जनवरी 2, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा २४.   १ योहान ४:१२-१६ स्टीफन विल्यम्स

                                                                          देवाचा पुरावा

देव अदृश्य आहे. अदृश्य देवाची ओळख कशी होऊ शकेल? जुन्या करारात मानवी वेश धारण करून देव प्रकट होताना दिसतो. पण तो देवाच्या परिपूर्णतेचा खरा अनुभव नव्हता. मोशेला सुद्धा देवाची केवळ पाठमोरी झलक पाहायला मिळाली.

आता अत्यंत महत्त्वाच्या या युगात देवाला आपण कोठेच पाहू शकत नाही, की शरीराने ख्रिस्ताकडे जाण्याचा काही मार्ग नाही. त्यामुळे अशा शंका येतील – जर देवाला मी पाहू शकत नाही तर मग तो अस्तित्वात आहे हे मला कसे कळू शकेल? योहान आपल्याला समजून घ्यायला मदत करत आहे की दैहिक मनुष्य विश्वास ठेऊ शकत नाही किंवा प्रीतीही करू शकत नाही, जेव्हा खरा विश्वास व खरी प्रीती आपल्यामध्ये दिसते तेव्हा देवाच्या अस्तित्वाचा तो निश्चित व खात्रीलायक पुरावा आहे आणि देवाचा आत्मा आपल्या ठायी वसत असल्याचा तो निश्चित व खात्रीलायक पुरावा आहे.

शास्त्राभ्यास

देव आमच्यामध्ये अस्तित्वात आहे कारण प्रीती आपल्यामध्ये अस्तित्वात आहे  (व. १२,१३)

देवाला कोणी कधीही पाहिले नाही; आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठायी राहतो; आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो हे आपण यावरून ओळखतो की, त्याने स्वत:च्या आत्म्यातून आपल्याला दिेले आहे (४:१२,१३).
७ व्या वचनात याउलट विधान करून ते सत्य असल्याचे म्हटले आहे. “प्रीती अस्तित्वात आहे कारण देव अस्तित्वात आहे.” योहानाने स्पष्ट मुद्दा मांडला आहे की ख्रिस्ती व्यक्तीला परस्परांवर प्रीती केल्यावाचून राहावतच नाही. कारण देवाचा स्वभावच प्रीती आहे. आणि तो जर प्रीती करतो तर त्याचे जे आहेत ते देखील प्रीती करणारच.
• या वचनात योहान निराळे सत्य मांडतो. आपण खात्री बाळगू शकतो की “देव अस्तित्वात आहे कारण प्रीती अस्तित्वात आहे.”
वचन १२ पाहा. त्याचे म्हणणे ईश्वरी सिद्धांताच्या वास्तवाने मांडण्यास तो आरंभ करतो – कोणी कधीही देवाला पाहिले नाही. देव अदृश्य आहे. तो शारिरीक नव्हे तर आत्मिक दृष्ट्या अस्तित्वात आहे.
मग पहिला प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की देव अमूर्त आहे तर मी त्याला कसे ओळखू शकेन? योहान १:१८ मध्ये उत्तर देतो की त्याला ख्रिस्ताच्या मानवी देहधारणेत तुम्ही ओळखू शकता.
पण मग यानंतर दुसरा एक अधिक वैयक्तिक प्रश्नही विचारला जातो: देव अमूर्त आहे, तर मी त्याला ओळखतो हे कसे जाणून घेऊ शकतो? आणि माझे या अमूर्त देवाशी संबंध प्रस्थापित झाले आहेत याची मी कशी खात्री बाळगू शकतो?
त्याचे उत्तर,  जेव्हा आपण परस्परांवर सुवार्तेच्या प्रीतीने प्रीती करतो यात आहे.
۰ जे अमूर्त ते त्याच्या प्रभावाने निश्चितार्थाने खरे होते.
۰ योहान ३:८
• योहानाचे आतापर्यंतचे प्रीतीविषयीचे म्हणणे असे आहे :
पहिले म्हणजे देवाचा स्वभाव प्रीती आहे ( वचन ७).
दुसरे म्हणजे देवाने आपल्या पुत्राला देऊन प्रीती प्रगट केली ( वचन ९-१०).
तिसरे म्हणजे देवाच्या प्रीतीचा अनुभव घेण्यामुळे देवाची प्रीती इतरांबरोबर वाटून घेण्यास प्रेरणा मिळते (वचन ११).
आता वचन १२,१३ मध्ये जेव्हा देवाचे लोक प्रीती करतात तेव्हा त्यातून दोन गोष्टी सिद्ध होतात:
ते म्हणजे देव खरोखर आपल्या ठायी वसतो (हे त्याचे वास्तव्य आपल्यामधील त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे असते वचन १३).
۰देवाचा प्रीती करण्यामागील उद्देश सिद्धीस गेलेला असतो (पूर्णत्व पावतो).

