Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 2, 2018 in जीवन प्रकाश

एलजीबीटी                                                                                   लेखक:  डग्लस विल्सन

एलजीबीटी लेखक: डग्लस विल्सन

(एलजीबीटी हा शब्द आता खूपच प्रसिद्ध होत आहे. इंद्रधनुष्य  हे चिन्ह आता या लोकांचे प्रतिक बनले आहे.

एलजीबीटीचा अर्थ काय?
एल: लिस्बीयन – स्त्रियांचा समलिंगी संभोग. जी: गे- पुरुषांचा समलिंगी संभोग. बी: बायसेक्षुअल – नैसर्गिक व समलिंगी सबंध दोन्ही. टी: ट्रान्सजेन्डर – लिंगबदल करून घेणे.
अशा या अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांचा समूह जगभर मान्य झालेला असून त्यांना कौटुंबिक हक्कही दिले जात आहेत. ख्रिस्ती या नात्याने आपली वृत्ती काय असावी यासबंधीचा हा एक लेख.)

नुकताच मी एका कॉन्फरन्सला गेलो होतो. ही कॉन्फरन्स एका मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केली होती. हॉटेलच्या मध्यभागी आमच्या सर्वांच्या वर एक इंद्रधनुष्याचा झेंडा फडकत होता. आणि तो इतका वर होता की जणू  आम्हाला तो सांगत होता, तुम्ही माझ्यासबंधी काहीही करू शकत नाहीत. आणि असेच आपल्या सर्वांना वाटत असेल.

तर समलिंगी लोकांच्या धोरणाबाबत आपण काही करू नाही हे बऱ्याच ख्रिस्ती लोकांना ठाऊक आहे. या विषयाबाबत चर्चमध्ये शिक्षणाची कमतरता आहे. आणि याच विषयावर जग अमाप शिक्षण देत आहे. यामुळे आपण काही करू शकत नाही.
हा लेख अगदी प्राथमिक स्वरूपाचा आहे असे माना.

देवाच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेले

देवाने म्हटले, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.” देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली (उत्पत्ती १:२६-२७).

जेव्हा आदाम व हवेला जगावर सत्ता गाजवण्याचा आदेश दिला तेव्हा जग हे भरून गेलेले होते. ते जीवनाने विपुल रसरसलेले होते (उत्पत्ती १:२१). त्यामध्ये दोन आदाम आणि एक मासा असलेली हवा, दोन आदाम आणि पक्षी असलेल्या हवा बाया, असे काही नव्हते. नाही, जग हे जीवनाने समृध्द होते, आणि देवाने मनुष्याला आपल्या प्रतिमेचे निर्माण केले होते. स्वत:च्या स्वरूपानुसार यासाठी की त्याने या सर्वांवर ‘सत्ता चालवावी” अर्थातच या सर्वासाठी आदाम व हवेला अधिक समर्थ होण्याची गरज होती आणि ती मिळवण्याची क्षमता देवाने त्यांच्यामध्ये ठेवलेली होती.

वचन २६ सूचित करते की देवाच्या प्रतिमेमध्ये मानवजात निर्माण करताना त्याने पुरुष व स्त्री घडवले. २७व्या वचनात हे स्पष्ट आहे. आपण देवाच्या प्रतिमेमध्ये आहोत हे या दोन वचनात तीन वेळा आले आहे. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली (व.२७).

समलिंगी जोडपी हे नाकारतात.

प्रतिमा डागाळली

पहिल्या व दुसऱ्या अध्यायाच्या वैभवानंतर तिसऱ्या अध्यायाची दुर्घटना येते. पुरुष व स्त्री देवाच्या प्रतिमेमध्ये होतेच, त्यांना महान प्रतिष्ठा देण्यात आली होती, पण आता त्यांना बरे वाईट समजून देवासमान होण्याचा मोह झाला होता (३:५). देवाने त्यांना स्वत:ची प्रतिमा दिली होती; सैतानानेही त्यांना देवासमान होण्याचे अभिवचन दिले. आणि त्यांच्या पापामुळे त्यांनी ही देवाची प्रतिमा अत्यंत वाईट रीतीने डागाळली. त्यांना असलेली प्रतिमा त्यांनी खूपच कमी केली. ती अजूनही तेथे होती पण तिची फारच खराबी झाली होती.

