दिसम्बर 12, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

चांगल्या रीतीने चहाड्या कशा कराल? कोल डाईक

लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी काय बोलतात याबद्दल तुम्ही कधी  विचार करता का?
कधी कधी तुम्ही जवळ असताना लोक आपसात कुजबुज करतात तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. आणि वाटते: मी काहीतरी केले की काय? आपले मन भरकटत जात राहते. कधीकधी इतरांच्या गप्पांचा आपण विषय आहोत अशा कल्पनेने तुमचा सर्व दिवस खराब होऊन जातो.
याकोब म्हणतो, “ कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही” (याकोब १:१३). आपल्या एकमेकांशी होणाऱ्या गप्पा या देवाशी जे आपले बोलणे होते त्यामध्ये मुळावलेल्या असतात. मंडळीच्या लोकांमध्ये होणाऱ्या चहाड्यांविरुद्ध आपली बोथट कुऱ्हाड उगारण्यापूर्वी याकोब ती आपल्या देवाबद्दलच्या गप्पांकडे वळवतो. या निषेधाचे ओझे चुकीच्या कृतीवर पडत नाही तर देवासंबंधी जे चुकीचे बोलणे आहे त्यावर पडते. आज्ञा आहे की: “देवाबद्दल तसे बोलू नका.”

आपण काय सबब देतो?

पहिली मंडळी त्यांचे पाप उघडे केल्यावर ते पाप कबूल करण्याऐवजी देवाविरुद्ध बोलत होती. आणि कदाचित “देवाने मला मोहात घातले” हेच शब्द तुमच्या ओठातून कदाचित बाहेर पडले नसतील पण माझ्यासारखेच या नेहमीच्या सबबी तुम्हीही दिल्या असतील.
जर देवाने माझ्या जीवनात ही परीक्षा घातली नसती तर मी पाप केले नसते.
जर देवाने मला जास्त जबाबदारी दिली असती तर मी आळसाचे पाप केले नसते.
जर देवाने मला कमी जबाबदारी दिली असती तर मी काळजी करण्याचे पाप केले नसते.

आपल्या मंडळ्या, लहान गट आपण सर्वोच्च देवाला कलंक लावणाऱ्या गप्पा मारणारी मंडळे तयार करतो. याच मूलभूत पायावरून याकोब आपल्या परिचयाच्या म्हणजे इतरांना दूषण देणाऱ्या गप्पाकडे आता विषय नेतो. “आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे” (याकोब १:२६). आणि  “जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे….तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो” (याकोब३:६-९).

चहाडीच्या विरुद्ध काय आहे

प्रेषित पौलासाठी चहाडी (कोणाविरुद्ध बोलणे) हा सैतानाचा दोष देणारा प्रकार आहे. फिलीपैकरांस लिहिलेल्या जबरदस्त पत्रात पौल मंडळीला एकतेसाठी उत्तेजन देतो व हे करताना कमालीच्या नम्रतेची आज्ञा देतो. “लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना” (फिली २:३).
‘माना’ – ‘गणणे’ या शब्दाला बायबलमध्ये खूप मोलवान इतिहास आहे आणि संपूर्ण विश्व त्याच्यात गुंफलेले आहे. तो शब्द अधोरेखित करा. उदा. रोम ४:५ मध्ये पौल हा शब्द ह्याच अर्थाने वापरतो. “पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्‍यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो.”
दुसऱ्या शब्दांत ख्रिस्ताने आपल्याला दिलेले नीतिमत्त्व हे चहाडीच्या विरुद्ध असलेली गोष्ट आहे: ती अधार्मिक असलेल्या व्यक्तीला नीतिमान ठरवते. जेव्हा देव आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल बोलतो तेव्हा देवाचा पुत्र देवबापाशी आपल्याबद्दल अशा प्रकारे बोलतो की तो आपल्याला  कमी नव्हे तर पूर्णपणे नीतिमान पाहतो. ख्रिस्त आपल्यापाठीमागे आपल्या वतीने बोलतो हाच तर सुवार्तेचा पाया आहे.

