प्रीती
आता आत्म्याच्या फळातील एका पैलूवर विचार करू या. प्रीती. ख्रिस्तावर विचार केल्याने आपल्याला प्रीतीकडे कसे नेले जाते? त्यासाठी १ योहान ४:७-११ ही वचने पाहू या.
“प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे; जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.”
अ) प्रीतीचा उगम देव आहे. (व. ७अ)
प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे.
* प्रीती करावी ही आज्ञा आहे. ह्या आज्ञेचे कारण काय? कारण प्रीती देवापासून आहे.
* जर देव अस्तित्वात नसता तर प्रीती अस्तित्वात नसती. मानव म्हणून आपल्यामध्ये देवाच्या प्रतिमेचा
एक भाग आहे तो म्हणजे प्रीती व्यक्त करण्याची कुवत.
* देवाने प्रीती व्यक्त केली असल्याने जर कोणी देवाला प्रदर्शित करण्याचा दावा करतो तर त्याने प्रीती
दाखवली पाहिजे.
ब) सर्व ख्रिस्ती लोकांकडून प्रीतीची अपेक्षा आहे.
जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे (व: ७, ८ब).
ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रीती का आवश्यक आहे?
प्रथम ती आज्ञा आहे. पण त्याहून खोलवर पहिले तर या वचनात दोन कारणे दिसतात.
नवा जन्म- तो देवापासून जन्मलेला आहे. योहानाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. आध्यात्मिक रीतीने ही देवाची मुले आहेत. ती त्यांच्या बापासारखी दिसतील. देव प्रीती आहे म्हणून ती प्रीती करतील. जशी माझी मुले माझ्यासारखी आणि माझ्या पत्नीसारखी दिसतात.
देवाशी ओळख- (व ८). ज्याच्याशी तुमची दाट ओळख असते त्याच्या चारित्र्याचा तुमच्यावर परिणाम होतो. जर तुम्ही देवाशी ओळख आहे असे म्हणता तर तुम्ही प्रीती करालच.
* खरंतर तुमची देवाशी ओळख नसेल तर तुम्ही प्रीती करूच शकत नाही. आणि जर तुम्ही देवाला ओळखता तर तुम्हाला प्रीती न करता येणे शक्यच नाही. आठवे वचन तेच सांगत नाही का?
* का? कारण देव प्रीती आहे. सर्वात महान गुण प्रीती आहे आणि देव तो पूर्णपणे आणि परिपूर्णतेने व्यक्त करतो. म्हणून देव हा प्रीतीचा उगम आहे आणि जो त्याला ओळखतो तो प्रीती करीलच.
* आणि जो देवाला ओळखत नाही त्याला देव करतो तशी प्रीती कधीच करता येणार नाही. त्याच्या प्रेमात नेहमीच कमतरता असणार.
हेच आत्म्याच्या इतर नऊ पैलूंबाबतीत खरे आहे. ज्याला जीवनाच्या मार्गात आनंद नाही त्याला देवाशी ओळख नाही कारण देव प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे.
२. प्रीतीचे उदाहरण: सुवार्ता
“देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे  ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले” (व. ९-१०).
पण प्रीती काय आहे ? आपल्याला असे दिसेल की खऱ्या प्रीतीचे ख्रिस्ताच्या बाहेर अस्तित्वच नाही.
होय प्रीतीच्या सावल्या आहेत. पण त्या अपयशी आहेत. ख्रिस्ताच्या बाहेर असलेली सर्वात उत्कट प्रीतीची गोष्ट ही अपुरी आहे. फसू नका. येशूच्या बाहेर तुम्हाला खरी प्रीती कधीही सापडणार नाही.
*तुम्हाला वाटेल की तुम्हाला तृप्त करणारे मानवी प्रेम सापडेल पण मानवी प्रेम कधीच टिकू शकत नाही.
असे मी का म्हणतो? कारण वचन ९ आणि १० मध्ये प्रेमाची स्पष्ट व्याख्या केली आहे.
“ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली” (व.९) “प्रीती म्हणावी तर हीच” (व. १०) प्रीतीची व्याख्या सुवार्तेच्या प्रीतीने केली आहे.
अ सुवार्तेची प्रीती ही अनुभवाद्वारे दाखवली आहे 
ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली (व. ९अ).
फक्त शब्दांनी नव्हे (३:१८) तर प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवली आहे. “आपल्यावरील प्रीती.” आपण त्याची सत्यता अनुभवू शकतो. ही खरी प्रीती आहे.
ब. सुवार्तेची प्रीती ही मोफत आहे, उदारपणे दिली आहे
देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे (व. ९अ).
देव त्याची प्रीती मोफत देऊन ती स्पष्ट करतो – ही अदलाबदल नाही, जबरदस्ती नाही.
‘एकुलत्या एका’ हा शब्द पाहा. देवाने राखून ठेवले नाही. त्याने त्याला या जगात पाठवले. त्याने काहीच मागे ठेवले नाही.
क. सुवार्तेच्या प्रीतीमध्ये खरी सेवा येते.
“ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे”  (९क).
“तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले” (१०ब).
येशूला पाठवून देवाने जी प्रीती प्रकट केली तीची आपल्या फायद्यासाठी रचना केली होती.
असे म्हटले आहे की प्रीतीची व्याख्या म्हणजे आपल्या प्रीतीचा जो विषय त्याला तृप्त करण्यात आनंद शोधणे. ही व्याख्या शुभवर्तमानातच खरी पूर्ण होते.
आपल्याला जीवन मिळावे अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने आपल्यावर असलेला क्रोध दूर केला. ही प्रीती आहे. त्यामध्ये शुद्ध ध्येय आहे. त्या ध्येयासाठी त्याने स्वत:ला संपूर्ण वाहून घेतले,- त्यासाठी त्याने लागेल ती सर्व किंमत भरली.
ड. या प्रीतीची तिच्या विषयापासून काहीही अपेक्षा नाही.
प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली (व. १०).
*आपला स्वभाव प्रेमळ आहे म्हणून काही देवाच्या प्रीतीला प्रेरणा मिळाली नाही.
*खरं तर आपल्यामध्ये प्रीतीचा अभाव होता तरी त्याने आपल्यावर प्रीती केली. काही सबब दिली नाही. जरी तू माझ्यावर प्रेम करत नाही तरी मी सर्वस्वाने तुझी खरी सेवा करीन.
*असली प्रीती शुभवर्तमानाच्या बाहेर तुम्हाला दिसते का? कदापि नाही.
३. प्रीतीचे सामर्थ्य: देवाशी नाते 
“प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे” (व.११).
या परिच्छेदाच्या शेवटी एक आग्रहाचे आव्हान दिले आहे. योहान येथे तुम्ही प्रीती केलीच पाहिजे असे न म्हणता ही आवश्यकता आहे असे म्हणतो. ख्रिस्ती लोकांना मिळालेल्या नव्या स्वभावाचे हे कर्तव्य आहे. आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे.
जसे गाडीचे इंजिन गाडीला ओढ्तेच, जसा पक्षी उडायलाच हवा, जसा आंबा रसाळ हवाच; तसे तुम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. का? कारण देवाने आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली आहे. तुमच्या प्रीतीची विहीर काठोकाठ भरली आहे. आता ती वाहू द्या.
*आपण आपल्याला काय नाही, आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करतो, आणि सर्वस्वाने प्रीती न करण्यास या सबबी सांगतो.
* येथे क्रांतिकारी सत्य आहे. ख्रिस्तामध्ये तुम्ही देवाच्या सुवार्तेची प्रीती अनुभवली आहे त्यामुळे तुमच्यावर पूर्ण प्रीती केली गेली आहे. तुम्हाला प्रीती न करायला काहीच कारण नाही. जेव्हा तुम्ही प्रीतीमध्ये अडखळता तेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे परत या आणि लक्षात ठेवा की देवाची प्रीती तुमच्यावर स्थिर आहे. – खरी प्रीती, प्रीतीची पूर्णता (सावली) नाही. ही देवाची प्रीती आहे. मी प्रीती का करणार नाही?
हेच तुम्हाला आत्म्याच्या फळाच्या सर्व नऊ पैलूंबाबत तुम्हाला आढळेल.
जसे तुम्ही ख्रिस्त आणि तुमच्यासाठी त्याने केलेले काम विचार यावर करता तेव्हा तुम्हाला त्याचे उदाहरण फक्त दिसत नाही. तर तो तुमच्याशी कसे वागतो हे पाहून प्रीती, आनंद , शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन तुमच्यामध्ये असण्याचे कारण तुम्हांला समजेल.
कारण ख्रिस्त असा आहे म्हणून नाही तर तो तुमच्याशी असा आहे म्हणून. आता तुमच्या चुका, कमतरता न लाजता कबूल करा. आणि येशूकडे पाहा व त्याच्या कृपेमध्ये वाढा.




 
	 
		 
		 
			 
			 
			 
			 
			
Social