दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा २९. १ योहान ५ : १३-१५ स्टीफन विल्यम्स

                                                                                  खात्री आणि धैर्य

ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात, आत्मविश्वास ही हवीहवीशी वाटणारी बाब असते का? ख्रिस्ती व्यक्तीला तिच्या देवासमोरच्या योग्यतेची जर तुम्ही हमी दिली तर ती आज्ञापालन गृहीत धरणार नाही का? आत्मविश्वासखात्री यामध्ये कोणता फरक आहे?

या अभ्यासात आपण पाहणार आहोत की आपल्याला सार्वकालिक जीवनाविषयी खात्री असावी अशी देवाची इच्छा आहे. त्यामुळे आपण त्याला विनंत्या सादर करताना त्या धैर्याने सादर करू.

शास्त्राभ्यास

खात्री

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांस सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांस कळावे म्हणून मी हे तुम्हांस लिहिले आहे
(१ योहान ५:१३).
ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला खरे जीवन सापडल्याविषयी व देवाच्या पुत्राविषयी देवाने दिलेल्या साक्षीबद्दल बोलल्यानंतर आता योहान खात्रीसंबंधात बोलत आहे. १३ व्या वचनात आपल्याला    त्याच्या या पत्रातील विषयाचे सार आढळते. पण हे पत्र व योहानाचे शुभवर्तमान याकडे तुलनात्मक पाहून आपल्यासाठी योहानाच्या लिखाणाचा जो विस्तृत उद्देश आहे त्याचा आपण शोध घेऊ.
• योहानाच्या शुभवर्तमानात त्याचा असाच उद्देश असल्याचे विधान आढळते ( योहान २०:३१).
ते सांगते की जे विश्वास ठेवीत नाहीत अशांसाठी लिहिणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
तुम्ही विश्वास ठेवावा या कारणास्तव ख्रिस्ताची कृत्ये व कार्याचा काळजीपूर्वक संग्रह करणे हा लिखाणाचा उद्देश आहे.
विश्वासाचा मुद्दा विश्वास नव्हे तर जीवन आहे.
•  आता पत्राशी तुलना करा (१ योहान ५:१३).
हे अविश्वासी जनांना नव्हे तर विश्वासी जनांना लिहिले आहे.
आणि उद्दिष्ट विश्वास ठेवणे किंवा स्वीकारणे हे नसून त्यांना प्राप्त झाल्याचे ओळखणे हे आहे.
विचार हा आहे की विश्वासीयांनी योहानाचे पत्र वाचावे आणि समजून घ्यावे की येथे आताच त्यांना ख्रिस्तामध्ये असलेले सार्वकालिक जीवन प्राप्त झाल्याच्या वास्तवाची खात्री पटावी.
•जॉन स्टॉट हे छान मांडतात: योहानाचे शुभवर्तमान व योहानाचे पत्र यांचे उद्दिष्ट एकत्र केल्यास योहानाच्या उद्दिष्टाच्या चार पायऱ्या समोर येतात त्या अशा – वाचकाने ऐकावे, जे ऐकले त्यावर विश्वास ठेवावा, विश्वास  ठेवल्यावर जिवंत व्हावे, आणि जिवंतच राहणार असल्याचे जाणून घ्यावे.
• जर तुम्ही कोणाला तारणाविषयीची खात्री दिली तर त्यात एक धोका असा आहे की त्यामुळे तुम्ही त्यांचे तारण  व त्यांचे आज्ञापालन गृहित धरल्याची जोखीम घेता.
पण योहान जी खात्री देत आहे ती कोणत्या तरी एका क्षणी एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयावर आधारित नाही. किंवा “तू येशूला कबुली दिली आहेस का? तर मग तुला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” अशी त्याला देण्यात आलेल्या खात्रीवर पण आधारित नाही. कोणीही कोणालाही तारण झाल्याची हमी देण्याचा परवाना योहान देत नाही
तर उलट हमी ही आहे की “तुम्ही आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे हे स्वत: ओळखावे.” आणि हे तुम्ही कसे ओळखू शकता? काही तरी कबुली देण्याने नव्हे. तर जीवनातील  लक्षणांवरून: विश्वास, आज्ञापालन व प्रीती. ही या पुस्तकाची दिशा आहे.
• उद्दिष्ट हे आहे की कोणतीही शंका न घेता त्याच्या किंवा तिच्या जीवनात देवाच्या चालू असलेल्या कार्याच्या पुराव्यांवर आधारित, त्याला आपले तारण झाले असल्याची खात्री पटावी. देवाची इच्छा आहे की आपण    विश्वास ठेवावा, त्याच्यावर शंका घेऊ नये.