यामुळे आता मानवामध्ये असलेली देवाची प्रतिमा एका भग्न चर्चच्या इमारतीसारखी आहे. तिचे छप्पर आकाशाकडे खुले पडले आहे. तुम्ही अजूनही त्याचा आराखडा ओळखू शकता आणि त्या चर्चमध्ये तुम्ही कोठे आहात ते तुम्ही समजू शकता. पण एकदा जे होते तसे ते आता मुळीच नाही.

माणसाने पतनानंतरही त्याची प्रतिमा राखून ठेवली आहे हे देवाने उत्पत्ती ९:६ मध्ये खुनासाठी शिक्षा देताना सांगितले. “जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.” आणि मनुष्यामधल्या देवाच्या प्रतिमेचा उद्धार करण्याची गरज आहे हे आपल्याला इफिस ४:२४ वरून समजते  “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” कारण अगदी हेच करण्यासाठी येशू आला.

प्रतिमा पुसून टाकणे?

उद्धार न पावलेली व्यक्ती ही मोठ्या दुर्दैवात आहे. तो अधिक “देवासमान” होण्यासाठी सरसावत आहे पण स्वत:ला मानेल तसे. यामुळे तो खूपच मागे पडला गेला आहे. देवाने त्याच्या कृपेने तारणारा दिला आहे व ही प्रतिमा उध्दार करण्याचा मार्ग पुरवला आहे. पण हा मार्ग पश्चात्ताप व विश्वास नसलेल्या सर्वांसाठी बंद आहे. हे उद्धार न पावलेल्या व्यक्तीला खूपच मागे टाकते कारण ती पश्चात्ताप न करण्याविषयी हट्टी असते. तो स्वत:साठी दोनच गोष्टी मिळवू शकतो. तो स्वत:हून देवासमान होण्याचे प्रयत्न चालूच ठेवील किंवा देवाच्या प्रतिमेचे असणे ही संकल्पनाच पुसून टाकण्याचे प्रयत्न तो करील.
आपण अशा काळात जगत आहोत की हा दुसरे धोरणच अधिक पुकारले जात आहे.

नास्तिकवाद: देवच नाही त्यामुळे त्याची प्रतिमाच नाही.
उत्क्रांतीवाद: विश्व ही एकच गोष्ट होती व ती सर्वकाळ असेल.
निधर्मवाद: ज्ञानाचा मार्ग हा देवविरहीत संस्थेमध्ये आहे.
एलजीबीटी: पूर्वीच्या राजाची सर्व चित्रे फाडून फेकून टाका.

जेव्हा बंडखोर लोक राजापर्यंत प्रत्यक्ष पोचू शकत नाहीत तेव्हा स्वाभाविकपणे ते एकच गोष्ट करतात ते त्या राजाची चित्रे प्रतिक म्हणून जाळून टाकतात. आणि आपण सध्या याच्याशीच सामना करत आहोत.

आपण काय करू शकतो

सुरुवातीस मी म्हटले की आपण काही करू शकत नाही असे आपल्याला वाटते. पण हे अजिबात खरे नाही. आपण दावे करून किंवा पत्रकांवर सह्या करून काही करू शकत नाही – आणि हे सत्य आहे. पण आपण काहीतरी करू शकतो. टक्कर देण्याचा कोणता मुद्दा आहे?

जगातील संस्कृती ही ख्रिस्ती विवाहाच्या विरोधात आहे कारण त्याद्वारे आपण देवाची प्रतिमा हळूवारपणे सादर करतो आणि तरीही त्यांच्यासाठी ती उच्च स्वराने बोलते. म्हणून आपण ती जितक्या मोठ्याने सांगता येईल तितकी सांगितली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला दिलेले साधन आहे शुभवर्तमान.

पित्याने वराला या जगात पाठवले आहे यासाठी की त्याने वधूची सुटका करून तिला मिळवावे. हे त्याने वधस्तंभावर प्राण देवून, कबरीमध्ये पडून, तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठून व स्वर्गारोहण करून पित्याच्या उजव्या हाताशी बसून आणि ही वधू तयार करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवून पूर्ण केले.

जेव्हा आपण हे धैर्याने प्रसिध्द करतो आणि तसे करणे आवश्यक आहे (इफिस ६:१९-२०) तेव्हा या सर्व योजना संपुष्टात आणण्यास हे पुरेसे आहे.