Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 9, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा ८.                                             १ योहान २:७ – ११                              स्टीफन विल्यम्स

धडा ८.   १ योहान २:७ – ११ स्टीफन विल्यम्स

 

                                                                                     फरक दुसरा – प्रीती व द्वेष
•           प्रेम एवढे आकर्षक का असते? या जगात प्रेम ही हवीहवीशी गोष्ट का वाटते?
▫        खरी प्रीती ही खोलवर समाधान प्राप्त झाल्याचे ओसंडून वाहणारे चिन्ह आहे – इतकी तुमची तृप्ती  होते, तुम्ही इतके भरून पावता की              तुम्ही इतरांना समाधान कसे देता येईल हे पाहू लागता. त्यामुळेच  खरी ख्रिस्ती प्रीती इतकी स्वत:ला देऊन  टाकणारी असते. कारण                  ख्रिस्ती व्यक्तीला ख्रिस्तामध्ये खोलवर समाधान प्राप्त झालेले असते.
▫        प्रीती एक नवीन पर्वाचे, ख्रिस्ताच्या युगाचे चिन्ह आहे. ख्रिस्तामध्ये पूर्ण समाधान प्राप्त झालेल्या लोकांच्या समूहापासून मंडळी तयार                   करण्यात आली आहे. ते सार्वकालिक राज्यासाठी इतरांना समाधान देण्यासाठी खटपट करतात.
स्वर्गामध्ये नातेसंबंध आहेत.
•           ख्रिस्ती जीवनाच्या चार फरकांचा आपण अभ्यास करत आहोत. पहिला फरक आपण नैतिकतेबाबत पाहिला.  त्यात आपण आज्ञापालन
करणारे अंत:करण व अवज्ञा करणारे अंत:करण यातील फरक पाहिला. त्याद्वारे ख्रिस्त तुमच्यामध्ये कार्यरत असल्याचे सिद्ध होते. या
अभ्यासात आपण प्रीती आणि द्वेष यातील फरक पाहणार आहोत.
•           योहान येथे ख्रिस्ताची प्रीती ही ख्रिस्तामध्ये देवाच्या नवीन युगाची पहाट झाल्याचे चिन्ह असल्याचे दाखवून देत आहे. योहान सादर करत
आहे की जे ख्रिस्ती जन परस्परांवर प्रीती करतात, ते आपण या नाश पावणाऱ्या युगाचे नसून ज्या नवीन युगाची ख्रिस्तामध्ये पहाट होऊन
चुकली आहे, त्या युगाचे आहोत असे दर्शवून देतात .

शास्त्राभ्यास

प्रीती करा ही काही नवीन आज्ञा नाही

प्रियजनहो मी तुम्हास नवीन आज्ञा लिहीत नाही. परंतु जी आज्ञा तुम्हास प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा तुम्हास लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ती जुनी आज्ञा आहे (१ योहान २:७.)

  • पूर्वीच्या शास्त्रभागात खऱ्या विश्वासाचा पुरावा आज्ञापालन आहे असे योहान सांगतो. आता तो आज्ञापालनाचे बारकावे मांडत आहे –  महत्त्वाचे हे की ख्रिस्ती आज्ञापालन हे प्रीतीत मुळावलेले आहे. (२:५ मध्ये उल्लेख आला आहे).
    •           ज्या आज्ञेसंदर्भात तो बोलत आहे ती तो स्पष्ट सांगत  नाही. पण या वचनाचा संदर्भ त्याचा अर्थ आपल्याला ते  उघड करतो.
    ▫         वचन ९ चा विषय प्रीती आणि द्वेष असा आहे.
    ▫         त्याने वापरलेल्या भाषेने “एकमेकांवर प्रीती करा” ही येशूने दिलेली “नवी आज्ञा” पुन्हा ऐकवली जाते (योहान १३:३४-३५; १५:                 १२,१७).
    तो काय शिकवत आहे, तर येशूची व त्याच्या प्रीतीची खूप खूप जुनी गोष्ट. त्यांच्या मंडळ्यांमधून सुवार्ता अगदी स्पष्टपणे तारण व
    येशूच्या परिवर्तन करणाऱ्या प्रीतीवर जोर देऊन घोषित केली जात होती.