तुमच्यासंबंधीचे दुष्ट आरोप

चहाड्या हे देवाने आपल्याला पांघरलेल्या नीतिमत्तेच्या विरुद्ध आहे. ते ख्रिस्ताने ज्या लोकांना नीतिमान गणले आहे त्यांना अधार्मिक गणणे आहे. चहाडी हे एक प्रकारचे अंगच्छेद करणे आहे: हे शरीरचा एखादा अवयव, हात किंवा पाय काढून टाकणे नाही तर एखाद्याचा मान, आदर तोडून टाकणे आहे. चहाडी ही सैतानी जीभ आहे.
देवाच्या राजासनाकडे सैतान तुमची पापे, अपयश, संघर्ष यांच्या आरोपांनी भरलेली एक प्रचंड मोठी पोतडी ओढत आणतो. याहून वाईट म्हणजे ही पोतडी तुमच्या अपराधांच्या खऱ्याखुऱ्या कहाण्यांनी भरलेली आहे. जर तुम्ही माझ्यासारखे असाल आणि सगेसोबती करत असलेल्या चहाड्यांनीच जर तुमची धडधड वाढत असेल तर ज्या सैतानाला तुमच्या सगेसोबत्यांपेक्षा खूपच काही माहीत आहे त्याला तुम्ही कसे हाताळणार?
तुम्हाला जर आपल्या जीवनातील उध्वस्त करणारी चहाडी थांबवायची असेल तर आपल्याला आपले डोळे उघडण्याची गरज आहे.  देवाचा कृपेचे जे कार्य इतरांमध्ये चालू आहे ते पाहण्याची गरज आहे आणि मग त्यांना आपल्यापेक्षा जास्त महत्त्वाचे मानण्याची गरज आहे.

चांगल्या चहाड्या

गेल्या वर्षामध्ये सैतानाचा प्रभाव आणि चाहडीचा अनंतकालिक परिणाम ह्याच्या वेदना मला अधिक वाढत्या रीतीने स्पष्ट होऊ लागल्या. पंधरा महिन्यांपूर्वी मी आयोवा येथे एका छोट्या गटासमवेत एका लहान मंडळीचे रोपण केले. जेव्हा तुम्ही लहान आणि नव्या मंडळीमध्ये सेवा करता तेव्हा असे वाटते की तुमच्या मंडळीचा समतोल हा लोक जे बोलतात त्यावर हेलकावे घेत असतो.
याकोब पहिल्या मंडळीला चहाड्या करण्यासंबंधी आणि त्याविरुध्द प्रश्न करतो, “ तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत” (३:१३). आमच्या कमकुवत  आणि नवीन मंडळीचा हाच आक्रोश आहे. आणि देवाच्या दयेने आमची मंडळी हळूहळू वाढत आहे कारण आम्ही एकमेकासबंधी ख्रिस्तासारखे कसे बोलावे हे शिकत आहोत.
ही विनंती ख्रिस्ती लोकांनी कमी चहाड्या कराव्या म्हणून नव्हे तर ख्रिस्ती लोकांनी चांगल्या चहाड्या कराव्या अशी आहे. पौल आणि याकोब सहमत आहेत की तुम्ही एकमेकांविषयी बोलणारच तेव्हा तुम्ही ख्रिस्तासारखे बोला. जेव्हा तुम्ही इतर सभासदांच्या पाठीमागे त्यांच्यासंबंधी बोलता तेव्हा ऐकणाऱ्याला त्या व्यक्तीसंबंधी वरचा दृष्टीकोन लाभावा अशी तुमच्या बोलण्याला चव आणा. जेव्हा तुम्ही चर्चच्या सभासदाच्या पाठीमागे बोलता तेव्हा त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक फळ – त्यांची प्रगती, त्यांचे ख्रिस्तासाठीचे कार्य, त्यांचे जीवन याबद्दल बोला.

दुसऱ्या शब्दांत: ख्रिस्ताने त्याची नितीमत्ता तुमच्यावर चढवली आहे का? आता तुम्ही इतरांवर आदर चढवा.

Previous Article

धडा २२.   १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग

१६८३-१७१९ लेखांक ११                                                                                                      आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा […]

जर सर्वात वाईट घडलं तर ?

वनीथा रिस्नर माझी भीती वाढत आहे असं मला जाणवलं. ती अगदी ह्रदयाची धडधड बंद करणारी, सर्वत्र व्यापून राहणारी भीती नव्हती पण  सतत कुरतडत राहणारी भीती- जेव्हा तुम्ही सध्याच्या निराशाजनक घटना पाहता आणि हे कधी बदलणार […]