देव आपल्यामध्ये अस्तित्वात आहे कारण विश्वास आपल्यामध्ये अस्तित्वात आहे (व. १४-१६)

आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो (४:१४,१५).

आपण अमूर्त देवाला कसे ओळखू शकतो? सहाजिकच एक मार्ग आहे की त्या अमूर्ताने निश्चितार्थाने वास्तव व्हावे. योहान १:१८ मध्ये ख्रिस्ताच्या मानवधारी होण्यात याचे उत्तर मिळते. त्या अमूर्त देवाने मानवी देह
धारण केला यासाठी की आपण त्याला ओळखावे.
•जेव्हा येशू या जगात वावरला तेव्हा त्याच्यासोबत चालणारे जे होते त्यांनी काळजीपूर्वक प्रथम व प्रत्यक्ष साक्षी म्हणून देवाच्या वचनात आपल्या नोंदी लिहून ठेवल्या (१ योहान १:१-३).
•आपल्याला देवाविषयी काय समजते? ते १४ वे वचन घोषित करते: “आम्ही” म्हणजे प्रेषितांनी येशू हा देवाचा पुत्र (सत्य) जो मानवधारी झाला त्याला पाहिले व त्याच्याविषयी साक्ष दिली. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्या पुत्राला पाठवले (प्रीती) यासाठी की आपण पापाच्या सामर्थ्यापासून व पापी आचरणापासून तारले जावे   (नैतिकता), याचीही घोषणा केली.
• पण वचनात प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी दिलेली साक्ष अस्तित्वात आहे ही गोष्ट कोणालाही ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत  नाही. खरी कबुली देण्यासाठी पवित्र आत्मा कार्य करतो तेव्हा एखादी व्यक्ती विश्वास ठेऊ शकते (४:२).
म्हणून वचन १५ म्हणते की आपण येशू हा मानवधारी होऊन आलेला देवाचा पुत्र तारणारा आहे हा विश्वास ठेऊन कबुली देऊ शकतो. हाच देव आपल्यामध्ये वसत असल्याचा दुसरा पुरावा आहे.
• मग आता वचन १६ मध्ये विश्वास आणि प्रीती या दोन कल्पनांचा एकत्रित सारांश दिला आहे. आणि प्रीती एक अलग गोष्ट असा विचार न करता योहान पुन्हा सांगतो की देव आपल्यामध्ये वसत असल्याचा व आपण त्याचे असल्याचा पुरावा हा आहे की आपण प्रीतीमध्ये राहतो.

मनन व चर्चेसाठी प्रश्न

प्रीतीसाठी समाजसंपर्क असायला हवा. देवाने कोणालाही निर्मिण्यापूर्वी देवाचा स्वभाव प्रीती आहे. देवाचा स्वभाव प्रीती कसा असू शकतो? म्हणजे प्रीती करण्यासाठी मानवप्राणी निर्माण केल्यानंतरच देवाने प्रीती करायला सुरूवात केली असा याचा अर्थ होतो का?

उत्तर  :- त्रेकत्व (योहान १७:२३-३६). देव प्रीती असल्यामुळे आणि त्रेकत्वात त्याने सर्वकाळ ती  प्रीती व्यक्त केल्यामुळे, ती प्रीती त्याची निर्मिती असलेल्या आम्हा मानव प्राण्यांमध्ये अस्तित्वात आहे.

Previous Article

देवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस

Next Article

एलजीबीटी लेखक: डग्लस विल्सन

You might be interested in …

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

 प्रकरण २                                            सुवार्ता प्रसारासाठी मंडळी ज्यांना पाठवते, त्यांच्यासाठी मिशनरी हा शब्द सध्या प्रचलित आहे. प्रे.कृत्यांमधील पौलाच्या सुवार्ता फेऱ्यांनाही मिशनरी फेऱ्या म्हणूनच संबोधले जाते. इतर देशांच्या तुलनेत विविध संप्रदायांतून, धर्मपीठांतून व देशांतून भारतात मिशन कार्य झाले.  […]

येशू मेलेल्यातून उठला याची आठ कारणे जॉन पायपर

१.  येशूने स्वत: आपल्या येणाऱ्या पुनरुत्थानाची साक्ष दिली. आपल्यासंबंधी पुढे काय होणार हे येशूने उघडपणे सांगितले. प्रथम वधस्तंभावर खिळले जाणे आणि नंतर मेलेल्यांतून पुन्हा उठणे. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री […]