•           येशूच्या प्रीती कर ह्या आज्ञेविषयी बोलताना ही आज्ञा जुनी आहे यावर योहान जोर देतो. ह्यात त्याचा दुहेरी हेतू असावा :
▫        आज्ञापालनावर जोर देताना सुवार्तेचा हा मूलभूत मुद्दा ख्रिस्ती व्यक्तीला आधीच माहीत असणे गरजेचे आहे असे योहान म्हणतो.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर , “तुम्हाला हे अगोदरच माहीत आहे, त्याप्रमाणे जीवन जगा” असे तो सांगतो.
▫         तो ठामपणे मांडतो की जुनी म्हणजे ख्रिस्ताने सांगितलेली सुवार्ता सर्व खोट्या शिक्षणावरचा उपाय  आहे.
۰           खोटे शिक्षक आपल्याजवळ “नवीन” ज्ञान असल्याचा दावा करीत असत. हे केवळ त्यांच्यापाशीच असून येशूविषयी प्रेषितांनी जे
शिकवले  त्याऐवजी आता हे आले आहे  असे ते सांगत.
۰          या खोट्या शिक्षकांशी योहान वाद घालत बसत नाही की नवीन काही सत्य किंवा विचारधारा घेऊन येत नाही. तर केवळ तो पुन्हा                       जोरदारपणे तीच पूर्वीची जुनी, सामर्थ्यशाली, जीवन परिवर्तन करणारी ख्रिस्ताने सांगितलेलीच सत्ये सांगतो.

प्रीती ही नव्या युगासाठी असलेली आज्ञा आहे

तरी एक प्रकारे मी तुम्हास नवी आज्ञा लिहितो . ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे; व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे (१ योहान २:८).

  • जुन्या शिक्षणावर जोर दिल्यानंतर आता योहान नाविन्यावर जोर देऊन पेचात पाडत आहे. ही विरोधाभासाची वाटणारी त्याची भाषा आपण कशी समजून घ्यायची? ती जुनी आज्ञा नवीन पण कशी आहे? येथे काही उत्तरे आहेत.
    ▫         ती यासाठी “नवीन” आहे की ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील प्रीतीचा “नवा “आदर्श घेऊन ती आली  आहे (१ योहान ४:९).
    ▫         ती यासाठी “नवीन”आहे की येशूने विलक्षण रीतीने देवावर प्रीती करणे (अनुवाद ६:४,५) व आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे
    (लेवीय १९:१८) या स्वरूपात संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश सांगितला आहे.
    ▫         ती यासाठी “नवीन” आहे की देवाची दया रोज नवी होते (विलाप ३:२३).
  • जरी ही सर्व सत्ये वचनात असली, तरी एका दुसऱ्या संदर्भात नाविन्यावर जोर दिला आहे. वचन ८ वाचा – पहिली गोष्ट म्हणजे ही नवीन आज्ञा “त्याच्यामध्ये ( येशूच्या) व तुमच्यामध्ये खरी आहे.” – दुसऱ्या  शब्दांत सांगायचे तर योहान म्हणत आहे की प्रीती करण्याची ही आज्ञा प्रभूमध्ये व त्याच्या सर्व  शिष्यांमध्ये खरोखर व्यक्त झाली आहे. देवाच्या लोकांचा “प्रीती” हा गुणविशेष आहे कारण तो खुद्द             देवाचा गुणविशेष आहे.
    नंतर ख्रिस्त व त्याच्या शिष्यांमध्ये प्रीती हा गुण का दिसतो याची दोन कारणे योहान देतो:
    ۰   कारण अंधार दूर होत आहे: ह्या युगाचा अंत होत आहे. (१ योहान २:१७ व १ करिंथ ७:३१ मध्ये हीच परिभाषा वापरली आहे.)
    ۰   कारण खरा प्रकाश केव्हापासूनच प्रकाशत आहे. हा खरा प्रकाश कोण आहे? आपला देव  आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त! (१:५).
    ۰   या वचनात दोन ऐतिहासिक घटना घडत आहेत – अंधार नाहीसा होत आहे आणि “खरा  प्रकाश” प्रकाशत आहे.
    ▫ योहानाचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
    ۰         जेव्हा येशू आला तेव्हा नवीन युग सुरू झाले. त्याचे मरण व पुनरुत्थानाने या युगाचे उदघाटन झाले.
    ۰         आणि आपण त्या येणाऱ्या युगाचे असण्याचा पुरावा हा कोणत्यातरी भावी आशेमध्ये नाही. तर त्याचा पुरावा वर्तमानकाळात आहे
    – जेव्हा आपण परस्परांवर प्रीती करतो तेव्हा या जगातच आपण स्वर्गाची चव घेत असतो. ख्रिस्तामध्ये समाधान प्राप्त                              झाल्यामुळेच मंडळीतील लोक परस्परांवर प्रीती करतात .
    ۰         स्वर्ग म्हणजे जेथे ख्रिस्ती प्रीती पूर्णत्वाला येते – सदा सर्वकालासाठी तिचा येथे चांगला सराव करा!