खात्री

त्याच्यासमोर येण्यात आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे (५:१४,१५)

आपल्या खात्रीचा परिणाम काय होतो?
जेव्हा आपण शंका घेतो तेव्हा केवळ आपल्या मन व भावनांच्या स्थितीवरच परिणाम होत नाही तर आपल्या देवाशी असलेल्या नातेसंबंधांवरही परिणाम होतो. जर मी ख्रिस्ती असेन आणि मला खात्री  नसेल तर ख्रिस्ताशी मोकळेपणाने सुसंबंध राखण्यात मला अडथळे येतील.
आणि जर मी मोकळेपणाने त्याच्याशी सुसंबंध ठेवत नसेन, व खरेपणाने त्याच्यावर विसंबून राहत नसेन, तर जगण्यासाठी मला रोज जे सामर्थ्य हवे आहे ते मला उपलब्ध होऊ शकणार नाही. आनंद,  देवाप्रीत्यर्थ फळ देणे, उपयुक्त असणे यावर परिणाम होईल.
अशा प्रकारे आपण देवाच्या ठायी खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे की ज्यामुळे आपण प्रार्थनेत त्याच्याजवळ धैर्याने जाऊ शकू. त्यामुळे देव जसजशी आपल्या प्रार्थनांची उत्तरे देईल तसतसे देव आपल्या जीवनात कार्यरत असल्याचे आपण पाहू शकू.
• देवाजवळ “धैर्याने” जाण्यातून आपल्याला सार्वकालिक जीवन असल्याचे व्यक्त होते. अखेर येशूने सार्वकालिक जीवनाची व्याख्याच नातेसंबंध अशीच केली आहे (योहान १७:३).
ख्रिस्ती व्यक्तीचे धैर्य ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासाठी आहे (२:२८).
ख्रिस्ती व्यक्तीचे धैर्य येणाऱ्या न्यायासाठी आहे (४:१७).
पण ख्रिस्ती व्यक्तीचे धैर्य येथे आतासाठी देखील आहे (५:१४).
•  येथे संदर्भ प्रार्थनेचा आहे हे नक्की (वचन १४).
येथे आपल्या धैर्याची व्याप्ती पाहा: आपण जे काही मागतो.
पण हे लक्षात घ्या की जगातील आपल्याला हवे असेल ते “काहीही” नव्हे तर त्या काहीहीचे वैशिष्ट्य दिले आहे. अट आहे की त्याच्या इच्छेप्रमाणे.
۰ १ योहान ३:११ मध्ये अट आहे, आज्ञापालन  व त्याच्या वचनावर प्रेम.
۰ येथे त्याची इच्छा ही अट आहे.
۰ देव आपल्याला खरोखर असलेल्या इच्छांचा त्याग करायला सांगत आहे का? आणि आपल्याला मागायची परवानगी आहे तेवढेच मागायला    सांगत आहे का? हा विचार आहे  का? (चर्चा करा)
ᵒ नाही. रोम १२:२ – देवाच्या वचनाने रूपांतर होण्याशी तुम्ही समरूप होत असाल तर देवाच्या इच्छेचे सौंदर्य तुमच्या दृष्टीस पडू लागेल. “ती   उत्तम,  ग्रहणीय व परिपूर्ण” असल्याचे तुम्हाला आढळेल.
ᵒ ख्रिस्ताने पुरेपूर भरलेल्या व्यक्तीची इच्छा बदललेली असते – आपण उत्तम गोष्टींची इच्छा धरू लागतो.
ᵒ आपल्याला जे खरोखर हवे आहे त्याचा देव आपल्याला त्याग करायला लावत नाही, तर खऱ्या अर्थाने आपण विश्वासूपणे त्याच्या समागमे        चालावे अशी तो इच्छा करतो; यासाठी की आपल्याला खऱ्या अर्थाने सार्वकालिक मोलाचे काय आहे ते दिसावे व अशाच गोष्टी प्राप्त       करण्याची तीव्र इच्छा व्हावी.
ᵒ देवाला गौरव देणाऱ्या गोष्टींसाठी प्रार्थना करण्याचे आपल्याला जितके अधिक  समजेल, तितकी अधिक उत्तरे आपल्याला मिळत  असल्याचे दिसू लागेल.
ᵒ याकोब ४:३; स्तोत्र ३७:४
۰आपला आदर्श तर ख्रिस्त आहे (लूक २२:३९-४४). जॉन स्टॉट: आपली प्रार्थना म्हणजे देवावर आपल्या इच्छा लादण्याचे किंवा आपल्या इच्छेपुढे त्याची इच्छा झुकवण्याचे साधन नव्हे; तर त्याच्या इच्छेच्या अधीन आपली इच्छा आणण्यासाठी लावून दिलेला मार्ग आहे.”
देवासमोर धैर्याने येण्याचा परिणाम लक्षात घ्या –
۰ वचन १४: तो आपले ऐकतो.
۰ वचन १५: आणि जेव्हा तो ऐकतो तेव्हा आपल्याला कळते की आपल्या विनंत्यांना उत्तर देण्यासाठी तो ऐकत आहे. हे आता किंवा भावी काळी देईल. आपल्या अपेक्षेप्रमाणे ते उत्तर नसेल; पण तो त्याच्या ज्ञानाने व त्याच्या इच्छेत ते उत्तर देईल.
۰आपल्या देवाविषयी येथे काय सांगितले आहे? आपल्या प्रार्थनांना तो उत्तर देऊ इच्छितो. धैर्याने प्रार्थना करा. नित्यनेमाने प्रार्थना करा. आणि प्रथम प्राधान्याने त्याने सार्वकालिक जीवन दिले आहे याची खात्री बाळगा. म्हणजे त्याच्यासमोर येताना तुमच्या धैर्यास अडखळण होणार नाही.

