळले होते. जेव्हा मी माझे अपराध स्वीकारू लागले तेव्हा येशूची चांगली बातमी सत्य घटनांपेक्षा खूपच मोठी वाटू लागली.
“चांगल्या मुलींना” सुवार्तेची गरज आहे
चर्चमध्ये वाढले जाणे हे पेचाचे असू शकते. आमच्यासारखी अशी चर्चची मुले चांगल्या आणि देवाच्या गोष्टींकडे आकर्षित होतात (आणि हे योग्यच आहे). आणि त्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा देवाच्या जवळ आहोत असे आम्हांला वाटू लागते. त्यामध्ये काही बायबलच्या ज्ञानाची भर घाला आणि “योग्य ते करण्याची” वाढती भूक या सर्वातून एक न तारलेली ख्रिस्ती व्यक्ती तयार होते. दुसऱ्या शब्दांत येशूबद्दल खूप ऐकत राहणे व देवभीरू वागण्याचे प्रयत्न करण्याच्या मार्गात जात राहणे सोपे असते – आणि सर्ववेळ तुम्ही स्वत:ची व इतरांची फसवणूक करत असता. “चांगली मुलगी” असण्याच्या प्रयत्नात मी पुरी फसले होते.
देवाच्या दर्जानुसार अशा चांगल्या मुली नाहीयेत; आणि हेच सत्य मी आकलन करू शकले नाही. खरं तर माझ्या सारख्या लोकांसाठी येशूने एक गोष्ट सांगितली:
“एक परूशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. परूश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.’
जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’
मी तुम्हांला सांगतो, त्या दुसर्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल” (लूक १८: १०-१४).
या परूशासारखे आपण चांगले आहोत असे ज्यांना वाटते ते स्वत:ची इतरांशी तुलना करण्यात इतके व्यस्त आहेत की स्वत:चे देवासमोर असलेले दुष्टपणा ते पाहत नाहीत. ते देवानुसार गोष्टी करत असतील, आध्यात्मिक दृष्ट्या ते महत्वाकांक्षी असतील पण त्यांचे तारण झालेले नसते. अगदी माझ्यासारखेच त्यांचेही ह्रदय परूशीमय, पुनर्जन्म न झालेले अंत:करण असते.
काही इतर जण आपली असहाय परिस्थिती जाणून घेऊन देवाच्या दयेसाठी त्याच्याकडे आक्रोश करतात. हे लोक देवापुढे नम्रपणे उभे राहतात व क्षमेची भीक मागतात. त्यांना समजते की आपण कधीच चांगले नव्हतो, पण ते परिपूर्ण चांगल्या अशा तारणाऱ्याला बिलगून राहतात. त्यांचा आत्मा खंडणी भरून सोडवला जातो. त्यांना नीतिमान गणण्यात येते (लूक १८:१४).
येशूच्या बाजूचे असणे पुरेसे नाही
आपण देवाच्या लोकांचा भाग आहे असे दिसत असू पण जोपर्यंत आपले ह्रदय “ देवा मज पाप्यावर दया कर” असा आक्रोश करत नाही तोपर्यंत हा देखावा आहे. हा भ्रम देवभीरू म्हणवणाऱ्या व्यक्तीलाही फसवू शकतो.
दु:खाची गोष्ट म्हणजे अनेक लोक देवासमोर उभे राहतील आणि विचार करतील की त्यांच्या ख्रिस्ती जीवनाची गोळाबेरीज चांगली दिसते (मत्तय ७:२१-२३). पण ख्रिस्ती सेवा तारणाची हमी देत नाही. येशूच्या बाजूचे असणे म्हणजे तुम्ही ख्रिस्ती आहात असे नाही. इतकेच नाही तर पापाची जाणीव असणे आणि आज्ञापालनाचे प्रयत्न करणे तुमच्या तारणाची खात्री देत नाही. लोक ख्रिस्तीत्वाच्या (आणि ख्रिस्ती सेवेच्या) मेळाव्यात अनेक कारणांसाठी सामील होतात पण मुख्य मुद्दाच त्यांना गवसलेला नसतो. आपले आतून रूपांतर होण्याची गरज आहे ज्यामध्ये आपल्याला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा ख्रिस्त हवासा वाटतो. कारण आपल्याला समजते की इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला त्याचीच गरज आहे (मत्तय १३:४४-४६). नाहीतर आपले ख्रिस्तीपण हे न तारलेल्या आत्म्यावर येशूविषयक गोष्टींची कात्रणे चिकटवलेले एक चित्र असू शकते.
दु:खद तरीही वैभवी आनंद
अनेक वर्षांच्या सुवार्ताप्रसार, मिशन फेऱ्या आणि सेवेचे अनेक प्रयास केल्यानंतर मी ख्रिस्ती नाही असे मान्य करणे फारच नमवणारी गोष्ट होती. पण तारणारा माझ्यासाठी मरण पावला हे लक्षात येणे यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली गोष्ट नव्हती. मला माझा गर्व सोडवा लागला पण मला अनंतकालिक जीवन मिळाले. माझे ‘आध्यात्मिक अनुभव’ हे केवळ अनेक अनुभव होते हे मला मान्य करावे लागले पण मला पापांची क्षमा प्राप्त झाली. मी खोटी होते हे स्वीकारणे वेदना देत होते पण देवाचे मूल बनणे हा शुध्द आनंद होता.
जर तुम्हाला जाणीव होत असेल की तुम्ही एक “देवभीरू व्यक्ती” आहात पण तुम्ही येशूशिवाय दुसऱ्याच कशाच्या तरी मागे लागला आहात तर तुमची ही चिंता दडवून ठेवू नका. तुमचा गर्व झाकू नका. तुम्हाला देवाच्या शुभवर्तमानाची जिवाहून अधिक गरज आहे मान्य करा. त्या जकातदारासारखे नम्र व्हा आणि देवाकडे पापक्षमेसाठी याचना करा. देवाचा जो क्रोध तुम्ही ओढवून घेतला आहे तो येशूने स्वत:वर घेतला यावर विश्वास ठेवा. तुमच्या आध्यात्मिक अनुभवांपासून मागे फिरा आणि खऱ्या विश्वासाने पश्चात्तापपूर्वक येशूकडे वळा (प्रेषित २०:२१). तुमचा अनंतकाळ अनिश्चित होईल; देवभीरूपणाला तुम्हाला फसवू देऊ नका.
हे लेख तुम्ही इतरांना पाठवू शकता . पाठवताना lovemaharashtra.org द्वारे प्रसारित असा उल्लेख करावा.
Social