तुम्ही कोणत्या युगाचे आहात हे प्रीतीवरून उघड होते

मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहातो आणि त्याच्याठायी अडखळण नसते. पण आपल्या  बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत (१ योहान २:९-११).

  • ख्रिस्तासारखी खरी प्रीती येणाऱ्या नवीन सार्वकालिक युगाची आहे. या नाहीशा होत असलेल्या जगाची ती स्वार्थी प्रीती नाही. योहान काही व्यावहारिक कसोटी लावून आपल्याला काय म्हणायचे आहे याचा अर्थ या      तीन वचनांमध्ये स्पष्ट करत आहे. 
    •          
    मंडळीतील लोकांचा द्वेष करायचा आणि तरीही स्वत:ला विश्वासी म्हणवून घ्यायचे हे शक्य आहे का?  नववे वचन याचे स्पष्ट                    उत्तर देते. मंडळीतील ख्रिस्ती लोक आपल्या सहकारी बंधुंशी द्वेषाने व कटुतेने वागत असतील      तर ते आपण ख्रिस्ती                           असल्याचा दावा करू शकत नाहीत. त्यामुळे ते ज्या नव्या युगाची पहाट होत आहे, त्या    युगाचे नाहीत. येशू प्रीती व द्वेषाविषयी                 काय म्हणाला ते लक्षात घ्या (मत्तय ५:२१,२२). 
    •          
    प्रीती करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील आशीर्वाद १० व्या वचनात आढळतात.
    जेव्हा तुम्ही ख्रिस्तासारखी प्रीती करता तेव्हा तुम्ही ख्रिस्ताशी असलेले तुमचे नातेसंबंध प्रदर्शित  करता  (वचन १०).
    जेव्हा तुम्ही ख्रिस्तासारखी प्रीती करता तेव्हा तुम्ही पाप करण्याची शक्यता कमी करणारी परिस्थिती निर्माण करत असता (वचन             १०). जेथे प्रीती विपुल होते तेथे अडखळण्याचे काही कारण नसते. स्वार्थीपणात भरपूर पाप रुजलेले असते. याउलट जेथे प्रीती                 असते तेथे विश्वास व सहाय्य विपुल होते.

•           प्रीतीहीन जीवनाचे निदान ११व्या वचनात स्पष्ट दिले आहे:
▫         ते ख्रिस्ताचे किंवा त्याने उदघाटन केलेल्या नव्या युगाचेही नसतात (वचन ११).
▫         त्यांच्या जीवनाला काही दिशाच नसते (वचन ११).
▫         त्यांच्या आत्मिक आंधळेपणात द्वेष मुळावलेला असतो. ते या नाहीसे होत चाललेल्या जगाचे लक्षण  आहे.
▫         यावरील उपाय स्पष्टच आहे: येशूकडे या –  तो तुम्हाला त्याची अमर्याद, खरी तृप्त करणारी प्रीती  दाखवून देईल (१ योहान ४:९) आणि
तुमचे अंत:करण असे बदलून टाकील की तुम्ही त्याच्या सारखीच प्रीती करू लागाल (१ योहान ४:७).

चर्चेसाठी प्रश्न

  • ख्रिस्ताची प्रीती स्वत;ला देऊन टाकणारी, ख्रिस्तामध्ये समाधानी राहणारी असते. आपण प्रीतीची चुकीची   व्याख्या कोणत्या पद्धतींनी करतो?
    •           आपली एकमेकांवर प्रीती असल्याचे आपण प्रत्यक्ष व्यवहारात कशा प्रकारे व्यक्त करू शकतो?
    •           हा शास्त्रभाग प्रदर्शित करतो की विश्वासी लोकांनी परस्परांवर कशा प्रकारे प्रीती करायला हवी. पण ही प्रीती ख्रिस्ती व्यक्ती व                अविश्वासी व्यक्ती यांच्या नातेसंबंधांविषयी काय सांगते? चर्चेसाठी वचनांचा वापर करा.