चर्चा व मननासाठी प्रश्न
काही वेळा प्रार्थनेची उत्तरे मिळत नाहीत. याच्या कारणांवर चर्चा करा.

Previous Article

देवाची प्रीती लेखक: जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

Next Article

असहाय, गरजू असे चर्चला या लेखक : जॉन पायपर

You might be interested in …

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स लेखांक ६ (ऑक्टोबर २०१७ मध्ये व्हिटेनबर्ग येथे  ५०० व्या धर्मजागृतीच्या स्मृतीदिनाच्या परिषदेत हा निबंध सादर केला गेला.) अँग्लिकन ही खेदाची गोष्ट आहे की अँग्लिकन मंडळी देवाच्या वचनापासून दूर राहिली. याचे पुरावे देता येतील. […]

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग

१६८३-१७१९ लेखांक ११                                                                                                      आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा […]

इतरांचे भले चिंता

ग्रेग मोर्स माझ्या पत्नीवर त्या पापाचा परिणाम पाहीपर्यंत मला ते दिसतही नव्हते. इतकी उत्साही, बालसदृश, तडफदार, असणारी ती आता सहजतेने विनोद करेना, तिचे हास्य मावळले. ती शांत झाली, तिच्यातला जोम कमी झाला, ती पूर्वीची राहिली […]